Type Here to Get Search Results !

श्रीदत्त जयंती कशी साजरी करावी? दत्त जयंती ची पूजाविधी कशी करावी?

 श्री.गुरुदेव दत्त नमस्कार  7 डिसेंबर बुधवार रोजी दत्त जयंती चा महा पर्व साजरा केला जाणार आहे. मार्गशीर्ष पौर्णिमे च्या मृग नक्षत्रा मध्ये  म्हणजे संध्याकाळच्या वेळी दत्त गुरु महाराजांचा जन्म झाला होता आणि हा पर्व दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो. मग आज आपण श्रीदत्त जयंती कशी साजरी करावी? दत्त जयंती ची पूजाविधी कशी करावी? कोणता मंत्र म्हणावा व कोणता आवडता नैवेद्य दाखवा त्या विषयी सविस्तर माहिती सांगितली आहे. 

श्रीदत्त जयंती कशी साजरी करावी? दत्त जयंती ची पूजाविधी कशी करावी?
दत्त जयंती पूजा विधी 


निशाणी श्रीदत्तात्रेयांचे स्वरूप हे त्रिगुणात्मक त्रिमूर्ती असलेली ब्रह्माविष्णु, महेश अशा स्वरूपाचे आहे. सत्त्व, रज आणि तम हे त्रिगुण तसेच या गुणांची प्रतीक म्हणजे त्रिमूर्ती व्यक्त होत. श्री दत्ता ची उपासना तीन प्रकारे करता येते. पहिला म्हणजे गायत्री मंत्राणी, दुसरा गुरु मंत्र, स्मरणी आणि तिसरं म्हणजे आपले श्री गुरुचरित्र ग्रंथा ची पारायण सेवेतून श्री दत्त गुरूंची सेवा करता येते. 

जयंतीच्या दिवशी श्री गुरुचरित्र अध्याय चार म्हणजेच दत्त जन्म कथा ही अवश्य श्रवण करावी. 


दत्त जयंती ची पूजाविधी कशी करावी?

  • आता आपण दत्त जयंती च्या दिवशी श्री गुरुदत्त यांची उपासना तसेच पूजाविधी कशी करावीत याविषयी जाणून घेऊया, तर या दत्त जयंती च्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे.
  • आपले स्नाना दी नित्यकर्म निवृत्त होऊन सर्वप्रथम सूर्यदेवाला जल अर्पण करायचा आहे व आपल्या हाता मध्ये जल फूल तांदूळ घेऊन आपण याच्या दत्त जयंतीच्या व्रता चा संकल्प करायचा आहे आणि आपल्या नित्य पूजा स्थळी आपण सुशोभन करायचे आहे. 
  • आपली नित्य पूजा संपन्न करायची आहे. या दत्त जयंती च्या दिवशी आपल्याला प्रदोषकाळाचे पूजनाचे महत्व आहे कारण प्रदोषकाळ सायंकाळी सत्त्वगुण चा जन्म झाला होता.

श्री दत्त गुरु पूजन 

  • त्यावेळी आपण दत्त गुरु चे पूजन करायचे आहे. . त्याआधी आपण ज्या ठिकाणी आपले पूजन करायची आहे ती जागा स्वच्छ करायची आहे. 
  • रांगोळी काढाय ची आहे. फुलांनी सुशोभित करायचे आहे.
  • त्यावर पाठ वायचा ही लाल कापड घेऊन त्यावर श्री दत्तगुरूंची मूर्ती अथवा प्रतिमा स्थापित करावी. 
  • श्री गुरुदेव दत्त या मंत्रा चा जप करावा. नंतर श्री दत्त गुरूंची पूजा करायची आहे. त्यांना गंध लावा त्यांना अक्षता फूल अर्पण करायचा आहे. 
  • आपण फुल अर्पण करत असताना सात किंवा सातच्या पटी मध्ये आपण ती फुलं अर्पण करायची आहे. 
  • तशी दत्तगुरूंना प्रिय असलेली जाळी आणि निशिगंधा ची फुले या दिवशी आपण त्यांना नक्की अर्पण करायची आहे. 

श्री दत्त गुरु आरती 

  • तसेच त्यानंतर धूप दीप लावायचे आहे. श्री दत्ताची आरती करायची आहे. 
  • श्री गुरु दत्ता ना आवडता नैवेद्य म्हणजे साखर मिश्रित दूध किंवा आपण रव्या चा शिरा जो दत्तगुरूंना अत्यंत प्रिय आहे तो त्यांना आपण अर्पण करायचा आहे. 


श्री गुरुदेव दत्त जन्म कथा श्रवण 

  • तसेच सह कुटुंब दत्त जन्म कथा श्रवण करावी, श्री गुरु चरित्र सारामृत वाचन करावे तसेच या दिवशी औदुंबर वृक्षाचीही पूजा केली जाते व श्रीदत्त ना प्रसन्न करण्यासाठी आपण या दिवशी या विशेष मंत्रा चा जप अवश्य करायचा आहे. 
  • तो मंत्र आहे ॐ दत्तात्रयाय नम:  
  • तसेच ॐ दिगंबराय विद्महे योगेश्वराय श्रीम ही तनोत प्रचोदयात्॥ या मंत्रा चा आपण अवश्य जप करावा. 
  • ज्या मुळे मानले जाते की श्री दत्तात्रेय यांच्या कृपेने सर्व पातकांचा नाश होतो व साधकांचा उद्धार होतो त्याचबरोबर त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असा श्री दत्त गुरूंचा महिमा आहे. खरी दत्त जयंती च्या दिवशी श्री दत्ता ची पूजा आराधना व नामस्मरण करावे. 





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad