Type Here to Get Search Results !

१०८ गीता उपदेश मराठी १८ अध्याय संपूर्ण गीतासार जीवनाचा रहस्य |positive thinking bhagavad gita quotes

श्रीमद्भगवद्गीता ही भगवंताची दिव्य वाणी आहे. तिच्यातील विचार फारच सखोल व अनायासे कल्याण करणारे आहेत. गीता उपदेश त्यांचे मनन केल्याने साधकांच्या हृदयात नव-नवीन विलक्षण भाव प्रकट होतात. समुद्रात मिळणाऱ्या रत्नांचा एखादे वेळी अंत लागू शकेल पण गीतेत मिळणारे मनोमुग्धकारक भावरत्नाचा अंत लागणे कठीण आहे.

१०८ गीता उपदेश १८ अध्याय संपूर्ण गीतासार जीवनाचा रहस्य |positive thinking bhagavad gita quotes
गीता उपदेश मराठी 


गीतेतील विचारांचे यथायोग्य आकलन झाल्यास गीतेच्या वक्त्याचा (भगवंताच्या), श्रोत्याचा (अर्जुनाचा), स्वयं गीतेचा व आपल्या स्व-रूपाचा योग्यतन्हेने बोध होतो असा बोध झाल्यावर मनुष्य कृतकृत्य, ज्ञातज्ञातव्य आणि प्राप्त प्राप्तव्य म्हणजेच धन्य होतो. त्यामुळे त्यास नंतर काहीही करणे, जाणणे किंवा मिळविणे शिल्लक राहत नाही. त्याचा मनुष्य जन्म सर्वप्रकारे सफल होतो..(१०८ गीता उपदेश १८ अध्याय संपूर्ण गीतासार जीवनाचा रहस्य |positive thinking bhagavad gita quotes)

गितामधील १८ अध्यायमधील गीता उपदेश मराठी 


अध्याय १ पहिला गीता उपदेश मराठी 

मोहामुळेच मनुष्य 'मी काय करू आणि काय न करू' अशा द्विधा मनःस्थितीत सापडून आपल्या कर्तव्यापासून ढळतो-जर तो मोहाच्या आधीन न झाला तर तो कर्तव्यच्युत होऊ शकत नाही.

देव, धर्म, परलोक इत्यादींवर श्रद्धा ठेवणाऱ्या मनुष्याच्या मनात बहुधा पुढील गोष्टींच्या बाबतीत चंचलता किंवा द्विधा वृत्ती राहात असते. त्या म्हणजे- जर आम्ही कर्तव्यरूपाने प्राप्त कर्म न केले तर आमचे पतन होईल,

 जर आम्ही फक्त सांसारिक कामातच गढून जाऊ तर आमची आध्यात्मिक उन्नती होणार नाही, व्यवहारातच राहिल्याने परमार्थ योग्य तऱ्हेने होणार नाही, आणि परमार्थच करीत राहिल्याने व्यवहार जमणार नाही, जर आम्ही कुटुंब सोडून दिले तर आम्हाला पाप लागेल आणि जर कुटुंबातच बसून राहिलो तर आध्यात्मिक उन्नती होणार नाही. 

तात्पर्य असे की, आपले कल्याण व्हावे अशी इच्छा तर करतात पण मोह सुखासक्ती यांमुळे संसार सुटत नाही. 

अशाच तऱ्हेची प्रचंड खळबळ अर्जुनाच्या मनात होती की जर मी युद्ध केले तर कुलाचा नाश होईल व त्यामुळे माझ्या कल्याणात बाधा निर्माण होईल आणि युद्ध न केले तर कर्तव्यापासून विमुख झाल्यामुळे देखील कल्याण होण्यात बाधाच निर्माण होणार. (तेव्हा युद्ध करावे की न करावे अशा द्विधा मनःस्थितीत तो असतो.)


अध्याय २रा गीता उपदेश मराठी 

आपल्या विवेकास महत्व देणे आणि आपल्या कर्तव्याचे पालन करणे- ह्या दोन उपायांमधून कोणत्याही एका उपायास दृढतेने कामात आणले तर शोक-चिन्ता मिटून जाते.

जितकी शरीर दिसतात ती सर्व नष्ट होणारी आहेत, मरणारी आहेत पण त्यांच्यात राहणारा कधीच मरत नाही. 

ज्याप्रमाणे शरीर बाल्यावस्था सोडून तारुण्यावस्थेस धारण करते व तारुण्यावस्था सोडून वृद्धावस्थाधारण करते त्याचप्रमाणे शरीरात राहणारा देखील एक शरीर सोडून दुसरे शरीर धारण करतो. 

मनुष्य जसा जुने कपडे टाकून नवे वस्त्र परिधान करतो तसाच शरीरात राहणारा सुद्धा शरीररूपी एका वस्त्रास टाकून दुसरे वस्त्र घालतो. 

जितकी काही अनुकूल-प्रतिकूल परिस्थिती असेल ती आरंभी नव्हती व नंतरही राहणार नाही, मध्येच जी भासते तिचाही प्रतिक्षणी वियोग होतच आहे. तात्पर्य, परिस्थिती ही येणारी जाणारी आहे. सदा राहणारी नाही.

 अशा प्रकारे स्पष्ट विवेक झाला तर चंचलता, खळबळ, शोक-चिंता राहात नाहीत. शास्त्राच्या आज्ञेप्रमाणे जे कर्तव्य-कर्म प्राप्त होईल त्याचे पालन कार्याची सिद्धी किंवा असिद्धी, फळाची प्राप्ती वा अप्राप्ती यांची चिंता न करता निर्विकार राहून केले तरी मनाची चलबिचल होऊ शकत नाही.
(१०८ गीता उपदेश १८ अध्याय संपूर्ण गीतासार जीवनाचा रहस्य |positive thinking bhagavad gita quotes)

१०८ गीता उपदेश १८ अध्याय संपूर्ण गीतासार जीवनाचा रहस्य |positive thinking bhagavad gita quotes
गीता उपदेश मराठी 

अध्याय ३रा गीता उपदेश 

ह्या मनुष्य लोकात सर्वांनीच निष्कामभावपूर्वक आपल्या कर्तव्याचे तत्परतेने पालन केले पाहिजे, मग तो ज्ञानी असो की अज्ञानी, प्रत्यक्ष भगवंताचा अवतार का असेना! कारण सृष्टि-चक्र आपापल्या कर्तव्याचे पालन केल्यानेच चालते.

मनुष्याला कर्माचा आरंभ केल्यावाचून सिध्दी मिळत नाही आणि कर्माचा त्याग केल्यानेही सिध्दी मिळत नाही. ब्रह्मदेवांनी सृष्टि रचनेच्या वेळी प्रजेला सांगितले की, तुम्ही आपापल्या कर्तव्यकमद्वारा एक दुसऱ्यांची मदत करा, परस्परांना उन्नत बनवा तर तुम्ही परमश्रेय प्राप्त करू शकाल. 

जो सृष्टिचक्राच्या मर्यादप्रमाणे आपल्या कर्तव्याचे पालन करणार नाही, त्याचे ह्या जगात जिणे व्यर्थ आहे. मनुष्यरूपाने अवतरलेल्या भगवंताला जरी ह्या त्रैलोक्यात काही कर्तव्य नसले तरी तो लोकसंग्रहासाठी आपल्या कर्तव्याचे तत्परतेने पालन करतो. 

ज्ञानी महापुरुषाने देखील लोकसंग्रहासाठी आपल्या कर्तव्याचे पालन तत्परतेने केले पाहिजे. आपल्या कर्तव्याचे निष्कामभावपूर्वक पालन करीत असताना मनुष्य जरी मेला तरी त्याचे कल्याणच होईल.



अध्याय ४ था गीता उपदेश मराठी 

  • संपूर्ण कमीना लीन करण्याचे, संपूर्ण कर्मांच्या बंधनातून मुक्त होण्याचे दोन उपाय आहेत—कर्मांची तत्त्वेजाणणे व तत्त्वज्ञान प्राप्त करणे.
  • भगवंत सृष्टीची रचना तर करतात पण त्या कर्मात व त्याच्या फल्त कर्तृत्वाभिमान आणि आसक्ती नसल्या मुळे त्यांना या कर्माचे बंधन होत नाही. 
  • कर्म करताना जो मनुष्य कर्मफलाची आसक्ती, कामना, ममता इत्यादी ठेवत नाही अर्थात् कर्मफलापासून सर्वच निर्लिप्त राहतो. व अशा तऱ्हेने कर्म करतो तो सर्व कमीना समाप्त करतो. 
  • अर्थात फल देण्याच्या दृष्टीने ती कर्मे निर्बीज होऊन नष्ट होतात. ज्याचे संपूर्ण कर्मे संकल्प आणि कामनार्थानी रहित असतात त्याची ती कर्मे जळून जातात. 
  • जो कर्म आणि कर्मफलाची आसक्ती ठेवीत नाही, तो कर्मात सर्वप्रकारे प्रवृत्त असूनही कर्मबंधनात अडकत नाही. 
  • जो केवळ आपल्या सिद्धी असिद्धी मध्ये सम राहतो तो कर्म करूनही बंधनात सापडत नाही जो केवळ कर्तव्य परंपरा सुरक्षित राखण्यासाठीच कर्म करतो त्याची सर्व कमें लीन होतात. 
  • याप्रमाणे कर्माच्या तत्त्वांना चांगल्या प्रकारे जाणल्याने मनुष्य कर्म बंधनातून मुक्त होतो.
  • जडतेपासून सर्वप्रकारे संबंध तुटून जाणे यालाच तत्त्वज्ञान म्हणतात. हे तत्त्वज्ञान पदार्थांनी होणाऱ्या यज्ञांपेक्षा श्रेष्ठ आहे. 
  • ह्या तत्त्वज्ञानाने संपूर्ण कर्म नष्ट होऊन जातात. तत्त्वज्ञान एकदा का झाले की मग कधीच मोह होत नाही. 
  • पाप्यातील पापी मनुष्य देखील ह्या ज्ञानाने पापातून तरून जाते. 
  • जसे अग्नी संपूर्ण इंधनास जाळून भस्म करतो तसेच हा ज्ञानरूपी अग्नी संपूर्ण कर्मे जाळून टाकतो.

१०८ गीता उपदेश १८ अध्याय संपूर्ण गीतासार जीवनाचा रहस्य |positive thinking bhagavad gita quotes
positive thinking bhagavad gita quotes


अध्याय ५ वा गीता उपदेश 

  • मनुष्याने अनुकूल वा प्रतिकूल परिस्थिती आल्यावर सुखी दुःखी, राजी नाराज होऊ नये कारण ह्या द्वंद्वात फसलेला मनुष्य संसारातून उन्नत होऊ शकत नाही. 
  • केवळ स्त्री, पुत्र, परिवार, धन-संपत्ती यांचा त्याग करणारा संन्यासी नसतो परंतु जो आपल्या कर्तव्य कर्माचे पालन करीत राग-द्वेष करीत नही तोच खरा संन्यासी होय. 
  • जो अनुकूल परिस्थिती आल्यावर हर्षित होत नाही व प्रतिकूल परिस्थितीत उद्विग्न होत नाही, असा द्वंद्वरहित मनुष्य परमात्म्यातच स्थित असतो. 
  • सांसारिक सुख दुःख अनुकूलता प्रतिकूलता इत्यादी द्वंद्वेच दुःखाची कारणे आहेत. अतः बुद्धीमान मनुष्याने त्यात फसू नये. ( १०८ गीता उपदेश १८ अध्याय संपूर्ण गीतासार जीवनाचा रहस्य |positive thinking bhagavad gita quotes)



अध्याय ६वा गीता उपदेश मराठी 
  • कोणत्याही साधनाने अंतःकरणात समता आली पाहिजे. कारण अंतःकरणातील समतेशिवाय मनुष्य अनुकूल प्रतिकुल परिस्थितीत, मानापमानात निर्विकार (सम) राहू शकत नाही. 
  • आणि परमात्माचे ध्यान करू म्हणेल तर ध्यानही करू शकत नाही. तात्पर्य असे की अंतःकरणात समता आल्याशिवाय सुख दुःखादी द्वंद्रांचा प्रभाव मिटणार नाही आणि मन देखील ध्यानात लागणार नाही.
  • जो मनुष्य प्रारब्धानुसार प्राप्त अनुकूल-प्रतिकूल परिस्थितीत, वर्तमान काळी केल्या जाणाऱ्या कर्माच्या पूर्ती अपूर्ती, सिद्धी- असिद्धी, मानापमान, धनसंपत्ती इत्यादीमध्ये तसेच भल्याबुऱ्या मनुष्यामध्ये समचित्त राहतो, तो श्रेष्ठ असतो. 
  • जो साध्यरूप समतेचा उद्देश ठेवून मन इंद्रिये यांच्या संयमपूर्वक परमाल्याचे ध्यान करतो त्याची संपूर्ण प्राण्यांमध्ये आणि त्यांच्या सुख-दुःखात समबुद्धी होते. 
  • समता प्राप्त करू इच्छिणारा मनुष्य वेदात सांगितलेल्या सकाम कर्माच्या पलीकडे जातो. समता प्राप्त करून घेतलेला मनुष्य सकाम भावनेने कर्म करणाऱ्या तपस्वी, ज्ञानी आणि कम मनुष्यापेक्षाही श्रेष्ठ असतो.

अध्याय ७वा गीता उपदेश 

सर्व काही वासुदेवच आहे, भगवद्रूपच आहे, याचा मनुष्याने अनुभव करून घेतला पाहिजे. माळेतील सर्व मण्यातून जसा दोरा आधारभूत असतो तसाच परमेश्वर सर्व प्राण्यांमध्ये ओतप्रोत भरला आहे. 

पृथ्वी, जल, तेज आदी तत्त्वांमध्ये, चंद्र, सूर्याच्यारूपात, सत्त्व, रज, तम आदी गुणात, सर्व कर्मात भगवंतच परिपूर्ण भरलेला आहे. ब्रह्म, जीव, क्रिया, संसार, ब्रह्मा आणि विष्णुरूपाने भगवंतच आहेत या प्रकारे तत्त्वतः सर्व काही भगवंतच आहे.




अध्याय ८वा गीता उपदेश 

अन्तकालीन चिन्तनानुसारच जीवाला गती मिळते म्हणून मनुष्याने नेहमी सावध राहिले पाहिजे.

मरण समयी शरीर सुटते वेळी मनुष्य ज्या वस्तू, व्यक्ती इत्यादींचे चिंतन करतो त्यानुसारच त्याला पुढील जन्मात शरीर मिळते. जो अंतःकाळी परमेश्वराचे चिंतन करीत शरीर सोडतो तो परमेश्वरालाच प्राप्त होतो. मग त्याला पुनः जन्म घ्यावा लागत नाही. 

म्हणून मनुष्याने सर्व काळी, सर्व अवस्थेत आणि शास्त्रानुसार सर्व कर्मे करीत असता भगवंताचेच स्मरण केले पाहिजे. त्यामुळे अंतःकाळी देखील देवाचेच स्मरण होईल. जीवनभर प्रेमपूर्वक जे काही केले जाते, तेच बहुधा मरणसमयी आठवते.

अध्याय ९वा गीता उपदेश 

सर्व माणसे भगवत्प्राप्तीचे अधिकारी आहेत. मग ते कोणत्याही वर्णाचे, आश्रमाचे, संप्रदायाचे, देशाचे, वेशाचे का असेनात. ते सर्व भगवंताकडे जाऊ शकतात. त्याचा आश्रय घेऊन त्याला प्राप्त करून घेऊ शकतात.

भगवंताला या गोष्टीचे अत्यंत दुःख, खेद आणि पश्चात्ताप होतो की, हे जीव मनुष्य शरीर मिळून देखील आणि माझ्या प्राप्तीचा अधिकार मिळून सुद्धा मला प्राप्त न करता, माझ्याजवळ न येता जन्ममृत्यूच्या चक्रात फसत आहेत. 

मला विमुख होऊन काही तर माझी अवहेलना करून, काही आसुरी संपत्तीचा आश्रय घेऊन तर काही सकाम भावाने यज्ञादिकांचे अनुष्ठान करून जन्ममरणाच्या तडाख्यात सापडले आहेत. पाप्यात पापी असला, कोणत्याही नीच योनीत जन्मलेला असला आणि कोणत्याही वर्ण, आश्रम, देश, वेश यांचा असला तरी माझा आश्रय घेऊन मला प्राप्त करून घेऊ शकतो.. म्हणून या मनुष्य शरीरास आल्यानंतर जीवाने माझे भजन करावे.

अध्याय १०वा गीता उपदेश 

मनुष्याजवळ चिन्तन करण्याची जी शक्ती आहे तिला भगवचिंतनातच लावले पाहिजे.

जगात कोणत्याही वस्तूत, जेथे कोठे विलक्षणता, विशेषता, महत्ता, अलौकिकता, सुंदरता इत्यादी दिसून येते ती सर्व वास्तविक भगवंताचीच असते. म्हणून अशा ठिकाणी भगवंताचेच चिंतन केले पाहिजे. त्या गुण युक्त वस्तू किंवा व्यक्तीचे चिंतन करू नये. हेच विभूतींच्या वर्णनाचे तात्पर्य आहे.

अध्याय ११वा गीता उपदेश 

अर्जुनाने भगवंताच्या कृपेने ज्या दिव्य विश्वरूपाचे दर्शन घेतले त्यास प्रत्येक मनुष्य काही पाहू शकत नाही परंतु आदि-अवतार रूपाने प्रकट झालेल्या ह्या जगास श्रद्धापूर्वक भगवद्रूप मानून तर प्रत्येक मनुष्य ह्या 'विश्व' रूपाचे दर्शन अवश्य घेऊ शकतो.

अर्जुनाने विश्वरूप दाखविण्याची भगवंतास नम्र प्रार्थना केली. तेव्हा त्यांनी अर्जुनास दिव्य नेत्र (दृष्टी) देऊन विश्वरूप दाखविले. त्या विश्वरूपात अर्जुनाने भगवंताची अनेक मुखे, नेत्र, हात इत्यादी पाहिले, ब्रह्माविष्णु, महेश यांना पाहिले, देवता, गंधर्व, सिद्ध, सूर्य इत्यादीही पाहिले. 

त्याने विश्वरूपाची सौम्य, उग्र, अत्युग्र इत्यादि सर्व रूपे पाहिली. अशा दिव्य विश्वरूपास आम्ही सर्व पाहू शकत नाही पण आपल्या डोळ्यांनी दिसणाऱ्या ह्या चित्र विचित्र जगतास भगवंताचे च विश्वरूपमानून स्वतः चा उद्धार तर करू शकतोच. 
कारण शेवटी हे विश्व देखील भगवंतापासूनच प्रकट झाले आहे आणि ह्या विश्वातील प्रत्येक वस्तू भगवंतच बनलेले आहे. ह्या विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय भगवंत स्वरूपातच होत असतो.


अध्याय १२वा गीता उपदेश 

भक्त भगवंताचा अत्यन्त प्रिय असतो कारण तो आपले शरीर, इंद्रिये, मन, बुद्धीसहित आपल्यास्वतःस भगवंतास अर्पण करतो.

जे श्रद्धापूर्वक आपले मन परमात्म्यामध्ये लावतात ते भक्त सर्वश्रेष्ठ होत. भगवद् परायण झालेले जे भक्त आपली संपूर्ण कर्मे भगवंतास अर्पण करून अनन्य भावाने त्याची उपासना करतात त्यांचा ह्या संसार सागरातून भगवंत त्वरित उद्धार करतात. 

ज्यांचा प्राणीमात्रांशी मित्रता व करुणेचा व्यवहार आहे, जे अहंममतारहित आहेत, ज्यांच्या मुळे कोणीही उद्विग्न होत नाही व जे कोणामुळेही उद्विग्न होत नाहीत, जे नवीन कमरंभ च करीत नाहीत, 

जे अनुकूल-प्रतिकूल परिस्थिती आल्यावर हर्षित वा दुःखित होत नाहीत, जे मानापमानात निर्विकार म्हणजेच सम राहतात, जे कोणत्याही परिस्थितीत सन्तुष्ट राहतात, असे भक्त भगवंतास प्रिय असतात. 

जर मनुष्य भगवंताचेच बनून राहतील, भगवंतावरच आपलेपणा ठेवतील तर सर्वच भगवंताचे प्रिय होऊ शकतात.

अध्याय १३वा गीता उपदेश 

जगात एक परमात्म तत्त्वच जाणण्यास योग्य असे आहे. त्याला अवश्य जाणले पाहिजे. त्याला तत्त्वतः जाणल्यावर जाणणाराचे त्याच्याशी (अभिन्नत्व) होऊन जाते. एकरूपत्व

ज्या परमात्म्याला जाणल्याने अमरत्वाची प्राप्ती होते, त्या परमात्म्याचे हात पाय, डोके, डोळे, कान सर्वत्र आहेत. तो संपूर्ण इंद्रियांनी रहित असून ही संपूर्ण विषयांना प्रकाशित करतो, संपूर्ण गुणानी रहित असूनही संपूर्ण गुणांचा भोक्ता आहे आणि आसक्ति रहित असुन सुध्दा सर्वांचे पालन पोषण करतो. 

तोच सर्व प्राण्यांच्या आत आणि बाहेरही आहे. तसेच चर-अचर असून सुद्धा प्राण्यांच्या रूपातही तोच आहे. सम्पूर्ण प्राण्यांपासून विभक्त (अलग) राहून सुद्धा तो विभागरहित आहे. हो संपूर्ण ज्ञानांचा प्रकाशक आहे. 

तो संपूर्ण विषम प्राण्यात सम रहतो व गतिशील प्राण्यात गतिरहित (स्थिर) राहतो. नष्ट होणाऱ्या प्राण्यात तो अविनाशी राहतो. ह्या तऱ्हेने परमाल्याला यथार्थ जाणल्यावर परमात्म्याला प्राप्त होतो.

अध्याय १४वा गीता उपदेश 

संपूर्ण जग त्रिगुणात्मक आहे. त्या गुणांच्या अतीत होण्यासाठी गुणांना व त्यांच्या वृत्तींना जाणणे आवश्यक आहे.

प्रकृतीपासून उत्पन्न झालेले सत्त्व, रज व तम हे तिन्ही गुण शरीर व जगात आसक्ती, ममता इत्यादींनी जीवात्म्यास बंधनात टाकतात सत्व गुण सुख आणि ज्ञानाच्या आसक्तीने,

 रजोगुण कर्मासक्तीने व तमोगुण प्रमादालस्य, निद्रा यांनी मनुष्याला बंधनात टाकतात - रज आणि तम यांना दाबून जेव्हा जेव्हा सत्त्वगुण वाढतो तेव्हा अंतःकरणात रज-तमाचे विरुद्ध प्रकाश होतो.

सत्व व तम यांना मागे हटवून जेव्हा रजोगुण वाढतो तेव्हा अंतःकरणात लोभ, क्रियाशीलता वगैरे सत्त्व-तम यांचे विरुद्ध असलेल्या प्रवृत्ती वाढतात सत्त्व आणि रज यांना दाबून जेव्हा तमोगुण बाढतो' 
तेव्हा अंतःकरणात अविवेक, आळस, प्रमाद, मोह इत्यादी सत्त्वरज यांचे उलट वृत्ती वाढतात. ह्या वृत्तींच्या वाढण्यामुळे मरणारा प्राणी क्रमशः उच्च, मध्यम आणि नीच लोकात जातो. 

परंतु जो ह्या गुणांव्यतिरिक्त दुसऱ्याला कर्ता मानत नाही, अर्थात् संपूर्ण क्रिया ह्या गुणांमध्येच होत आहेत- स्वतः मध्ये नाहीत असा अनुभव घेतो तो गुणांच्या पलीकडे जाऊन (अतीत होऊन) भगवद्भावास प्राप्त होतो. अनन्य भक्तीने देखील मनुष्य गुणातीत होऊ शकतो. (१०८ गीता उपदेश १८ अध्याय संपूर्ण गीतासार जीवनाचा रहस्य |positive thinking bhagavad gita quotes)

अध्याय १५वा गीता उपदेश 

ह्या विश्वाचा मूळ आधार व ह्या विश्वात अत्यंत श्रेष्ठ परमपुरुष एक परमात्माच आहे, त्याला श्रद्धापूर्वक असे मानल्याने मनुष्य सर्वज्ञ आणि कृतकृत्य होतो.

ज्याच्या पासून हे जग अनादिकालापासून चालत आले आहे व जो प्राप्त झाला असता मनुष्याला पुनः जन्मास यावे लागत नाही, त्या परमात्याचा शोध घेतला पाहिजे. ज्ञानचक्षु साधक आपल्यामध्येच त्या परमात्याचा अनुभव घेतात. 

तो परमात्माच चंद्र, सूर्य, अग्नी यांच्यात तेज रूपाने राहून जगात प्रकाश करतो. तोच पृथ्वीत प्रवेश करून तिला धारण करतो. तोच रसमय चंद्र बनून सर्व वनस्पतींना पुष्ट करतो. तोच जठराग्नी बनून प्राण्याद्वारा खाल्ल्या जाणाऱ्या अन्नाचे पचन करतो. 

तोच सर्वांच्या हृदयात राहणारा, वेद- निर्माता, वेदज्ञ आणि वेदाकडून जाणला जाणारा आहे. तो संपूर्ण विश्वाचे पालन-पोषण करणारा आहे. तो नाशिवंत संसारापासून अलिप्त आणि अविनाशी जीवात्म्यापेक्षा उत्तम आहे. म्हणूनच तो लोकात व वेदात पुरुषोत्तम नावाने प्रसिद्ध आहे. त्याला सर्वश्रेष्ठ समजून अनन्य भावाने त्याची भक्तिी केली पाहिजे,

अध्याय १६वा गीता उपदेश 

दुर्गुण व दुराचरणांनीच मनुष्य चौऱ्यांशी लाख योनी आणि नरक यात जातो. म्हणून मनुष्याने सद्गुण व सदाचरण करून संसाराच्या व जन्ममरणाच्या बंधनातून मुक्त झाले पाहिजे, 

जो दंभ, दर्प, अभिमान, काम, क्रोध, लोभ इत्यादी आसुरी संपत्तीच्या गुणांचा त्याग करून अभय, अहिंसा अक्रोध, दया, यज्ञ, दान, तप वगैरे दैवी संपत्तीचे गुण अंगी बाणवितो तो संसार बंधनापासून मुक्त होतो. 

परंतु - जे केवल दुर्गुण-दुराचार, काम, क्रोध, लोभ आदींचा आश्रय करतात, त्यातच रममाण होतात असे ते आसुरी संपत्तीचे लोक चौऱ्यांशी लक्ष योनीत आणि नरकात जातात.

अध्याय १७वा गीता उपदेश 

शास्त्रविधी जाणणाऱ्या वा न जाणणाऱ्या मनुष्याने, तो जे काही शुभ काम करतो ते श्रद्धापूर्वक देवा चे स्मरण करून, देवाचे नामोच्चारण करून च करावे.

जे शास्त्रविधी तर जाणत नाहीत पण श्रद्धापूर्वक यजन-पूजन मात्र करतात त्याची श्रद्धा (निष्ठा, स्थिति) तीन प्रकारांची असते. सात्त्विकी, राजसी व तामसी. 

श्रद्धेप्रमाणेच त्यांचेद्वारा पूजल्या जाणाऱ्या देवता देखील तीन प्रकाराच्या असतात. जे असे यजन-पूजन करीत नाहीत, त्यांच्या श्रद्धेची ओळख त्यांच्या आहाराच्या प्रकारावरून होते कारण आहार (भोजन) तर सर्वच करीतच असतात.

अध्याय १८वा गीता उपदेश 

मनुष्यमात्राच्या उद्धारासाठी त्याची अभिरुची, योग्यता आणि श्रद्धा या अनुसार तीन साधने सांगितली आहेत कर्मयोग, ज्ञानयोगभक्तियोग (शरणागति). यापैकी कोणत्याही एका साधनाचा अवलंब केला असता मनुष्याचा उद्धार होतो.

जो मनुष्य यज्ञ, तप व दान तसेच आपली नियत- कर्तव्य कर्मे आसक्ती व फलेच्छा यांचा त्याग करून करतो आणि अकुशल वा कुशल कर्मात राग द्वेष करीत नाही तो च खरोखर त्यागी आहे.

नियतकर्म करीत असताही त्याला पाप लागत नाही, त्याला कोणतेच कर्मफल प्राप्त होत नाही त्याचे सर्व संशय-सन्देह मिटून जातात व तो आपल्या स्वरूपात स्थित होतो. 

हा कर्मयोग आहे. जो मनुष्य सात्त्विकज्ञान, कर्म बुद्धि, धृती व सुख याना धारण करून कर्तृत्व-भोक्तृत्व यापासून रहित होतो, त्याने जरी सर्व प्राण्यांना मारून टाकले तरी त्याला पाप लागत नाही. (१०८ गीता उपदेश १८ अध्याय संपूर्ण गीतासार जीवनाचा रहस्य |positive thinking bhagavad gita quotes)

आपल्याच स्वरूपात नित्य स्थित असल्यामुळे त्याला पराभक्तीची प्राप्ती होते व तीमुळे तो परमात्मतत्त्वास यथार्थतेने जाणून त्यातच प्रविष्ट होतो. हा ज्ञानयोग आहे.

मनुष्य भगवन्ताचा आश्रय घेऊन संपूर्ण शुभकर्मांना सदा सांगोपांग करून देखील भगवत्कृपेने अविनाशी पदास प्राप्त होतो. जो मनुष्य भगवत्परायण होऊन संपूर्ण कर्मे भगवंतास अर्पण करतो तो परमात्मकृपेने संपूर्ण विघ्नबाधातून तरून जातो. 

जो आपल्यासह शरीर-मन-इंद्रियांना भगवंताकडेच लावून देतो, तो भगवंतालाच प्राप्त होतो. जो संपूर्ण धर्मांच्या आश्रयाचा त्याग करून अनन्य भावाने केवळ भगवंतालाच शरण जातो, त्याला भगवान् संपूर्णपापापासून मुक्त करतात हा भक्तियोग आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad