Type Here to Get Search Results !

अधिक मास महात्म्य 2023 | adhik maas 2023 |

भक्तकवि मिलिंद विरचित अधिक मास माहात्म्य

अधिक मास महात्म्य 2023 | adhik maas 2023 |
adhik maas 2023

अधिक मास महात्म्य 2023


॥ ॐ श्रीपुरुषोत्तमाय नमः ॥ ॐ नमो श्रीगजवदना । गणराया गौरीनंदना । विघ्नेशा भवभयहरणा। नमन माझे साष्टांगी ॥ १ ॥ 

नंतर नमिली श्रीसरस्वती । ब्रह्मकुमारी वीणावती। जगन्माता भगवती । विद्यादात्री विश्वाची ॥ २ ॥ 

नमन तैसे गुरुवर्या । सुखनिधान सद्गुरुराया । स्मरूनी त्या पवित्र पाया । चित्तशुद्धि जाहली ॥ ३ ॥ 

थोर ऋषिमुनी संतजन । बुधगण आणि सज्जन करून तयांसी नमन। ग्रंथरचना आरंभिली ॥४ ॥ 

अधिक महिना हा मलमास। पुरुषोत्तम नाव कसे पडले त्यास । त्याचा इतिहास माहात्म्य खास। सांगे मिलिंदमाधव ॥ ५ ॥ 

वर्षाचे असती बारा महिने । परंतु एका विशिष्ट क्रमाने । तेरावा महिना येतो नेमाने ।।

अधिक मास माहात्म्य ॥। ११ ॥

कालगणनाच तशी असे ।। ६ ।। सृष्टीच्या उत्पत्तीपासुनी। वर्ष, मास, पक्ष दिनादि नावांनी । कालखंड ते प्रसिद्ध असुनी । त्यांचे त्यांचे महत्त्व असे ॥ ७ ॥ 

अधिक महिना अवचित आला। नाव रूप दैवत नाही त्याला । तेणे अशुभ अपवित्र ठरला । अधिष्ठाता कोणी नसे ॥। ८ ।।

अशा त्या मलिन मासी । कोणी न करिती शुभ कृत्यासी । सूर्य संक्रमणही न करी अशी दुर्दशा त्याची जाहली ।। ९ ।। 

कोणीच त्याला महत्त्व देईना । नशिबी आली अवहेलना । खिन्नपणे क्लेश नाना । सहन करी सर्वही ।। १० ।' 

मलमास' या नावे सर्वत्र । सर्वच करिती तिरस्कार 'सहन होईना तो धिक्कार । अश्रू ढाळी दुःखाने ।। ११ ।। 

कोणाचा काय अपराध केला म्हणुनी ऐसा जन्म मिळाला दोष देत तो दैवाला । कसाबसा काळ कंठीतसे ।। १२ ।। 

एकदा त्याने विचार केला । आणि तो विष्णुलोकीं गेला । श्रीविष्णूला त्याने सांगितला । सर्व वृत्तांत आपुला ।। १३ ।। विष्णु मनी कळवळला। मलमासासी तो म्हणाला 

अधिकमास माहा।। १५ ।।

दुःख निवारण्याला । समर्थ असे तो श्रीकृष्ण ।। १४ ।। गोलोकी चल जाऊ आपण । श्रीकृष्णासी करू सर्व निवेदन। तो होताच सुप्रसन्न्नन । चिंतामुक्त होशील तू ।। १५ ।। 

मग निघाले ते तेथून गोलोकी गेले दोघेजण घेऊनी श्रीकृष्णाचे दर्शन । मलमास पाय धरीतसे ।। १६ ।। 

श्रीविष्णूसी श्रीकृष्णाने । आलिंगिले बहु प्रेमानें। परस्परांनी अति आस्थेनें । कुशल पुसिलें बैसुनी ।। १७ ।। 

मलमासे धरिले कृष्णाचे चरण । सर्व दुःख केले कथन । गोलोकी येण्याचे कारण। विष्णूनेंही सांगितलें ।। १८ ।। 

श्रीकृष्ण प्रत्यक्ष भगवंत । परम कृपाळू दीनानाथ । शरणागतावरी वरदहस्त । ठेवी ऐसा उदार तो ।। १९ ।। 

मलमासासी धीर देऊनी । त्यासी म्हणाला चक्रपाणी। तुझे भाग्य आजपासुनी । उदया आलें जाण हैं ।। २० ।। 

आलास तूं मजला शरण । हेंच तुझ्या सदभाग्याचे लक्षण आतां यापुढें सकल जन । वंद्य मानतील तुला ।। २१ ।। विश्वातील जे जे उत्तम गुण । ते माझे ठायी असती जाण ।


अधिक मास माहात्म्य १३ ।।  adhik maas 2023

पुरुषोत्तम हे नामाभिधान । मिळालें मज त्यामुळें ।। २२ ।। 

ते उत्तमोत्तम सर्व गुण । तुजला दिले मी आजपासून । तूं झालासी पवित्र पावन । धन्य धन्य तूं जगीं ।। २३ ।। 

मी तूं झालों एकरूप। तूं झालासी कृष्णस्वरूप । देवत्व तुझें आपोआप । सिद्ध आतां जाहलें ।। २४ ।। 

यापुढें या जगतात । होशील तूं बहु प्रख्यात । माझा पूर्णांश ओतप्रोत । तुझ्यांत आतां भरला असे ।। २५ ।। 

बारा महिन्याहुनी अधिक श्रेष्ठ । अधिक महिना तूं अससी वरिष्ठ । सर्वांत तुझे स्थान विशिष्ट । तुझ्या आज्ञेत सर्वही ।। २६ ।। 

ऐसें सांगुनी कृष्ण मुरारी। अधिक मासाच्या मस्तकावरी वरदहस्त ठेवुनी नंतरी स्वतः संतोष पावला ।। २७ ।। 

मलमास झाला पुरुषोत्तम मास । आनंद झाला श्रीविष्णूस । त्यानेंही त्या अधिक महिन्यास शत शुभाशीर्वाद दिले ।। २८ ।। 

वंदन करुनी श्रीकृष्णास । दोघेही परतले वैकुंठास तेव्हांपासुनी पुरुषोत्तम मास । जगीं श्रेष्ठ ठरला असे ।। २९ ।। श्रीविष्णूच्या आश्रयाने व्रत राहिलें आनंदानें । तें आचरितां 
॥ श्रीहरिः ॥

अधिकमास माहाय ॥ १४

श्रीविष्णुकृपेनें । सकल सिद्धी लाभती ।। ३० ।। पवित्र काळ चातुर्मास । लोक करिती उपासतापास । जप तप पूजन ब्राह्मणांस । दानें देती अनेक ।। ३१ ।। 

त्या त्या पुण्याच्या प्रमाणांत । स्वर्गी सुख होतसे प्राप्त । पुण्यसंचय होता समाप्त । पुनर्जन्म घ्यावा लागतो ।। ३२ ।। 

तसें नाही पुरुषोत्तम व्रताचें । त्याचें पुण्य असे अव्यय साचें । भय नसतें जन्ममृत्यूचें । शाश्वत सद्गति लाभते ।। ३३ ।। 

पुरुषोत्तम व्रत महत्त्वाचें । साधन सकल सुखसमृद्धीचें । महिनाभर आचरिता साचें । अक्षय पुण्यलाभ होतसे ।। ३४ ।। 

यात्रेस जावें उत्तर क्षेत्रीं । स्नान करावें पवित्र तीर्थी । दानधर्म करावा यथाशक्ति । एकभुक्त: राहावे ।। ३५ ।। 

यात्रा, स्नान आणि ध्यान । उपोषण, दान, दीपपूजन। ऐसें करावे व्रताचरण । पुरुषोत्तममासीं सर्वांनी ॥ ३६ ॥ 

जे जे पदार्थ खाऊ आपण। ते ते करावे श्रीकृष्णार्पण। सदोदित असावें शुद्ध मन । विकल्प कधींही नसावा ।। ३७ ।। इतर व्रतें देती एकेक फळ । पुरुषोत्तम व्रत देतें फळें

अधिक मास माहात्म्य ।। १५ ।।

सकळ । कल्याण होतें आणि सफल । होतात सर्व कामना ।। ३८ ।। पांडव असतां काम्यक वनीं । श्रीकृष्णाचा धावा केला त्यांनीं। धावत आला तो चक्रपाणी । आणि दर्शन दिलें त्यांना ।। ३९ ।। 

पांडव म्हणाले श्रीकृष्णाला । अंतरलों राज्य ऐश्वर्याला नशिबीं हा वनवास आला । काय आतां करावें ।। ४० ।। 

तूं अमुचा कैवारी ना मग झाली अशी कां दैना। कष्ट क्लेश अनंत यातना । भोगावे कां लागती ।। ४१ ।। 

तुझ्याशिवाय अन्य कोण । त्राता आम्हां नसे जाण । गतवैभव, कीर्ति, मान, धन परत कैसे मिळेल ।। ४२ ।। 

तें ऐकुनी म्हणे भगवंत । तुम्ही करा पुरुषोत्तम व्रत। तें आणितां आचरणांत । गेलेलें सर्व मिळेल ।। ४३ ।। 

आचरितां त्या महाव्रतास। कुबेर होतो निरंतर दास । लक्ष्मीही वश होते त्यास गत साम्राज्यही लाभतें ।। ४४ ।। 

अधिक मास येता जाण एकच वेळ रोज करावें भोजन भूशय्येवरी करावें शयन । पापवासना नसावी ।। ४५ ।। 

अधिक मासाची अधिक माहिती। सांगे त्यांना रुक्मिणीपती । आणि म्हणाला तयांप्रती । अपमान व्रताचा करूं

नका ।। ४६ ।। पूर्वजन्मीं या द्रौपदीनें। अपमानिलें व्रत उद्धटपणें । ती कथा

मी संक्षेपानें। तुम्हा आतां सांगतो ।। ४७ ।। पूर्वकाळ तपोवनीं । राहात होते

एक मुनी । त्यांना सुंदर सुलक्षणी एकच कन्या होती ती ।। ४८ ।। मेधावती

तिचे नामाभिधान । ती असतां अगदीं लहान। मातृसुखास मुकली म्हणून ।

पिता तिला वाढवी ।। ४९ ।। पुढें तिचा पिताही निवर्तला। जगांतील तिचा

आधार गेला । तिच्यापुढें प्रश्न पडला । आतां काय करावें ॥ ५० ॥

बालतपस्विनी ती चतुर । मनानेंही खरीच खंबीर । तिनें न सोडितां धीर ।

शिवाराधना आरंभिली ।। ५१ ।। एकदां तिच्या आश्रमापाशीं । आले

अकस्मात दुर्वासऋषी । पाहुनी त्या तपस्विनीसी । मनीं दया

उपजली ।। ५२ ।। म्हणाले मुली तुझें दुःख समस्त । दूर व्हावया एकच मार्ग

असे फक्त । करावें तूं पुरुषोत्तम व्रत । मनोभावें निष्ठेनें ।। ५३ ।। मेधाला तें नाहीं

अधिक मास माहात्म्य ॥ १७ ॥ adhik maas 2023

पटलें । थट्टेवारी तिनें ते नेलें । दुर्वासांनी परत उपदेशिलें । असे झालें पांचदां ।। ५४ ।। 

मी आहें खरी शिवभक्त मला नको तें पुरुषोत्तम व्रत। ऐसें ती हंसत हंसत । दुर्वासांना म्हणाली ।। ५५ ।। 

क्रोधायमान झाले ते ऋषी त्यांनी शाप दिला तिसी । अपमानिले तूं व्रतासी । परिणाम घोर भोगशील ।। ५६ ।। 

पुढे तिनें उग्र तप केलें । कैलासपती मग प्रगट झाले। दर्शन देऊन तिला म्हणाले माग काय हवें तें ।। ५७ ।। 

ती म्हणे पति मिळावा पराक्रमी बलशाली, शूर, वीर नामी। देखणा आणि सद्धर्मी । हाचि देवा वर द्यावा ।। ५८ ।। 

शिव म्हणे ऐसा पंचगुणी। एकच पुरुष मी आणूं कोठुनी एकेक गुणयुक्त असे रत्नमणी। पांच पती तुज मिळतील ।। ५९ ।। 

मेधा म्हणे हे मदनारी एका पुरुषा अनेक नारी हे घडूं शकते खरोखरी परंतु वर विचित्र हा ।। ६० ।। 

पांच पतींची होतां पत्नी। हंसेच होईल माझें जनीं । म्हणुनी देवा कृपा करुनी अन्य वर मज द्यावा हो ।। ६९ ।। 

शिव बोलले मग तिला । दुर्वासांनी तुज उपदेश केला । तेव्हां हंसलीस पांच वेळां । त्याचाच हा परिणाम असे ।। ६२ ।। 

सत्य ठरेलच माझी वाणी। मात्र पुढच्या जन्मीं होशील राणी । करशील पुरुषोत्तम व्रत मनापासुनी। तेव्हांच सुखी होशील ।। ६३ ।। 

शिवाची वाणी खरी ठरली । मेधा द्रौपदीरूपें जन्मा आली। पांच पतींची पत्नी झाली । व्रताचा अपमान भोवला ।। ६४ ।। दुर्वासाची शापवाणी । या जन्मी खरी ठरूनी। पांच पतींची झाली पत्नी । याचें स्मरण असावें ।। ६५ ।।

 पुरुषोत्तम व्रत आचरितां । त्वरित फलप्राप्ति होय तत्त्वता । गतवैभव सारे येईल हाता । विश्वास मजवरी ठेवावा ।। ६६ ।। एवढें पांडवांना सांगुनी । कृष्ण गेला द्वारकेस निघुनी। व्रत ते केल्यावरी पांडवांनी। राज्य त्यांचे त्यांना मिळालें ।। ६७ ।। 

नकळत घडलें जरी हे व्रत । तरी पुण्य पडतें पदरांत । या संबंधीची कथा उदात्त । सांगतो आतां ऐकावी ।। ६८ ।। पूर्वी सुदेवनामें एक ब्राह्मण । गौतमी नामें त्याची पत्नी जाण । दोघे करिती विष्णुपूजन। सदैव सुखानें नांदती ।। ६९ ।।


अधिक मास माहात्म्य ।। १९ ।। adhik maas 2023

करितां श्रीविष्णूची भक्ती पापें हजार वाटांनी पळती । अंतीं होते मोक्षप्राप्ती । 1 प्रभाव मोठा भक्तीचा ।। ७० ।। अंबरिष भवसागर तरला । अढळपद मिळाले प्रल्हादाला । सद्गति मिळाली विदुराला। भीष्म विभुषणही तरले ते ।। ७१ ।। 

ईश्वरभक्तींचे पुण्य महान । इच्छित फलप्राप्ती होते जाण । म्हणुनी तो सत्शील ब्राह्मण। विष्णुभक्ति करीतसे ।। ७२ ।। त्यानें पुत्रप्राप्तीसाठीं । तपश्चर्या केली फार मोठी गरुडकृपेनें त्याचे पोर्टी। शुकदेव पुत्र जन्मला ।। ७३ ।। 

परंतु पुढें कालांतरानें । तशाच कांहीं कारणानें त्या ब्राह्मणाच्या दुर्दैवाने । पुत्र निधन पावला ।। ७४ ।। गौतमी आणि सुदेव शोक करू लागली सदैव ईश्वरावरी ठेवुनी भाव अन्नपाणी वर्जिलें ।। ७५ ।। 

ब्राह्मण पतिपत्नी होतीं कष्टी कृश झाली त्यांची शरीरयष्टी वरून होतसे पर्जन्यवृष्टि त्याचेंही भान नसे त्यांना ।। ७६ ।। सुदैवाने तो होता अधिक मास त्यांना घडले कडक उपास । पर्जन्यस्नानही घडलें त्यांस । पुण्यलाभ जाहला ।। ७७ ।। 

अनायासे आणि नकळत । त्यांना घडलें पुरुषोत्तम व्रत म्हणुनी पुत्र झाला जिवंत । आनंदी आनंद जाहला ।। ७८ ।। पुरुषोत्तम व्रत घडलें म्हणुनी । पुढच्या जन्मीं झाली राजाराणी । दृढधन्वा गुणसुंदरी नामाभिधानी। अपार ऐश्वर्य भोगिलें ।। ७९ ।। 

दृढधन्वा होता पुण्यवान । त्याचें पूर्वजन्माख्यान । वाल्मिकी ऋषींनी केलें कथन। तेव्हां कळलें सर्वांना ॥ ८० ॥ आतां ऐका दीपाख्यान। दीपदानानें मिळतें कोणतें पुण्य । तेंच सर्व वर्तमान । ऐका शांत चित्तानें ।। ८१ ।। 

चमत्कार नामें एका नगरींत । मणिग्रीव आपल्या पत्नीसहित । होता कसाबसा राहात । नास्तिक पापी होता तो ।। ८२ ।। लोभी आणि उद्धट । स्वार्थी आणि तापट । अविश्वासू विषयलंपट । सर्व दुर्गुण संपन्न ।। ८३ ।।

 त्याचे उलट त्याची पत्नी । होती साध्वी आणि सदगुणी। पतिसेवारत समाधानी । विनयशील सर्वदा ।। ८४ ।। मणिग्रीव होता दुष्ट। हिंसक तसाच कर्मभ्रष्ट । त्याचेवरी होते सर्व रुष्ट । अप्रिय होता सर्वांना ।। ८५ ।। आप्तांनी घातला बहिष्कार। छळही


अधिक मास माहात्म्य ।। २१ ।। adhik maas 2023

त्याचा झाला फार । अखेर सोडुनी तें नगर वनांत जावें लागलें ॥। ८६ ।। पति तेथें पत्नी गेली। रानींवनीं दोघे भटकूं लागलीं। योगायोगाने गांठ पडली। उग्रदेव नामें मुनीची ८७ ॥ 

त्याची दीनदशा पाहुनी मनीं द्रवले उग्रदेवमुनी । दीपदानाचें महत्त्व त्यांनीं । सांगितले त्या दोघांना ।। ८८ ।। म्हणाले नको जपतपसाधन नाहीं करावें लागत उपोषण दुःख दारिद्रय संकट होतें निवारण केवळ दीपदानानें ।।८९ ।। 
म्हणुनी पुरुषोत्तम मासात । दीप ठेवावा अखंड तेवत तेणें श्रीविष्णु भगवंत प्रसन्न होईल निश्चयें ।। ९० ।। वेद शास्त्रे आणि पुराणें वर्णिती जीं नाना व्रतविधानें । त्या सर्वांचे फळ साकल्यानें । मिळतें दीप दानानें ।। ९१ ।। 

गयाश्राद्ध गौतमीस्नान वेदपठणाचेंही महापुण्य । अधिक महिन्यांत दीपदान केल्यानें तें मिळतसे ।। ९२ ।। नंतर प्रयागासी गेले उग्रदेवमुनी । मग मणिग्रीव पतिपत्नींनी पुरुषोत्तम मास येतांक्षणी । दीपदान आरंभिले ।। ९३ ।। 

मुनीवचनावरी विश्वास ठेवुनी । शुचिर्भूत व्रतस्थ राहुनी । पर्णकुटींत आपुल्या दोघांनी । भक्तिभावें दीप लाविले ।। ९४ ।। त्यांचें पुण्य फळा आलें। विष्णुलोकीं त्यांना स्थान मिळालें । पुढच्या जन्मीं त्यांना लाभलें । राजवैभव आगळें ।। ९५ ।। 

पूर्वजन्मींचा मणिग्रीव । पुनर्जन्मीं त्याचें चित्रबाहु नाव। मणिग्रीवाच्या पत्नीचे नांव । चंद्रकला जाहलें । ९६ ।। पूर्वजन्मींच्या दीपदानांनी । दोघें झालीं राजाराणी । ही कथा अगस्त्यमुनींनी । सांगितली चित्रबाहला ।। ९७ ।। 

आणखी एक कथा ऐका । कर्दमनामें ब्राह्मणाची एका । त्याची उजळली भाग्यरेखा। पुरुषोत्तम व्रतामुळे ।। ९८ ।। स्वार्थी मित्रद्रोही कृपण । महालोभी होता तो ब्राह्मण। नित्य करी असत्य भाषण । केवळ द्रव्यलोभानें ।। ९९ ।। 

त्याच्या पापानें पुढे त्याला । क्षुद्र वानराचा जन्म मिळाला। कर्मधर्मसंयोगाने घडला । पुरुषोवम व्रतोपवास ।। १०० ॥ एका विहिरींत घडलें स्नान । दिसलें पुरुषोत्तम व्रतपूजन । नकळत मिळालें अगणित पुण्य । विष्णुलोकीं गेला तो ।। १०१ ।।


अधिक मास माहात्म्य ॥ २३ ॥

उदया आलें भाग्य खरोखर । त्याचा झाला उद्धार आनंद झाला त्याला फार । विष्णुभजनीं लागला ।। १०२ ।। अधिक महिन्याच्या दोन पक्षीं । येतात दोन शुभ एकादशी। पद्मिनी नांव 

पहिलीसी। दुसरीचें नाव परमा असे ।। १०३ ।। सबंध महिन्याचें व्रताचरण। ज्यांना नसेल शक्य जाण । त्यांनी निदान ते दोन दिन । अवश्यमेव पाळावे ।। १०४ ।। आतां अधिक महिन्याचे उद्यापन । सांगतो ऐका लक्ष देऊन त्या महिन्याचा येतां अंत्य दिन। श्रीकृष्णपूजन करावें ।। १०५ ।। 

फापटपसारा सर्व टाळावा। मुख्य विधि फक्त आचरावा । उगीच डामडौल नसावा । केवळ श्रद्धा असावी ।। १०६ ।। मूर्ति किंवा तसबीर मांडून । स्नानादिं उपचार करावे समर्पण। यथासांग करावें पूजन। साष्टांग नमस्कार घालावा ।। १०७ ।। 

नंतर दोन्ही हात जोडुनी प्रार्थना करावी मनींच्या मनीं । “देवा ही पूजा स्वीकारूनी। अपराधांची क्षमा करावी ।। १०८ ।। न जाणें मी आवाहन । न कळे मजला पूजार्चन । अज्ञ बालक मज समजून । कृपा करावी भगवंता" ।। १०९ ।। शेवटीं महानैवेद्य समर्पन। गाय किंवा एखादा श्वान । यांना द्यावें पान वाढून । 'कृष्णार्पणमस्तु' म्हणावें ।। ११० ।। 

मग कुटुंबियासहित आपण । प्रसन्न चित्तें करावें भोजन । जेवतांना असावें मौन । हरि मनीं स्मरावा ।। १११ ।। गोरगरिबांसी भिक्षा द्यावी । अनाथ अपंगांची दया करावी । वृत्ति सदा उदार असावी । सत्पात्री दान करावें ।। ११२ ।। 

विष्णू आणि कृष्ण समजून दोन ब्राह्मणांना बोलावून । यथाशक्ति दक्षिणा देऊन । एक एक पोथी द्यावी ही ।। ११३ ।। अधिक मासाचें माहात्म्य अपार । पुरुषोत्तम व्रताचें पुण्य थोर। टाळावयासी ग्रंथ विस्तार । संक्षेपें सर्व वर्णिलें ।। ११४ ।। 

हे व्रत पाळावे स्त्री-पुरुषांनीं । त्यांतल्या त्यांत सुवासिनींनीं । त्यांची सौभाग्यवृद्धि होऊनी । पुत्रपौत्रसौख्य मिळेल ।। ११५ ।। कुमारिकेला मिळेल भाग्यवंत पती लग्नार्थी पुरुषाला सुशील पत्नी । विद्यार्थ्यांना होईल विद्याप्राप्ती । मोक्षार्थियांना मोक्ष

अधिक मास माहात्म्य ॥ २५ ॥

लाभेल ।। ११६ ।। अधिक महिन्यांत दैनंदिन । ही पोथी करावी पठण । किंवा करावी श्रवण । पुण्यलाभ होतसे ।। ११७ ।। श्रीनारायणानें नारदांना । श्रीकृष्णानें हें पांडवांना । सूतानें सर्व ऋषिमुनींना । पुरुषोत्तम व्रत वर्णिलें ।। ११८ ।। माहात्म्य हैं अधिक महिन्याचें । खरोखरी पुण्यदायक साचें । कल्याण होतें स्वभक्तांचें । म्हणे मिलिंद माधव ।। ११९ ।।

 असो. शके अठराशें अठ्याण्णव वर्षी। कार्तिकमासीं कृष्णपक्ष। गुरुवारी एकादशी दिवशीं । ग्रंथ पूर्ण झाला हा ।। १२० ॥ ॐ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ ॐ विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमः ॥ ॐ शांतिः शांतिः शांतिः ॥ भक्तकवि मिलिंदमाधवकृत “ अधिक मास माहात्म्य आणि पुरुषोत्तम व्रतकथा " संपूर्ण । (ओवी संख्या १२० )

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad