Type Here to Get Search Results !

नारायण नागबली पितृदोष संपूर्ण माहिती मराठी |पुजा, विधी, महत्व| Narayan Nagabali marathi

नारायणबली व नागबली हे विधी मनात एखादा विशिष्ट हेतु किंवा इच्छा धरून ती पुर्ण होण्यासाठी केला जातो. म्हणुन या विधीस 'काम्य' असे म्हणतात. या विधीद्वारे अतृप्त जीवात्म्यांपासुन अदृश्य रूपाने होणाऱ्या पीडा जसे प्रेतशाप, पिशाचपीडा, सर्पशाप, पितृदोष तसेच घरात एखाद्या व्यक्तीस दुर्भरण आल्यास किंवा एखाद्या व्यक्तींची काही इच्छा, वासना अपुर्ण राहिल्यास घराण्यास जी पीडा होते त्याच्या परीहारार्थ नारायण - नागबली विधी करावा असे शास्त्राने सांगितले आहे. सर्वप्रथम आपण नारायणबलीचा विधी लक्षात घेऊ. (नारायण नागबली माहिती मराठी)

नारायण नागबली पितृदोष संपूर्ण माहिती मराठी |पुजा, विधी, महत्व| Narayan Nagabali marathi
नारायण नागबली 


नारायण नागबली म्हणजे काय? संपूर्ण माहिती मराठी 

नारायणबली आपल्या अतृप्त पितरांना सद्गती मिळवुन देण्यासाठी हा विधी - प्रामुख्याने केला जातो. आपल्या जीवनकाळामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या मनात अनेक इच्छा किंवा वासना उत्पन्न होत असतात. परंतु सर्व वासना किंवा इच्छा व्यक्तीच्या पुर्ण होता असे नाही. काही तीव्र इच्छा किंवा वासना अपुर्ण राहतातच. 
या वासना मृत्युनंतर देखील आत्म्यास सोडत नाही मग असा आत्मा तो स्त्रीचा किंवा पुरूषाचा असेल आपल्या मुक्तीसाठी आपल्या घराण्यास किंवा संबंधीत व्यक्तींना आर्थिक, मानसिक किंवा शारीरिक पीडा देतो. . (नारायण नागबली माहिती मराठी)

कारण आपल्या शाखानुसार जेव्हा एखादी व्यक्ती मृत होते त्यावेळेस त्याव्यक्तीच्या शरीरातील आत्मा शरीराच्या बाहेर पडतो. मृत्युनंतर आत्म्याचा प्रवास दक्षिण दिशेस यमलोकाकडे सुरू होतो (गरुड़ पुराण) आत्मा हा अरूण आहे तो जोपर्यंत शरीरात असतो तो पर्यंत शरीर उष्ण असते, म्हणून आल्याने शरीर सोडल्यावर शरीर देखील थंड पडू लागते. "सूर्य आत्माजगतस्तस्त्युखथ" या शास्त्रवचनानुसार संपूर्ण विश्वाचा आत्मा सुर्य आहे व त्यांचेच काही अंश आत्म्यारूपी आपल्या शरीरात असतात. 

शरीरातून निघालेला आत्मा ज्यावेळेस यमलोकात पोहचतो त्यावेळेस त्याला परत एक शरीर देण्यात येते यालाच पुनरपि जननम् आणि पुनरपि मरणम् असे म्हणतात. भगवान श्री कृष्णाने भगवतगीतेमध्ये आत्म्याचे वर्णन
नैनं छिंदंती शस्त्राणी नैनं दहति पावकः ।
म्हणजेच कोणतेही शस्त्र हे आत्म्यास छेदू शकत नाही व कोणताच अशी त्यास जाजु शकत नाही असे केलेले आहे.

परंतु एखाद्या व्यक्तीच्या काही तीव्र वासना किंवा इच्छा अपूर्ण राहिल्या असतील त्या वासना आत्म्यास भुलोकावरील वातावरणात स्थित करून भयंकर पीड़ा देतात. वास्तविक आत्म्यास मोक्ष हवा असल्याने व या पीडांपासून मुक्ती मिळावी या साठी असा आत्मा घराण्यास पीडादायक होतो. 

आत्मा इतका अतिसुक्ष्म आहे की सामान्य डोळ्यांनी आपण त्यास बघु शकत नाही. परंतु जसे रेडीओवर आवाज ऐकतो किंवा टेलिव्हिजनवर दृष्य बघण्यासाठी ज्या लहरी येतात त्या आपण बघु शकत नाही पण त्यांचे अस्तित्व असते त्याच प्रमाणे आत्म्याचे आहे. अतिसुक्ष्म असल्याने आत्म्यास आपण बघु शकत नाही. म्हणुन अशा आत्म्याच्या सद्गतीसाठी नारायण बलि विधी करावा. 

या विधीद्वारे पितृदोष, पिशाचपीडा, संततीस प्रतिबंध असे समस्यांचे निवारण होऊन घराण्यातील व्यक्तींना आरोग्य प्राप्त होते. नोकरी - व्यवसायात येणारे अपयश जाऊन आर्थिक भरभराट होते. विवाहादी शुभकार्य घरामध्ये होतात. थोडक्यात घराण्याची आर्थिक, मानसिक व शारीरिक प्रगती होते. (नारायण नागबली माहिती मराठी)


पितृदोष व त्याची कारणे

 • प्रेतयोनी किंवा प्रेतपीडा - 

प्रेत योनी ही एक स्वतंत्र योनी आहे. या जन्मी किंवा - मागील जन्मामध्ये एखाद्याच्या द्रव्याचा म्हणजेच संपत्ती, घर, शेती, पैसा थोडक्यात परद्रव्याचा अपहार एखाद्याने केला असेल तर ज्याच्या संपत्तीचा अपहार झालेला आहे. असा आत्मा त्याच्या संपत्तीतील वासनेमुळेच अपहारकर्त्यास पीड़ा देतो. 

असा आत्मा प्रेतयोनीत जातो व सद्गतीसाठी आपल्या संबंधीतांना त्रास देतो. असा आत्मा मृत्युनंतरकधी कधी आपल्या संपुर्ण शरीरासह दिसतो किंवा एखाद्या जीवित व्यक्तीच्या बळजबरीने संचार करून आपल्या यातना सांगतो. प्रेत योनीतील काही आत्मे उपकारी तर काही उपद्रवी असतात. 

त्यांना आपल्या केलेल्या कमांच प्रावरि भोगाव्या लागतात असे जीवात्मे आपल्या घराण्यास शाप देतात त्यामुळे त्या घराण्या अनारोग्य, व्यवसाय, नोकरीत अपयश, विवाह किंवा संतती न होणे. संपत्ती सध प्रकरणे कोर्ट, कचेरीत अडकुन पडणे असे त्रास होतात. यातुन मुक्तीसाठी नारायणबली हा पालाशविधी सह करावा. • दुर्भरण किया अपमृत्यु 

एखाद्या व्यक्तीस दमरण प्राप्त झाल्यावर प्रेतत्व येते. विष्णु व दालभ्य ऋषींच्या संवादात दुर्मरणाचा उल्लेख आहे. 

एकुण ३६ प्रकारचे दुर्मरण सांगितले आहे
 1. त्यात पलंगावर, 
 2. शय्येवर पडून, 
 3. रस्त्यात चक्कर येऊन, 
 4. ब्रम्हचारी अवस्थेत, 
 5. पाण्यात पडून, 
 6. झाडावरून पडून, 
 7. सर्पदंशाने किंवा 
 8. व्याघ्र सिंहादी हिंस्त्र पशुंमुळे, 
 9. ब्रम्हहत्या, 
 10. स्त्रीहत्या, 
 11. बालहत्या, 
 12. गोहत्या घडल्याने, 
 13. अग्निच्या दाहाने, 
 14. आत्महत्या केल्याने, 
 15. विष प्राशनाने, 
 16. विजेचा धक्का लागुन, 
 17. क्षय रोगाने, 
 18. कंठ दाबल्याने 
 19. किंवा कंठात प्राण अडकल्याने 
 20. साथीच्या रोगाने, 
 21. अतिशय आहार घेतल्याने, 
 22. पुत्र संतती न झाल्याने 
 23. देशांतरी मूत झाल्याने, 
 24. पंचक, 
 25. त्रिपाद किंवा 
 26. दक्षिणायनात मृत झाल्याने, 
 27. प्रेतक्रिया दशाहश्राध्द (दावा) 
 28. किंवा सपिंडी न झाल्यास, 
 29. अपघाताने तसेच अपरात्री मृत्यु येणे .
हे सर्व दुर्मरणात मोडतात. दुमरण आल्याने असा सुक्ष्म जीवात्मा प्रेतयोनीत जातो तेथे त्यास अनेक प्रकारचा यमयातना भोगाव्या लागतात. 

त्या भोगुन पुर्ण झाल्याने तो मुक्तीसाठी आपल्या कुलात पीडा उत्पन्न करतो. घराण्यास त्रास सहन करावा लागतो यासाठी नारायणबली विधी करावा.


 • परागंदा व्यक्ती 

घराण्यातील एखादी व्यक्ती घरात काही न सांगता घर सोडून - निघुन जाते. अनेक वर्ष तपास करून देखील त्या व्यक्तीचा काहीच तपास होत नाही ती व्यक्ती जीवित आहे की मृत झाली, तिचा विवाह झाला की नाही असा कोणताच तपास त्या व्यक्तीचा मिळत नाही अशा व्यक्तीस परागंदा व्यक्ती असे म्हणतात. 

अशी व्यक्ती जर मृत झाली असेल तर अशा व्यक्तीचे सर्व और्ध्वदेहिक कर्म जसे अग्निसंस्कार, दहावा, बारावा, वार्षिक श्राध्द होण्याची शक्यता अत्यंत कमी असते अशा व्यक्तीस प्रेतयोनी मिळाल्यास घराण्यास त्रास होतो. यावर सर्वोत्तम उपाय म्हणजे नारायणबली होय.


 • अनापत्य योग - 

ज्योतिषशास्त्रानुसार अनेक वंशपरंपरागत शापांचे वर्णन केलेले आहे त्यात मुख्यत्वाने बृहतपराशरी ग्रंथात ८ शापांचे उल्लेख आहे.
 •  १) सर्पशाप 
 • २) पितृशाप 
 • ३) मातृशाप 
 • ४) भातृशाप 
 • ५) मातुलशाप 
 • ६) ब्रह्मशाप 
 • ७) भार्याशाप 
 • ८) प्रेतशाप 
यातील पितृशाप, सर्पशाप, प्रेतशाप असल्यास संतती होत नाही अथवा झाल्यास टिकत नाही.
(नारायण नागबली माहिती मराठी)आजकाल अनेक घरांमध्ये गैरसमजामुळे श्राध्द केले - जात नाही. अनेकवेळ पुर्वजांची तिथी माहित नसते. माहित असल्यास नोकरी व्यवसायाच्या जबाबदारीने तिथीस वेळ नसल्याने श्राध्द होत नाही. श्राध्दकर्त्याची श्राध्द करण्याची इच्छा असुन देखील श्राध्दाची आवश्यक सामग्री नसल्याने श्राध्द टाळले जाते. 

तसेच कुटूंब विभक्त झाल्यावर नक्की श्राध्द कोणी करावे हे माहित नसल्याने श्रादाची जबाबदारी एकमेकांवर लादण्यात येते त्यामुळे श्राध्द कर्माचा लोप होतो. यामुळे पितर अतृप्त होऊन घराण्यास शाप देतात व त्यामुळे घराण्यावर पितृदोष येतो. 


शापसूचक स्वप्ने म्हणजे काय?

ज्या घराण्यात पितृदोष आहे अशा व्यक्तींना अनेकदा भयंकर भयावह स्वप्ने दिसतात. ज्यात प्रामुख्याने 
 1. भांडणे झालेली दिसणे, 
 2. घर कोसळत असतांना दिसणे, 
 3. मृत नातेवाईक वारंवार स्वप्नात येणे, 
 4. विधवा स्त्री दिसणे, 
 5. नदी, तलाव, विहिरी किंवा समुद्राचे पाणी दिसुन त्यात पडून आपण वर निघण्याचा प्रयत्न करतांना दिसणे, 
 6. झाडांवर बहरलेली फळे दिसणे, 
 7. परागंदा झालेली व्यक्ती स्वप्नात येणे, 
 8. एखादे संकट येत असल्याची स्वप्ने वारंवार येणे, 
 9. अनोळखी व्यक्ती, घर, वाडा, झोपडी दिसणे. अशा स्वप्नांना शापसूचक स्वप्ने म्हणतात. अशी स्वप्ने कायम येत असल्यास आपल्या घराण्यावर दोष आहे हे ओळखुन नारायण बली विधी करावा.

 • कुंडलीनुसार प्रेतशाप, पितृशाप, पिशाचबाधा

प्रेतशाप - ज्यांचे जन्मकुंडलीत 
 • १) पंचमस्थानावर तसे गुरूवर पाप ग्रहाची दृष्टी व राहु गुरूच्या धनु किंवा मीन राशीत असेल 
 • २) पंचमेश अथवा गुरू व राहुचे युतीत असेल ३) पंचमात राहु असता अथवा पंचमस्थान राहुमुळे दुषित झाले असता. 
 • ४) लग्नात राहु, गुरू, शुक्र अथवा चंद्र शनिसोबत असता तसेच लग्नेश अष्टमात असता. 
 • ५) लग्नात मंगळ, शनि, पंचमेश, होऊन अष्टमात असता. 
 • ६) लग्नी राहु, पंचमात शनि, रवि, सप्तमात क्षीण चंद्र व व्ययात गुरू असता. 
 • ७) लग्नात पापग्रह, व्ययात रवि, पंचमात शनि, मंगळ किंवा बुध पंचमेश होऊन अष्टमात. 
 • ८) लग्नी शनि, पंचमात राहू, अष्टमात रवि, व्ययात मंगळ 
 • ९) राहु व मंगळाने लग्न दृष्ट असुन किंवा लग्नी राहु व मंगळाचेही लग्नावर दृष्टी असून शनि पंचमात असता. 
 • १०) लगी राह, पंचमात शनि, गुरु अष्टमात असता. 
 • ११) ६,८,१२ स्थानात लगी शनि, पंचमात क्षीण चंद्र असता. 
 • २) अष्टमेश पंचम शुक्रासोबत असुन गुरु अहनात असता. 
 • १३) शनिच्या मकर किंवा कुंभ राशीत पुत्र गुरु असुन पंचमेश शत्रु ग्रहाने युक्त अखवा दृष्ट असता प्रेत शापाने संततीचा नाश होतो.


पितृशाप 
 • १) लग्नात किंवा पंचमात रवि, मंगळ, शनि, अष्टमात अथवा व्ययात राहु, गुरू असता. 
 • २) षष्टेश अगर नवमेश पंचमात असल्यास 
 • ३) पंचमेश रवि असुन तो ५ किंवा ९ स्थानात शत्रुग्रहाने युक्त अथवा दृष्ट असता. 
 • ४) पंचमात नीच राशीचा रवि नीच राशीचा शनि, मंगळाच्या अंशात पापग्रहाने युक्त अथवा दृष्ट असता. 
 • ५) पंचमात नीच राशीचा रवि, शनिच्या नवमांशात रवि पापग्रहाच्या कर्तरीत असता. 
 • ६) दशमेश मंगळ असुन पंचमेशाने युक्त लग्नी, पंचमात दशमात पापग्रह असता. 
 • ७) व्ययेश लग्नी, अष्टमेश पंचमात व दशमेश अष्टमात असता. 
 • ८) नवमेश ६-८-१२ स्थानात गुरू पाप ग्रहाच्या राशीत पंचमात पापग्रह व लग्नेश पण पापग्रह असता. 
 • ९) दशमेश ६-८-१२ स्थानात पुत्रकारक गुरू पाप ग्रहाचे राशीत लग्नी व पंचमात पापग्रह असता पितरांच्या शापाने संतती वाचत नाही.


पिशाच्च बाधा -
 •  १) लग्नात व सप्तमात राहु व केतु असणे. 
 • २) द्वितीय स्थानात शनी व राहु यांची युती असणे.
 • ३) षष्ट स्थानात चंद्र व सप्तमात राहु किंवा केतु असणे.
 • ४) षष्ठात राहु किंवा केतु असल्यास. 
 • ५) लग्नी राहु व चंद्राची युती, पंचमात मंगळ किंवा शनि पापग्रस्त असणे. 
 • ६) लग्नात बुध व केतु पापग्रहाने युक्त अथवा दृष्ट असतील तर. 
 • ७) लग्नी शनि, राहु, शुक्र, मंगळ पापग्रहाने युक्त असल्यास किंवा सप्तमात वक्री शनि नीचेचा असल्यास भुत प्रेत, पिशाब बाधा होण्याची शक्यता असते. 


काही वंशपरंपरागत दोष

साधारणतः राहुच्या योगावरून वंशपरंपरागत दोष कुंडलीद्वारे पहाता येतो. लगी, द्वितीयात, चतुर्थात, पंचमात, षष्ठात सप्तमात, दशमात तसेच व्ययात राहु असता काहीतरी वंशपरंपरागत दोष आहे असे समजावे..

 • १) धनस्थानात राहु असल्यास त्या घराण्याच्या वरील पिढ्यांमध्ये धनासाठी एखाद्याचा घात झालेला असतो. किंवा एखाद्या व्यक्तीची वासना धनात, संपत्तीत किंवा कुटुंबात राहुन गेलेली असते. 
 • २) सप्तमस्थानात पुरुष राशीत राहू असता वैवाहिक समस्या उद्भवतात. स्त्रीला पीडा होऊन घटस्फोट अथवा द्विभार्या योग होतो. एखाद्या स्त्रीची घराण्यात संसारीक वासना अतृप्त असते किंवा घराण्यात वरील पिढ्यांमध्ये एखादे स्वीचा छळ झालेला असतो. 
 • ३) चंद्रापासुन राहु केतु अष्टमात असता कुंडली पूर्व जन्माच्या शापाने युक्त आहे असे समजावे. 
 • ४) राहु, चंद्र, शुक्र यांची युती कुंडलीत असता पिशाब बाधा होते. 
 • ५) राहु, मंगळ युती असल्यास यापुर्वी घराण्यात एखाद्यावर विषप्रयोग झाला असतो किंवा धना साठी हत्या झालेली असते या शापामुळे अनाचार दोष होतो. जातक व्याभिचारी होऊन स्त्रीसुखाचा नाश होतो.
 • ६) शनि, राहु एकत्र असल्यास घराण्यात आत्महत्या केली असते. त्यामुळे चांगल्या घराण्यात जन्म होऊन देखील व्यक्ती भ्रष्ट होते. 
 • ७) रवि, गुरू तसेच शुक्र यांची युती किंवा मंगळ, शनि, बुध राहु सह असतील तर त्या घराण्यात संपत्तीचा अपहार झालेला असतो किंवा धनासाठी विधवा स्त्रीची हत्या झालेली असते. 
 • ८) राहू बुध युती असल्यास बाल्य अवस्थेत एखाद्या बालकाची हत्या झालेली असते त्यामुळे प्रेत पिडा होऊन अंधत्व किंवा दारिद्रय येते.
जन्मकुंडली नसतांना पितृदोष कसा ओळखावा

बऱ्याचदा जन्म वेळ व तारीख माहित नसल्याने अनेक व्यक्तींची जन्मकुंडली तयार करता येत नाही. अशा परिस्थितीत जिवनात घडत असणाऱ्या घटनांचा बारकाईने विचार करून पितृदोष जाणुन घेता येतो.

 • १) परिवारामध्ये पिता पुत्रामध्ये सतत वाद विवाद होऊन भांडणे होतात. - दोघांचे विचार भिन्न असतात. 
 • २) एखाद्या व्यक्तीच्या लग्नात सतत बाधा निर्माण होते किंवा जुनून आलेले लग्न मोडतात. 
 • ३) संततीसंबंधी समस्या उत्पन्न होतात. संतती न होता वारंवार गर्भपात होणे, अपंग संतती किंवा मतीमंद संतान होणे. 
 • ४) परिवारात सतत रोगराई असणे, योग्य उपचार व दक्षता घेऊनही सतत व्यक्ती आजारी पडणे त्यावर पैसा खर्च होणे. 
 • ५) निरंतर कर्ज वाढत जाणे, प्रयत्न करूनही कर्ज फेड न करता येणे. 
 • ६) सतत पैशाची चणचण जाणवणे व कामात अपयश येणे. 
 • ७) झोपेत वाईट स्वप्ने पडणे त्यात हिंस्त्रपशु, सर्प, भुकंप, अत्री, झाडे पडणे, पुर इत्यादी बघणे, 
 • ८) घर जळणे, 
 • ९) मनुष्य परागंदा होणे इ.


नारायणबली विधीचे प्रमुख वैशिष्ट्य पालाशविधी

पालाशविधी - नारायणबली पुजेचे वैशिष्ट्य म्हणजे पालाशविधी. यालाच पुत्तलविधी असेही म्हणतात. हा फक्त त्र्यंबकेश्वरीच केला जातो. पळसाच्या काही काड्या घेऊन त्या दोरीने बांधुन मस्तकाच्या ठिकाणी नारळ ठेऊन त्या काड्यांवर व नारळावर कणकेदा • गोळा ठेऊन त्या कणकीत काही वनस्पती मिसळवुन मनुष्याची सुबक आकृती तयार केली जाते. 

हा पुतळा पळसाच्या काड्यांनी बनला असल्याने त्यास पालाशविधी असे म्हणतात. ज्यास गती मिळाली नाही व ज्या पासुन आपल्याला पीडा होत आहे अशा जीवात्म्याचा हा देह असून त्याचे नाव व गोत्र माहित नसल्याने त्यास देवाचे नाव नारायण व देवाचे गोत्र काश्यप असे संबोधुन त्याची पुजा करण्यात येते. 

आपल्या घराण्यामध्ये एखादी व्यक्ती मग ती स्त्री किंवा पुरूष यापैकी कोणीही असेल व ज्यास वासनेमुळे तसेच दुर्मरण आल्याने किंवा परागंदा झाल्याने मृत्युच्या पश्चात जे प्रेतत्व प्राप्त झालेले आहे किंदा घराण्यातील एखाद्या व्यक्तीचे मृत्युपश्चात जे और्ध्वदेहिक कर्म म्हणजेच अग्निसंस्कार रक्षाविसर्जन, दहावा, बारावा, वार्षिक श्राध्द इत्यादी कर्माचा लोप होऊन जर जीवात्मा असद्गतीस गेला असेल तर या सर्वासाठी पालाशविधी केला जातो. 

पालाशविधीत पुतळ्याची प्राणप्रतिष्ठा करून अशा असद्गतीला जीवात्म्याचे आवाहन केले जाते. त्याची पुजा करून हा पुतळा मृत झाल्याची भावना करून या पुतळ्याचे मनुष्याप्रमाणे सर्व और्ध्वदेहिक कर्म म्हणजे अग्निसंस्कार, रक्षाविसर्जन, दहावा, अकरावा, बारावा असे सर्व श्राध्दादी कर्म करण्यात येते. एक दिवसाचे सुतक पाळण्यात येते यामुळे घराण्यातील दोष दुर होऊन अतृप्त पितरांना सद्गती प्राप्त होते.

हे पण वाचा:- श्राद्ध का केले पाहिजे? श्राद्ध म्हणजे काय? अशा प्रार्थनेने होईल श्राद्ध पूर्ण करा विधि पूर्वक श्राद्ध.

नागबली विधी माहिती मराठी 

नागबली हा स्वतंत्र विधी आहे. शौनक ऋषींनी आपल्या पुराणामध्ये नागबली विधी सांगितला आहे. मनुष्य योनी व नाग योनीचा निकटचा संबंध आहे. जर एखाद्या व्यक्तीने आपल्या आयुष्यामध्ये भरपुर धन कमावले असेल आणि त्याची त्या धनावर आसक्ती किंवा जीव राहिला असेल तर अशी व्यक्ती मृत झाल्यावर त्या धनाच्या रक्षणासाठी त्यावर नाग होऊन बसतो व त्या धनाचा लाभ कोणालाही घेऊ देत नाही. 

अशा नागाची या जन्मी किंवा जन्मांतरी जर हत्या झाली असेल तर त्याच्या हत्येचा शाप हत्या करणाऱ्याच्या घराण्यास मिळतो. यालाच सर्पशाप असे म्हणतात. पृथ्वीतलावावर नाग सर्वात जास्त आयुष्यमान प्राणी आहे. सर्प योनी चिरंजीव मानली गेली आहे. सर्प कुलात नाग हा श्रेष्ठ आहे म्हणुन नागाची हत्या झाल्यास दोष सांगितला आहे. नागाचे एकुण आठ वंश आहे त्यात सर्पादिकांचा पण समावेश आहे. 

सर्प, अनंत, शेष, कपिल, नाग, कुलिक, शंखपाल, भुधर या आठ कुलातील एखाद्याचा वध झाल्यास दोष उत्पन्न होतो. सर्पशापामुळे संतती न होणे, कन्या संततीच होणे, पुत्र संततीचा अभाव असणे, वात, पित्त, त्रिदोषजन्य ज्वर, शुळ, गंडमाळ, कुष्ट, कंडु, नेत्रकर्ण मुळ, मुत्रकुच्छ इत्यादी रोग उत्पन्न होतात. अनेक प्रकारची औषधी घेऊनही काहीही परिणाम होत नाही. 

यासाठी नागबली विधी करावा असे सांगितले आहे. नागवली केल्याने पूर्व जन्मातील नागवधाचा शाप दूर होऊन पुत्र संतती होते. शरीरास आरोग्य प्राप्ती होते.

सर्पशापात् सुतक्षयः ।।

असे शास्त्र वचन आहे. म्हणजेच सर्पशापाचा सर्वात जास्त परिणाम घराण्यातील संततीवर होतो. ज्या घराण्यावर सर्पशाप आहे त्या घराण्यातील संततीवर सर्पशापाचा प्रभाव जाणवतो. संतती न होणे, झाल्यास ती न टिकणे, कन्या संततीच होत रहाने किंवा जी संतती आहे ती कायम रोगग्रस्त किंवा समस्यांनी ग्रासलेली असणे तसेच अशा घराण्यांमध्ये संतती व्हायलाच नको यासाठी विवाहादी कार्य न होणे असे सर्पशापाची लक्षणे आहेत यासाठी नागबली विधी करावा. या विधीत पिष्टमय (पिठाच्या) नागाचे विधीवत पुजन केले जाते. 

त्याची प्राणप्रतिष्ठा करून पुर्वी ज्या नागाची हत्या झालेली असेल त्यास त्या मुर्तीत आवाहित केले जाते. पुजेच्या पश्चात हा नाम मृत झाला असे मानुन त्याचे स्मशानात दहन करून नागाच्या आठ कुळांच्या प्रित्यर्थ पिंडदान केले जाते. कारण घराण्यात नेमक्या कोणत्या कुळाच्या सर्पाची हत्या झालेली आहे हे माहित नसते. 

म्हणुन सर्वच कुळांना पिंड देण्यात येतो. सर्पहत्येच्या प्रायश्चित्त रूपी सोन्याचा यथाशक्ती नाग तयार करून तो दुधाने भरलेल्या चांदीच्या वाटीत ब्राम्हणास दान करावा असे शारणाने सांगितले आहे. सर्पशाप हा ज्योतिषशास्वाने कुंडलीद्वारे अथवा शापसूचक स्वप्नांद्वारे ओळखता येतो.


शापसूचक स्वप्ने 

पुरुष किंवा स्त्रियांना स्वप्नात सर्प, नाग दिसणे. त्याला मारणे, त्याचे तुकडे तुकडे झालेले दिसणे, तसेच ज्यांचे मुल जगत नाही त्या स्त्रियांना स्वप्नात मृतमुल दिसुन ते आपल्या मांडीवर आहे, जीवंत आहे असा भास होणे ही सर्व सर्पशाप सुचक स्वप्ने आहेत.कुंडलीद्वारे सर्पशाप

 • 1) पंचमात राहू हा मंगळाचे मेष, वृश्चिक राशीत असेल किंवा मंगळाची राहूवर दृष्टी असल्यास. 
 • २) पुत्रकारक गुरू मंगळाने युक्त, लग्नी, राहु असुन पंचमेश ६-८-१२ स्थानात असता. 
 • ३) गुरू, राहु युती पत्रिकेत कोठेती असता (चांडाळ दोष) 
 • ४) पंचमात शनि त्यावर चंद्राची दृष्टी किंवा युती असेल व पंचमेश राहुने युक्त असता. 
 • ५) पंचमाध्या मेष, वृश्चिक राशीत राहु, बुधाने युक्त किंवा दृष्ट असता. 
 • ६) लश राहुने युक्त पंचमेश मंगळाने युक्त व गुरु राहुने दृष्टीत असता. 
 • ७) गुरू, राहुने युक्त पंचमस्थानी चंद्राने किंवा शनिचंद्राने दृष्ट असल्यास. 
 • ८) पंचमेश बुध, मंगळाच्या नवमांशात मंगळाने युक्त तसेच लग्नात राहु असता. 
 • ९) लग्नेश बलहीन असुन पंचमात रवि, मंगळ, शनि अथवा राहू पंचमेश असता सर्पशापाने संततीस प्रतिबंध होतो.


अभिचार योग

 • १) मंगळ एकादश स्थानी असता अभिचार योग होतो. 
 • २) लग्नी मेष, कर्क, तुळ, मकर यापैकी एक राशी असेल तर त्यावर षष्ठेशाची दृष्टी असेल तर 
 • ३) सप्तमात मिथुन, कन्या, धनु, मीन यापैकी एक राशी असुन नवमात वृषभ, सिंह, वृश्चिक, कुंभ यापैकी एक राशी असता अभिचारयोग होतो. 
अभिचार योगामुळे संततीस प्रतिबंध होणे व इतर त्रास होतात. यावर उपाय म्हणजे नागबली विधी होय.


बलिदान व काकस्पर्श मराठी माहिती 

नारायणबली व नागबली या दोन्ही विधींमध्ये कावळ्यासाठी भाताचा बली पुजन करून ठेवण्यात येतो. आपल्यास किंवा घराण्यास पीडा उत्पन्न करणारा अतृप्त जीवात्मा सद्गतीस जाण्यास इच्छा करत असल्यास त्या बलीस काक स्पर्श ताबडतोब होतो परंतु त्या जीवात्म्याच्या काही वासना अपुर्ण राहिल्यास तो जीवात्मा त्या बलीभोवती फिरत असतो. 


असे असल्यास मात्र कावळा बलीजवळ येत नाही व काकस्पर्श होत नाही. कारण जीवात्मा हा अतिसुक्ष्म आहे. आपण सामान्य डोळ्यांनी जीवात्मा बघु शकत नाही पण फक्त कावळाच जीवात्म्याला बघु शकतो कारण कावळ्यास अत्यंत तीक्ष्ण दृष्टी असते. 

वास्तविक कावळ्यास एकच बुबुळ असते पण तरीही त्याची दृष्टी अत्यंत तीक्ष्ण आहे. तीक्ष्ण दृष्टी असल्याने फक्त कावळाच जीवात्मा बघु शकतो. ईश्वराने हा अधिकार फक्त कावळ्यालाच दिलेला आहे. कावळ्यास यमदुत असे म्हणतात. 

तो या भुलोकावर पक्षाच्या रूपाने भ्रमण करीत असतो म्हणुन बलीभोवती जर अतृत्प जीवात्मा फिरत असेल तर काकस्पर्श होत नाही. काकस्पर्श झाला नाही तर त्र्यंबकेश्वर मंदिरास ११ किंवा २१ प्रदक्षिणा घालण्याचे संकल्प केल्यास किंवा आपल्या पितरांची यापुढे यथोचित सेवा करण्याचे कबुल केल्यास बलीस कावळा स्पर्श करतो असा विलक्षण अनुभव येतो. 

काकस्पर्श झाल्यानंतर अतृप्त जीवात्मा सद्गतीस मार्गस्थ होतो अशी धारणा आहे. त्यामुळे आपल्या पितरांना उत्तम गती मिळवुन देण्यासाठी नारायण नागबली पुजेत बलीदान व काकस्पर्शाचे महत्त्व आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad