Type Here to Get Search Results !

योग म्हणजे काय योगाचे महत्त्व माहिती मराठी | व्यायाम| Yog in Marathi|

योग म्हणजे शरीर, मन आणि आत्मा या सर्वांना ईश्वराशी जोडणे होय. योग म्हणजे काय योगाचे महत्त्व काय आहे, योग म्हणजे बुद्धी, मन, भावना आणि संकल्प यांचे नियमन होय. योग म्हणजे आत्म्याचे स्थिरत्व होय. योग म्हणजे मनुष्याचे त्याच्या आत्मशक्तीशी मिलन होय. आत्मशक्ती म्हणजे कुंडलिनी आणि आरोग्य हीच कुंडलिनीची देणगी होय. कुंडलिनी ही आनंदाची माऊली आहे, विश्रांती, तृप्त झोप, पूर्ण अनुभवजन्य विश्वास, ज्ञान यांची जननी होय. योग म्हणजे आपला आत्मा परमेश्वराशी जोडणे होय. सत्य, ईश्वर यांचे ज्ञान प्राप्त करून घेण्याचा मार्ग होय.

योग म्हणजे काय योगाचे महत्त्व माहिती मराठी | व्यायाम| Yog in Marathi|
योग म्हणजे काय?

योग म्हणजे काय योगाचे महत्त्व YOG MARATHI 

योग हा शब्द संस्कृत भाषेतील 'युज' या शब्दापासून बनलेला आहे. एकत्र जुळवणे, जोडणे, संयोग पावणे, एकत्व साधणे असा या शब्दाचा अर्थ होय. पतंजलीने परमात्म्याच्या प्राप्तीसाठी असलेल्या साधनांचा उल्लेख योगाच्या आठ अंगांच्या स्वरूपात केलेला आहे. यामुळे योग अष्टांगयोग म्हणून प्रसिद्ध आहे.



अष्टांगयोग   कोणते आहे?

  1. पहिले अंग 'यम' होय. यमाने सर्व जीवनाला नियंत्रित करता येते.
  2. दुसरे अंग 'नियम' होय. शरीराची निगा, प्रत्यही स्नान, आहारविषयक नियमांचे पालन करता येते.
  3. तिसरे अंग 'आसन' होय. डोके, खांदे, कंबर सरळ ठेवले म्हणजे पाठीचा कणा मोकळा राहतो. व्यायामाने शरीरही निरोगी राहते.
  4. चौथे अंग 'प्राणायाम' होय. प्राणावर प्रभुत्व मिळविण्यासाठी याच्या साहाय्याने श्वसनक्रियेमार्फत नियंत्रण ठेवता येते. 
  5. पाचवे अंग 'प्रत्याहार' होय. इंद्रिय व विषय यांच्या प्रभुत्वाखालून मन काढून, त्याचा उद्धार करून, मन अंतर्मुख करता येते.
  6. सहावे अंग 'धारना' होय. कोणत्याही एका विषयावर आपले मन एकाग्र करता येते. ही पूर्ण तल्लीनतेची अवस्था प्राप्त करून घेण्यासाठी चित्त स्थिर करता येते.
  7. सातवे अंग 'ध्यान' होय. ध्यानाने आरोग्य, शरीराचा तरलपणा, स्थिरता, चेहऱ्यावरील प्रसन्नता, मधुर कंठ, शरीराला सुगंध येणे आणि निर्लोभ वृत्ती या गोष्टी प्राप्त होऊ लागतात. अशाप्रकारे आपल्याला समजले योग म्हणजे काय योगाचे महत्त्व काय आहे ते 
  8. आठवे अंग 'समाधी' होय. आपल्या सर्व प्रयत्नांचे उद्दिष्ट असलेली ज्ञानप्राप्ती होय. ध्यानाची स्थिती पूर्णतेला पोहोचली की योगी समाधी अवस्थेत प्रवेशतो. जणू काही निद्रिस्त असल्याप्रमाणे भासून, योगी जाणीवयुक्त व जागृत असतो. सर्व सृष्टी हे ब्रह्म आहे या ब्रह्मातून आपण निर्माण झालो व यातच आपण विलीन होणार आहोत हे योगी जाणतो. त्यालाच योग प्राप्त झालेला असतो.


  • यम नियम 

यम आणि नियम यामुळे योग्याच्या भावना आणि वासना नियंत्रणात राहतात आणि आपल्या बांधवांशी त्याचे जिव्हाळ्याचे संबंध राहतात. आसनामुळे शरीर निरोगी, बलवान आणि निसर्गाशी संवादी राहते. शेवटी योग्याची शरीराबद्दलची जाणीव हळूहळू नाहीशी होऊ लागते. योगी देहावर ताबा मिळवितो आणि त्याला आत्म्याचे वाहन बनवतो. अशा प्रकारे पहिली तीन अंगे म्हणजे बहिरंग साधना होय.

आंतरराष्ट्रीय योग दीन 2023: International Yoga Day 2023 Celebration & Importance | योग दिवसाचे महत्त्व

  • प्राणायाम आणि प्रत्याहार

प्राणायाम प्रत्याहार ही अंगे योग्याला श्वसनावर नियंत्रण ठेवण्यास व त्याद्वारे मनाचे नियमन करावयास शिकवतात. यामुळे विषयांच्या दास्यातून इंद्रियांची सुटका करणे शक्य होते. अशा प्रकारे ही दोन अंगे म्हणजे अंतरंग साधना होय.


  • आसन 

आसनांनी शरीरशुद्धी झाली. प्राणायामाच्या अग्नीत मनाचे दोष जळून गेले आणि प्रत्याहारच्या साहाय्याने इंद्रिये अधीन झाली, म्हणजे योगी 'धारण' या योगाच्या टप्प्याजवळ पोहोचतो.

  • धारणा ध्यान 

धारणा, ध्यान आणि समाधी ही अंगे योग्याला आत्म्याच्या केंद्रापर्यंत नेऊन पोहोचवतात. ईश्वर हा आपल्याच अंतरंगात आहे, त्यालाच आत्मा म्हणतात हे जाणून आपण आणि परमात्मा यांच्यात एकरूपता निर्माण होते आणि टिकून राहते. अशा रीतीने ही तीन अंगे म्हणजे अंतरात्मा साधना होय.


ध्यानधारणेमुळे ज्ञाता, ज्ञान व ज्ञेत ही एक होतात. द्रष्टा, वृष्टी, दृश्य यांना परस्परांपासून वेगळे अस्तित्व राहत नाही. यातून योगी स्वभावात स्थिर होतो आणि परमात्म्याचा त्याच्यामधील अंश जो जीवात्मा त्याचे ज्ञान योग्याला होते.



स्वत:च्या जास्तीत जास्त सामर्थ्यानुसार उंचावलेल्या स्वतःच्या व्यक्तिमत्त्वप्राप्तीसाठी शारीरिक व मानसिक स्वास्थाची अत्यंत जरुरी आहे. शारीरिक व मानसिक स्वास्थ्यास योगसाधनेसारखा सोपा, सरळ व बिनखर्चाचा दुसरा व्यायाम किंवा मार्ग उपलब्ध नाही.

हे पण पहा - अगस्त्य ऋषी माहिती मराठी | दंडक अरण्य माहिती मराठी | Agastya Rushi Information in Marathi




व्यायाम म्हणेज नक्की काय?

आता आपण बघितल की योग म्हणजे काय योगाचे महत्त्व काय ते आता बघुया व्यायाम म्हणजे काय? ज्यापासून आपल्या अंत:करणाला स्थिरत्व व देहाच्या शक्तीची वाढ होते अशा ज्या शरीराच्या क्रिया, त्याला व्यायाम असे म्हणतात. मनुष्य पूर्ण स्वास्थ्यदशेत राहण्यास देहाच्या प्रत्येक अवयवाच्या हालचाली यथायोग्य झाल्या पाहिजेत आणि तसे न झाले तर सर्व इंद्रिये व गात्रे शिथिल होऊन, आपल्या अमूल्य देहाचा नाश त्वरित झाल्यावाचून राहणार नाही. श्रम केल्याने वातादि दोषांचा क्षय व अग्नीची वृद्धी होते. आपल्या शरीराची झीज होते. 


व्यायामाने गात्रे दृढ झाली म्हणजे व्याधी कधीही होत नाही. व्यायामाचे या दृष्टीने दोन प्रकार करता येतील एक शारीरिक व दुसरा मानसिक. योगासनाखेरीज इतर कोणत्याही व्यायामाने हे पूर्णत्वाने साधता आलेले नाही. शरीराच्या निरोगीपणास व पुष्ठतेस समप्रमाणात ज्याची अधिकाधिक मदत होईल असा व्यायाम म्हणजे योगासनाचा व्यायाम होय. 



योगासनाच्या व्यायाम पद्धतीत, शारीरिक व्याधीस कारणीभूत होणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या अशा मज्जातंतूंच्या विशुद्ध कार्यक्षमतेचा व त्यामानाने वेळेची बचत करण्याचा विचार परिपूर्ण आहे.


योगासनाचा व्यायाम हा एक सर्वोत्कृष्ट व्यायाम आहे. जितकी शास्त्रशुद्धता हवी असते तितकी आसनाच्या व्यायामात असते. शारीरिक व्यायामाच्या म्हणजेच आरोग्यप्रद कार्याच्या सर्वांगांचे गुण आसनांमध्ये आहेत. 


या व्यायामाचे गुण, शरीर व मन या दोहोंना उपयुक्त असतात. योगासनाचा नियमित व्यायाम घेणारा सहसा कधी आजारी पडत नाही व पडल्यास बरे होणे त्याच्याच हातात असते; कारण योगासनाचा परिणाम शरीराच्या महत्त्वाच्या अवयवांवर होत असतो. आसने करताना काही महत्त्वाच्या सूचना पुढीलप्रमाणे- योगासनाचा व्यायाम सकाळी वा संध्याकाळी यांपैकी कोणत्यातरी एका वेळेस केला पाहिजे. 


त्यातल्या त्यात संध्याकाळची वेळ उत्तम कारण, दिवसभरातील हालचालींनी आपले शरीर सकाळपेक्षा अधिक लवचीक असते. शास्त्रीयदृष्ट्या सकाळची वेळ अधिक उपयुक्त कारण, त्या वेळेस पोट रिकामे असून मनही प्रसन्न असते. दिवसभर काम करण्याचा उत्साह व श्रम सहन करण्याची क्षमता सकाळच्या व्यायामाने निर्माण होते. यामुळे सकाळची वेळ सोईस्कर ठरते. थोडक्यात, कोणत्याही एक वेळा व्यायाम करावा. 


श्वासोच्छ्वासाची क्रिया चालविणारे जे फुप्फुस ह्यामध्ये स्नायूंच्या चलनवलनाने सवपिक्षा अधिक फेरफार घडून येतात. फुप्फुसांतील रक्ताभिसरण फार जोराने चालते आणि श्वासोच्छ्वास लवकर चालल्याने हवा जाऊन, उष्णता जास्त उत्पन्न होऊन ती बाहेर पडते. स्नायूंच्या चलनवलन क्रियांपासून त्याच्या मूलतत्वाचे रूपांतर होऊन जी उष्णता उत्पन्न होते ती फुप्फुसांवाटे बाहेर पडते.


अशा रीतीने निरुपयोगी झालेले पदार्थ, मांसरज्जूतील कचरा व्यायामाने बाहेर टाकले जातात. योग म्हणजे काय योगाचे महत्त्व आपण बघितल तर व्यायाम करताना तो उघड्या जागेत व मोकळ्या हवेत करावा. हवेत गारठा असेल तर शरीरास बाधणार नाही अशी काळजी घेऊन, त्याप्रमाणे खिडक्या दरवाजे लावावेत. 

हवेत फारच थंडावा असेल तर अंगावर सैलसा गरम कपडा परिधान करावा. व्यायाम करावयाची जागा स्वच्छ असावी. माशा, डास, ढेकूण आदींचा उपद्रव होणार नाही अशी जागा असावी. मनाच्या प्रसन्नतेसाठी सुगंधी उदबत्ती लावणे हे अधिक उत्तम

व धष्टपुष्ट माणसास, चालणे हा उत्कृष्ट व्यायाम आहे. तरुणांची शरीरसंपत्ती वृद्धिंगत होण्यास कुस्ती, जोर, दंड, सूर्यनमस्कार यांसारखे व्यायाम चांगले. जेवणानंतर व्यायाम करू नये. कारण त्यामुळे हृदयाची क्रिया बिघडून, शरीराच्या महत्त्वाच्या इंद्रियांवर दाब पडून, फुप्फुसे व हृदय यांच्या रचनेस पीडा पोहोचते. 

त्यामुळे फुप्फुसांत रक्ताधिक्य अधिक होऊन, छातीतून कळा येतात वा ग्लानी, रक्तपित्त, ज्वर, खोकला, पित्तादि विकार उत्पन्न होतात. 

व्यायाम बेताचा व शरीरप्रकृत्तीनुसार असावा, अन्यथा त्याचे उलटे परिणाम होतात. बलक्षय होतो, ज्ञानतंतूचा क्षोभ होतो व त्यातून रोगाची बाधा होते व्यायाम एकसारखा वाढवित जाऊ नये तर चढत्या क्रमाने वाढवित जावा..


एकच वेळी एकाच प्रकारचा पुष्कळ व्यायाम न करता निरनिराळ्या प्रकारचा थोडा-थोडा व्यायाम करावा म्हणजे सर्व अवयवांस व्यायाम घडतो. एकाच प्रकारचा व्यायाम केल्यास शरीराचे काही ठरावीक स्नायू, अवयव बळकट होतात; पण त्यामानाने इतर अवयव कमकुवतच राहतात.


शक्यतो व्यायाम सुरुवातीला एखाद्या व्यायामतज्ज्ञाकडून शास्त्रोक्तरित्या शिकून घ्यावा; नाहीतर चुकीच्या पद्धतीचा अवलंब केला गेल्यास, त्याचे उलट व वाईट परिणाम शरीरावर होतात.


व्यायामाचा परिणाम हळूहळू दिसून येतो, म्हणून निराश न होता, व्यायामात सातत्य ठेवावे. साधारणपणे सहा महिन्यांपासून ते वर्षापर्यंत नियमितपणे व्यायाम केल्यावर इष्ट परिणाम स्पष्टपणे जाणवतात. उतावीळ होऊन अधिक परिणामासाठी फार मेहनत करू नये.


जोर, जोडी, बैठका यांसारखे व्यायाम शक्ती वाढवतात, पण चापल्य वाढवित नाहीत. त्याकरिता ह्या व्यायामांबरोबर चापल्य वाढविणारे इतर व्यायाम-कुस्ती, मल्लखांब, दांडपट्टा, लाठी यांसारखे व्यायाम करणे आवश्यक आहे.

  • निष्कर्ष:- 

बहुतेक लोकांना योग म्हणजे काय योगाचे महत्त्व काय ते माहीत नसते त्यामूळे ते व्यायामाला योग समजतात त्यासाठी ही संपुर्ण माहिती वाचण्यासाठी शेअर केली आहे. आपल्याला ही माहिती कशी वाटली नक्की कळवा कॉमेंट मध्ये आणि सर्वांना ही महत्वाची माहिती शेअर करा खाली शेअर चे बटण आहेत WhatsApp, Facebook, सगळीकडे करा शेअर. 


हे पण वाचा - योगासने करताना घ्यावयाची काळजी | योगासने करण्यापूर्वी महत्वाच्या सूचना आणि २५ नियम |

  • FAQ 

प्रश्न उत्तरे :-

  • अष्टांगयोग म्हणजे काय?

पतंजलीने परमात्म्याच्या प्राप्तीसाठी असलेल्या साधनांचा उल्लेख योगाच्या आठ अंगांच्या स्वरूपात केलेला आहे. यामुळे योग अष्टांगयोग म्हणून प्रसिद्ध आहे.

  • अष्टांगयोग कोणते आहे? नावे

यम, नियम, प्रत्याहार, आसन,प्राणायाम, ध्यान, धारणा, समाधी हे अष्टांगयोग आहे.

  • योग म्हणजे काय?

योग हा शब्द संस्कृत भाषेतील 'युज' या शब्दापासून बनलेला आहे. एकत्र जुळवणे, जोडणे, संयोग पावणे, एकत्व साधणे असा या शब्दाचा अर्थ होय. 

  • प्राणायाम म्हणजे काय?

प्राणावर प्रभुत्व मिळविण्यासाठी प्राणायामच्या  साहाय्याने श्वसनक्रियेमार्फत नियंत्रण ठेवता येते. प्राणायाम हे अष्टांगयोग मधील एक प्रक्रिया आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad