Type Here to Get Search Results !

pranayam in marathi information | प्राणायामचा अर्थ आहे तरी काय?

योगासनच्या नंतर प्रणायम खूप महत्वाचं आहे म्हणुन इथे जाणून घेऊया प्राणायामाचा अर्थ काय?, pranayam in marathi, प्राणायाम म्हणजे काय? संपूर्ण माहिती वाचा प्राणायामच्या शास्त्रीय स्वरुप काय आहे ते सुध्दा इथे आपल्याला वाचायला मिळेल. लक्षपूर्वक वाचा संपूर्ण माहिती आणि शेअर करायला विसरू नका...

pranayam in marathi information | प्राणायामचा अर्थ आहे तरी काय?
प्राणायाम


प्राणायाम म्हणजे काय ? pranayam in marathi information 


प्राणायाम हे आह्निकाचाराचे एक महत्त्वपूर्ण अंग असूनही त्याचे महत्त्व न कळल्यामुळे प्राणायामाकडे कानाडोळा होतो. ( pranayam in marathi ) धार्मिक कार्यांचे वेळी पुरोहित आचमनानंतर 'प्राणायामः' असे म्हणण्याचा अवकाश की लगेच नवखा यजमान एखाद्या माहितगाराचा आव आणून आपल्या नाकाला हात लावून मोकळा होतो. 

इकडे पुरोहित प्राणायामाचे छंद ऋषी-देवता म्हणतच असतात. तात्पर्य, असा निष्फळ प्राणायाम केल्यावर त्याचे खरे मर्मही कळणार नाही व त्याचे प्रयोजनही सफल होणार नाही. प्राणायामाचे लाभ विविध क्षेत्रांत विविध स्तरांवर विशद केले जातात.

प्राणायामाचा पहिला व महत्त्वाचा लाभ म्हणजे प्राणायामामुळे शरीराचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते. व्यायामामध्ये प्रमुख भूमिका प्राणाची म्हणजेच प्राणवायूची असते. 

अन्न, पाणी आणि हवा हे शरीरास सर्वाधिक अत्यावश्यक असे तीन घटक असून त्यांचे महत्त्व उत्तरोत्तर अधिकाधिक आहे. अन्नावाचून माणूस कित्येक आठवडे जिवंत राहू शकतो. पाण्यावाचून तो काही दिवस राहू शकेल, पण हवेवाचून त्याला काही क्षणही जिवंत राहणे अशक्य असते. 

शरीराची संपूर्ण यंत्रणा श्वासोच्छ्वासावर आधारित असते. श्वासोच्छ्वासाद्वारे हवा फुप्फुसामध्ये घेतल्यानंतर तेथे हवेतील प्राणवायूच्या संपर्कामुळे रक्तातील अशुद्धता नष्ट होते. 

नियमितपणे प्राणायाम करणाऱ्या साधकाच्या श्वासावाटे घेतला जाणारा प्राणवायू फुप्फुसातील सर्व नसापर्यंत पोचतो. त्यामुळे फुप्फुसाची कार्यक्षमता वाढून पर्यायाने शरीराचे आरोग्य राखले जाते.
pranayam in marathi information | प्राणायामचा अर्थ आहे तरी काय?
mudra 

प्राणायामाच्या पूरक, कुंभक व रेचक या तीन अवस्था असून त्यापैकी कुंभक अवस्थेत फुप्फुसांत घेतलेला श्वास काही क्षणात संपूर्ण फुप्फुसात भरून राहातो व शरीरात अत्यावश्यक ऊर्जा निर्माण करतो. 

दिवसभर काम करून थकवा आला असल्यास लागोपाठ सहा प्राणायाम केल्यावर तात्काळ ताजेतवाने वाटते व थकवा दूर पळतो असा अनुभव येतो.


प्राणायामाचा दुसरा लाभ म्हणजे 'श्वसनसाधना' होय. प्राणायामास नव्याने प्रारंभ केल्यावर श्वास रोखून धरण्याचा जो कालावधी असतो तो पुढे हळूहळू वाढत जातो.

घड्याळाचा उपयोग करून कालावधीची नोंद ठेवल्यास श्वासावरोधात कशी कशी प्रगती घडते हे सहज अजमावून पाहता येते. श्वासावरोध म्हणजेच कुंभक जितका दीर्घ होत.. जाईल, तितकी प्राणायामात प्रगती होत जाते. 

दिवसातील विविध प्रकारच्या आह्निकात केले जाणारे प्राणायाम संख्येने जितके जास्त तितका प्राणायामाचा अभ्यास सखोल होत जातो व त्यानुसार त्याचे सुपरिणाम घडत जातात.

pranayam in marathi information | प्राणायामचा अर्थ आहे तरी काय?
meditation pose

प्राणायामाचा तिसरा लाभ म्हणजे 'मनोविकास' होय. प्राणायामातील विविध अवस्थांतून जाताना मनाची एकाग्रता साधते. कोणत्याही कर्मात मनाचा सहभाग मोठ्या प्रमाणात असणे अत्यावश्यक असते. 

चंचल व हट्टी मनाविषयी गीतेत म्हटले आहे की. ‘चंचलं हि मनः कृष्ण प्रमाथि बलवद् दृढम् ।' अशा चंचल मनाला आवर घालण्यासाठी उपयोगात आणली जाणारी बाह्य साधने नेहमीच कुचकामी ठरतात. अशावेळी केवळ प्राणायामाने मनाला स्थैर्य आणणे हाच एक उपाय असतो. 

प्राणायामातूनच पुढे चिंतन, मनन, निदिध्यास, ध्यान व धारणा या पुढील अवस्था साध्य होतात. प्राणायामाचा अभ्यास करताना प्रारंभावस्थेत दृढयत्न असतो तर अंतिम अवस्थेत प्राणविजय असतो. प्राणायामाचे महत्त्व विशद करताना प्रयोगपारिजात या ग्रंथात म्हटले आहे की, 
'पूरके विष्णुसायुज्य कुंभके ब्रह्मणोऽन्तिकम् रेचकेन तृतीयं तु प्राप्नुयादैश्वरं पदम् ।।' प्राणायाम करताना पूरकाचे वेळी नाभिकमलस्थित विष्णूचे, कुम्भकाचे वेळी हृदयकमलस्थित ब्रह्मयाचे व रेचकाचे वेळी सहस्रारस्थित शिवाचे ध्यान करावे. 

काही साधक तिन्ही वेळी ब्रह्मविष्णुशिवात्मक अशा आपल्या सद्गुरूंचे ध्यान करतात. अशा प्रकारे प्राणायाम करताना विश्वाच्या तिन्ही अवस्थांना कारणीभूत असणाऱ्या तिन्ही शक्तींचे ज्ञान व अंतिमतः त्यांचा साक्षात्कार होतो.

प्राणायामाचा चौथा व अत्यंत महत्त्वाचा लाभ म्हणजे साधकाच्या श्वासोच्छ्वासात एक प्रकारची लयबद्धता येते. एरवी जेथे मोजक्या श्वासोच्छ्वासांत भागते तेथे अनावश्यकरीत्या कितीतरी पटीने आपले श्वासोच्छ्वास चालू असतात. 

कामक्रोधादी षड्रिपूंशी लढताना तर त्यांची संख्या अमर्याद वाढते. परमेश्वराने एखाद्या जीवाला आयुर्मर्यादा आखून दिलेली असते, असे जेव्हा सांगितले जाते तेव्हा ती आयुर्मर्यादा दिवस, मास, वर्षे यांच्या मोजमापात नसून श्वासोच्छ्वासाच्या संख्येत असते. 

नियमित प्राणायाम करणारा साधक मोजकेच पण अत्यंत पुष्टिकारक श्वासोच्छ्वास करून देवाने दिलेली श्वासोच्छ्वासांची संख्या अधिक काळ वापरत जातो व लौकिकार्थाने दीर्घायुषी ठरतो.

उलट कामक्रोधांच्या युद्धात सापडून त्यांच्याशी लढताना श्वासोच्छ्वासांचा अमाप अपव्यय करणारा सामान्य माणूस देवाने दिलेली श्वासोच्छ्वाससंख्या ऐन तारुण्यातच उधळून टाकतो व यमराजास निमंत्रण देतो. म्हणून प्राणायामाचा सराव करून श्वासोच्छ्वासाचा किमान वापर करून दीर्घायुष्य प्राप्त करून घेता येते.

प्राणायाम हे योगमार्गाचे हरद्वार होय. ज्याप्रमाणे हिमालयातील बद्री, केदार, गंगोत्री, यमुनोत्री, विविध तीर्थस्थळे, मठ इत्यादी ठिकाणी जाताना प्रथम हरद्वार लागते, त्याप्रमाणे योगमार्गातील विविध प्रकारचे प्रगत प्राणायाम, सोऽहं साधना, अजपाजपसाधना, क्रियायोगातील क्रिया इत्यादी सर्व बाबींची सुरुवात नेहमी प्राणायामानेच होते. 

यास्तव दिनचर्येत तर प्राणायामाचा समावेश केलेला आहेच, पण एरवीदेखील मनाला अस्वस्थता वाटल्यास, एखाद्या अनिष्ट घटनेमुळे मनास ताग येत चालल्यास, विमनस्कता, दुर्भाती यासारखे मनोविकार बळावल्यास शक्य होतील तितके प्राणायाम अवश्य करावेत.


प्राणायाम कसा करावा..

प्राणायाम हा श्वसन संस्थेच्या संबंधीत एक महत्वाचा व्यायाम प्रकार आहे.प्राणायामाचे तर अनेक प्रकार आहेत. पण प्राणायामासाठी खालील तीन गोष्टी महत्वाच्या आहेत.

  • 1.रेचक ( श्वास सोडणे)

  • 2.पुरक.( श्वास घेणे)

  • 3.कुंभक ( श्वास थांबऊन ठेवणे )

रेचक करताना हळूवार दोन्ही नाकपुडितुन श्वास सोडून पोट खपाटीला नेणे.

पुरक, श्वास घेताना पोट फुगवीने.

कुंभक, घेतलेला श्वास क्षण भर कोंडुन ठेवणे .

अशा प्रकारे दोन्ही नाकपुडीतुन हळू हळू श्वास घेणे, व सोडणे,कोंडुन ठेवन याने पोटाचा सुध्दा व्यायाम होऊन पचन संस्थेवर चांगला परिणाम होतो,अपचन,ऐसिडिटी,कब्ज दुर होतात. आणि पोटातील सर्व ग्रंथींचा व्यायाम होतो.

प्राणायाम कधी करावा..

  1. प्राणायाम सकाळी आणि सायंकाळी करू शकता.
  2. साधारणपणे अर्धातास अगोदर व नंतर काही खाऊ तसेच पिऊ नये असे सांगितल्या जातं.
  3. जो प्राणायाम तुम्हाला करायचा आहे किंवा विशिष्ट धेयय ठेऊन तुम्ही प्राणयामाला सुरवात करायची असल्यास तसा शोध घेणे आवश्यक आहे.
  4. सूर्यनमस्कार सुरवात केल्यावर बरेच बारकावे लक्षात येतात.
  5. नेमका कुठे स्ट्रेच पडावा आणि कुठे नाही या दृष्टिकोनातून विशिष्ट कृति असतात. त्यांच्या मूळ उद्देश लक्षात घेतला तर होणारी चुका टाळता येतील.
  6. त्यामुळे नेमका जो फायदा हवा आहे तो प्राणायाम मधून साधता येऊ शकतो.
  7. बाबा रामदेव यांनी भारतात तसेच भारत बाहेर योग घराघरात पोचवलाय. त्यांचे video बघून तुम्ही तुमच्या योगसाधनेत परिपूर्णता आणू शकता.
  8. एकाच योगा साठी त्यांचे बरेच video आहेत. त्यातून तुम्ही हळू हळू 1 1 आसन करणे सुरू करा.
  9. सूर्यनमस्कार सर्वात उत्तम आहे. दिवसाला 20 सूर्यनमस्कार असं ध्येय ठेऊन नमस्कार सुरू करावे. सुरवातीला 1 किंवा 2 जरी केलेत तरी ठीक. जमलेच पाहिजे असा हट्ट नको. पण सर्व setps मात्र अचूक कराव्यात.
  10. आणि श्वसन साठी अनुलोम विलोम, भस्त्रिका, भ्रमरी व उजैनी प्राणायाम करावे.


निस्कर्ष:-

या लेखामध्ये आपण pranayam in marathi information | प्राणायामचा अर्थ आहे तरी काय? प्राणायाम म्हणजे काय? ही सर्व माहिती अनेक स्त्रोत वरून उपलब्ध केली आहे तर आपल्याला माहीत कशी वाटली ते कॉमेंट मध्ये नक्की कळवा आणि ही माहिती सर्वांना शेअर करायला मात्र विसरू नका. खाली व्हॉट्सॲप, फेसबुक चे बटण आहेत त्यावर क्लिक करून ही पोस्ट सर्वांना शेअर करा. धन्यवाद 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad