Type Here to Get Search Results !

संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ हरिपाठ | अभंग १९ ते २७ | माऊलींचा हरिपाठ अर्थासहीत |

वाचा संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ हरिपाठ अभंग १९ ते २७. संपूर्ण हरिपाठ अर्थासहीत संपूर्ण विस्तारपूर्वक अर्थ विवरण वाचा. माऊलींची सार्थ हरिपाठ क्रमांकानुसार वाचा अर्थासहीत...

संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ हरिपाठ | अभंग १९ ते २७ | माऊलींचा हरिपाठ अर्थासहीत |
माऊलींचा हरिपाठ अर्थासहीत


संपूर्ण सार्थ हरिपाठ


संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ हरिपाठ | अभंग १९ ते २७


🚩 अभंग १९ | नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी


नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी । पापें अनंत कोडी गेलीं त्यांची ॥१॥ 
अनंत जन्मांचे तप एक नाम। सर्व मार्ग सुगम हरिपाठ ॥ २॥ 
योगयाग क्रिया धर्माधर्म माया । गेले ते विलया हरिपाठीं ॥३॥ 
ज्ञानदेवी यज्ञ योग क्रिया धर्म । हरिविणें नेम नाहीं दुजा ॥४॥
- संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ हरिपाठ 

भावार्थ : नामस्मरण आणि संकीर्तन ही वैष्णवांची जोडी होय. यामुळे त्यांची अनंत कोटी पापे लयाला जातात. अनंत जन्मांचे तप एका हरिनामाच्या बरोबरीचे आहे. ईश्वरप्राप्तीच्या सर्व साधनमार्गांत हरिपाठ सवांत सोपा मार्ग आहे. योग, यज्ञ, क्रिया, धर्म, अधर्म ही सर्व माणसाला प्रपंचात गुंतवणारी माया आहे. हरिपाठाने तिचा नाश होतो. श्री ज्ञानदेवमहाराज म्हणतात, माझे यज्ञ, योग, क्रिया, धर्म, सर्व काही हरीच आहे. हरिनामावाचून मला दुसरा नेम नाही.


विवरण : भागवत धर्माचे निष्काम बुद्धीने आचरण करून विष्णूची नि:सीम उपासना करणाऱ्यास वैष्णव म्हणतात. वैष्णवांच्या दृष्टीने नाम- संकीर्तन जोडी महत्त्वाची आहे. हरि नामस्मरण व संकीर्तन. संकीर्तन म्हणजे भगवंतांच्या लीलांचे श्रवण करणे व त्यांचे स्वतः वर्णन करणे. याखेरीज सर्व प्रकारची कायिक, वाचिक व मानसिक कर्मे भगवत्प्राप्तीसाठी करून ती भगवंतांनाच अर्पण करणे हाही भागवत धर्मच होय. भागवत धर्माचे | आजन्म अनुष्ठान करणारा वैष्णव म्हटला जातो. श्री गुलाबराव महाराजांनी "वैष्णव बोलिले नामस्मरणीं । रामकृष्णीं उच्चारु ॥ ६११॥ (संप्रदाय सुरतरु अ. २) असे वैष्णवांचे लक्षण सांगितले आहे; तर श्री तुकाराममहाराज म्हणतात,

"वैष्णव म्हणों जया । अवघी देवावरी माया ॥ १ ॥ नाहीं आणिक प्रमाण । तन धन तृण जन ॥२॥”


🚩 अभंग २० | वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन 


वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन । एक नारायण सार जप ॥१॥ जप तप कर्म क्रिया नेम धर्म । वाउगाचि श्रम व्यर्थ जाय ॥२॥ हरिपाठी गेले ते निवांतचि ठेले । भ्रमर गुंतले सुमनकळिके ||३|| ज्ञानदेवा मंत्र हरिनामाचें शास्त्र । यमें कुळ गोत्र वर्जियेलें ॥४॥

भावार्थ : नारायणनामाचा जप हेच सर्व साधनांचे सार आहे, याला वेद, शास्त्र, उपनिषदे प्रमाण आहेत. भगवत्प्रेमाशिवाय केलेले जप, तप, कर्म, नेम, धर्म इत्यादी सर्व हे व्यर्थ श्रम आहेत. मधाच्या लोभाने व कळीत अडकलेला भुंगा तेथून बाहेर येत नाही, तसा हरिपाठात रंगलेला नामधारक तेथेच गुंतून स्थिर राहातो. श्री ज्ञानदेवमहाराज म्हणतात की हरिनामरूप मंत्रशास्त्राला यमसुद्धा भितो. तो नामधारकालाच नव्हे, तर त्याच्या कुळगोत्रालाही स्पर्श करीत नाही. कमळाच्या

विवरण: आपल्याला अखंड सुख असावे, दु:ख कधीही नसावे, असेच प्रत्येक माणसाला वाटत असते. परंतु या जगाचा धर्मच असा की, कोणतीही गोष्ट येथे कायमची नसते. त्यामुळे माणसाने कितीही इच्छा केली, तरी या जगात असणाऱ्या कोणत्याही वस्तूमुळे त्याला कायमच सुख मिळत नाही. या जगात एकच गोष्ट कायम टिकणारी व कायम आनंद देणारी आहे, ती म्हणजे भगवान. म्हणून भगवंतांना 'सत्-चित्-आनंद' म्हणतात. जर माणूस जगातील नाशिवंत सुखे मिळविण्यासाठी करीत असलेल्या प्रयत्नांच्या ऐवजी तसेच प्रयत्न भगवत्प्राप्तीसाठी करीत राहील तर त्याला अखंड सुख, अखंड आनंद मिळवता येईल.
भगवत्प्राप्तीचा मार्ग म्हणजे धर्माचरण होय. माउली सांगतात, 
अगा जया जे विहित ते ईश्वराचे मनोगत । म्हणोनि केलिया निभ्रांत सांपडेच तो ॥

विहित कर्म आणि हेचि पांडवा । आपुला अनन्य ओलावा । परमसेवा । मज सर्वात्मकाची ॥
(ज्ञाने. १८.९०६) 

या जगात आपल्या वाट्याला जे काम आले असेल (मग ते नियतीमुळे असो की आपल्या इच्छेने असो, ते प्रामाणिकपणे भगवंतांची इच्छा समजून, त्यांच्याच साठी केल्यास भगवंतांची प्राप्ती नक्कीच होते.

( माऊलींचा हरिपाठ अर्थासहीत)

एखादी गोष्ट आपल्या कल्पनेने सांगण्यापेक्षा त्याला पूर्वशास्त्रांचे प्रमाण दिल्यास ती अधिक विश्वासार्ह ठरते. - संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ हरिपाठ 

🚩 अभंग २१ | काळ वेळ नाम उच्चारितांनाहीं


काळ वेळ नाम उच्चारितांनाहीं । दोन्ही पक्ष पाहीं उद्धरती ||१|| रामकृष्ण नाम सर्व दोषा हरण । जडजीवा तारण हरि एक ||२|| हरिनाम सार जिव्हा या नामाची। उपमा त्या देवाची कोण वाणी ॥३॥ ज्ञानदेवीं सांग झाला हरिपाठ । पूर्वजां वैकुंठ मार्ग सोपा ||४||


भावार्थ : हरिनामाच्या उच्चाराला काळ -वेळ लागत नाही. शिवाय

ते उच्चारणारे व ऐकणारे दोघेही तरून जातात. राम-कृष्ण हे नाम सर्व

दोष नाहीसे करणारे आहे. अज्ञानी जीवांना तरून जायला हरिनाम हाच

एक उपाय आहे. हरिनाम हेच जिभेचे सार्थक आहे. ज्याच्या जिभेला
( माऊलींचा हरिपाठ अर्थासहीत)
हरिनामाची गोडी लागली, त्याच्या भाग्याला कोणाची उपमा देणार ?

श्रीज्ञानदेवमहाराज म्हणतात, ज्या हरिनामस्मरणाने पूर्वजांना वैकुंठ मार्ग

सोपा झाला, त्याचेच आम्ही यथासांग आचरण केले.

विवरण : इतर धर्मकर्मे कोणत्या ठिकाणी, कोणत्या वेळी करावीत आणि कशी करावीत, याविषयी शास्त्रांत नियम सांगितले आहेत; पण नामस्मरणाला स्थळकाळाचे कोणतेही बंधन नाही. याउलट असेही सांगितले आहे की, अहो येता जाता उठतबसता काम करिता सदा देता घेता वदनि वदता ग्रास गिळिता । घरी दारी शय्येवरि रतिसुखाचे अवसरी समस्तांची लज्जा त्यजुनि भगवच्चिंतन करी ॥

नामानेच अपवित्र देशकाल पवित्र होतात व अधर्मही धर्मरूप होतो. अशौच ते बाधी आणिकां अक्षरां । नाम निदसुरा घेतां तरे ॥

हरिनामावाचून अन्य मंत्रांचा जप करावयाचा असल्यास स्नानादिकांनी शुद्ध होणे आवश्यक आहे. नाहीतर त्या मंत्रजपाचे परिणाम उलट होतात. उदा. गायत्रीमंत्र अशुद्ध, अयोग्य वेळी व अयोग्य ठिकाणी जपल्यास | उरणाऱ्याला वेड लागते. हरिनामाचे तसे नाही. ते कोठेही केव्हाही घेतले स चालते. ( माऊलींचा हरिपाठ अर्थासहीत )

धर्मकर्मे, ज्ञान, योग ही ईश्वरप्राप्तीची साधने कर्त्यालाच ततात; हरिनामाचा मोठ्याने उच्चार केल्यास ते ऐकणाराही तरून जातो. पशुपक्षी किंवा वृक्षपाषाणांना नामाचा उच्चार करता येत नाही. पण त्यांना ऐकता येते. नामश्रवणाने त्यांच्या तमोगुणाचा नाश होऊन त्यांच्यांत सत्त्वगुणाचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे त्यांना परमार्थमार्गाकडे जाणे शक्य होते.

एका पोपटाला हरिनाम शिकवता शिकवता गणिका आणि पोपट दोघेही उद्धरून गेले. श्रीसंत बहिणाबाईंच्या संगतीतील एक वासरू कीर्तन व रामश्रवण ऐकून तरून गेले. अशी पुराणात उदाहरणे आहेत. म्हणून - जपतो आत्मानं च पुनात्युच्चैर्जपन् श्रोतॄन् पुनाति च ॥
हरिनामानि स्थाने शतगुणाधिकः ।

“एका जागी बसून हळू नामजप करणाऱ्यापेक्षा मोठ्याने नामजप करणारा शतपट चांगला. कारण तो स्वतःबरोबरच ऐकणाऱ्यालाही पवित्र छतो. " - संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ हरिपाठ 

🚩 अभंग २२ | नित्य नेम नामीं ते प्राणीदुर्लभ 


नित्य नेम नामीं ते प्राणीदुर्लभ लक्ष्मीवल्लभ तयां जवळी ॥१॥ नारायण हरि नारायण हरि भुक्तिमुक्ति चारी घरीं त्यांच्या ॥ २॥ हरिविणें जन्म नर्कचि पैं जाणा । यमाचा पाहुणा प्राणी होय ॥ ३॥ ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड । गगनाहूनि वाड नाम आहे॥४॥

भावार्थ : भगवन्नामाच्या नित्यस्मरणाचा नेम करणारा मनुष्य दुर्मिळ आहे. भगवंत नित्य नाम घेणाऱ्याजवळ नेहमी असतात. ज्याच्या मुखात ‘नारायण हरी' असा नामजप असतो, त्याला इहलोकीचे भोग व चारही मुक्ती प्राप्त होतात. नामस्मरणाविना जीवन हा साक्षात् नरकच होय.  ( sant dnyaneshwar maharaj sarth haripath ) मरणानंतरही त्याला यमलोकीच जावे लागते. श्री ज्ञानदेवांनी श्री निवृत्तिनाथांना नाममाहात्म्याविषयी विचारले, तेव्हा ते म्हणाले, नामाचा महिमा आकाशाहून धोर आहे. ( माऊलींचा हरिपाठ अर्थासहीत)

विवरण : भगवंतांना नामाची अतिशय आवड आहे. म्हणूनच भगवंत नारदांना सांगतात,

वसामि वैकुंठे योगिनां हृदये रवौ ।
मद्भक्ता
यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद ॥

"हे नारदा, मी वैकुंठात राहात नाही. योग्यांच्या हृदयांत राहात नाही. - संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ हरिपाठ 

🚩 अभंग २३ | सात पांच तीन दशकांचा मेळा


सात पांच तीन दशकांचा मेळा । एकतत्त्वीं कळा दावी हरि ॥१॥ तैसें नव्हे नाम सर्व मार्गां वरिष्ठ । येथें कांहीं कष्ट न लगती ||२|| अजपा जपणे उलट प्राणाचा । येथेंहि नामाचा निर्धार असे ||३|| ज्ञानदेवा जिणें नामेंविण व्यर्थ । रामकृष्णीं पंथ क्रमियेला ॥४॥

भावार्थ : श्रीहरी स्वस्वरूप एकाच तत्त्वात सृष्टीतील पंचवीस तत्त्वांची कला दाखवितो. निरनिराळ्या शास्त्रांनी सांगितलेल्या एक ते पंचवीस तत्त्वांपैकी खरी किती आहेत, हे ठरविणे कठीण आहे.  ( sant dnyaneshwar maharaj sarth haripath ) नामाचे तसे नाही. सर्व साधनमार्गांत तेच श्रेष्ठ आहे, असा दृढनिश्चय असणाऱ्याला खात्रीने ईश्वरप्राप्ती होते. शिवाय यात कष्टही नाहीत. अजपाजप करणे किंवासुषुम्नामार्गाने पूरणतात, प्राण वर चढविणे यातही नामजपच आहे. श्री ज्ञानदेवमहाराज नामावाचून मार्ग अनुसरला आहे. जगणे व्यर्थ आहे. म्हणून मी हा रामकृष्णजपाचाच

विवरण: छान्दोग्य उपनिषदात (६.२) सृष्टीच्या उत्पत्तीसंबंधी श्वेतकेतूला त्याचे वडील आरुणी सांगतात- " सदेव सोम्येदमग्र आसीत् एकमेवाद्वितीयम् । तदैक्षत बहु स्यां प्रजायेयेति।” (विश्वाच्या उत्पत्तीपूर्वी एकमेव 'सत्' नावाचे तत्त्व होते. त्याने विचार केला की, आपण अनेक रूपांनी नटावे.) या सत् तत्त्वालाच निर्गुण, निराकार परब्रह्म म्हटले आहे. हे परब्रह्मच विविधरूपी विश्व झाले आहे. दूधच दही व्हावे तसे. ( sant dnyaneshwar maharaj sarth haripath ) पण यात एक फरक आहे. दुधाचे दही होते, तेव्हा दूध मूळ रूपात राहू शकत नाही. याठिकाणी मात्र परब्रह्म आहे तसे राहूनही विश्वरूप होते. म्हणून येथे स्वप्नाचा दृष्टान्त योग्य ठरेल. स्वप्न पाहणारा मनुष्य बिछान्यावर अविचल राहूनही स्वप्नसृष्टीच्या रूपाने नटलेला असतो. तसेच एकच ब्रह्म त्रिगुणात्मक प्रकृतीपासून ते स्थावर-जंगमात्मक विश्वापर्यंत विविध रूपांनी नटलेले आहे. ( माऊलींचा हरिपाठ अर्थासहीत)

🚩 अभंग २४ | जप तप कर्म क्रिया नेम धर्म 


जप तप कर्म क्रिया नेम धर्म । सर्वांघटीं राम भाव शुद्ध ॥१॥ न सोडीं रे भावो टाकीं र संदेहो रामकृष्णीं टाहो नित्य फोडीं ॥२॥ जाति वित्त गोत कुळशीळ मात । भज कां त्वरित भावयुक्त ||३|| ज्ञानदेवा ध्यानीं रामकृष्ण मनीं । वैकुंठभुवनीं घर केलें ॥४॥

भावार्थ : सर्व वस्तुमात्रांत राम भरून राहिला आहे, हा शुद्ध भाव उत्पन्न होण्यासाठी जप, तप, कर्मे, क्रिया, उपवासादी नियम इत्यादी साधने शास्त्राने सांगितली आहेत. म्हणून संशय सोडून सर्वकाही श्रीहरी आहे, हा भाव दृढ धर आणि रामकृष्णनामाचा अखंड उद्घोष कर. भगवत्प्राप्तीसाठी जात, द्रव्य, गोत्र, कुळ, शील या गोष्टींना काडीचीही किंमत नाही. आवश्यकता आहे ती भावयुक्त भजनाची. म्हणून ते करण्यास तत्काळ सुरुवात कर.  ( sant dnyaneshwar maharaj sarth haripath ) श्रीज्ञानदेवमहाराज म्हणतात, माझ्या ध्यानी-मनी रामकृष्णच आहे. त्यामुळे माझे नित्य वास्तव्य वैकुंठभुवनातच आहे.

विवरण : गुरूंनी दिलेल्या मंत्रांचा जप करणे, देह कष्टवून, शीतोष्णादी सहन करून तप करणे, नित्य नैमित्तिक पूजा इत्यादी करणे, व्रतवैकल्ये करणे, उपवासादी नेम करणे ही सर्व साधने चित्तातील वासना नाहीशा होऊन चित्त शुद्ध होण्यासाठी आहेत. - संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ हरिपाठ  

🚩 अभंग २५ | जाणीव नेणीव भगवंतीं नाहीं 


जाणीव नेणीव भगवंतीं नाहीं । हरिउच्चारणीं पाहीं मोक्ष सदा ॥ १ ॥ नारायण हरि उच्चार नामाचा । तेथें कळिकाळाचा रीघ नाहीं ॥२॥ तेथील प्रमाण नेणवे वेदांसी। तें जीवजंतूंसी केवीं कळे ॥३॥ ज्ञानदेवा फळ नारायण पाठ । सर्वत्र वैकुंठ केलें असे ॥४॥

भावार्थ : भगवंताच्या ठिकाणी ज्ञानही नाही आणि अज्ञानही नाही. म्हणून हरिनामाच्या उच्चारणात नेहमी मोक्ष आहे. जेथे भगवन्नामाचा उच्चार असतो, तेथे कळिकाळाचे दोष शिरत नाहीत. नामाचा महिमा वेदांनाही कळत नाही, तर तो सामान्य माणसांना काय कळणार ? श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, नारायणनामाच्या पाठाचे फळ अखंड नामस्मरण हेच आहे. या अखंड स्मरणाने सर्व ठिकाणे वैकुंठ होऊन राहातात.

विवरण: पाण्याचे मूळ स्वरूप शुद्ध आहे. पण त्याला येणारा वास किंवा त्याचा गढूळपणा किंवा त्याचा रंग हे पृथ्वीचे गुणधर्म तिच्या संपर्काने पाण्यात येतात. अशा पाण्याला जर वाटू लागले की, आपण दुर्गंधी आहोत, आपण गढूळ आहोत, आपण लाल आहोत, तर हे त्याचे अज्ञान आहे, ही नेणीव आहे. त्याचप्रमाणे माणसाचे मूळ रूप शुद्ध, सच्चिदानन्द, शाश्वत आत्मा असे आहे.  ( माऊलींचा हरिपाठ अर्थासहीत)

पण अविद्येमुळे त्याला आपण पापी, सुखी, दुःखी, अनित्य, अनेक कामे करून त्यांचे परिणाम भोगणारा इत्यादी वाटत असते. आणि असे त्याला अनेक जन्मात वाटतच आलेले आहे. या वाटण्यालाच वासना किंवा संस्कार म्हणतात.  ( sant dnyaneshwar maharaj sarth haripath ) हे संस्कार दिसणाऱ्या (स्थूल) देहात राहात नसून 'कारण देहात' राहतात. याला संचित कर्म असेही म्हणतात. त्यामुळे त्या आत्म्याला अनेक देह धारण करून त्या कर्माची बरी-वाईट फळे भोगावी लागतात. हे त्या जीवाचे अज्ञान आहे, नेणीव आहे. या नेणिवेमुळे ‘मी कर्मे करणारा असून त्याची फळे भोगणारा आहे', असे जीवाला सतत वाटत असते.

🚩 अभंग २६ | एक तत्त्व नाम दृढ धरीं मना


एक तत्त्व नाम दृढ धरीं मना । हरिसी करुणा येइल तुझी ॥१॥ तें नाम सोपें रे राम कृष्ण गोविंद । वाचेसी सद्गद जपा आधीं ॥२॥ नामापरतें तत्त्व नाहीं रे अन्यथा । वायां आणिका पंथा जासी झणीं ॥ ३ ॥ ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी । धरूनि श्रीहरी जपे सदा ॥४॥

भावार्थ : हे मना, नाम हेच एक भगवत्प्राप्तीचे तत्त्व आहे, हे पक्के ध्यानात ठेव. म्हणून त्याचा जप केल्याने श्रीहरीला तुझी करुणा येईल. अरे ! शिवाय राम कृष्ण-गोविंद हे नाव घ्यायलाही सोपे आहे. म्हणून सद्गदित होऊन आधी वाणीने तेच जपत जा. नामाशिवाय दुसरे निराळे तत्त्व नाही. म्हणून या मार्गाशिवाय दुसऱ्या मार्गाने जाशील, तर ते व्यर्थ होईल. श्रीज्ञानदेव महाराज म्हणतात, मी मौन धरून, अंतरंगात मनाची जपमाळ करून श्रीहरीचा सदैव जप करीत असतो.  ( sant dnyaneshwar maharaj sarth haripath )

विवरण: नाम आणि नामी यांच्यात भेद नसतो. म्हणून वस्तू किंवा वस्तू व्यक्ती समोर नसली, तरी नाव उच्चारताच त्या व्यक्तीचे किंवा वस्तूचे गुण, आकार इत्यादी डोळ्यांसमोर येतात. किंबहुना व्यवहारात ती किंवा व्यक्ती नाहीशी झाली, तरी ते नाव मात्र शिल्लक राहाते आणि त्या गेलेल्या, नष्ट झालेल्या वस्तु-व्यक्तीचा बोध करून देते. परंतु भगवंत तर अविनाशी आहेत, तसेच त्यांचे नावही अविनाशी आहे. आपण भगवंतांना पाहिले नसले, तरी त्यांचे नाव आपल्याला त्यांच्याकडे नेणारे एकमेव तत्त्व आहे, ही मनाशी पक्की खूणगाठ बांधावी. किंवा नाम हेच श्रेष्ठ तत्त्व समजून ते मनात दृढ धरून ठेवावे.

🚩 अभंग २७ | सर्व सुख गोडी साही शास्त्रे निवडी


सर्व सुख गोडी साही शास्त्रे निवडी । रिकामा अर्धघडी राहू नको ||१|| टिका व्यवहार सर्व हा संसार । वायां येरझार हरिविण ||२|| नाममंत्र जप कोटी जाईल पाप । रामकृष्णी संकल्प धरूनि राहे ||३|| विजवृत्ति काढी सर्व माया तोडी । इंद्रियां सवडी लं नको ||४|| तीथी व्रती भाव धरी रे करुणा । शांति दया पाहुणा हरि करी ||५|| ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तिदेवीं ज्ञान । समाधि संजीवन हरिपाठ ||६|| 

 ( sant dnyaneshwar maharaj sarth haripath )

भावार्थ : साही शास्त्रांनी निवड करून निर्णय केला की, सर्वसुखाची गोडी हरिनामातच आहे. म्हणून त्या नामाशिवाय अर्धी घटकाही राहू नकोस. हा सर्व संसार खोटा आहे. या संसारातील व्यर्थ ये-जा हरीवाचून चुकणार नाही. नाममंत्राच्या जपाने अगणित पाप जाईल. म्हणून रामकृष्णनामाचा दृढनिश्चय धरून राहा. संसारातून मनोवृत्ती काढून टाक. सर्व मायाममता तोडून टाक. इंद्रियांच्या अधीन होऊन आत्मस्वरूपाला विसरू नकोस. करुणा, शांती, दया, यांचा आश्रय करून श्रीहरीला आपला पाहुणा कर. श्री ज्ञानदेव म्हणतात, श्रीनिवृत्तिदेवांनी मला दिलेले नामस्मरणाचे ज्ञानच मला प्रमाण आहे. त्यायोगेच मला संजीवन समाधी प्राप्त झाली. - संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ हरिपाठ  

विवरण : मनुष्याचे मन नेहमी सुखाची इच्छा करीत असते. आणि ते सुख मिळवण्यासाठी ते नेहमी बाहेरील विषयांकडे इंद्रियांच्याद्वारा असते. पण जगात असा कोणताही विषय नाही की, जो कायम व पूर्ण सुख देऊ शकेल. डोळ्यांना आता सुंदर दिसणारी वस्तू काही काळाने तशीच सुंदर दिसेल, याची खात्री नसते. शिवाय सुंदर वस्तू शोधणाऱ्या डोळ्यांना कुरूप वस्तूही पाहाव्या लागतात. काही वेळा बाहेरील वस्तूंचा बरेवाईटपणा मनाच्या स्थितीवर अवलंबून असतो. एक सुभाषितकार म्हणतो, ( माऊलींचा हरिपाठ अर्थासहीत ) ( sant dnyaneshwar maharaj sarth haripath )

चित्ते प्रसन्ने भुवनं प्रसन्नं चित्ते विषण्णे भुवनं विषण्णम् ।

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad