Type Here to Get Search Results !

महादेवाचे आणि मंगळ ग्रहाचे हे संबंध तुम्हाला माहीत आहे का?


मंगळ ग्रह जो की सर्व ग्रहांचा सेनापती मानला जातो. मंगळ ग्रहाचे आणि महादेवाचे संबंध खुप जवळचे आहे. कारण मंगळ ग्रहाची उत्पत्ती कशी झाली या मागच्या कथेवरून मंगळ ग्रहाचे आणि महादेवाचे संबंध आपल्या लक्षात येईल.

महादेवाचे आणि मंगळ ग्रहाचे हे संबंध तुम्हाला माहीत आहे का?
महादेव मंगळ ग्रह संबंध 

महादेवाचे आणि मंगळ ग्रहाचे संबंध  

आपण नेहमी ऐकतो कुंडलीमध्ये मंगळ आहे, मंगळ दोष आहे, शनी आहे, म्हणजे ते ग्रह आपले नुकसान करतात का? आपल्या भारती संस्कृतीमध्ये वृक्षापासून ते ग्रहा पर्यंत सर्वांवर देव मानण्याची, बघण्याची श्रद्धा आहे आणि असलीच पाहिजे. कारण सगळीकडे देव आहेच यात मात्र शंका नाही.

कशी आणि का झाली मंगळ ग्रहाची उत्त्पती?

मंगळ ग्रहाची उत्पती कशी झाली त्याची कथा आहे. महादेवाचे एक खूप जवळचे भक्त होते. आणि ते पृथ्वीवर संगीताचे शिक्षण विद्यार्थ्यांना देत असत. म्हणजेच ते संगीत शिक्षक होते. म्हणजेच संगीत आचार्य होते.

ते महादेव भक्त गायन वादन तसेच नृत्य सुध्दा शिकवत असत. त्यांनी तांडव नृत्याची शिक्षण महादेवा कडून घेतले होते. म्हणजेच महादेव त्यांचे गुरू तसेच आराध्य सुध्दा होते. महादेवची सुध्दा इच्छा होती की त्यांनी पृथ्वीवर संगीताचा प्रचार प्रसार करीत रहावा.

एकदा त्यांनी तांडव नृत्य द्वारे महादेवना प्रसन्न करून घेतले आणि महादेव प्रकट झाले आणि त्याला बोलले तुझ्या या नृत्याच्या अव्हणाने मी प्रसन्न झालो आहे माग तू काहीतरी वरदान माग काहीपण माग. 

महादेव भक्ताची वेगळीच इच्छा होती. त्यांनी महादेवा समोर अपली इच्छा प्रकट केली.
त्याची इच्छा होती की तांडव चे अनेक प्रकार आहेत त्यात एक प्रकार असे आहेत ते म्हणजे महादेव आणि आदिशक्ती माता दोन्ही एकत्र तांडव नृत्य करतात. 

ते पाहण्याची त्याची इच्छा होती तर ही इच्छा त्यांनी महादेवा पुढे व्यक्त केली. तर महादेवांनी त्याला याचे परिणाम काय होतील याबद्दल कल्पना दीली परंतु वरदान मागितले तर पूर्ण तर करावेच लागेल म्हणून महादेव तयार झाले.

तांडव नृत्याला सुरुवात झाली नऊ रसातले नऊ प्रकारचे तांडव महादेवांनी सुरू केले. जसा रस तसे तांडव नृत्य असे प्रचंड परिणाम दिसू लागले. सगळीकडे प्रलयचे वातावरण बनले. सगळीकडे गोंधळ सुरू झाला.

महेदेव प्रचंड प्रमाणात तापले होते. तेव्हा पार्वती मातेने आपल्या शांत रस तांडव ने शांत केलं जेव्हा महादेव आणि पार्वती माता एकत्र तांडव नृत्य करत होते हे नृत्य महादेव भक्ताला बघायचे होते. त्याने बघितले त्यांचे वरदान पूर्ण झाले.

तांडव नृत्य आणि मंगळ ग्रह उत्त्पत्ती 

परंतु महादेव आणि पार्वती च्या तांडव नृत्याने संपूर्ण प्रलय सुरु झाला. तांडव नृत्य करत असताना महादेव ला घाम आला आणि तो घाम तांडव नृत्य मुळे अग्नीत भाजलेल्या त्या जमिनीवर पडला. 

आणि त्यातून एका बालकाचे जन्म झाले. ते म्हणजेच मंगळ ग्रह.
त्या बालकाच नाव महादेवांनी "लोहितांग" असे ठेवले. लोहीतांग म्हणजेच मंगळ ग्रह. ते बालक पाहताच धरती माता म्हणजेच पृथ्वी माता तिथे प्रकट झाल्या आणि यांना प्रार्थना केली. की हे पूत्र माझ्या मातीत म्ह
णजेच माझ्यापासून झाले आहे तर मला या याचे पालनपोषण ची संधी द्यावी.

महादेवाने ते मान्य केले परंतु तिथे "अंधक" आला आंधक म्हणजे महादेवाचा अंश. त्याने ही त्या मुलाची पालनपोषण ची जबाबदारी घेण्याची इच्छा व्यक्त केली. महादेवन नीं सर्वांची इच्छा पुर्ण केली. तर अशी होती मंगळ ग्रहाची उत्तपत्ती.

या कथेवरून तुम्हाला लक्षात आलेच असेल की महादेव आणि मंगळ ग्रहाचे काय नाते आहे. मंगळ ग्रह म्हणजे महादेवाचे अंश आहे. महादेव आणि मंगळ ग्रह यांमध्ये पिता पुत्राचे नाते आहे. 

मंगळ ग्रह हे पृथ्वी मातेचे पुत्र आहे

पृथ्वी मातेने लोहितांग ला आपले पूत्र मानले आणि त्याचे पालन पोषण केले आहे. त्यामुळे मंगळ ग्रहावर जीवन होऊ शकते तसेच तिथे पाणी सुध्दा आहे. आणि मंगळ ग्रहावर लाल माती असते त्याचे कारण म्हणजे तिथे महादेवाच्या तांडव नृत्याने जे प्रलय झाले होते त्याचे हे परिणाम आहे.

महादेवाचे पुत्र आणि अंश 

जालंदर, गणेश, कार्तिक, अन्धक, मनसा देवी, अशोक सुंदरी, भैरव, वीरभद्र हे सर्व महादेवाचे अंश आहे. ज्यांची उत्पत्ती महादेव पार्वती यांच्यापासून झाली होती.

लोहितांगण आणि महादेवाचे प्रचंड युद्ध झाले होते. संगीताचे युद्ध झालं त्यानंतर तांडव नृत्य युद्ध झाले त्यानंतर जेव्हा महादेवाने तांडव नृत्य केलं तेव्हा ते बघून लोहितंग प्रभावित झाला आणि महादेवाला शरण आला. 

आणि तेव्हा महादेवांनी लोहीतंग ला वरदान दिला म्हणून आजपण लोहीतांग म्हणजे मंगळ ग्रह आहे आणि एक ग्रह म्हणून आहे कारण ते पृथ्वी मातेचे पुत्र आहे. तर आता तुम्हाला लक्षात आलेच असेल. की मंगळ ग्रह काय आहे आणि कोण आहे. 

भविष्यामध्ये पृथ्वी प्रमाणे मंगळ ग्रहावर देखील जीवन असेल आणि तिथेही मनुष्य तसेच अन्य प्राणी देखील राहू शकतील. मंगळ ग्रह प्रमाणे चंद्र ग्रह, सुरूर्ग्रह, शनी, शुक्र ग्रह हे सर्व ग्रह आहे परंतु प्रत्येक ग्रहावर मनुष्य राहू शकेल असे नाही.

प्रत्येक ग्रहांवर जीवसृष्टी निर्माण नाही होऊ शकत कारण तिथे प्राणवायू नाही, औक्षिजन नाही, मनुष्याला पाणी आवश्यक असते ते देखील सर्व ग्रह वर नाही. त्यामुळे मंगळ आणि पृथ्वी वर मनुष्य राहू शकतात. 

कुंडली मध्ये असेल मंगळ ग्रह तर हे करा..
 
कुंडलीमध्ये मंगळ ग्रह प्रभावशाली असेल तर महादेवची आराधना करावी. महादेवची पूजा करावी. तसेच सोमवार व्रत करावा. महादेवची आराधना फलदायी ठरेल. मंगळ ग्रह दोष प्रभाव महादेवाच्या अरधनामुळे नक्की कमी होइल.

महादेवाच्या अराधनामुळे अनेक दोष नष्ट होतात संकट दुर होतात तर हे दोष सुध्दा निघून जाईल.महादेवची आराधना ही सर्वात सोपी सुध्दा आहे त्यामुळे सर्वसामान्य माणूस सहज महादेवाचं जप आराधना करू शकतो.

महादेवची आराधना करण्यासाठी भरपूर ज्ञान संपादन करण्याची गरज नाही. किंवा योग करण्याची गरज नाहि महादेव हे एका बेलाच्या पानाने सुध्दा प्रसन्न होऊन जातात. दरोज एक बेलपत्र जरी महदेवला वाहिले तरी पुरेसे आहे. यावर देवांचे देव महादेव प्रसन्न होऊन जातात.
आणि आपल्या भक्तांवर कृपा करतात.

महादेव त्रिकाल दर्शी आहेत. महादेव संसारी असून वैरागी आहेत. जे नाहि ते सुध्दा महादेव आहेत आणि जे नाहि ते सुध्दा महादेव आहेत. महादेवाचे वर्णन करणे हे येवढे सोपे नाहि कारण त्यांची महती कितीही शब्दात सांगणे कठीणच आहे.

महादेवाला भोलेनाथ म्हटले जाते म्हणजेच ते भोळे दैवत आहेत परंतु ते भोळे असून त्यांच्या रागाने संपूर्ण सृष्टी नष्ट होऊ शकते असे त्यांचे तेज आहेत तरी सुध्दा त्यांना भोलेनाथ असे म्हणतात कारण भक्तांसाठी ते अगदी भोळे होऊन जातात प्रेमळ होऊन जातात म्हणून त्यांना भोलेनाथ हे नाव आहे.

आपल्या भक्तांसाठी महादेव हे बारा ज्योतिर्लिंग स्वरूपात जागृत असतात. १२ ज्योतिर्लिंग व्दारे सर्व भक्तांवर कृपादृष्टी महादेवाची असतेच. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण सद्भावनेने महादेवची आराधना भक्ती केली पाहिजे.

ही महिती तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंट मध्ये नक्की कळवा तसेच ही माहित सर्वांपर्यंत नक्की पोहोचवा. आणि तुम्हाला कोणत्या माहितीची अपेक्षा आहे ते सुध्दा कळवा त्याबद्दल आपणास नक्की माहिती इथे मिळेल. यात मात्र शंका नाही. एवढं सर्व वाचण्यासाठी धन्यवाद.

हे पण वाचा:-
FAQ :
१. लोहितांग कोण आहे?
लोहितांग म्हणजेच मंगळ ग्रह आहे त्याची उत्पत्ती ही महादेव पार्वती च्या तांडव नृत्याने झाली.

२. मंगळ ग्रह लाल का दिसते?
लोहितांग म्हणजे लोहित म्हणजे रक्त रक्तासारखा लाल ग्रह म्हणजेच मंगळ ग्रह. 

३. महादेवाचे अंश कोण कोण आहे?
जलंदर, अंधक, लोहीतांग, मनसा देवी, भैरव वीरभद्र, काळभैरव, हनुमान हे महादेवाचे अंश आहेत.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad