Type Here to Get Search Results !

Ranjangaon ganpati mandir live darshan today | रांजणगाव गणपती मंदिर दर्शन| माहिती मराठी

गणपती बाप्पा मोरया! रांजणगाव गणपती मंदिर चे लाईव्ह दर्शन इथे बघायला मिळणार आहे. ranjangaon ganpati mandir live darshan today | तसेच रांजणगाव गणपती मंदिर बद्दल माहिती इतिहास आपल्याला इथे वाचायला मिळणार आहे.


Ranjangaon ganpati mandir live darshan today 








रांजणगाव गणपती मंदिर माहिती मराठी 
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पुण्यापासून ६० किमी अंतरावर हे अष्टविनायकाचे स्थान आहे. त्रिपुरासुर या असुराने तिनही लोक जिंकल्यानंतर लोकांचा छळ सुरू केला. तेव्हा घाबरलेल्या सर्व देवांनी गणेशाची प्रार्थना केली. 


श्रीगजाननाने ब्राह्मणाचे रूप घेऊन त्रिपुरासुराकडे आले व मला चौसष्ट कला येतात, त्या मी तुम्हाला दाखवितो. असे सांगितले, 'तुझी कला मला आवडली तर मी तुला माझे प्राणही देईन' असे त्रिपुरासुराने म्हटल्यावर गणेशाने त्याला तीन विमाने दिली व या  बसून तू कोठेही जाऊ शकशील; परंतु जर भगवान शंकराने बाण मारला तर तू विमानासहित नष्ट होशील असे सांगितले. 

भगवान शंकराने त्याचा त्रिपुरी पौणिमेला वध केला, तेच हे ठिकाण म्हणजे मणिपूर ऊर्फ रांजणगाव. मूर्तीच्या खाली तळघर असून त्यात दहा सोंडी व वीस हाताची गणेशाची मूर्ती आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला येथे यात्रा भरते.
ranjangaon ganpati mandir live darshan करा आणि शेअर करा.


अष्टविनायकाची ही आठ स्थाने म्हणजे हिंदूंची श्रद्धास्थाने, पवित्रस्थाने या अष्टविनायकाची यात्रा करावी. गणरायांचा संग लाभावा, दर्शन घडावे अशीच सर्व गणेशभक्तांची भावना असते, जीवनेच्छा असते. ranjangaon ganpati mandir live darshan केल्याने आनंद प्राप्त होते.


शुभ कार्याची सुरुवात आपण श्रीगणेशाच्या पूजेने करतो. ही आपली प्राचीन काळापासून चालत आलेली परंपरा आहे. देवदेवतांच्या साक्षीने जी कामे होतात, ती मंगलमय असतात. अशा कार्यात सगळा आनंदच असतो; आणि तो ओतप्रोतपणे भरभरून वाहात असतो. अशा कार्यक्रमाची धुरा पेललेली असते. 

देवाने, श्रीगणेशाच्या पूजेने अशीही कामे असतात जेव्हा पूजेसाठी श्रीगणेशाची मूर्ती प्रतिमा की प्राप्त होऊ शकत नाही; अशा वेळी गणपतीचे प्रातिनिधिक स्वरूप म्हणून सुपारी योजतात व तिची यथाविधीं पूजा करतात. शेतात विहीर खोदायची आहे, विहिरीला पाणी लागणार असे भूगर्भीय सर्वेक्षणांतून सांगितले गेले आहे; तेव्हा उत्साहभरीत मनाने आपण त्या भूमीची पूजा करतो. येथे सुपारीचीच गणपती म्हणून पूजा केली जाते. अशा रीतीने शुभ कार्याच्या प्रारंभी श्रीगणपतीची पूजा आपण करतो.

श्रीगणेशास 'विघ्नहर्ता' असेही म्हणतात. त्याच्या स्मरणाने कार्यात विघ्न अथवा बाधा केव्हाही येत नाही. म्हणूनच गणेशभक्त सकाळ-संध्याकाळ मंदिरात जाऊन श्रीगणेशाचे दर्शन घेतात, प्रार्थना करतात : वक्रतुंड महाकाय सूर्यकोटीसमप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा भक्तांची दर्शनाची सोय व्हावी म्हणून शहरातील मार्गामार्गावर श्रीगणेशाची मंदिरे असतात. सर्व मंदिरे नेहमीच गर्दीने भरगच्च असतात. पण हो ! श्रीगणेश सर्वांचीच दखल घेतो हं! त्याच्या दृष्टीतून कोणी राहून जाईल असे कधी होत नाही. कारण तो देव आहे सर्व साक्षी आहे!!


जयदेव जयदेव श्रीगणेशदेवा माता ज्याकी पार्वती पीता महादेवा' असे आरतीतून श्रीगणेशाचे वर्णन आहे. श्रीगणेश, पीता शंकर व माता पार्वतीचा मुलगा आहे. 'विनायक' हे गणपतीचे आद्यनाब आहे. पुढे अनेक अबतार घेऊन तो बेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. स्कंद पुराणांत त्याचे माहात्म्य प्रत्यक्ष शंकराने वर्णन केले आहे. ब्रह्मदेवाने त्याचीच उपासना करून सृष्टी उत्पन्न करण्याचे सामर्थ्य प्राप्त केले. गणेश ही बुद्धीची देवता म्हणून समजली जाते. अशा ह्या देवतेचा महिमा अगाध आहे. त्याचे वर्णन करण्यास बेद- . पुराणेही अपुरी पडतात. अनेक नावाने ओळखल्या जाणाऱ्या या देवताचे काही महत्त्वाचे अवतारही आहेत. त्याने मायावी राक्षसाचा वध करणे, भक्तांवर प्रसन्न होऊन वर देण्यास म्हणून वगैरे, अशा काही ना काही निमित्त्याच्या पार्श्वभूमीवर ते अवतार आहेत. यातील वक्रतुंड हा अवतार महत्त्वाचा आहे.

ब्रह्मदेवाच्या तपश्चर्येतून वक्रतुंडाचा अवतार आहे. महाप्रलयानंतर ब्रह्मदेवाला जगाची उत्पत्ती क्रतुंडाच्याच कृपेमुळे निर्विघ्नपणे करता आली. यातील नुसती प्राणीसृष्टी पाहून ब्रह्मदेवाचे समाधान झाले नाही. त्याने पुन्हा बक्रतुंडाचे स्मरण केले. मोठ्या प्रयासाने मानवी देह निर्माण केला व स्वतःचे कल्याण करण्याचे सामर्थ्य त्या मानवात निर्माण केले. असा हा दुर्लभ मानव पृथ्वीवर निर्माण झाला. बक्रतुंड ही मूर्ती प्रकट झाली. ती मूर्ती रक्तवर्णीय चेहऱ्यावर शेंदूर लावलेली अशी होती. ranjangaon ganpati mandir live darshan today रांजणगाव गणपती मंदिर लाईव्ह दर्शन करा...


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad