गणपती बाप्पा मोरया! अष्टविनायक गणपती मंदिराचे लाईव्ह दर्शन इथे करावे ashtavinayak live darshan लिंक सर्वांना शेअर करावी. अष्टविनायक मंदिराविषयी माहिती सुध्दा इथे उपलब्ध आहेत.
अष्टविनायक गणपती लाईव्ह दर्शन
मोरगांव मयुरेश्वर लाईव्ह दर्शन |
सिद्धिविनायक मंदिर लाईव्ह दर्शन |
पाली बल्लाळेश्वर लाईव्ह दर्शन |
विघ्नहर मंदिर Live Darshan |
लेण्याद्री गणपती मंदिर लाईव्ह दर्शन |
वरद विनायक मंदिर लाईव्ह दर्शन |
थेऊर चिंतामणी मंदिर लाईव्ह दर्शन |
रांजणगाव महागणपती मंदिर लाईव्ह दर्शन |
👉श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर लाईव्ह दर्शन
अष्टविनायक लाईव्ह दर्शन ashtavinayak live darshan
- मोरगाव - मयुरेश्वर
पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील पुण्यापासून ६४ कि.मी. अंतरावरील कऱ्हा नदीच्या काठावर वसलेले हे परमपवित्र स्थान 'भुस्वानंदभुवन' या नावाने प्रसिद्ध आहे. गंडकी नगरीचा राजा 'चक्रपाणी' याला सूर्यकृपेने झालेल्या सिंधु नावाच्या मुलाने देवांचा पराभव केला तेव्हा भगवान श्रीविष्णुने पार्वतीच्या उदरी 'मयुरेश्वर' या नावाने जन्म घेऊन मोरावर बसून सिंधुसुराचा वध केला. व त्याचे तीन तुकडे करून तीन दिशांना फेकले. सिंधुसुराचे मस्तक ज्या ठिकाणी पडले ते हे मोरगाव होय. पूर्वी गावाजवळ मोर होते. व गावाचा आकार मोरासारखा असल्याने आणि सिंधुसुराचा वध मोरावर बसून केल्याने या स्थानाला मोरगाव म्हणतात. मोरगावच्या या मंदिरात बसून श्री समर्थ रामदास स्वामींनी सुखकर्ता दुःखहर्ता ही आरती तयार केली. सिंधु व त्याचा सेनापती कमलासूर यांची हत्या केलेले हे स्थान गणेश भक्तांचे आद्यपीठ आहे.
- सिद्धटेक - सिद्धिविनायक
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील भीमा नदीच्या किनारी महर्षी वेद व्यासांनी या ठिकाणी यज्ञ केला. आजही यज्ञ स्थानी भस्म निघते. सृष्टी निर्माण करण्यापूर्वी ब्रह्मदेवाने येथे श्रीगणेशाची आराधना केली होती. याच ठिकाणी ब्रह्मदेवाला त्रास देणाऱ्या व युद्धात विष्णूला हरविणाऱ्या 'मधु व कैटभ' या राक्षसांचा श्रीगणेशाने नाश केला. श्रीविष्णुला गणेशाने याच ठिकाणी सिद्धी दिली. म्हणून गणेशाला सिद्धिविनायक असे म्हणतात. भाद्रपद व माघ महिन्यातील चतुर्थीला उत्सव होणारे हे मंदिर पुण्यश्लोक अहिल्याबाईंनी बांधले आहे.
- पाली - बल्लाळेश्वर
रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील पुण्यापासून ११० किमी अंतरावर असणाऱ्या पाठीच्या बल्लाळेश्वराच्या मंदिराचा जिर्णोद्धार चिमाजी आप्पा पेशवे यांनी केला व एक मोठी घंटा अर्पण केली. कोकणातील पहीर नावाच्या गावी 'कल्याण व इंदुमती' या दांपत्यास 'बल्लाळ' नावाचा गणेशभक्त मुलगा झाला. गावातील मुले बल्लाळबरोबर श्रीगणेशभक्तीत रमून जात. 'आमची मुळे तुमच्या मुलामुळे बिघडली' असा आरोप गावातील लोकांनी करून त्यास शिक्षा केली. आपल्या भक्ताच्या भक्तीसाठी श्रीगणेश प्रकट झाले व बल्लाळेश्वर विनायक' या नावाने पालीला निवास करून राहिले.
- महड (मढ)- श्रीवरदविनायक
- रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील पुण्यापासून ७५ किमी अंतरावर खोपोलीजवळ हे अष्टविनायकाचे स्थान आहे. गाणपत्य सांप्रदायाचा आद्यप्रवर्तक गृत्समद यांच्या तपश्चर्येने हे स्थान पावन झाले आहे. भिम राजाचा पुत्र 'रुख्मानंद' शिकारीला गेल्यानंतर बाचक्नवी ऋषींची पत्नी मुकुंदा हिने त्याच्याजवळ कामेच्छा व्यक्त केली; परंतु त्याने नाकारताच त्याला कुष्ठरोगी होशील असा शाप दिला. परंतु रुख्यागंदाने गणेशाची आराधना केल्यामुळे तो शापमुक्त झाला. परंतु इंद्राने मायावी रूप घेऊन मुकुंदाची इच्छा पूर्ण केली. त्यांच्यापासून झालेला पुत्र म्हणजे गृत्समद होय. आईच्या दुवर्तनामुळे त्याने गृहत्याग केला व अरण्यात गणेशाची आराधना केली. त्याच्या इच्छेसाठी वर देणारा विनायक - वरदविनायक या नावाने गणराय ओळखले जाऊ लागले. माघ शुद्ध चतुर्थीला येथे यात्रा भरते.
- थेऊर चिंतामणी
पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील थेऊर हे गाव अष्टविनायक म्हणून प्रसिद्ध आहे. राजा अभिजित व गुणवती यांनी वैशंपायन ऋषींच्या आज्ञेने पुत्रप्राप्तीसाठी तपश्चर्या केल्यावर त्यांना गण नावाचा पुत्र झाला. परंतु तो मोठा झाल्यावर त्याने उन्मत्त होऊन कपिल मुनींच्या जवळचा चिंतामणी हरण केला. कपिल ऋषींनी श्रीगणेशाची आराधना केल्यावर गणेशाने गणांचा वध केला व चिंतामणी प्राप्त केला. कपिल ऋषींनी आठवण म्हणून हे रत्न गणरायास अर्पण केले. म्हणूनच गणपतीने चिंतामणी हे नाव धारण केले. पुण्यापासून २३ किमी अंतरावरील थेऊर हे गाव कदंबनगर म्हणूनही ओळखले जाते.
- लेण्याद्री श्रीगिरिजात्मज
पार्वतीने पुण्यातील जुन्नर तालुक्यातील जुन्नर शहरापासून ५ किमी अंतरावर हे पवित्र स्थान आहे. लेण्याद्रीला १२ वर्षे कठोर तपश्चर्या केल्यावर श्रीगणेशाने तिच्या पोटी जन्म घेतला. या ठिकाणी श्रीगणेशाने अनेक मायावी राक्षसांचा वध केला. हे गणेशमंदिर खडकात कोरलेले असून तेथे भाद्रपद व माघ शुद्ध चतुर्थीला यात्रा भरते.
- ओझर - श्रीविघ्नेश्वर
पुण्यापासून ७५ किमी अंतरावरील ओझर या ठिकाणी चिमाजी आप्पा पेशवे यांनी जिर्णोद्धार केलेले हे श्रीविघ्नेश्वराचे मंदिर आहे. इंद्रपद मिळविण्यासाठी हेमवती नगरीच्या अभिनंदन राजाने सुरू केलेल्या यज्ञात इंद्राच्या सांगण्यावरून काळाने विघ्नासूर नाव धारण करून हा यज्ञ उद्ध्वस्त केला. व सर्वसामान्यांना त्रास देण्यास सुरुवात केली. तेव्हा सर्वांच्या भक्तीमुळे श्रीगणेशाने पार्श्व व दिपवत्स नावाच्या ऋषी दांपत्याच्या पोटी जन्म घेऊन विघ्नासुराचा पराभव केला. परंतु विघ्नासुराच्या याचनेमुळे त्याला अभय दिले. याच ठिकाणी विघ्नासुराने वर मागितला म्हणून त्यास विघ्नेश्वर म्हणतात.
- रांजणगाव - महागणपती
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पुण्यापासून ६० किमी अंतरावर हे अष्टविनायकाचे स्थान आहे. त्रिपुरासुर या असुराने तिनही लोक जिंकल्यानंतर लोकांचा छळ सुरू केला. तेव्हा घाबरलेल्या सर्व देवांनी • गणेशाची प्रार्थना केली. श्रीगजाननाने ब्राह्मणाचे रूप घेऊन त्रिपुरासुराकडे आले व मला चौसष्ट कला येतात, त्या मी तुम्हाला दाखवितो. असे सांगितले, 'तुझी कला मला आवडली तर मी तुला माझे प्राणही देईन' असे त्रिपुरासुराने म्हटल्यावर गणेशाने त्याला तीन विमाने दिली व या विमानात बसून तू कोठेही जाऊ शकशील; परंतु जर भगवान शंकराने बाण मारला तर तू विमानासहित नष्ट होशील असे सांगितले. भगवान शंकराने त्याचा त्रिपुरी पौणिमेला वध केला, तेच हे ठिकाण म्हणजे मणिपूर ऊर्फ रांजणगाव. मूर्तीच्या खाली तळघर असून त्यात दहा सोंडी व वीस हाताची गणेशाची मूर्ती आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला येथे यात्रा भरते.
अष्टविनायकाची ही आठ स्थाने म्हणजे हिंदूंची श्रद्धास्थाने, पवित्रस्थाने या अष्टविनायकाची यात्रा करावी. गणरायांचा संग लाभावा, दर्शन घडावे अशीच सर्व गणेशभक्तांची भावना असते, जीवनेच्छा असते.