Type Here to Get Search Results !

आमलकी एकादशी व्रत कथा मराठी मध्ये | एकादशी महात्म्य | amalaki ekadashi 2023

मार्च मध्ये फाल्गुन महिन्यात शुक्ल पक्षा मध्ये येणारी आमलकी एकादशी ची व्रत कथा व महात्म्य वाचा मराठीतून. एकादशी हा व्रत अजारी व्यक्ती, लहान मुले सर्वांनी च केला पाहिजे. एकादशी 15 दिवसातून येते तर 15 दिवसात एक दिवस पोटाला आराम दिला तर अपल्या शरीरासाठी सुध्दा अत्यंत चांगले होईल. तसेच अध्यात्मिक फायदे तर आहेतच.

आमलकी एकादशी व्रत कथा मराठी मध्ये | एकादशी महात्म्य | amalaki ekadashi 2023
आमलकी एकादशी व्रत कथा मराठी मध्ये | एकादशी महात्म्य | amalaki ekadashi 2023

आमलकी एकादशी व्रत कथा मराठी | महात्म्य २०२३

आमलकी या एकादशीचे माहात्म्य पुराणामध्ये सांगितले आहे. आमलकी एकादशी व्रत कथा amalaki ekadashi 2023 मराठी मध्ये बघुया.. 
युधिष्ठिर महाराजांनी विचारले, "हे श्रीकृष्ण फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये येणाऱ्या एकादशीचे नाव काय ? आणि कोणत्या प्रकारे हे व्रत करतात याविषयी कृपया आपण मला सांगावे."

भगवान श्रीकृष्ण म्हणाले, "हे धर्मवन्दना ऐक एके काळी मान्धाता राजाने याविषयी वसिष्ठ ऋषींना विचारले होते. या एकादशीचे नाव 'आमलकी' आहे आणि जो कोणी या प्रताचे पालन करतो त्यास विष्णुलोकाची म्हणजेय वैकुंठाची प्राप्ती होते. "

राजा मान्धातानी विचारले, "हे ऋषीवर्य ही आमलकी एकादशी या भूतलावर केव्हा निर्माण झाली ? याविषयी आपण मला सांगावे." वसिष्ठ ऋषी म्हणाले, "हे महाभाग ऐक, मी आता पृथ्वी 'आमलकी ची उत्पत्ती कशी झाली याविषयी सांगतो. आमलकी हा पुष्कळ महान वृक्ष आहे. जो सर्व पापांचा नाश करणारा आहे. भगवान श्रीविष्णूंच्या थुंकण्यामुळे एक चंद्राप्रमाणे बिंदू प्रकट झाला. 

तो बिंदू पृथ्वीवर पडला आणि त्यापासून आमलकी (आवळा) वृक्ष उत्पन्न झाला. हा सर्व वृक्षामधील आदी वृक्ष मानला जातो. त्याच वेळी साया सृष्टीचे निर्माते ब्रह्माजीदेखील उत्पन्न झाले. त्याच्यापासूनच सर्व प्रजेची सृष्टी झाली. ब्रह्माजी देवता गंधर्व, यक्ष, रावस, नाग तथा पवित्र आणि शुद्ध हृदय असलेल्या महर्षिना जन्म दिला. त्यातील देवता आणि ऋषीलोक ज्या ठिकाणी विष्णुप्रिया आमलकी वृक्ष होता त्या ठिकाणी आले. 
amalaki ekadashi 2023 आमलकी एकादशी 2023आमलकी एकादशी व्रत कथा मराठी
amalaki ekadashi 2023आमलकी एकादशी 2023


हे महानाग्यवान त्या वृक्षाला पाहून देवतांना पुष्कळच आश्चर्य वाटले आणि ते एकमेकांच्या तोंडाकडे पहात विचार करू लागले की, पळस आधी वृव आम्हाला माहित आहेत, परंतु हा वृक्ष तर आम्ही प्रथमच पाहात आहोत. त्यांना या स्थितीमध्ये पाहून आकाशवाणी झाली, 'हे महर्षी हा 'आमलकी' वृक्ष आहे, जो श्रीविष्णूंना अतिशय प्रिय आहे. याच्या केवळ स्मरणानेच गोदानाचे पुण्य प्राप्त होते. स्पर्श केल्याने दुप्पट तर खाल्ल्याने तिप्पट पुण्य प्राप्त होते. त्यामुळे प्रयत्नपूर्वक नेहमी आवळा खावयास हवा. सर्व पापांचा नाश करणारा हा वैष्णव वृक्ष गानला जातो. " आमलकी एकादशी व्रत कथा मराठी

तस्या मूले स्थितो विष्णुस्तवध्वंच पितामह।
स्कन्धे च भगवान् रुद्रः संस्थितः परमेश्वरः ॥
शाखासु मुनयः सर्वे प्रशाखासुच देवता ।
प्रजानां पतयः सर्वे फलेष्वेव व्यवस्थिता । सर्वदेवमयी होषा धात्री च कथिता गया ।

ऋषी म्हणाले, "हे अव्यक्त महापुरुषा आपण कोण आहात? आम्ही
आपल्याला देवता समजावे की काय ? कृपया आपण आम्हाला सांगावे."


पर्णेषु वसवो देवाः पुष्येषु मरुतस्तथा ॥ "याच्या मुळामध्ये विष्णु मध्ये ब्रह्माजी, वडामध्ये शिवजी, शाखामध्ये मुनी, फांद्यामध्ये देवता, पानांमध्ये वसु फुलामध्ये मतगण तथा फळांमध्ये सर्व प्रजापती यास करतात. त्यामुळे आमलकी वृक्षाला म्हटले जाते. त्यामुळेच तो सर्व विष्णुताना प्रिय आहे." सर्वदेवमय

आमलकी एकादशी व्रत कथा मराठी मध्ये | एकादशी महात्म्य | amalaki ekadashi 2023 pandurang text design
पांडुरंग text 

पुन्हा आकाशवाणी झाली. "जो संपूर्ण जीवांचा कर्ता आणि सर्व भुवनांचा स्रोत आहे आणि विद्वान पुरुषांनादेखील अगम्य असणारा मी विष्णु आहे." देवाधिदेव भगवान श्रीविष्णूंचे कथन ऐकल्यानंतर सर्व ब्रह्मपुत्र आश्चर्यचकित झाले. त्या सर्वांनी मोठ्या क्तिभावाने श्रीविष्णुदी स्तुती करण्यास प्रारंभ केला. ऋषी म्हणाले, "संपूर्ण जीवांचे आत्मभूत आत्मा तथा परमात्मा असणाऱ्या आपल्याला नमस्कार असो, ज्यांचे कधीही पतन होत नाही अशा श्री अच्युतांना आम्ही नमस्कार करतो. 

आमलकी एकादशी व्रत कथा मराठी दामोदर, यजेश्वर आणि परमपरमेश्वर आपल्याला आमचा नमस्कार असो. आपण मायापती आणि संपूर्ण विश्वाचे स्वामी आहात. आपल्याला आमचे सादर वंदन असो. "



अशा प्रकारेनी केलेली स्तुती ऐकून भगवान श्रीविष्णुप्रस झाले आणि म्हणाले, "हे महर्षिनो तुम्हाला मी कोणते अनिष्ट वरदान देऊ." ऋषी म्हणाले, "हे भगवान आपण खरोखरच आमच्यावर प्रसन असाल तर कृपया ज्यामुळे गोव प्राप्ती होईल असे व्रत आम्हाला सांगावे. "

श्री विष्णू म्हणाले, "हे महर्षीनो । फाल्गुन शुक्ल पक्षामध्ये जर पुष्य नक्षत्रयुक्त द्वादशी असेल तर ती सर्व पापांना नष्ट करणारी आहे. 

हे द्विजवर त्या दिवशी विशेष कर्तव्य करावयाचे आहे. त्याविषयी मी सांगतो ते ऐका. आमलकी एकादशी दिवशी आवळ्याच्या वृक्षाजवळ जाऊन तेथे रात्रभर जागरण करावे. त्यामुळे मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होतो आणि त्यास सहस्त्र गाई दान केल्याचे पुण्य प्राप्त होते. हे विप्रगण सर्व व्रतांमध्ये हे उत्तम व्रत आहे.'

ऋषी म्हणाले, "हे भगवान कृपया या व्रताची विधी सांगावी. हे कसे पूर्ण होते ? याचे अधिष्ठाते कोण आहेत ? या दिवशी स्नान, दान आदी विधी कशा प्रकारे करावे ? पूजेचा विधी काय आहे ? त्यासाठी मंत्र काय आहे ? कृपया यथार्थ रूपाने याचे वर्णन करावे. "

भगवान श्रीविष्णू म्हणाले, "हे द्विजवर ऐका एकादशी दिवशी प्रातःकाली लवकर उठावे दन्तधावन केल्यानंतर संकल्प करावा की, हे पुण्डरीकाक्ष हे अच्युत । मी आज निराहार एकादशी करेन आणि उद्या भोजन ग्रहण करेन.. कृपया मला आपल्या चरणांचा आश्रय द्यावा." अशाप्रकारे नियम ग्रहण केल्यानंतर पापी, पतित, चोर, पाखंडी, दुराचारी, मर्यादा भंग करणारे, गुरु पत्नीगामी लोकांशी कोणत्याही प्रकारचा वार्तालाप करू नये. आपल्या मनाला दश करून नदी, सरोवर, विहीर अथवा घरामध्येच स्नान करावे. स्नान करण्यापूर्वी शरीराला माती लावावी. माती लावताना खालील मंत्र म्हणावा- 

अश्वकान्ते रथक्रान्ते विष्णुकान्ते वसुन्धरे ।
मृत्तिके हर मे पाप जन्मकोट्यां समर्जितम् ॥

"हे वसुंधरे तुझ्यावरून घोडे आणि रथ नेहमी चालत असतात तसेच भगवान श्रीवामन देवांनी देखील तुला पादाक्रांत केले आहे. हे मृत्तिके! मी कोट्यवधी जन्मात अनेक पापे केली आहेत. कृपया त्या सर्व पापांचे तू हरण कर." - amalaki ekadashi 2023

आमलकी एकादशी व्रत कथा मराठी मध्ये | एकादशी महात्म्य | amalaki ekadashi 2023 विठ्ठल गंध
विठ्ठलाचा गंध 

स्नान मंत्र त्वं मातः सर्वभूतानां जीवनं तत्तु रक्षकम् । स्वेदजो द्विजातीनां रसनां पतये नमः ॥ स्नातोऽहं सर्वतीर्थेषु हृदयप्रसवणेषु च । नदीषु देवखातेषु इदं स्नानं तु में भवेत् ॥

एकादशी माहात्म्य

"हे जलजधिष्ठात्री देवी हे माते तू सर्व जीवांचे जीवन आहेस, तेच जीवन जे स्वेदज आणि उद्भिज जातीच्या जीवाचे रक्षक आहे. तू रसांची स्वामिनी आहेस. तुला माझे वंदन असो, आज मी सर्व तीर्थ, कुंड, झरे, नद्या देवसंबंधी सरोवरांमध्ये स्नान केले आहे. माझे है स्नान वर सांगितलेल्या सर्व स्थानांचे फळ देणारे असो, "

विद्वान पुरुषांनी परशुरामांची सोन्याची मूर्ती बनवावी प्रतिमा आपल्या कुवतीप्रमाणे एक अथवा अर्ध्या तोळ्याची असावी. स्नान झाल्यानंतर घरी पूजा आणि हवन करावे. त्यानंतर पूजेची सर्व सामग्री घेऊन आवळ्याच्या झाडाजवळ जाये. तिथे गेल्यावर वृक्षाच्या आजूबाजूची जागा झाडून सारवून घ्यावी. अशा प्रकारे शुद्ध झालेल्या भूमीवर मंत्र पठणाद्वारे नवीन कुंभ स्थापन करावा. -
आमलकी एकादशी व्रत कथा मराठी

कुंमामध्ये कलशामध्ये पंचरत्न आणि चंदन सोडावे, श्वेत चंदनाने त्याला सजवावे. कण्ठामध्ये फुलांची माळ घालावी. सुगंधित धूप अर्पण करावा. कांची श्रृंखला तेवत ठेवावी. तात्पर्य एवढेच की सर्व प्रकारे मनोहर, सुशोभित दृश्य निर्माण करावे. पूजेसाठी नवीन छत्री, चप्पल आणि वस्त्र मागवून घ्यावे. कलशावर एक भांडे ठेवून त्यामध्ये दिव्य लाह्या भराव्यात. त्यानंतर त्यावर सुवर्णमय परशुरामांची स्थापना करावी, 'विशोकाय नमः' म्हणून त्यांच्या चरणांची विश्वरूपिणे नमः म्हणून त्यांच्या गुडघ्यांची उग्राय नमः" म्हणून त्यांच्या मांड्यांची 'दामोदराय नमः म्हणून कटिभागाची, पानामाय नमः म्हणून उदराची, श्रीवत्सधारिणे नमः" म्हणून वक्षस्थळाची 'चकिणे नमः' म्हणून डाव्या

एकादशी माहात्म्य

बाहूची, 'गदिने नमः' म्हणून उजव्या बाहूची वैकुण्ठाय नमः" म्हणून कठाय 'यशमुखाय नमः' म्हणून गुखाची 'विशोकनिधये नमः" म्हणून नासिकेची, 'वासुदेवाय नमः' म्हणून डोळ्यांची 'वामनाय नमः' म्हणून लटाची, 'सर्वात्मने नमः म्हणून मस्तकाची तथा सर्व अंगांची पूजा करावी.

नमस्ते देवदेवेश जामदग्न्य नमोऽस्तु ते । ग्रहाणामिमं वत्तामलक्या युतं हरे । - amalaki ekadashi 2023

"हे देवदेवेश्वरा है जमदग्निनंदन! आपल्याला माझे सादर वंदन असो, आवळ्या सोबत दिलेल्या या अर्ध्याचा आपण स्वीकार करावा. "

त्यानंतर भक्तिभावाने जागरण करावे. नृत्य, संगीत, वाद्य, धार्मिक उपाख्यान तथा श्रीविष्णूसंबंधी कथा वार्ता करीत ती रात्र पालवादी भगवान श्रीविष्णूचे नामस्मरण करीत आवळ्याच्या झाडाला १०८ व २८ परिक्रमा कराव्यात. पहाट होताच श्रीहरींची आरती करावी श्री परशुराम स्वरूपातील श्रीविष्णू माझ्यावर प्रसण रहावेत अशी भावना ठेऊन ब्राह्मणांची पूजा करून त्यास तेथील सर्व सामग्री दान करावी.

यानंतर जामलकी वृक्षाला प्रदक्षिणा घालून स्नान करून ब्राह्मणांना भोजन द्यावे. त्यानंतर सहकुटुंब आपण देखील भोजन करावे. असे केल्याने जे पुण्य प्राप्त होते त्याविषयी मी आता सांगतो ऐका. सर्व तीर्थामध्ये स्वान केल्याने सर्व प्रकारचे दान केल्याने जे पुण्य प्राप्त होते ते पुण्य उपर्युक्त विधीचे पालन केल्याने प्राप्त होते. 

सर्व यज्ञ पार केल्याने जे पुण्य मिळते त्याहूनही अधिक पुण्यप्राप्ती या व्रताने होते, यात किंचितही संशय नाही."

वसिष्ठ ऋषी म्हणाले, "हे राजन् असे बोलून भगवान श्रीविष्णू अदृश्य झाले. त्यानंतर सर्व महर्षिनी या व्रताचे पालन केले. त्याप्रमाणे तुम्हाला देखील या व्रताचे अनुष्ठान करावयास हवे. "" भगवान श्रीकृष्ण म्हणाले, "हे राजन् है सर्व पापापासून मनुष्याला मुक्त करते " -amalaki ekadashi 2023

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad