Type Here to Get Search Results !

निःस्वार्थ कर्माची शक्ति कथा - एक गरीब मुलगा कसा झाला राजा वाचा संपूर्ण कथा मराठी मध्ये|

 निःस्वार्थ कर्माची शक्ति कथा - एक गरीब मुलगा कसा झाला राजा वाचा संपूर्ण कथा मराठी मध्ये… 

राजाची कथा मराठी
राजकुमार राजा कथा 


निस्वार्थ भावाने जर आपण आपले कर्तव्य कार्य करत राहिलो तर त्याच फळ हे खूप मोठे असतेच तर या कथा मधून आपल्याला हे प्रत्यक्ष उदाहरण पाहायला मिळेल तर पहा… 



एका गावामधे एक विधवा स्री राहत असते तर त्यासोबत त्याचा एक छोटा मुलगा राहत असतो. त्या मुलाचे नाव असते महेश. त्याची आई खूप कष्ट करून त्याचे पालन करत असते. त्यांची अशी गरिबी बघून त्या छोट्या मुलाला खूप प्रश्न पडत असतात. एके दिवशी गावामधे राजा त्याच्या मंत्री लोकांसोबत गावत येतो. तेव्हा महेश त्या राजाला पाहून आश्चर्य चकित होतो तसेच त्यांची श्रीमंती, तेज, आत्मविश्वास बघून दंग होऊन जातो. त्याच्या मनात आता प्रश्नांची यादी तयार झालेली असते. त्याला सहज इच्छा झाली की आपण राजाशी बोलून याव म्हणुन तो राजाकडे जाण्याचा प्रयत्न करतो. परंतु…. 


राजाकडे जाण्यासाठी पुढे येतो परंतु त्याला तिथले राजाचे सैनिक अडवतात राजा पर्यन्त जाऊ देत नाही. तसच त्याला त्याची आई सुद्धा मागे घेऊन जाते. तेव्हा तो आईला प्रश्नां वर प्रश्न विचारतो. कोण आहे हा?आपल्यापेक्षा अलग का? तर त्याच्या आईने सांगितल की "राजा हा राज्याचा असा माणूस असतो जो हे सर्व राज्य चालवतो." महेश बोलतो "मला राजाशी बोलायच होत, मला त्या सैनिकांनी का नाही जाऊ दिलं त्यांच्याकडे?" आई म्हणते "तुला जर राजाशी बोलायच असेल तर तुला एक उपाय सांगते, तू राजाच्या तिथे निस्वार्थ भावाने मजुरी करायला जा. कशाची अपेक्षा न करता काम कर तुला सर्व काही मिळेल. महेश म्हणतो," खरच अस होईल का तर मी उद्याच राजाकडे कामाला जातो" अस बोलत बोलत त्याला झोप लागून जाते. 


सकाळी उठल्यावर सर्व तयारी करून तो आईचा आशिर्वाद घेतो आणि बोलतो, "आई मी चाललो राजाकडे, आता परत येणार तेव्हा राजा सोबत दिसणार तुला." आई आश्चर्यचकित होऊन बघते आणि बोलते, "अरे बाळा तू खरच चाललास, तर एक गोष्ट लक्षात ठेव निस्वार्थ भावाने काम करायच, तुला सर्व काही मिळेल." आईचा आशिर्वाद घेऊन निघतो राज दरबार कडे. 


राजदरबारात पोहोचल्यावर तो तिथे कामाला लागण्यासाठी खूप प्रयत्न करतो. तिथले मंत्री त्याला कामावर ठेवत नव्हते त्यांनी त्याला एक अवघड काम करायचे सांगितले ते जर महेश ने संध्याकाळ पर्यंत पूर्ण केल तर त्याला कामावर ठेवतील अस सांगितल. ते काम एका अनुभव नसलेल्या बालकाला अशक्यच होतं. परन्तु त्याने संध्याकाळच्या आधी ते काम केल म्हणून त्याला राजाकडे कौतुकाने घेऊन गेले. तर राजा खुश होऊन त्याला एक महिना कामावर ठेवायची परवानगी देतात. 

एक महिना निस्वार्थ भावाने महेश तिथे काम करून सर्वांचे मन जिंकतो. असा एक महिना निघून जातो.. 

राजकुमार राजा कथा
राजदरबार 

एक महिना झाल्यानंतर महेश राजांकडे जातो तेव्हा त्याला राजा म्हणतात तुझा काळ संपला आता तू जाऊ शकतो, तेव्हा लगेच मंत्री बोलतात की या मुलाने कोणतेही पैसे काहीच घेतले नाही निस्वार्थ भावाने काम केल तर राजा त्यावर प्रभावती झाले खुश झाले. तर राजाने राणी ला विचारले की याला ठेऊन घ्यायच का ईथे. तेव्हा राणी ला ही मुलगा नव्हताच तिची ममता जागृत झाली. ती होकार देते म्हणून त्याला ठेऊन घेतात. तर असाच, महीने, दिवस वर्ष झाले. एक दिवस राणी च्या मनात आले की आपल्याला पुत्र नाही तर आपण या महेश ला दत्तक घेतलं तर? याची चर्चा त्यांनी राजाशी केली तेव्हा राजाला ही ते चांगल वाटल कारण महेश ईमानदार, निस्वार्थ, प्रेमळ होता त्यामुळे त्यांनी महेश ला विचारले तर महेश म्हणतो की मी तर तुमचाच पुत्र आहेत तुम्ही माझे माता पिता आहात. महेश च्या या गोड बोलण्याने ते खुश झाले आणि त्याला विधी पूर्वक दत्तक घेतल… 


दुसर्या दिवस त्या गावामधे राजा आपल्या राजपुत्राला सोबत घेऊन जातात. महेश ला येवढ्या छान कपड्यात राजपुत्रा च्या रुपात बघून सगळे आश्चर्यचकित होतात त्या गर्दी मध्ये महेश चि जन्म देणारी खरी आई सुद्धा उभी असते. महेश त्या गर्दी मध्ये जाऊन त्याच्या जन्म देणार्‍या आईचे दर्शन घेतो तेव्हा आई बोलतो बाळा तू ज्या राजा सोबत दोन शब्द बोलायला फडफडत होता आता त्याच्या गादीवर बसणार आहेस. तेव्हा महेश तिच्या आईला बोलतो "आई हे तुझ्याच कान मंत्र मूळे झाल आहे तूच सांगितल होतं की निस्वार्थ भावनेने काम कर तर मी तेच केल." तेव्हा त्याची आई बोलते छान बाळा. आता पुढे संपूर्ण ब्रह्मांड चा राजाला पण आपलसं करून घे. हा राजा तर खूप छोटा आहे, तो मोठा राजा म्हणजे परमात्मा त्यालाही तुझ्या निस्वार्थ भावनेने आपलासा करून घे. आईच्या या उपदेशा ने तो पुढे आपला प्रवास परमात्म्याच्या दृष्टीने चालू ठेवतो….. 


तर बघा कसा एका छोट्या गावातला गरीब घरचा मुलगा निस्वार्थ भावाच्या शक्तीने राजा बनला. येवढी शक्ति असते ईमानदारीची. तुम्हाला ही कथा कशी वाटली ते नक्की कळवा तसेच आवडली असेल तर नक्की शेअर करा. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad