Type Here to Get Search Results !

गणपती अथर्वशीर्ष मराठी अर्थ आणि विज्ञान | Ganpati Atharvshirsh Marathi

गणपती अथर्वशीर्षातील फलश्रुतीत उपदेशिलेला अनुभम केवळ पाट करून येणार नाही, तर त्यासाठी त्यातील विज्ञान समजून घेतले पाहिजे. गणपती अथर्वशीर्ष मराठी अर्थ आणि विज्ञान | (Ganpati Atharvshirsh Marathi)  विज्ञान म्हणजे भौतिकशास्त्र नव्हे; विज्ञान हा अध्यात्म क्षेत्रातील पारिभाषिक शब्द आहे. 
 
गणपती अथर्वशीर्ष मराठी अर्थ आणि विज्ञान | Ganpati Atharvshirsh Marathi
गणपती अथरवशीर्ष मराठी अर्थ 

गणपती अथर्वशीर्ष मराठी अर्थ आणि विज्ञान 

जीव-शिव ऐक्याचा अनुभव म्हणजे विज्ञान, विश्वरूप परमेश्वराचे प्रत्यक्ष पार्थ दर्शन म्हणजे विज्ञान, विश्वरूपाच्या दर्शनाचा समग्र व संशयरहित अनुभव म्हणजे विज्ञान या विज्ञानात अनुभवान अंश (जीव) अंशी (विश्व) यांच्या एकरस अभिन्न स्वरूपाचा साक्षात्कार होतो, प्रत्यय येतो. 

Ganpati Atharvshirsh Marathi

अल्पशक्ती (जीवभाव) महत् शक्तीच्या (विश्वरूपाच्या) आधारावरच कार्यरत आहे हा अनुभव येणे म्हणजेच साक्षात्कार. या साक्षात्कारातून अभिन्न सद्रूपतेचा अखंड अनुभव येतो. या अनुभवातील (साक्षात्कारातील) अचल स्थिती म्हणजे विज्ञानास्तिभ्य होय, जीवशिवाच्या अभिन्न एकरसतेचा अनुभव घ्यावयाचा असेल तर श्रीगणपती अथर्वशीर्षातील विज्ञानपुलक अर्थ तत्त्वदर्शी पुरुषांकडून समजावून घेतला पाहिजे.

 

श्री गणपती अथर्वशीर्षाची सुरुवात ओम्काराने झाली आहे. ओम् नमस्ते गणपतये । ओम् हा विश्ववाचक शब्द (मंत्र) आहे. 

ओम् इतिइंद्रसर्वम ओम् इति ब्रह्म । विचिन्त्यमत्र स चराचर जगत् ओम्कारमात्रम् । ओम् इत्येकाक्षरं ब्रह्म । विश्वरूपं विलक्षण साफारच निराकारं अद्वितीय परात्परम् ।

श्री गणपती अथर्वशीर्षातील गम् (अथर्म ७) हा विश्ववाचक आहे. गम चा विग्रह ग्+अ+म् असा आहे. त्याचे स्पष्टीकरण करताना अथर्वशीर्ष म्हणते, गुकारः पूर्वरूपम् । अफारी मध्यरूपम् । अनुस्वार शान्तरूपम् । ओम्कारातील अ उ म् ही त्रिपुटी आहे. गम शब्दातील गुम ही त्रिपुटी आहे. या त्रिपुटींनाच अथर्वशीर्ष अनुक्रमे पूर्वरूप, मध्यमरूप म अन्त्यरूप म्हणते. गीतेने क्षर, अक्षर पुरुषोत्तम ही त्रिपुटी स्वीकारली आहे. अथर्वशीर्षातील पूर्णरूप (ग) म्हणजे क्षर, मध्यरूप (अ) म्हणजे अक्षर में अन्त्यरूप (म्) म्हणजे पुरुषोत्तमभाव होय.

हे पण वाचा:स्वामी समर्थ तारक मंत्र फायदे मराठी अर्थ | swami samarth tarak mantra benefits in marathi |


श्री गणपती हा ओम्कार स्वरूप आहे. ओम्कार स्वरूप विचातील असंख्य गणांचा पती तो गणपती, गणाधीश होय. श्रीगणपती विश्वाच्या बाहेर नाही. विधात मंदिर इत्यादी ठिकाणीच नाही. विशिष्ट प्रतिमास्यरूप नाही; तर आदी, मध्य, अंत नसलेले संपूर्ण विश्व हेच त्याचे स्वरूप आहे. हा श्री गणपती प्रत्यक्ष तत्त्वमासिकस्वरूप आहे. तत्त्वमसि या महावाक्यात तत् त्वम् असि अशी तीन पदे आहेत. तत्मद श्रीगणपतीचे पूर्वरूप, त्वम्पद हे मध्यरूप व असिपद हे अन्त्यरूप आहे.


गणपतीच्या पूर्वरूपाचे विज्ञान

त्वम भूमिरापोऽनलोऽनीनमः । त्वम शक्तित्रयात्मकः । पृथ्वी, जल, अग्नी, चायू, आकाश ही पंचमहाभूते व सत्त्व, रज, तम ही अमृधाप्रकृती श्रीगणपतीचे पूर्वरूप आहे. पंचमहाभूतेय त्रिगुण मिळून श्री गणपतीचे सगुण साकार स्वरूप आहे. 

या विश्वरूप गणपतीच्या सगुण साकार स्वरूपावरच जीवसृष्टी कार्यरत आहे. जीवाच्या डोळ्यांना रूप गणपतीच्या (विश्वाच्या) अग्नितत्त्वामुळे, त्वचेला स्पर्श वायुतत्त्वामुळे, फानांना शब्द आकाशतत्त्वामुळे, जिभेला रस जलतत्त्वांमुळे नाकाला गंध पृथ्वीतत्त्वामुळे अनुभवास येतो. ही विश्वरूप श्री गणपतीची लीला आहे. 

विश्वात्मक, पंचमहाभूत ही पंचज्ञानेद्रियांचे मूलाधिष्ठान आहे. जीवाला पंचज्ञानेंद्रियांचे यथार्थं विज्ञाननिष्ठ स्वरूप पटताच त्यांची पंचज्ञानेंद्रिय पंचमहाभूत होतात

 

गणपती अथर्वशीर्ष मराठी अर्थ आणि विज्ञान 

विश्वरूप श्री गणपती हा कर्ता, धर्ता हर्ता आहे. श्री गणपतीच्या विवरूपात चाललेली उत्पत्ती (कर्ता), स्थिती (धर्ता) व लय (हर्ता) ही त्यांचीच सत्त्व, रज, तम या त्रिगुणांची लीला आहे. उत्पत्ती ही रजोगुणांचे, स्थिती ही सत्त्वगुणांचे व लय हे तमोगुणांचे कार्य होय. विश्वातील उत्पत्ती, स्थिती, वय अखंद चक्राकार गतीने चालू आहे. 
हे विश्वरूप श्री गणपतीचे वैभव आहे. विश्वातील एक अणूही स्थिर नाही; तो सतत क्षणोक्षणी परिवर्तनशील आहे.


 त्वमेव सर्वं खलविदम ब्रह्मशी
दिसणारे हे सगळे विश्वात्मक श्री गणपतीचेच स्वरूप आहे. श्री गणपती सर्वरूप आहे. जगाची निर्मिती श्री गणपती स्वरूपातून होत आहे. हे सर्व जगत् त्यातच स्थिर असून लपही त्यातच होत आहे. संपूर्ण विश्व चक्राकार गतीने फिरत असून, पुन्हा श्री गणपतीतच येऊन मिळत आहे. 

सर्व जगदीदं तत्त्वा जायते । सर्व जगदीदं तत्त्वस्तिष्ठीत | सर्व जगदीदं त्वति तयमेष्यति । सर्व जगदीदं त्वयि प्रत्येति । 
मागे, पुढे, उत्तर, दक्षिण, खाली, वर सगळीकडेच तो नटलेला आहे. दहाही दिशा त्याने व्यापलेल्या आहेत. असा हा विश्वरूप श्री गणपतीच माझे बक्त्यांचे, श्रोत्यांचे, दात्यांचे धारण (ज्ञानग्रहण) करणाऱ्यांचे शिष्यांचे, सर्वांचे सर्व बाजूंनी संरक्षण करीत आहे. त्यंचत्वारि वाक्पदानि । विश्वरूपात्मक श्री गणपती, परा, पश्यंती, मध्यमा व वैखरी या चार वाणीचे आश्रयस्थान आहे.


श्रीगणपतीच्या मध्यरूपाचे विज्ञान 

हे मध्यरूप अक्षररूप आहे. हे महावाक्यातील त्वम् पद होय. क्षररूप (विश्व) हे चक्राकार गतीने फिरताना जो कधीही न बदलणारा अविनाशी अस्तित्त्वरूप सदैव असताना भाव आहे. तो श्री गणपतीचे अक्षररूप आहे. हे रूप चिन्मय, आनंदरूप, ब्रह्ममय आहे. या अक्षराचा अनुभव अस्ति, मति, प्रियत्व रूपाने येतो. 

अस्तिच अवृधा प्रकारांनी म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, सत्त्व, रज, तम या स्वरूपात मासि म्हणजे प्रकाशतो आहे. आणि जे प्रकाशते आहे ते सर्व प्रिय आहे. म्हणजे आनंदमय आहे. वस्तुत कितीही बदल झाले तरीही त्यातील पंचतत्व, तीनगुण कायम अस्तित्वात असतात. उदा. कागद जाळला त्याची राख झाली. राखेतही अनंत बदल झाले तरीही त्यातील पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, सत्त्व, रज, तम ही अवृधा प्रकृती आहेत. त्यात कोणताही बदल झाला नाही. म्हणून या रूपाला नित्य, शुद्ध, अज, स्थायी, अक्षर, अविनाशी म्हटलेलं आहे. 

हे अक्षररूप, गुणत्रयातीत, अवस्थात्रयातीत, देहत्रयातीत, कालत्रयातीत असे आहे. म्हणजे सत्त्व, रज, तम या गुणांच्या पलीकडे जागृती, स्वप्न, सुषुप्ती या अवस्थांना ओलांडलेले स्थूल, सूक्ष्म, कारण स्वरूप देहांच्या पलीकडे अतिकाल, महाकात काल या त्रिकालांच्या अतित असे श्री गणपतीचे अक्षररूप क्षरापेक्षा श्रेष्ठ आहे. खडीसाखरेत गोडी


जशी ओतप्नोत लदालद आहे तसे विश्वरूपात्मक श्री गणपतीत अक्षर एफरस आहे. पंचज्ञानेंद्रिये यमन यांनी अनुभवलेले श्री गणपतीचे सगुणसाकार स्वरूप आहे व बुद्धिग्राह्म सद्गुरुकृपा प्रसादाने अनुभवलेले अक्षर हे निराकार रूप आहे. सगुण साकार नि निर्गुण निराकार ही विश्वरूप श्रीगणपतीची स्वरूपरूपे आहेत.


श्रीगणपतीच्या अन्त्यरूपाचे विज्ञान :

गसि पद हे श्री गणपतीचे अन्त्यरूप होय. पंचमहाभूते व त्रिगुणांनी युक्त श्री गणपतीचे सगुण साकार स्वरूप व या स्वरूपात अंतर्बाह्य एकरस असलेले, अस्तिभाति प्रियत्व रूपाने अनुभवास येणारे अक्षररूप हे दोन्ही ज्यात अभिन्नपणे लय पावतात ते नाम श्री गणपती हे त्याचे अंत्यरूप होय. हाच पुरुषोत्तम परमात्मा होय.


हे अथर्वशीर्षातील श्री गणपतीचे विज्ञाननिष्ठ दर्शन आहे. अथर्व म्हणजे स्थायी शांती, शीर्ष म्हणजे डोके, पंचज्ञानेंद्रिय मन, बुद्धी, जीवभाव यांची चंचलता नाहीशी होऊन अखंड शांती, चिर समाधान हवे असेल तर चोवीस तासांचा व्यवहार हा श्री गणपतीशीच होतो आहे. या जाणिवेने छल, कपट, दंभ सोडून देऊन प्रत्येकाने आपले कार्य निष्ठेने, प्रामाणिकपणे श्रद्धेने करावे, ही श्री गणपतीची खरी पूजा होय.




श्री गणपतीचे श्लोक 

  • जिवन व्यर्थ हैं तूजवेगळें ||
  • स्वहित आपुले काय साधिलें || 
  • सुख नसे सदा मोह यातना || 
  • हे दयानिधे श्रीगजानना ||१२||
  •  
  • फारसे मला बोलता न ये ॥ 
  • पाउलें तुझीं देखिलीं स्वयें || 
  • मांडिली असे बहुत बलाना || 
  • हे दयानिधे श्रीगजानना ||१३||
  •  
  • दीनबंधु हे ब्रीद आपुलें ॥ 
  • साच तूं करी दावि पाउलें ॥ 
  • मंगलाल्या विश्वजीवना || 
  • नाशिवंत रे सर्व संपदा || 
  • हे नको मला पाव एकदां ॥ 
  • क्षेम देउनी चित्तरंजना ॥ 
  • हे दयानिधे श्रीगजानना ||१५||

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad