Type Here to Get Search Results !

एकादशी महात्म्य मराठी | सफला एकादशी 2022 व्रत कथा |

ब्रह्मांड पुराणामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि महाराज युधिष्ठिर यांच्या संवादामध्ये सफला एकादशीचे माहात्म्य वर्णन केले आहे. एकादशी महात्म्य मराठी मध्ये वाचा.  सफला एकादशी 2022 ही 19 डिसेंबर ला येत आहे. तर इथे पाहूया सफला एकादशी व्रत  कथा मराठीमध्ये..

एकादशी महात्म्य मराठी | सफला एकादशी 2022 व्रत कथा |
एकादशी महात्म्य मराठी | सफला एकादशी 2022 व्रत कथा |

एकादशी महात्म्य मराठी 

  • सफला एकादशी व्रत कथा 

( पौष, कृष्ण पक्ष,सफला एकादशी १९ डिसेंबर २०२२)
महाराज युधिष्ठिर नी विचारले, "हे वासुदेव। पौष महिन्याच्या कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या एकादशीचे नाव काय आहे ? हे व्रत कशा प्रकारे करतात? कोणत्या देवतेची पूजा करतात ? कृपया याविषयी आपण मला विस्तृत रूपाने सांगावे."

भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिर राजास म्हणाले, "हे राजेंद्र मोठमोठे यज्ञ संपन्न केल्याने होणाऱ्या आनंदापेक्षा या एकादशी व्रताचे पालन केल्याने मला होणारा आनंद पुष्कळच महान आहे. त्यामुळे यथाशक्ति प्रत्येकाने हे व्रत करावे. विधिपूर्वक यादिवशी एकादशी व्रत करावे. भगवान श्रीनारायणांची पूजा करावी. 


ज्याप्रमाणे नागांमध्ये शेषनाग, पक्ष्यांमध्ये गरुड, देवतांमध्ये श्रीविष्णू आणि मानवांमध्ये ब्राह्मण श्रेष्ठ आहेत, त्याचप्रमाणे सर्व व्रतांमध्ये ही एकादशी तिथी श्रेष्ठ आहे. राजन् सफला एकादशी दिवशी नाममंत्राचे उच्चारण करीत फळे अर्पण करून भगवान श्रीहरींची सेवा करावयास हवी. 



नारळ, सुपारी, लिंबू, डाळिंब, चांगले आवळे, लवंगा, बोरे तथा आंबे इत्यादी फळे अर्पण करून श्रीहरींची पूजा करावी. धूप-दीप अर्पून भगवंतांची अर्चना करावी. सफला एकादशीस विशेष करून दीपदान करण्याचे विधान आहे. रात्री वैष्णवांच्या संगतीमध्ये भगवत्कथा, कीर्तन करीत जागरण करावे. सहस्त्रो वर्षे तपस्या करून जे फळ प्राप्त होत नाही ते केवळ या दिवशी जागरण केल्याने प्राप्त होते. "

"हे नृपश्रेष्ठ ! आता या सफला एकादशीची शुभदायी कथा ऐक. प्राचीन काळी चम्पावती नावाची सुंदर नगरी होती. कोणे एके काळी ती महाराज माहिष्मतांची राजधानी होती. राजर्षी महिष्मतांना पाच पुत्र होते. त्यातील जो ज्येष्ठ पुत्र होता, तो नेहमी पाप कर्मामध्ये रत होता. तो परस्त्रीगमन करणारा आणि वेश्यासक्त होता. त्याने आपल्या पित्याचे सर्व धन पापकर्मामध्ये नष्ट केले. तो नेहमी दुराचारी आणि ब्राह्मणांचा निंदक होता. वैष्णवांची आणि इतर देवतांची देखील तो नेहमी निंदा करीत होता. ( एकादशी महात्म्य मराठी )

आपल्या मुलाचे असे पापाचरण पाहून माहिष्मत राजाने त्याचे नाव लुम्भक असे ठेवले. काही दिवसांनी पिता आणि इतर भावांनी मिळून त्याला राज्यातून बाहेर जायला सांगितले. लुम्भक त्यानंतर तो गहन वनामध्ये निघून गेला. आणि तिथेच राहून तो येणाऱ्या जाणाऱ्या नगरवासीयांना लुटू लागला. 

एक दिवस चोरी करण्यासाठी तो नगरामध्ये गेला. तेव्हा त्याला सैनिकांनी पकडले. परंतु जेव्हा त्याने शिपायांना सांगितले की मी माहिष्मत राजाचा पुत्र आहे, तेव्हा तिथे त्यांनी त्याला सोडून दिले. तेव्हा तो पापी परत वनामध्ये आला आणि मांस, फळे भक्षण करून जीवन निर्वाह करू लागला. त्या दुष्टाचे विश्रामस्थान पिंपळाच्या वृक्षाखाली होते. तो अतिशय प्राचीन वृक्ष होता. त्या वनामध्ये तो वृक्ष म्हणजेच एक महान देवता मानली जात असे.

पुष्कळ दिवसानंतर एक दिवस संचित पुण्यांच्या प्रभावाने त्याने नकळत एकादशी व्रताचे पालन केले. पौष महिन्यातील कृष्ण पक्षाच्या दशमी दिनी पापीष्ठ लुम्भक झाडांची फळे खाऊन आणि वस्त्रहीन असल्यामुळे रात्रभर थंडीमुळे झोपूच शकला नाही.  ( सफला एकादशी व्रत कथा )

जवळ जवळ तो मुर्च्छितच झाला होता. सूर्योदय झाला तरी त्याला कळले नाही. 'सफला एकादशी दिवशी देखील लुम्भक मुर्च्छित राहिला. मध्यान्ह झाल्यानंतर तो शुद्धीवर आला. त्यानंतर उठून इकडे तिकडे पाहत एखाद्या लंगड्या व्यक्तिप्रमाणे चालत तो दाट वनामध्ये निघून गेला. तो भुकेमुळे कासावीस झाला होता. 

हे राजन् ! त्यावेळी पुष्कळ फळे घेऊन लुम्भक विश्राम स्थानावर परतला. त्याचवेळी सूर्यास्त झाला. त्यामुळे ती फळे वृक्षाच्या खोडामध्ये ठेवली आणि प्रार्थना केली की भगवान लक्ष्मीपती विष्णू या फळांचा स्वीकार करोत. असे म्हणून त्याने रात्री झोप घेतली नाही. 

त्यामुळे नकळत त्याच्याकडून व्रताचे पालन झाले. त्यावेळी आकाशवाणी झाली, "हे राजकुमार ! 'सफला एकादशीच्या प्रसादामुळे तुला राज्य आणि पुत्र प्राप्त होईल." त्यानंतर त्याच्यामध्ये परिवर्तन झाले. 

त्यावेळेपासून त्याने आपली बुद्धी भगवान श्रीविष्णूंच्या भजनामध्ये लावली. त्यानंतर तो आपल्या वडिलांकडे परत आला. वडिलांनी त्याला संपूर्ण राज्य दिले. अनुरुप राजकन्येशी विवाह करून त्याने अनेक वर्षे उत्तम राज्य केले. भगवान श्रीविष्णूंच्या वरदानाने त्याला मनोज नामक पुत्र प्राप्त झाला. 

ज्यावेळी तो पुत्र राज्यकारभार पाहण्यासाठी योग्य झाला तेव्हा राज्याची कोणतीही आसक्ती न ठेवता लुम्भकने राज्याचा त्याग केला आणि त्याने भगवान श्रीकृष्णांची शरण घेतली. अशा प्रकारे सफला एकादशीच्या व्रताच्या प्रभावाने त्याने या जन्मात सुख प्राप्त तर केलेच, त्याच समवेत मृत्युनंतर त्याने मोक्ष प्राप्तीदेखील केला. या सफला एकादशीच्या पालनाने आणि व्रताचा महिमा ऐकल्याने मनुष्यास राजसूय यज्ञ केल्याचे फळ प्राप्त होते.


निस्कर्ष:-
या लेखामध्ये आपण बघितल एकादशी महात्म्य मराठी | सफला एकादशी व्रत कथा. ही सर्व माहिती अनेक स्त्रोत वरून उपलब्ध केली आहे तर आपल्याला माहीत कशी वाटली ते कॉमेंट मध्ये नक्की कळवा आणि ही माहिती सर्वांना शेअर करायला मात्र विसरू नका. खाली व्हॉट्सॲप, फेसबुक चे बटण आहेत त्यावर क्लिक करून ही पोस्ट सर्वांना शेअर करा. धन्यवाद.

FAQ:- 
प्रश्नोत्तरे:-
१. एकादशीचा अर्थ काय?
11वी तिथी, किंवा चंद्र दिवस म्हणजे एकादशी. अकरावी तिथी म्हणजेच मेण आणि मावळत्या चंद्राच्या अचूक टप्प्याशी निगडित आहे. चंद्र हा महिन्याच्या तेजस्वी अर्ध्यामध्ये, एकादशीचा चंद्र अंदाजे 3/4 पूर्ण दिसेल तसेच चंद्र महिन्याच्या गडद अर्ध्यामध्ये, एकादशीला चंद्र सुमारे 3/4 गडद दिसत असतो.

२. एका वर्षात किती एकादशी येतात?
एका वर्षात एकूण २३ एकादशी येतात कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष मिळून २३ एकादशी व्रत एका वर्षात येतात.

३. सफला एकादशी कधी आहे ?
पौष महिन्यात कृष्ण पक्ष १९ डिसेंबर ला सफला एकादशी आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad