जो परमात्मा सर्व ठिकाणी आ परिपूर्ण आहे, त्याचे विशेष स्मरण करण्यासाठी मूर्ती बनवून त्या मूर्तीत त्या परमात्म्याचे पूजन करतात त्यामुळे परमात्म्याचे ध्यान चिन्तन सुगमतापूर्वक व्हावे.
मूर्ती पूजा म्हणजे काय |
मुर्ती पूजा म्हणजे काय? Murti Pooja in Marathi
जर दगडाचीच पूजा असती तर पूजकाच्या मनात दगडाचाच भाव असायला पाहिजे तो असा की 'तू अमुक पर्वतातून निघाला आहेस, अमुक व्यक्तीने तुला घडविले, अमुकव्यक्तीने तुला येथे आणले आहे म्हणून हे दगडोबा! तुम्ही माझे कल्याण करा' परंतु असे कोणी म्हणतच नाही तर मग मूर्तिपूजा कशी ?
म्हणून भक्त लोक मूर्तीची पूजा करीत नसून मूर्तीत भगवंतांची पूजा करतात. यावरून लक्षात येते मुर्ती पूजा म्हणजे काय मूर्तीभाव मिटवून भगवद्भाव करतात. या प्रमाणे मूर्तीत भगवंताचे पूजा केल्याने सर्व ठिकाणी भगवद्भाव होतो. भगवत्पूजनाने देवाच्या भक्तीचा आरंभ होतो. भक्त सिद्ध झाल्यानंतर भगवत्पूजन होतच राहते. - मूर्ती पूजा म्हणजे काय? मूर्ती पूजा का करावी?
मूर्तीत आपल्या पूजेविषयी गीतेत भगवंतांनी म्हटले आहे की,
‘भक्तलोक भक्तिपूर्वक मला नमस्कार करीत माझी उपासना करतात' (९।१४)
जो भक्त श्रद्धापूर्वक मला पत्र-पुष्प फल जल आदी अर्पण करतो त्याने प्रेमपूर्वक अर्पण केलेली ती भेट मी खाऊ घेतो. (९।२६) देवता, (विष्णु, शिव, शक्ति, गणेश व सूर्य ह्या ईश्वर कोटीच्या पाच देवता) ब्राह्मण, आचार्य, मातापिता आदी वडील लोक आणि ज्ञानी जीवन्मुक्त महात्म्यांचे पूजन करणे हे शारीरिक तप आहे (१७-१४)
जर समोर मूर्तीच नसेल तर कोणाला नमस्कार केला जाईल? कोणाला पुष्प, पत्र, फल अर्पण करणार? आणि पूजन तरी कोणाचे करण्यार? यावरून हेच सिद्ध होते की, गीतेत मूर्तीपूजे विषयीची बात आलेली आहे.
याच प्रमाणे
- गाय,
- तुळशी,
- पिंपळ,
- ब्राह्मण,
- तत्त्वज्ञ,
- जीवन्मुक्त,
- गिरिराज गोवर्धन,
- गंगा,
- यमुना
इत्यादींचे पूजन देखील भगवत्पूजनच आहे. यांचे पूजन केल्याने सर्वत्र परमात्मा भरलेला आहे, हे फार सुलभतेने अनुभवात येते. - मूर्ती पूजा म्हणजे काय? मूर्ती पूजा का करावी?
सर्वत्र परमात्म्याचा अनुभव येण्यात गाय आदींचे पूजन फार सहायक होते. कारण पूजकाने सर्वत्र परमात्मा आहे असे मानणे तर यामुळे सुरू केले आहे. परंतु जो कोणाचेच पूजन करीत नाही, केवळ वाचाळपणा करतो त्याला सर्वत्र परमात्मा आहे असा अनुभव होणार नाही. म्हणून मूर्तीत भगवंताचे पूजन करणे कल्याणाचे, श्रेयाचे साधन आहे.
भगवत्पूजन सोडून आपल्या हाडामांसांच्या शरीराचे पूजन करणे, त्याला सुंदर सुंदर दागिने, कपडे इत्यादींनी सजविणे, घर सुंदर बनविणे, श्रृंगार करणे ही देखील मूर्तीपूजाच आहे पण ती पतनाला कारणीभूत होणारी आहे.
सारांश
भगवान् सर्वत्र परिपूर्ण आहे, असे सर्व आस्तिक बहुधा मानतात पण वास्तविक असे मानणे त्यांचेच खरे आहे की, ज्यांनी वेद, तुळसी, पिंपळ, सूर्य, गाय इत्यादींमध्ये परमात्मामानून त्यांचे पूजन सुरू केले आहे.
कारण असे पूजन सुरू केलेल्यानी सर्वत्र भगवान् आहे, सर्व प्राण्यात भगवान् आहे असे मानणे सुरू केले आहे. जे केवळ मूर्तीतच देव आहे असे मानतात.
त्यांना प्राकृत भक्त (प्रारम्भिक) म्हटले जाते.
अर्चायामेव हरये पूजां यः श्रद्धयेहते । न तद्भक्तेषु चान्येषु स भक्तः प्राकृतः मतः ।। (श्रीमद्भागवत ११।२ (४७).
कारण त्यांनी एका ठिकाणी भगवत्पूजन सुरू केले आहे म्हणून ते भगवंतसन्मुख झाले आहेत. परंतु ये केवळ 'भगवान् सर्वत्र आहेत' असे नुसते म्हणतात पण त्यांचा कोठेही आदर, श्रद्धा, पूज्य भाव नाही त्यांना भक्त म्हटलेले नाही.
कारण ते असे नुसते म्हणतात पण मानत कोठेच नाहीत म्हणून ते भगवंताच्या सन्मुख देखील झाले नाहीत. मूर्तीत भगवंताचे पूजन हा विषय श्रद्धेचा आहे. तर्काचा नव्हे.
ज्यांच्यात श्रद्धा आहे, त्यांच्या समोर भगवंताचे महत्त्व प्रकट होते. त्यांच्याकडून केली गेलेली पूजा भगवान् स्वीकारतात. त्यांच्या हातून भगवान् प्रसाद सुद्धा खातात.
जसे- कर्माबाईकडून भगवंतांनी खिचडी खाल्ली, धन्ना भक्ताच्या भाकरी खाल्ल्या, मीराकडून दूध घेतले इत्यादी. श्रद्धाभक्तीमुळे भगवान् मूर्तीत प्रकट होतात.
देव भावाचा भुकेला
न काष्ठे विद्यते देवो न शिलायां न मृत्सु च । भावे हि विद्यते देवस्तस्माद् भावं समाचरेत् ॥
(गरुड० उत्तर० २८ । ११)
- 'देवता न लाकडात असते न दगडात न मातीत, भावातच देवतेचा निवास आहे, म्हणून भावालाच मुख्य मानले पाहिजे.
- एक बैरागी बाबा होते. त्यांच्या जवळ सोन्याच्या दोन मूर्त्या होत्या. एक गणपतीची आणि एक उंदराची. दोन्ही मूर्त्या सारख्याच होत्या. बाबांना एकदा रामेश्वरला जायचे होते. म्हणून ते सोनाराजवळ जाऊन म्हणाले की, ह्या मूर्तीचे किती रुपये देशील? सोनाराने दोन्ही मूर्त्यांचे वजन केले व दोन्ही मूर्त्यांची प्रत्येकी पाचपाचशे रुपये किंमत सांगितली, तेव्हा बाबा म्हणाले 'अरे, पहात नाहीस? दोघांची किंमत एक कशी? एक मालक आहे तर दुसरी त्याचे वाहन आहे.
- जितकी किंमत मालकाची तितकीच किंमत वाहनाची (उंदराची) कशी ? सोनार म्हणाला बाबा! मी गणेश आणि उंदीर यांची किंमत नाही सांगितली मी तर सोन्याचीच किंमत सांगितली. तात्पर्य असे की, त्या बाबांची दृष्टी गणेश व उंदीर यांच्यावर तर सोनाराची दृष्टी सोन्यावर होती. म्हणजे बाबांना त्या मूर्तीचा भावगुण दिसतो तर सोनारास वस्तुगुण दिसतो.
- त्याच प्रमाणे जे मूर्त्या तोडतात त्यांना वस्तुगुण म्हणजे दगड, चांदी, पितळच दिसते. म्हणून बनून राहतात. भगवानही त्यांच्या भावनेप्रमाणे दगडच
- वास्तविक पाहिले तर स्थावर-जंगमादि सर्व काही भगवत्स्वरूपच आहे. ज्यांच्यात भावगुण अर्थात् भगवंताची भावना आहे, त्यांना सर्वकाही भगवत्स्वरूपच दिसते.
पण ज्यांच्यात वस्तुगुण अर्थात् संसाराची - जगाची भावना आहे त्यांना स्थावरजंगम अर्थात् सर्व काही अलग-अलग च दिसते. हीच गोष्ट मूर्तीच्या बाबतीतही समजली पाहिजे.
लोक श्रद्धाभावाने मूर्तीची पूजा करतात, स्तुती व प्रार्थना करतात, कारण त्यांना मूर्तीत विशेषता दिसते. जे मूर्ती तोडतात, त्यांनाही मूर्तीत विशेषता दिसते. जर विशेषता दिसली नसती तर मूर्ती तोडतेच कशाला? इतर दगडांना का नाही तोडीत? म्हणून तेही मूर्तीत विशेषता मानतात. केवळ मूर्तीत श्रद्धा-विश्वास ठेवणाऱ्याच्या द्वेषामुळे त्यांना दुखविण्यासाठीच ते मूर्ती तोडतात.
जे लोक शास्त्रमर्यादानुसार बनलेल्या मंदिरास, त्यात प्राणप्रतिष्ठा करून स्थापन केलेल्या मूर्तीना तोडतात ते तर आपला स्वार्थ सिद्ध करणे, हिंदूच्या मर्यादांचा भंग करणे, आपल्या अहंकारास व नावास कायम करणे, भग्नावशेष मूर्तीना पाहून हिंदूच्या मनात अनेक पिढयापर्यंत भावनांचा दाह निर्माण करणे यासाठी द्वेष भावाने मूर्ती तोडतात.
अशालोकांची फार भयानक दुर्गती होते, ते घोर नरकात जातात कारण त्यांची नियत च दुसऱ्यास दुःख देणे, दुसऱ्यांचा नाश करणे अशीच असते. खराब नियत असलेल्याचा परिणामही खराबच होणार. परंतु जे लोक मंदिरांची, मूर्तीची रक्षा (रक्षण) करण्यासाठी आपली पूर्ण शक्ती लावतात, आपल्या प्राणाचीही पर्वा करीत नाहीत, त्यांची नियत चांगली असल्यामुळे त्यांची सद्गतीच होते.
आम्ही एखाद्या विद्वानाचा जेव्हा आदर करतो तेव्हा त्याच्यात असलेल्या विद्येचा आदर होतो, हाडमांसाच्या शरीराचा नव्हे. त्याचप्रमाणे जो मूर्तीत भगवान आहे. असे मानतो, त्याचे द्वारा भगवंताचाच आदर झाला मूर्तीचा नव्हे. म्हणून जो मूर्तीत भगवान आहे असे मानत नाही, त्यांच्या समोर भगवंताचा प्रभाव प्रकट होत नाही. आणि जो मानतो त्याच्यासमोर प्रभाव प्रकट होतो.
मूर्तिपूजा का करावी? Murti Puja ka karavi?
- उत्तर—आपला भगवद्भाव वाढविण्यासाठी, तो जागृत ठेवण्यासाठी, भगवंतास प्रसन्न करण्यासाठी मूर्तिपूजा करावी.
- आपल्या अंतःकरणात सांसारिक पदार्थांचे जे महत्त्व ठसले आहे, त्यांच्यात आमची जी ममता-आसक्ती आहे, ती मिटविण्यासाठी देवाचीपूजा करणे, पुष्पमाला अर्पण करणे, चांगले कपडे घालणे आरती करणे, नैवेद्य अर्पण करणे - इत्यादी क्रिया फार आवश्यक आहेत. - मूर्ती पूजा म्हणजे काय? मूर्ती पूजा का करावी?
- तात्पर्य, मूर्तिपूजेने आम्हास दोन प्रकारे फायदा होतो. भगवद्भाव जागृत होऊन तो वाढतो आणि सांसारिक वस्तूवरील ममता- आसक्तीचा त्याग होतो.
- मनुष्य जीवनात कमीत कमी एक तरी जागा अशी असलीच पाहिजे की जिच्या साठी मनुष्य आपल्या सर्वस्वाचा त्याग करू शकेल.
- मग ती जागा देव असो, संत महात्मा असो, मातापिता असोत की आचार्य असोत. कारण ह्यामुळे मनुष्याची भौतिक भावना कमी होते आणि धार्मिक, अध्यात्मिक भावना वाढते.
- एकदा काही यात्रेकरू काशीक्षेत्राची परिक्रमा (प्रदक्षिणा) करीत होते. तेथील एक पंड्या त्या यात्रेकरूंना मंदिरांची माहिती देत, त्यांच्या कडून शिवलिंगाची पूजा करवीत असे व नमस्कार करायला लावी.
त्या यात्रेकरूत काही आधुनिक विचारधारेची मुले होती. त्यांना ठिकठिकाणी नमस्कार करणे आवडले नाही.
म्हणून ते त्या पंड्यास म्हणाले— पंडेजी! ठिकठिकाणी दगडावर मस्तक रगडण्याचा काय फायदा ? तेथे एक संत उभे होते.
ते त्या मुलांना म्हणाले- बंधूनो! ह्या हाडामासांच्या शरीरात जसे तुम्ही आहात, तसाच मूर्तीत देव आहे. तुमचे वय तर फारच कमी वर्षांचे आहे पण ही शिवलिंगे अनेक वर्षांची आहेत.
म्हणून वयाच्या दृष्टीने शिवलिंग तुमच्यापेक्षा कितीतरी वर्षांनी मोठे आहे. शुद्धतेच्या दृष्टीने पाहिले तर, तर हाडमांस अशुद्ध असते आणि दगड शुद्ध असतो.
हे पण वाचा:- श्री कृष्णाच्या शंखाचे नाव? | शंखाचे फायदे व प्रकार | शंख माहिती मराठी | Conch Information in Marathi
मजबुतीच्या दृष्टीने पाहिले तरी हाडांपेक्षा दगड कितीतरी मजबूत असतो. जर तुम्हाला परीक्षाच पाहायची असेल तर आपले डोके मूर्तीवर आपटून बघा. डोके फुटते की मूर्ती? तुमच्यात कित्येक दुर्गुण-दुराचार आहेत पण मूर्तीत तसा एकही नाही. तात्पर्य मूर्ती सर्वच दृष्टीनी पूजनीय आहे. श्रेष्ठ आहे.
तुम्ही लोक आपल्या नावाची निंदा झाल्यास आपलीच निंदा व स्तुती झाल्यास आपलीच स्तुती मानता. शरीराचा अनादर झाला तर आपलाच अनादर झाला व आदर झाला तर आपलाच आदर झाला असे मानता तर मूर्तीत भगवंताची पूजा, स्तुती प्रार्थना करण्याने भगवान् आपलीच ही पूजा, स्तुती आहे असे मानणार नाहीत काय? बंधूनो! सर्वलोक तुमच्या ज्या नाम-रूपाचा आदर करतात ते नाम रूप काही तुमचे वास्तविक स्वरूप नव्हे, तरी देखील तुम्ही त्यामुळे खुश होता. भगवंताचे स्वरूप तर सर्वत्र व्यापक आहे, म्हणून. -मूर्ती पूजा म्हणजे काय? मूर्ती पूजा का करावी?
मूर्तीत सुद्धा भगवंताचे स्वरूप आहे. आम्ही जर ह्या मूर्तीत भगवंताची पूजा केली तर भगवान् प्रसन्न होणार नाहीत काय ? आम्ही जितक्या तीव्र भावनेने भगवंताचे पूजन करू भगवान् तितकेच अधिक प्रसन्न होतील.
कोणीही मनुष्य जो आस्तिक आहे, तो भलेही मूर्तिपूजा करण्यास कुपथ्या सारखे दूर ठेवीत असेल, अर्थात् चुकूनही मूर्तिपूजा करीत नसेल, तरी देखील त्याच्याकडून होतच असते. कशी? तो आस्तिक असल्यामुळे वेदादी ग्रंथांना मानतो, व त्यानुसार आपले आचरण ठेवतो तर ही मूर्तिपूजाच आहे.
कारण वेद देखील (लिहिलेल्या पुस्तक रूपात असल्यामुळे) मूर्तीच आहे. वेद आदींचा आदर करणेही मूर्तिपूजाच आहे. त्याच प्रमाणे मनुष्य, गुरु, माता-पिता, अतिथी यांचा आदर-सत्कार करतो, अन्न, पाणी, वस्त्र इत्यादींना त्यांची सेवा करतो ही सर्व मूर्तिपूजाच आहे. कारण गुरू, माता-पिता यांची शरीरे तर जडच आहेत पण शरीरांचा आदर करण्यात त्याचाही आदर होतोच ज्यामुळे ते प्रसन्न होतात.
तात्पर्य मनुष्य कोठेही, ज्या कोणाचा, ज्या कोणत्या रूपाने आदर सत्कार करतो, ती सर्व मूर्तिपूजाच आहे. जर मनुष्य भावाने मूर्तीत भगवंताचे पूजन करीत असे तर ती भगवंताचेच पूजन असते.
एक बैरागी बाबा होते. ते एका छत्रीखाली राहात होते. तेथेच शालिग्रामाचे पूजन करीत. जे लोक मूर्तिपूजा मानीत नव्हते त्यांना बाबाजींचे असे करणे आवडत नसे. त्या काळी तेथे हुक साहेब नावाचा एक इंग्रज आफिसर आलेला होता.
त्या आफिसरकडे लोकांनी बाबाजी विषयी तक्रार केली की, हे बाबाजी मूर्तिपूजा करून सर्वव्यापक परमात्म्याचा अपमान करीत आहेत. तिरस्कार करीत आहेत. आफिसर क्रोधित झाला. त्याने त्या बाबानां तेथून निघून जाण्याचा हुकूम दिला.
दुसऱ्या दिवशी बाबाजींनी हुक साहेबाचा एक पुतळा बनविला व त्याला घेऊन ते शहरात फिरू लागले. रस्त्याने ते लोकांना तो पुतळा दाखवून त्या पुतळ्यास जोडे मारीत असे आणि म्हणत असे की 'ह्या हुक साहेबाला बिल्कुल अक्कल नाही, हा मूर्ख आहे.
लोक पुनः हुक साहेबाकडे गेले व त्याला सांगितले की, ते बाबाजी तुमच्या पुतळ्याला जोडे मारतात, शिव्या देतात. साहेबाने बाबाजींना बोलावले व विचारले की, "तुम्ही माझा अपमान का करीत आहात" बाबाजी म्हणाले - 'मी आपला अपमान मुळीच करीत नाही. मी तर ह्या पुतळ्याचा अपमान करीत आहे. - मूर्ती पूजा म्हणजे काय? मूर्ती पूजा का करावी?
कारण ह्या फारच मूर्ख आहे, असे म्हणून बाबजींनी पुनः पुतळ्यास जोडे मारले, तेव्हा हुक साहेब म्हणाले, 'माझ्या पुतळ्याचा अपमान करणे म्हणजे माझाच अपमान करणे आहे.' बाबाजी म्हणाले 'आपण ह्या पुतळ्यात आहातच कोठे? आपण ह्या पुतळ्यात अजिबात नसताना केवळ नावामुळेच आपल्यावर एवढा परिणाम होतो.
आमचे भगवान् तर सर्व देश, काल, वस्तू इत्यादींमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत म्हणून जो श्रद्धापूर्वक मूर्तीत भगवान् मानून त्यांचे पूजन करतो, त्यामुळे भगवान प्रसन्न होणार नाही काय? मी मूर्तीत भगवंताची पूजा करतो तर ह्या त्यांचा आदर झाला की अनादर' ? हुक साहेबानी बाबांना सांगितले की, 'जा, आता आपण मोकळेपणे पूजा – मूर्तिपूजा करू शकता.' बाबाजी आपल्या ठिकाणी निघून गेले.