Type Here to Get Search Results !

श्राद्ध का केले पाहिजे? श्राद्ध म्हणजे काय? अशा प्रार्थनेने होईल श्राद्ध पूर्ण करा विधि पूर्वक श्राद्ध.

श्राद्ध का केले पाहिजे? श्राद्ध म्हणजे काय? अशा प्रार्थनेने होईल श्राद्ध पूर्ण करा विधि पूर्वक श्राद्ध


श्राद्ध का केले पाहिजे? श्राद्ध म्हणजे काय? :- हा प्रश्न तर बहुतेक सर्वांना पडत असले की श्राद्ध का केले पाहिजे आणि श्राद्ध म्हणजे काय? तर सोप्या भाषेमध्ये पुर्वजांसाठी श्रद्धेने जे कार्य केले जाते, त्या कार्याला "श्राद्ध" असे म्हणतात. आपला एक महिना पूर्ण होतो तेव्हा पितृ लोकांचा एक दिवस पूर्ण होतो. श्राद्धाच्या दिवसात पितर आशा ठेवतात की आमची मुले आमच्यासाठी काहीतरी अर्पण करतील, ज्याने आम्हाला तृप्ती प्राप्त होईल. 

www.marathivachak.com
श्राद्ध का केले पाहिजे? 

सर्वपित्री अमावस्या च्या संध्याकाळ पर्यंत पितर ईकडे तिकडे फिरत असतात बघत असतात की आपल्या तृप्ती साठी आपल्या मुलानी काय केल आहे की नाही. जर केल असेल तर ते तृप्त होऊन आशिर्वाद देऊन जातात. परन्तु जर त्यांच्या तृप्ती साठी काही केल नसेल तर ते तळतळाट देऊन जातात त्यामुळे घरात अनेक संकट येतात, आजार येतो, म्हणून उत्तम पुत्र प्राप्ति साठी तसेच उत्तम आरोग्यासाठी पितर लोकांच्या आशिर्वाद प्राप्त करण्यासाठी श्राद्ध करणे आवश्यक आहे. चांगल्या शुद्ध भावनेने विधिपूर्वक श्राद्ध केले पाहिजे. 



श्राद्ध का केले पाहिजे?  :- या पृथ्वीतला ला कर्मभूमि असे म्हणतात ईथे जे कर्म आपण करतो त्याचे फळ तसेच मिळते. पुण्यवंत लोक सत्कार्य करून पुण्य कमावतात तर पापी लोक पाप करून त्यांच नुकसान करून घेतात. ईथे "जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर" त्यामुळे सत्कार्य केले पाहिजे. जे लोकं सत्कार्य न करता पाप करून समाधानी न होताच मरून जातात त्यांची आत्मा मेल्यावर सुद्धा तृप्त होत नाही. 


त्यामुळे त्यांची अपेक्षा असते की त्यांच्या मुलांनी त्यांच्या तृप्ती साठी काहीतरी केले पाहिजे म्हणून ते मुलांना सतत संकटात आणतात जे मुले पितर पक्षांसाठी काही करत नाही. त्यामुळे काही लोक इमानदारीने चांगले कार्य करतात तरी त्यांचा घरात सुख समृद्धि लाभत नसेल तर ते त्यांच्या पितर लोकांच्या अतृप्त आत्मामूळे. 


त्यामुळे मुलांचे कर्तव्य असते की पूर्वज लोकांच्या तृप्ती साठी श्रद्धेने श्राद्ध केले पाहिजे. पितर लोक आपल्याशी संपर्क करु शकत नाही म्हणून ते संकट आणून आपल्याला खुणावतात आठवण करून देतात की आमच्या तृप्ती साठी श्राद्ध केल पाहिजे. 


श्राद्ध चा मंत्र 


एका तांब्या मध्ये पाणी घेऊन त्यामधे काळे तिळ टाकून 3 वेळा श्राद्ध चे मंत्र उच्चारण करून सूर्याला अर्घ्य दिल्याने पितर लोकांची तृप्ती होते. आणि प्रसन्नता प्राप्त होते. श्राद्ध करताना ही हा मंत्र 3 वेळा बोलल्याने श्राद्ध फलित होतो. 


मंत्र -  ॐ ह्रीं क्लीं स्वधादेव्यै स्वाहा। 


सर्वपित्री अमावस्या च्या दिवशी सर्व कार्य करून या मंत्राचा जप करून श्राद्ध मध्ये जे काही त्रुटी राहिली असेल ते पूर्ण होते आणि पितर लोकांना तृप्ती मिळेल. 


शेवटी सर्वानी अशी प्रार्थना करून श्राद्ध पूर्ण करा. 


श्राद्ध करताना वस्तू, विधि, तर सर्वांचा पूर्ण होत नाही त्यामुळे आपल्यापरीने प्रयत्न करावा. सूर्यनारायण समोर डोळे बंद करून दोन्ही हात वर करून बोलावे - " हे सूर्यदेव आणि यमदेव माझ्या माता पिता किंवा आजी आजोबा पितर लोकांच्या श्राद्ध निमित्ताने जे विधी, विधान, सामग्री व्यवस्था केले ते अपूर्णच आहे. 

आपण त्यांना उन्नत करावे, सुख शांति द्यावे, भक्ति प्रेम द्यावे अशी प्रार्थना करतो." अशी प्रार्थना करून श्राद्ध पूर्ण होईल. 


ही माहिती कशी वाटली नक्की comment मध्ये कळवा. आणि माहिती आवडली असले तर शेअर करा. सर्व आध्यात्मिक माहिती, कथा या साइट वर आपल्याला मिळेल. 


हे पण वाचा:-

समर्थ रामदास स्वामी मराठी कथा

नारायण नागबली पितृदोष संपूर्ण माहिती मराठी |पुजा, विधी, महत्व| Narayan Nagabali marathi








टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad