महाशिवरात्रि हे व्रत सर्वात महत्वाच्या व्रताच्या यादीत येते. तर हा महाशिवरात्रि व्रत कसा करावा आणि का करावा, या व्रताचे फळ काय, पूजा काशी करावी तसेच महाशिवरात्रि व्रत कथा सुध्दा आपल्याला इथे वाचायला मिळणार आहे.
महाशिवरात्रि उपवास कसा करावा आणि का करावा | mahashivratri 2023
सूतजी म्हणतात : ‘“सोमवारच्या अष्टमीला आणि कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला कोणी उपवास केला तर त्याच्यावर श्री महादेव विशेष प्रसन्न राहतात. आणि महाशिवरात्री ( mahashivratri 2023 ) सर्वांत बलवान व्रत आहे.
१८ फेब्रुवारी २०२३ रोजी , माघ कृष्ण १३ रोजी महाशिवरात्रि आहे....
कोट्यवधी हत्यांचे पाप ज्याच्या डोक्यावर आहे त्यानेही जर विधिवत् महाशिवरात्रीचे ( mahashivratri 2023) पूजन-अर्चन केले, भलेही मंदिरात गेला नाही - आपल्या घरीच अर्चन किंवा मानसिक पूजन केले तर त्याचे रोग-शोक, पाप-ताप श्रीमहादेवांच्या कृपेने नष्ट होतात आणि त्याचे हृदय प्रफुल्लित व पुण्यमय होते."
अष्टमी व चतुर्दशीचा उपवास ग्र हिशोबाने आपल्या आरोग्यास भक्तिभावासाठीही चांगला आहे.
अष्टमी व चतुर्दशीचा उपवास ग्रह-नक्षत्राच्या हिशोबाने आपल्या आरोग्यासाठी आणि भक्तिभावासाठीही चांगला आहे.
काय आहे महाशिवरात्रि व्रताचे फळ 2023
श्री सूतजी शौनक ऋषींना म्हणतात: "ज्यांना आत्मज्ञानाच्या सत्संगाचे श्रवण-मनन करायला मिळत नाही त्यांनी विधिपूर्वक श्रद्धा भक्तीने शिवपूजन, शिव-व्रत केले पाहिजे.श्रद्धा-भक्तीने केलेले महादेवांचे पूजन-स्मरण कालांतराने त्यांना आत्मशिवाची विद्या देणाऱ्या सत्संगात पोहोचविते आणि सत्यस्वरूप व्यापक शिवाचा साक्षात्कार करवून देते. ' "
मला जर फळली तर एक महाशिवरात्री फळली. जेथे कोणीच नव्हते तेथे मी एकट्यानेच जमेल तशी पूजा केली आणि माझ्या जीवनात खूप परिवर्तन झाले. मी विचार करीत होतो की 'घर सोडून जातो, काय होईल, कसे होईल ?... ते सर्व निघून गेले, उडी घेण्याची हिंमत आली. बाबा ! महाशिवरात्री व्रताने कैलासपती शिवशंकर येतात की नाही ही गोष्ट सूक्ष्म आहे परंतु तुमचे हृदय तर शिवमय होते, भाव तर शुद्ध होतो.
महाशिवरात्र पूजा विधी - घरालाच बनवा शिवालय
महाशिवरात्रि उपवास कसा करावा - तुम्ही आपल्या घरात साधन-भजनाची, पूजेची एक अशी खोली बनवा की जेथे संसाराची 'खटपट' नसेल. मग तेथे शिवलिंगाची स्थापना केली तर ठीकच आहे, नाहीतर भगवंत ज्यांच्या हृदयात नृत्य करीत आहे, वाणी उच्चारण करीत आहे अशा एखादया ब्रह्मवेत्तामहापुरुषाचे श्रीचित्र लावा की ज्यांच्यात तुमची श्रद्धा असेल. रोज थोडेफार ध्यान, जप करा. कधीकधी तेथे फुले ठेवा, दिवा लावा, धूप वगैरे करा.
धूप रसायन (chemical) युक्त कृत्रिम सुगंधाच्या अगरबत्त्यांचा नाही; या तर गडबड करतात. देशी गायीच्या जळत्या गोवरीवर थोडे गुग्गुळ टाका अथवा निखाऱ्यांवर थोडी हवन-सामग्री टाका अथवा तर 'गौ-चंदन धूपबत्ती' जाळा. तेथे तुम्ही नियमाने मंत्रजप, साधन-भजन कराल तर ती जागा थोड्याच दिवसांत शिवमंदिर झालेली तुम्हाला दिसून येईल.
मग जेव्हा संसाराची विडंबना, संकट येईल तेव्हा तुम्ही हात-पाय धुऊन त्या पूजेच्या खोलीत जाऊन थोडी प्रार्थना करा. ५-७ मिनिटे ॐकारचे दीर्घ उच्चारण करून मानसिक जप व ध्यान करा. जर रात्रीची वेळ असेल तर ध्यान करता-करता ध्यानाचा जो भाव बनला आहे त्याच भावात शयन करा.
रात्री स्वप्नात तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल, नाहीतर पहाटे नक्कीच मिळेल. पहिल्या दिवशी नाही मिळाले तर दुसऱ्या दिवशी मिळेल. उत्तर मिळेल अथवा तर समस्येचे आपोआपच समाधान (निवारण) होईल, ही अगदी खरी आणि पक्की गोष्ट आहे !
महादेवांना हेच मागा की 'हे भोळ्या शंकरा ! अशी कृपा कर की शिवस्वरूपाचा अनुभव करवून देणारा सत्संग आम्हाला मिळत राहो, आम्हाला शिवतत्त्वात जागृत झालेल्या संतांचे सान्निध्य मिळो.'
mahashiratri 2023 ला महादेवांना काय मागावे ?
महादेवांना हेच मागा की 'हे भोळ्या शंकरा ! अशी कृपा कर की शिवस्वरूपाचा अनुभव करवून देणारा सत्संग आम्हाला मिळत राहो, आम्हाला शिवतत्त्वात जागृत झालेल्या संतांचे सान्निध्य मिळो. '
महाशिवरात्रीच्या दिवशी संकल्प केला पाहिजे की :
देवदेव ! महादेव ! नीलकण्ठ ! नमोऽस्तु ते
कर्तुमिच्छाम्यहं देव शिवरात्रिव्रतं तव ॥ तव प्रभावाद्देवेश ! निर्विघ्नेन भवेदिति । कामाद्याः शत्रवो मां वै पीडां कुर्वन्तु नैव हि ॥
'देवदेव ! महादेव ! नीळकंठ ! तुम्हाला नमस्कार असो !... हे देव ! मी तुमचे शिवरात्री- व्रत करू इच्छितो. हे देवेश ! तुमच्या प्रभावाने माझे व्रत निर्विघ्न पूर्ण होवो. व्रतादरम्यान काम क्रोधादी शत्रू मला पीडा देऊ नयेत. ' ही प्रार्थना करून व्रताचा आरंभ केला पाहिजे
आणि व्रत पूर्ण केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी शिवतत्त्वाला जाणणाऱ्या महापुरुषाचे अभिवादन केले पाहिजे. जर असे महापुरुषभेटले नाहीत तर मनोमन त्यांचे अभिवादन आणि पूजन केल्याने आपल्या अंतरात्मा शिवाचा प्रसाद शीघ्र प्रगट होईल...याच्याने सर्वांनाच फायदा होईल
श्री महादेव म्हणतात की “लिंगाचे पूजन ॐकार जप करून आणि मूर्तीचे पूजन 'ॐ नमः शिवाय' जप करून करावे.”महाशिवरात्रीच्या जागरणाचा मोठा प्रभाव आहे. याच्याने चित्तात प्रसन्नता येते आणि त्याचा विकास होतो. मनोमन महादेवांना बेलपत्र वाहा, शिवलिंगावर जलाभिषेक करा, असेही चालेल..... १० मिनिटे ओठांनी, मग १० मिनिटे कंठाने, मग १० मिनिटे हृदयाने जप करा. मन इकडे-तिकडे गेले तर मोठ्याने 'हरि ओऽऽ...म्ऽऽ..., शिव ओss...म्ss...' असे उच्चारण करा. सकाळ- सायंकाळ व रात्री अर्धा-अर्धा तास अशी साधना करा. याच्याने सर्वांनाच फायदा होईल.
महाशिवरात्रि व्रत कथा २०२३
पौराणिक कथा आहे. एकदा पार्वतीदेवीने
श्रीमहादेवांना विचारले : "इतके सगळे लोक मंदिरांमध्ये जातात, इतके सगळे लोक धार्मिक आहेत तरीही त्यांचा भवपाश का तुटत नाही ?" श्रीमहादेव म्हणाले : "ते मंदिरांमध्ये तर जातात परंतु विषय-विकारांच्या पार जात नाहीत; आत्मतीर्थाला, आत्ममंदिराला ते जाणत नाहीत.
इदं तीर्थं इदं तीर्थं भ्राम्यन्ति तामसा जनाः ।
आत्मतीर्थं न जानन्ति कथं मोक्ष शृणु प्रिये ॥ ते आपल्या मान्यतांनी घेरलेले असतात. मान्यतांच्या जे पार झाले आहेत ते तर जेथे आहेत तेथेच मंदिर आहे पार्वती !'
पार्वतीदेवी म्हणाली : "तरीही माझ्या समाधानासाठी तुम्ही चला. इतके इतके भक्त आहेत, काही तर मान्यतांच्या पार असतील." महादेव म्हणाले : "चला, जाऊया.'
देवाधिदेव महादेव व जगज्जननी पार्वतीदेवी मनुष्य-शरीर धारण करून एका प्रसिद्ध विशाल मंदिराच्या प्रांगणात तेथे जाऊन बसले जेथे भिकारी बसत होते. पार्वतीदेवीने एका सुंदर स्त्रीचे आणि महादेवांनी एका कोढीचे रूप घेतले होते. त्या कोढी पतीला घेऊन भिकारिणीचा वेश बनवून ती देदीप्यमान सुंदरी बसली होती. कित्येक लोक मंदिरात जात होते, त्यांची थेट नजर त्या सुंदरीवर पडत होती. परत जाताना काही दान-दक्षिणा वगैरे दयायची असली तर सुंदरीकडे देत होते आणि तिची छबी आपल्या डोक्यात भरून जात होते.
कोढीची छबी कोणीच घेत नव्हते. गर्दी तर खूप होती, घंटानादही सुरू होता, भगवंताचा जयघोषही सुरू होता, त्वमेव सर्वं मम देव देव... हेसुद्धा सुरू होते, परंतु सर्व आपापल्या मान्यतांच्या अनुसार केले जात होते. भक्तगण कपाळाला 5.
टिळासुद्धा लावत होते, रोजच्या प्रमाणे सर्व दर्शन करून परत जात होते, खूप गर्दी तेथून जात होती. इतक्यात एकजण तेथे आला, तो मंदिरात जात • होता. त्याने पाहिले की एक कोढी बसला आहे आणि त्याची पत्नी घोंगावणाऱ्या माशांना पळवून लावत आहे.
तो भक्त म्हणाला ः “आई ! हे तुमचे पती कोढाने ग्रस्त आहेत, तुम्ही माझ्या घरी चला. मी तुमच्या मुलासारखा आहे, माझी संपत्ती तुमची संपत्ती आहे, माझे घर तुमचे घर आहे.
येथे तर यांचा रोग आणखी वाढत जाईल आणि हा संसर्गजन्य असल्याने याच्याने इतरांनाही त्रास होईल, तुम्ही माझ्या घरी चला. मी यांची सेवा करेन, तुम्हीसुद्धा सेवा करा. माझ्याकडे जे काही आहे ते यांच्या सेवेत लावेन."
पार्वतीदेवी : "नाही, आम्ही कोणाच्या घरी जात नाही.'
आणि गोष्टही खरी आहे ! ते कोणाच्या घरी जात नाहीत. जोपर्यंत कोणाचे घर वाचते तोपर्यंत ते जात नाहीत, जेव्हा 'कोणी' हटतो तेव्हा तेच राहून जातात.
पार्वतीदेवी म्हणाली :
"पार्वती वास्तविक देव नाही आहे, महादेवही वास्तविक देव नाही आहेत, ब्रह्मदेवही
वास्तविक देव नाही आहेत आणि मंदिरातही हे वास्तविक देव नाही आहेत. वास्तविक देव तर तो आहे जो सर्वांच्या अंतरी दडलेला
आहे, जो गुण आणि मान्यतांच्या पार आहे."
तो सज्जन मंदिरात न जाता आपल्या घरी
गेला. त्याच्याकडे जी काही उपचाराची औषधे, पट्ट्या वगैरे होत्या ते सर्व घेऊन आला, घाव साफ केले. जे विश्वाची सफाई करतात, गडबड- गोंधळ, रजो-तमोगुण वाढतो, पापी लोक वाढतात तेव्हा जे सफाई करून टाकतात, त्यांची आज त्या भक्ताने सफाई केली... पट्ट्या बांधल्या, नमस्कार केला, मग मंदिरातगेला तर मंदिराचा देव हसताना दिसला.
त्या देवाला पाहता- पाहता अंतरीचा देव म्हणत आहे की 'बस ! मला फक्त या दगडातच पाहू नकोस, जेथे तुझी नजर पडेल तेथे अगोदर मला पहा, नंतर दुसऱ्यांना मान.' तो परतला, रोमांचित झाला. येऊन त्या कोढीला नमस्कार केला, त्याच्या पत्नीला नमस्कार केला. पार्वतीदेवी म्हणाली सफाई करून टाकतात,
"मुला ! माझ्या शंकेचे समाधानझाले. मंदिरांमध्ये मूर्त्यांकडे तर बरेचसे लोक येतात परंतु कोणीकोणी विरळाच सात्त्विक आहे जो मंदिर आणि मूर्त्यांच्या बहाण्याने आमच्याकडे येतो. आणि तू आमच्याकडे आला आहेस, तुझी तू नजर रूप-लावण्यावर, सौंदर्यावर पडली नाही तर माझ्या या कोढी पतीवर पडली. तू यांना आत्मभावाने पाहिलेस - जसे तुलाच काही झाले असेल. ज्याची आत्मभावाची दृष्टी असते ना, त्यालाच सत्याचा साक्षात्कार होतो.
बरं, आता हे जे कोढी आहेत यांना मी खऱ्या रूपात प्रगट व्हायला सांगते आणि मी काय आहे तेसुद्धा तुला सांगते. लोक तर आम्हाला याच रूपात पाहतील पण आमच्या कृपेने तुला आमच्या खऱ्या रूपाचे दर्शन होईल.' "
पार्वतीदेवीचा संकल्प अकाट्य असतो. पार्वतीने संकल्प केला, शिव आणि पार्वतीचे दर्शन झाले त्याच कोढी आणि कोढीच्या पत्नीमध्ये !.... तो भक्त धन्यवादाने भरून गेला.
पार्वतीदेवी म्हणाली : "हेसुद्धा आमचे वास्तविक स्वरूप नाही आहे. हे भक्त ! हीसुद्धा तुझी आणि लोकांची मान्यता आहे की महादेव अशा प्रकारचे आहेत, पार्वती अशा प्रकारची आहे परंतु पार्वती वास्तविक देव नाही आहे, महादेवही वास्तविक देव नाही आहेत, ब्रह्मदेवही वास्तविक देव नाही आहेत आणि मंदिरातही हे वास्तविक देव नाही आहेत. वास्तविक देव तर तो आहे जो सर्वांच्या अंतरी दडलेला आहे, जो गुण आणि मान्यतांच्या पार आहे. "
असङ्गो ह्ययं पुरुषः ।... केवलो निर्गुणश्च ।
अष्टावक्र मुनी हीच गोष्ट सांगत आहेत की 'मान्यतांच्या पार हो.' किती सुंदर गोष्ट आहे !
देहाभिमानपाशेन चिरं बद्धोऽसि पुत्रक ।
(अष्टावक्र गीता : १.१४) पुत्र ! देहाभिमानरूपी पाशाने तू चिरकाळापासून बांधलेला (बंदिस्त) आहेस.
लोक देहाभिमानाने बांधलेले आहेत म्हणून त्यांनी जरी भगवंताला शोधले तरी एखादया देहधारीच्या रूपात शोधतील. आपण जर धनाच्या पाशात बांधलेलो असलो तर आपल्याला धनवान इष्ट किंवा भगवंतच आवडेल. आपण जर त्यागाच्या कल्पनांमध्ये बांधलेलो असलो तर आपल्याला त्यागी इष्ट किंवा गुरूच आवडतील. आपण जर विद्वत्तेच्या अभिमानाने बांधलेलो असलो तर आपला इष्ट 'विद्या' असेल आणि आपल्याला विद्वान गुरूच आवडतील. हा सर्व मान्यतांचा खेळ आहे. आपण जोपर्यंत मान्यतांच्या पार जात नाही तोपर्यंत भवबंधन तुटत नाही.
निस्कर्ष:-
या लेखामध्ये आपण बघितल जाणून घ्या महाशिवरात्रि उपवास कसा करावा आणि का? | व्रत कथा 2023.. ही सर्व माहिती अनेक स्त्रोत वरून उपलब्ध केली आहे तर आपल्याला माहीत कशी वाटली ते कॉमेंट मध्ये नक्की कळवा आणि ही माहिती सर्वांना शेअर करायला मात्र विसरू नका. खाली व्हॉट्सॲप, फेसबुक चे बटण आहेत त्यावर क्लिक करून ही पोस्ट सर्वांना शेअर करा. धन्यवाद