Type Here to Get Search Results !

भागवत एकादशी माहिती मराठी | वाचा विजया एकादशी व्रत कथा व महत्व 2023 | bhagwat ekadashi vrat katha

फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये येणारी विजया भागवत एकादशी ची माहिती मराठी मध्ये तसेच व्रत कथा व महत्म्य, पूजा विधी आणि एकादशी व्रता चे महत्व जाणून घेणार आहोत. वारकरी संप्रदायामध्ये एकादशी चे व्रत अगदी भक्तीभावाने ठेवले जाते. या दिवशी भगवान विष्णू ची पूजा केली जाते.

भागवत एकादशी माहिती मराठी मध्ये
भागवत एकादशी माहिती 

भागवत एकादशी (स्मार्त विजया ) ची संपूर्ण माहिती 

प्रत्येक चांद्रमासातील शुक्ल व कृष्ण पक्षातील 11 वी तिथी ला एकादशी म्हटले जाते. या दिवशी विष्णु भक्त तसेच विठ्ठल भक्त उपवास करतात. एकादशी च्या दुसऱ्या दिवशी उपवास सोडला जातो. भागवत एकादशीला स्मार्त आणि भागवत असे दोन भेद सांगितले आहेत. ज्या पक्षात हे दोन भेदा त्यावेळी पंचांगात पहिल्या दिवशी स्मार्त दिवशी भागवत अशी लिहिलेले असते. अनेकदा एका पक्षात स्मार्त आणि भागवत अशा एका पाठोपाठ दोन एकादशी असतात. यातील पहिल्या येणार्या एकादशी ला स्मार्त एकादशी नाव असते. - भागवत एकादशी माहिती मराठी

परंतु भागवत एकादशी ला नाव नसते. संपूर्ण राज्यात या दिवशी भगवान विष्णू ची पूजा कशा पद्धतीने करावी तसेच एकादशी चे महत्व काय ते जाणून घेऊ या. वारकरी संप्रदाया मध्ये परंपरेने भागवत एकादशी साजरी केली जाते. भागवत एकादशी व्रत हे पूर्ण नियम, श्रद्धा व विश्वासा ने केले जाते. या व्रता च्या प्रभावा मुळे मोक्षप्राप्ती होते. 

या वृत्तामुळे अश्वमेध घोर तपस्या, तीर्थस्नान व दान या सर्वां पासून मिळणारा पुण्यापेक्षाही जास्त पुण्य आपल्याला मिळते. 

भागवत एकादशी चे महत्व काय?

एकादशी चे महत्त्व जाणून घेऊया. वारकरी संप्रदाया मध्ये एकादशीच्या व्रता ला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक महिन्यात दोन याप्रमाणे वर्षा मध्ये 24 एकादशी येतात. यातील चैत्र पासून फाल्गुन मासातील शुक्ल पक्षात कामदा मोहिनी निर्जला  पुत्रदा  यांचा समावेश होतो. 

याशिवाय कृष्णपक्षात पापमोचनी अपरा योगिनी, कामिका, इंदिरा, सफला, षट्तिला, विजया एकादशी चा समावेश होतो. 

bhagwat ekadashi status पांडूरंग विठ्ठल hd 4k
श्री विठ्ठल 

एकादशी उपवास का करतात?

एकादशीच्या दिवशी सर्व पापे अन्नाचा आश्रय करून राहतात म्हणून जो मनुष्य एकादशी च्या दिवशी अन्न भक्षण करतो त्याला ती पापे लागतात असे म्हणतात म्हणून एकादशीला उपवास केला जातो. या दिवशी दान केल्यास भगवान विष्णू प्रसन्न होतात. भगवान विष्णूला पिवळा रंग चे दान केले तर फुले? प्रसाद. अशा प्रकारची कोणतीही पिवळ्या प्रकारचें पिवळ्या रंगाचे दान केले तर श्री भगवान विष्णू ची कृपा आपल्या वर नक्की होईल. - भागवत एकादशी माहिती मराठी

स्मार्त एकादशी आणि भागवत एकादशी मधील फरक 

एकादशी चे व्रत सर्व व्रतांमध्ये सर्वश्रेष्ठ मानलं जातं. एकादशी या व्रताची देवता भगवान श्री हरी श्रीविष्णु आहे. कधी कधी कॅलेंडर मध्ये दोन एकादशी सलग आलेल्या दिसून येतात. पहिलीचं नाव स्मार्त एकादशी असते तर दुसरा एकादशीला भागवत एकादशी असे म्हणतात. अशा वेळी अनेकांच्या मनात प्रश्न पडतो की आपण नक्की स्मार्त एकादशी धरावी की भागवत एकादशी मित्रांनो, यासंबंधी जे काही आपले प्रश्न आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरे या इथे देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. जसं यापूर्वी सांगितलं की एकादशी  हे भगवान श्रीहरी विष्णूना अर्पित आहे. स्मार्त म्हणजे काय? 

तर ज्या लोकांचा प्राचीन वेदांवर विश्वास आहे. पुराणांमध्ये विश्वास ठेवता श्रुति स्मृती यांचे प्रमाण मानता अशी ऋषी मुनी आचार्य हे स्मार्त एकादशी चे व्रत करता. त्यांना वेदिक ज्ञान आहे जे वेदिक धर्मावर विश्वास ठेवतात. त्यांच्या साठी ची एकादशी म्हणजे स्मार्त एकादशी.
 

भागवत एकादशी ही असे लोक पाळतात किंवा धरतात ज्यांचा भगवान श्री हरी श्री विष्णू वरती ज्यांची श्रद्धा आहे जे वैष्णव आहेत जे वारकरी आहेत किंवा जे गृहस्थ जीवनामध्ये कार्यरत आहे. आपण तर गृहस्थाश्रमामध्ये आहात. आपण जर या संसाराचा गाडा हाकत आहात अशा वेळी विशेष करून महाराष्ट्रामध्ये भागवत एकादशी चा उपवास धरण्याची प्रथा आहे. मी तुम्हाला स्मार्त म्हणजे काय सांगितलं ही स्मार्त एकादशी आणि भागवत एकादशी ही नक्की कधी ठरते तर सूर्य उगवण्या पूर्वी 96 मिनिटे आधी जर दशमी तिथी संपली. 

कसा करावा एकादशीचा उपवास 

  • एकादशीचा उपवास हा तीन दिवसांचा असतो. 
  • एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजे दशमी तिथीला केवल एक वेळ जेवण करण्याची प्रथा आहे. 
  • एकादशीला संपूर्ण दिवसभर कडकडीत उपवास धरला जातो.
  • एकादशीच्या दुसर्या दिवशी म्हणजे द्वादशी तिथेला सूर्य उगवल्या नंतर अन्न सेवन केलं जातं. 
  • दशमी तिथी एकादशी आणि द्वादशी यापैकी कोणत्याही तिथीस 1000 लोप झाला किंवा द्वादशी तिथीमध्ये जर वृद्धी झाली तर अशा वेळी दोन एकादशी या येत असतात. या दोन एकादशी आहेत. सूर्योदय होण्यापूर्वी सूर्य उगवण्यापूर्वी ९६ मिनिटे आधी जर दशमी तिथीचा लोप झाला ते जर संपली तर पुढे येणारी तिथी ही एकादशी म्हणून ओळख ली जाते आणि जर दशमी तिथी च्या 96 मिनिटां च्या दरम्यान जर आली. तर मात्र ती तिथी दशमी म्हणून ओळखली जाते. 

vitthal hd wallpapers HD 4k pandurang
श्री विठ्ठल पांडुरंग

कोणासाठी आहे भागवत किंवा सार्थ एकादशी 

मित्रांनो या सर्व भानगडीत न पडता कॅल्क्युलेशन मध्ये न पडता केवळ इतकं लक्षात ठेवा की स्मार्त एकादशी ही ऋषी मुनी साठी वेदिक धर्म आचरण करणार् यांसाठी आहे तर भागवत एकादशी ही सर्वसामान्य जीवन व्यतीत करणारे आणि वारकरी पंथीय भगवान श्री हरी श्री विष्णूची उपासना करणार्या वैष्णवांसाठी आहे. - भागवत एकादशी चे महत्व


शैव व वैष्णव म्हणजे काय ?

ज्यांना वैष्णव म्हणजे काही समजत नाही अशा लोकांना सांगतो वैष्णव. 
  • असे काही लोकं आहेत जे भगवान शिवशंकरांना मानतात त्यांना शैव असं म्हंटलं जातं. 
  • भगवान श्री विष्णूंची उपासना करतात. त्यांना वैष्णव म्हणतात 
  • तर जे आदी शक्ती देवीची म्हणजे माता दुर्गे ची किंवा देवीच्या कोणत्याही रूपाची उपासना करतात त्यांना सप्त असं म्हटलं जातं. आपले अजूनही काही प्रश्न असतील. कॉमेंट मध्ये नक्की विचारा.

bhagwat ekadashi status download
भागवत एकादशी 2023

भागवत एकादशी कधी आहे?

फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये १७ फेब्रुवारी २०२३ ला  विजया भागवत एकादशी आहे.

भागवत एकादशी ( विजया एकादशी ) व्रत कथा | एकादशी महात्म्य मराठी २०२३

स्कंद पुराणामध्ये या एकादशीच्या माहात्म्याचे वर्णन येते. महाराज युधिष्ठिरांनी विचारले, "हे वासुदेव ! फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये कोणती एकादशी येते ? कृपया आपण मला सांगावे.”


भगवान श्रीकृष्ण म्हणाले, "हे युधिष्ठिर एकदा कमलासनावर आरूढ़ झालेल्या ब्रह्मदेवांना नारदांनी विचारले, "हे सुरश्रेष्ठ फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये जी 'विजया' एकादशी येते. कृपया तीचे पालन केल्याने प्राप्त होणाऱ्या पुण्याविषयी आपण मला सांगावे. "

ब्रह्मदेव म्हणाले, " हे नारद! ऐक, मी तुला एक सुंदर कथा सांगतो, जी सर्व पापांचे हरण करणारी आहे. हे व्रत अतिशय प्राचीन आणि पवित्र आहे. ही "विजया एकादशी राजांना विजय प्रदान करणारी आहे. यामध्ये कोणताही संशय नाही. पूर्वी जेव्हा श्रीरामचंद्र १४ वर्षांसाठी वनामध्ये गेले, तेव्हा सीता आणि लक्ष्मणसह ते पंचवटीमध्ये राहात होते. - भागवत एकादशी माहिती मराठी

तेथून रावणाने सीतेचे हरण केले, त्यामुळे श्रीरामचंद्र दुःखाने अतिशय व्याकुळ झाले. त्यावेळी सीतेचा शोध घेत ते वनामध्ये फिरत होते. काही अंतर चालल्यावर त्यांना मरावयास टेकलेला जटायु भेटला. त्यानंतर त्यांनी वनामध्ये कबन्ध नावाच्या राक्षसाचा वध केला. त्यानंतर सुग्रीवाशी मैत्री करून श्रीरामचंद्रांनी वानरांची सेना एकत्र केली. त्यानंतर हनुमान रामनामांकित अंगठी घेऊन लंकेस गेला आणि सीतामातेचा शोध लावला. तेथून परत आल्यावर त्याने लंकेतील सारा वृतांत श्रीरामचंद्राना कथन केला. 

त्यानंतर श्रीरामचंद्रानी सुग्रीवाची अनुमती घेऊन लंकेकडे जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ते समुद्र किनाऱ्यावर आले आणि लक्ष्मणास म्हणाले, "हे सुमित्रानंदना! हा अत्यंत अगाध समुद्र अनेक भयानक जीवजंतूनी भरलेला आहे. त्याला सुगमतेने पार करण्यासाठी मला कोणताही उपाय दिसत नाही."
विठ्ठल फोटो hd 4k wallpaper pandurang photo भागवत एकादशी बॅनर bhagwat ekadashi status downloadbhagwat ekadashi status
पांडुरंग 

लक्ष्मण म्हणाला, “महाराज ! आपणच आदिदेव आणि पुराण पुरुष पुरुषोत्तम आहात. आपल्यापासून काही लपविणे शक्य आहे का ? या द्विपामध्ये बकदाल्भ्य नावाचे मुनी राहतात. इथे जवळच त्यांचा आश्रम आहे. हे रघुनंदना ! प्राचीन काळापासून ते इथे राहात आहेत. आपण त्यांनाच विचारू."
लक्ष्मणाचे हे कथन ऐकल्यानंतर प्रभू श्रीरामचंद्र मुनीवर्य बकदाल्भ्यांना भेटण्यासाठी त्यांच्या आश्रमात गेले आणि मुनींना सादर प्रणाम केला. तेव्हा मुनिवर्यांनी ओळखले की हेच परमपुरुषोत्तम श्रीराम आहेत, हे पाहून मुनिवर्यांना अतिशय आनंद झाला. त्यानी विचारले, “श्रीराम, आपल्या आगमनाचे कारण काय आहे ?"


श्रीरामचंद्रांनी सांगितले, “हे मुनिवर्य ! रावणाचा संहार करण्यासाठी मी इथे आलो आहे. कृपया हा समुद्र पार करण्यासाठी आपण उपाय सांगावा." बकदाल्भ्यांनी सांगितले, "हे श्रीराम फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये जी 'विजया एकादशी येते. तिच्या पालनाने विजय प्राप्त होतो. हे राजन् ! आता या व्रताचा विधी मी तुम्हाला सांगतो. - भागवत एकादशी व्रत कथा

दशमीदिवशी एक कलश स्थापन करावा. तो सोन्याचा, चांदीचा, तांब्याचा अथवा मातीचा असावा. त्यामध्ये पाणी भरावे आणि पाने घालावीत, नंतर त्यावर भगवान श्रीनारायणाच्या सुवर्णमय विग्रहाची स्थापना करावी. एकादशीदिवशी प्रातःकाली लवकर उठून स्नान करावे. त्यानंतर पुष्पमाला, चंदन, सुपारी तथा नारळ अर्पण करून त्या कलशाची पूजा करावी. गंध, धूप, दीप, नैवेद्य आदि अर्पण करून त्या कलशाची पूजा करावी. - भागवत एकादशी माहिती मराठी

दिवसभर कलशासमोर बसून कथा करावी, त्याचबरोबर जागरणदेखील करावे. व्रताची अखंड सिद्धी प्राप्त होण्यासाठी तुपाचा दीपक लावावा. त्यानंतर द्वादशी दिवशी नदी, झरा अथवा सरोवराकाठी जाऊन त्या कलशाची विधीवत पूजा करून तो वेदवेत्ता ब्राह्मणाला दान करावा. महाराज ! कलशासमवेत इतरही मोठमोठे दान द्यावयास हवे. हे श्रीराम ! आपण आपल्या यूथपतिबरोबर या व्रताचे पालन करावे. त्यामुळे तुम्हाला विजय प्राप्त होईल."

ब्रह्माजी म्हणाले, "हे जारदा मुनिवर्याच्या कथनानुसार प्रभू श्रीरामचंद्रांनी 'विजया एकादशीचे व्रत केले. या व्रताच्या प्रभावाने श्रीरामचंद्र विजयी झाले. हे पुत्रा ! या व्रताच्या प्रभावाने मनुष्याला या जीवनामध्ये विजय प्राप्त होतो आणि अक्षय परलोक प्राप्त होतो.

भगवान श्रीकृष्ण म्हणाले, “यास्तव एकादशीचे व्रत करावयास हवे. याचे माहात्म्य ऐकल्याने वाजपेय यज्ञ केल्याचे फळ मिळते." - भागवत एकादशी व्रत कथा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad