Type Here to Get Search Results !

वाचा पुत्रदा एकादशी व्रत कथा मराठी २०२३ |एकादशी महात्म्य मराठी | putrada ekadashi january 2023

Putrada ekadashi 2023 - नवीन वर्षातील पहिली एकादशी म्हणजेच पूत्रदा एकादशी 2023 पौष महिन्याच्य शुक्ल पक्षा मध्ये 2 जानेवारी ला येते. जाणुन घेऊ पुत्रदा एकादशी व्रत कथा मराठी मध्ये. हे व्रत भगवान विष्णुना समर्पित आहे. 

putrada ekadashi 2023

पुत्रदा एकादशी व्रत कथा मराठी - ( एकादशी महात्म्य मराठी )

भविष्योत्तर पुराणामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि महाराज युधिष्ठीर यांच्या संवादामध्ये पुत्रदा एकादशीचे माहात्म्य आढळते.

महाराज युधिष्ठिरांनी विचारले, "हे श्रीकृष्ण ! कृपया मला पौष महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये येणाऱ्या एकादशीविषयी सांगा. त्या व्रताची विधी काय आहे ? - putrada ekadashi vrat katha marathi

तथा त्यावेळी कोणत्या देवतेचे पूजन केले जाते ?"

भगवान श्रीकृष्ण म्हणाले, "जगताच्या कल्याणासाठी या एकादशीविषयी मी आपल्याला सांगतो. अन्य एकादशीप्रमाणेच ही देखील एकादशी करावी. या एकादशीव्रताचे नाव 'पुत्रदा' असे आहे. ही सर्व पापांचे हरण करणारी सर्वोत्तम तिथी आहे. सर्व कामना आणि सिद्धी पूर्ण करणारे भगवान या तिथीची अधिदेवता आहेत. या त्रिलोकामध्ये यापेक्षा उत्तम तिथीच नाही."
 ( पुत्रदा एकादशी व्रत कथा मराठी )


"प्राचीन काळातील कथा आहे. भद्रावती पुरीमध्ये सुकेतुमान नावाचे राजा राज्य करीत होते. त्यांच्या राणीचे नाव चम्पा होते. कित्येक वर्षापर्यंत राजाचा वंश चालविण्यासाठी राजाला पुत्र झाला नव्हता. त्यामुळे दोघे पति- पत्नी नेहमी चिंता आणि शोकाने व्याकुळ रहायचे. 

त्यामुळे राजाचे पितर राज्याने अर्पण केलेले जल शोकोच्छवासाने गरम करून पीत होते. राजानंतर आम्हाला कोणीच तर्पण करणारे नाही. या विचाराने पितर दुःखी झाले होते."
वाचा पुत्रदा एकादशी व्रत कथा मराठी २०२३ |एकादशी महात्म्य मराठी | putrada ekadashi january 2023
एकादशी महात्म्य मराठी 

"एक दिवस आपल्या घोड्यावर स्वार होऊन सुकेतुमान महाराज दाट वनामध्ये निघून गेले. पुरोहित आदी लोकांना याची कल्पना देखील नव्हती. पशूपक्षानी भरलेल्या या दाट वनामध्ये महाराज भ्रमण करीत होते. 


सर्वत्र अनेक प्रकारचे पशूपक्षी पाहत महाराज वनामध्ये इकडे तिकडे फिरत होते. इतक्यात दुपार झाली. राजाला तहान आणि भूक लागली. त्यामुळे पाण्याचा शोध घेत राजा इकडेतिकडे फिरू लागला. पूर्वजन्मीच्या पुण्यामुळे त्यांना एक सरोवर दिसले. putrada ekadashi january 2023 

त्या सरोवराजवळच मुनींचा एक आश्रम होता. त्याचवेळी अनेक शुभ शकून होत होते. राजाचा डावा डोळा आणि डावा हात फडफडू लागला. त्यामुळे काहीतरी शुभदायक घडणार आहे याची राजाला जाणीव झाली. सरोवराच्या काठावर अनेक मुनी वेदांचे पठन करीत होते. 

त्यांना पाहून राजाला अतिशय आनंद झाला. घोड्यावरून खाली उतरून राजाने मुनींजवळ जाऊन सर्वांना नमस्कार केला. तेव्हा ते मुनीवर म्हणाले, "हे राजन् ! आम्ही तुझ्यावर प्रसन्न आहोत. "

राजा म्हणाला, "हे मुनिगण आपण कोण आहात? आपली नावे काय
वाचा पुत्रदा एकादशी व्रत कथा मराठी २०२३ |एकादशी महात्म्य मराठी | putrada ekadashi january 2023
श्री विठ्ठल vitthal photo

( एकादशी महात्म्य मराठी )

आहेत ? आपण इथे का एकत्र आला आहात ? कृपया मला सत्य सांगा." मुनी म्हणाले, "राजन् ! आम्ही विश्वदेव आहोत. माघ महिना जवळ आला आहे. आजपासून पाचव्या दिवशी माघ मासास प्रारंभ होईल. आजच 'पुत्रदा' नावाची एकादशी आहे. जो कोणी ही एकादशी करतो त्यास पुत्र प्राप्ती अवश्य होते. " - putrada ekadashi vrat katha marathi

राजा म्हणाला, "विश्वदेवगण ! जर तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर कृपया मला पुत्र द्या. "

मुनी म्हणाले, "राजन् ! आज पुत्रदा एकादशी आहे. या एकादशी व्रताचे आपण आजच पालन करावे. महाराज ! भगवान श्रीकेशवांच्या प्रसादामुळे आपल्याला निश्चितच पुत्र प्राप्ती होईल."

भगवान श्रीकृष्ण म्हणाले, “हे युधिष्ठिरा ! अशा प्रकारे मुनींच्या सांगण्याप्रमाणे राजाने एकादशी व्रताचे पालन केले. द्वादशीस पारणे करून तथा मुनीजनांच्या चरणी मस्तक टेकवून राजा घरी परत आला. त्यानंतर राणीला गर्भधारणा झाली.  ( पुत्रदा एकादशी व्रत कथा मराठी )

 या पुण्यामुळे राजाला तेजस्वी पुत्र प्राप्त झाला. ज्याने आपल्या उत्तम गुणांमुळे पित्याला संतुष्ट केले. तो प्रजेचा उत्तम पालक झाला. त्यामुळे हे राजन् ! 'पुत्रदा' व्रत अवश्य करावयास हवे. - ( putrada ekadashi january 2023 )


जो कोणी या व्रताचे पालन करतो त्यास पुत्र प्राप्ती होऊन तो मनुष्य स्वर्गगामी बनतो." "जो कोणी या व्रताचे माहात्म्य वाचतो, ऐकतो अथवा सांगतो त्यास अश्वमेध यज्ञाचे फळ प्राप्त होते."

वाचा पुत्रदा एकादशी व्रत कथा मराठी २०२३ |एकादशी महात्म्य मराठी | putrada ekadashi january 2023
श्री कृष्ण फोटो 

एकादशी उपवास का करतात

उपवास धरणे धार्मिक दृष्टया आणि शारीरिक दृष्टया उत्तम असते. उपवास या‌ शब्दाचा विग्रह केल्यास उप म्हणजेच देव तसेच वास म्हणजे जवळ राहणे, आपल्या रोजच्या कर्मांतुन मुक्त होऊन देवाजवळ वास करणे जवळ राहणे याला उपवास म्हणतात. 

एकादशी म्हणजे हिंदु तिथि चा ११ वा‌ दिवस होय, ही तिथि श्री भगवान विष्णु यांना अत्यंत प्रिय असते. या दिवशी‌ आपल्या नित्य कर्मांतुन मुक्त होउन, तसेच श्री भगवान विष्णु यांची‌ पुजा करावी व निराहार राहावे.  ( पुत्रदा एकादशी व्रत कथा मराठी )

एकादशी व्रत उपवास केल्यास सर्व पाप नष्ट होतात आणि विष्णु भक्तिचे पुण्य ही मिळते. एखादी ईच्छा ठेवून जरर हे व्रत केल्यास ती ईच्छा अवश्य पूर्ण होते. पुराणांनमध्ये एकादशी व्रत करणे हे अनिवार्य असल्याचे सांगितले आहे .
म्हणुन मनुष्यधर्म या नात्याने तरी हे व्रत अवश्य करावे.


निस्कर्ष:-

या लेखामध्ये आपण बघितल पुत्रदा एकादशी व्रत कथा मराठी २०२३ |एकादशी महात्म्य मराठी | putrada ekadashi january 2023.  ही सर्व माहिती अनेक स्त्रोत वरून उपलब्ध केली आहे तर आपल्याला माहीत कशी वाटली ते कॉमेंट मध्ये नक्की कळवा आणि ही माहिती सर्वांना शेअर करायला मात्र विसरू नका. खाली व्हॉट्सॲप, फेसबुक चे बटण आहेत त्यावर क्लिक करून ही पोस्ट सर्वांना शेअर करा. धन्यवाद .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad