Type Here to Get Search Results !

bhagavad gita jayanti gita jayanti | Gita jayanti in marathi| गीता जयंती महत्व कथा|

गीता जयंती म्हणजेच आजच्या दिवशीच भगवान श्रकृष्णांनी अर्जुनाला गीता उपदेश केला होता. या दिवशी bhagavad gita jayanti gita jayanti साजरी केली जाते. मोक्षदा एकादशीच्या दिवशी गीता जयंती साजरी केली जाते. गीता जयंती बद्दल अधिक महिती जाणुन घेऊया...

bhagavad gita jayanti gita jayanti | Gita jayanti in marathi| गीता जयंती महत्व कथा|
bhagavad gita jayanti gita jayantiGita jayanti in marathi|


Gita jayanti in marathi 
संपुर्ण जीवनाचं सार हे भगवद् गीतेमध्ये आहे. अर्जुनाला पडलेल्या प्रश्नाची तसेच समस्यांची उत्तरे भगवंताने गीतेचा उपदेश देऊन समाधान केलें तसेच आपल्याही जीवनात अनेक प्रश्न निर्माण होतात तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला भगवद् गीतेमध्ये मिळते. भगवद् गीता हा हिंदू धर्माचा प्रमूख ग्रंथ मानला जातो. कारण त्यात सर्व ग्रंथाचं सार आहे तसेच ते स्वतः भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून निघालेले श्र्लोक आहेत. म्हणून bhagavad gita jayanti gita jayanti गीता जयंती साजरी केली जाते. 



bhagavad gita jayanti gita jayanti महत्त्व आणि कथा 

  • अशिक्षित असूनही गीता समजून घेतली

एक म्हातारे काका गंगेकाठी गीता वाचत होते. निमाई पंडित (गौरांग) तेथून जात होते. त्यांनी पाहिले की ते काका 'ऊँ हूँ.. ऊँ ऊँ...' करीत आहेत, गीतेचा कोणता श्लोक तर उच्चारत नाही आहेत पण रोमांचित होत आहेत - शांत, मौन, आनंदित होत आहेत. ते जवळ गेले आणि मागे

उभे राहिले. पाहिले की हे पाने तर उलटून राहिले. नाहीत पण 'ऊँ हूँ... ऊँ ऊँ...' करीत मोठ्या आनंदाने वाचत आहेत.

गीता वाचून ठेवली तेव्हा निमाई पंडिताने विचारले : "तुम्ही संस्कृत शिकला आहात ?" काका म्हणाले : “संस्कृतचे एक अक्षरही जाणत नाही.”

"गीता तर पूर्ण संस्कृतमध्ये आहे, मग तुम्ही का वाचत आहात ?"

"मी ऐकले आहे की अर्जुन विषादात बुडाला होता. अर्जुनाला भगवंताने उपदेश देऊन त्याचा विषाद दूर केला. तर ही गीता विषादनाशिनी आहे, विषाद दूर करून आपल्या आत्म्यात बसविणारी (स्थित करणारी) आहे. 'ऊँ हूँ... ऊँ ऊँ...' करतो, मला आनंद येतो, बाकी यात काय लिहिले आहे हे मला समजून येत नाही."गौरांग म्हणाले : "मी तर निमाई पंडित बनलो, शास्त्रार्थ करून दुसऱ्यांना पराजित केले आणि काही विशेष बनलो परंतु गीता तर तुम्हीच वाचली आहे काका ! मी वाचली नाही." bhagavad gita jayanti gita jayanti साजरी केली नाही.

हे पण वाचा:ashtavinayak live darshan | अष्टविनायक गणपती दर्शन आणि माहिती मराठी|अष्टविनायक

असेच कित्येक लोक भागवताची, रामायणाची कथा तर करतात पण भागवत, रामायण कोठे जाणतात ? चौपाई जाणतात, श्लोक जाणतात, त्यांचा लक्ष्यार्थ जाणत नाहीत.


  • 'आता शांती मिळविण्यासाठी गीता वाच' 

घाटवाले बाबांकडे एक प्रोफेसर आला नि म्हणाला : “महाराज ! तुमचे नाव ऐकून खूप दुरून आलो आहे. मला थोडी शांती मिळावी असा एखादा उपाय सांगा."


बाबांनी त्याला आपादमस्तक न्याहाळले, मग म्हणाले : “बरं, तू गीता वाच."


हे ऐकून तो चकित होऊन म्हणाला ः ''बाबा ! गीता !... गीता तर मी विद्यार्थ्यांना शिकवितो. मी महाविद्यालयात प्रोफेसर आहे. गीता मी कित्येकदा वाचली आहे. तिच्यावर माझी पूर्ण 'पकड' आहे. तिच्यात ७०० श्लोक आहेत, कित्येक श्लोक मला कंठस्थ आहेत. "

बाबा : “आजपर्यंत तू पैसे कमविण्यासाठीगीता वाचली आहेस, आता शांती मिळविण्यासाठी वाच.



  •  " पुरस्कार मिळवूनही गीतेपासून अनभिज्ञ

रविंद्रनाथ टागोरांना नोबेल पुरस्कार मिळाला होता. एके दिवशी सायंकाळची वेळ होती, ते मोठ्या मजेत जात होते. शेजारी एक म्हातारा ओट्यावर बसला होता. रविंद्रनाथ त्याला म्हणाले : "मी 'गीतांजली' लिहिली आहे, त्यासाठी मला नोबेल


पुरस्कार मिळाला आहे !" म्हाताऱ्याने पाहिले आणि विचारले : "अरे, तू गीतेला जाणतोस, ईश्वराला जाणतोस ?"

"गीतेला जाणतो...! माझ्या दार्शनिक चिंतनावर आधारित गीतेच्या संग्रहासाठी तर मला नोबेल पुरस्कार मिळाला आहे !"

"नोबेल पुरस्कार मिळविला तर कोणती मोठी गोष्ट केली !... गीतेला, ईश्वराला तर तू जाणत नाहीस!"

टागोर लिहितात की 'त्या वृद्ध माणसाने माझ्या (मान, मोठेपणा, अहंच्या) नशेचा चक्काचूर केला. वाटले की कोठून याचे दर्शन झाले !... इतके लोक वाहवाही करीत होते, इतके यश होत होते, मोठमोठ्या व्हाईसरायकडून सन्मानित होत होतो आणि त्या म्हाताऱ्याने थोड्याशा खोल आवाजात म्हटले की 'अरे, दार्शनिक गीते लिहिणे जाणतोस परंतु काय तू गीता जाणतोस ?.... गीतेला तर जाणत नाहीस, दार्शनिक साहित्य काय लिहिले !'


डोके गरगरू लागले, त्याच्या शब्दांमध्ये खोल आघात होता. विचार केला की 'त्याच्याकडे जाणेच योग्य नव्हते, तेथे थांबणे योग्य नव्हते... पण आता हे शब्द डोक्यातून कसे निघतील ? झोपायला गेलो तर शांत झोपही येत नाही.'

त्या अशिक्षित वयोवृद्ध ब्रह्मवेत्ता पुरुषाने रविंद्रनाथ टागोरांचा रोमरोम कंपित केला. रात्री झोप आली नाही. सकाळी मन जरा उदास होते, उदासी मिटविण्यासाठी नैसर्गिक वातावरणात फिरायला निघाले. सूर्योदय झाला, उषःकाळाची किरणे मिळाली.

सकाळच्या वेळी बुद्धीचाही थोडा विशेष विकास होतो, वातावरणात थोडा आनंद विशेष असतो. हेच कारण आहे की सकाळी रुग्ण व्यक्ती स्वतःला कमी दुःखी अनुभवतात.

सकाळची हवा खाता खाता बुद्धाने कुस बदलली. कवी तर होतेच, नैसर्गिक सौंदर्य पाहता- पाहता वाटले की 'अरे, कोठे तलाव आहे तर कोठे नदी आहे, कोठे कोणती भांडी-मडकी आहेत... हे साधन भिन्न-भिन्न आहेत, या सर्वामध्ये सूर्य भिन्न-भिन्न पद्धतीने चमकत आहे परंतु सूर्य तर एक आहे. असेच ते चैतन्य भिन्न-भिन्न साधनांमध्ये भिन्न-भिन्न पद्धतीने चमकत आहे पण ते चैतन्य तर एक आहे.' या विचारांमध्ये रविंद्रनाथ थोडे शांत झाले, मौन झाले. 'सर्वांमध्ये एक, एकात सर्व' असा विचार करता-करता निर्विचार अवस्थेत, आपल्या 'मी' मध्ये पोहोचले. मग जी विश्रांती मिळाली, जो आनंद आला, चेतना आली, जो आपला महिमा समजला त्याच्याने डोळ्यांमध्ये थोडी वेगळीच खुमारी आली.

आले त्या म्हाताऱ्याकडे, दार ठोठावले आणि म्हणाले : "मी गीतेला जाणले आहे, ईश्वराला जाणले आहे. ' "



म्हाताऱ्याने त्यांना न्याहाळले आणि म्हटले : "आजपर्यंत तू गीतेला समजला नव्हतास, आता समजला आहेस. एक श्लोकही उच्चारला नाहीस पण गीता आता तुला समजली आहे. तुझे डोळे याची ग्वाही देत आहेत. "

तर गरजेचे नाही की कोणी गीतेचा श्लोक बोलत असेल तर त्याने गीतेचा सार समजला आहे आणि कोणाला गीतेवर प्रवचन किंवा तिची व्याख्या करण्यासाठी पुरस्कार मिळाला तर तो माणूस आत्मज्ञ झाला. पंडित, विद्वान किंवा शास्त्री बनणे वेगळी गोष्ट आहे आणि ब्रह्मवेत्ता बनणे काही। निराळीच गोष्ट आहे !

इकडे लागतो... जन्म-मृत्यूच्या, वार्धक्याच्या, मित्रांनी केलेल्या बेईमानीच्या दुःखाची आठवण करतो; शत्रूंच्या सतविणाऱ्या शब्दांना, संसाराच्या नश्वरतेला आठवतो तेव्हा वाटते की अनित्यं असुखं च... - हे अनित्य आहे, सुखरहित आहे. जे अनित्य आहे, सुखरहित आहे त्याला हटविता-हटविता बाकी जे उरते ते नित्य आहे, सुखस्वरूप आहे. 'हे' ला हटविता - हटविता बाकी जे उरते ते 'मी' आहे. जेव्हा 'मी' मध्ये विश्रांती मिळते तेव्हा मग गीता समजून येते, उपनिषदे समजून येतात. bhagavad gita jayanti gita jayanti चे महत्व थोडक्यात....

१०८ गीता उपदेश १८ अध्याय संपूर्ण गीतासार जीवनाचा रहस्य |positive thinking bhagavad gita quotes

मूर्ती पूजा म्हणजे काय? मूर्ती पूजा का करावी? जाणून घ्या गीतानुसार मूर्ती पूजा चे महत्व |



टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad