Type Here to Get Search Results !

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी काय खावे | हे १२ उपाय करा | immunity power increase marathi

वातावरणात उपस्थित रोगाणू नेहमी शरीरावर आक्रमण करीत राहतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी काय खावे तसेच काय उपाय करायचे ते आपण पाहणार अहोत. जेव्हा शरीराची रोगप्रतिकारक क्षमता कमी होते तेव्हा रोग, आजार येऊन घेरतात. जर तुम्ही पुढील सशक्त रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपाय केले तर तुमचे शरीर, मन व प्राण बलवान होतील आणि तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहील.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी काय खावे | हे १२ उपाय करा | immunity power increase marathi
रोगप्रतिकारक शक्ती 

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपाय

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पुढे काही महत्वाचे उपाय सांगितले आहे ते नक्की करून पहा. 

(१) शुद्ध हवा आणि प्राणायाम

जे लोक सकाळच्या शुद्ध हवेत प्राणायाम करतात, त्यांच्यात प्राणबळ वाढल्याने त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि यामुळे कित्येक रोगकारी जीवाणू नष्ट होतात. जे प्राणायामाच्या वेळी आणि इतर वेळीसुद्धा खोल (दीर्घ) श्वास घेतात, त्यांच्या फुप्फुस्सांच्या निष्क्रिय पडलेल्या वायुकोशांना प्राणवायू मिळू लागतो आणि ते सक्रिय होतात. परिणामी शरीराची कार्य करण्याची क्षमता वाढते आणि रक्त शुद्ध होते. नाड्यासुद्धा शुद्ध राहतात, ज्यामुळे मन प्रसन्न राहते. प्राणायाम हे एक महत्वाचे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपाय आहे.

जर गायीच्या शेणाच्या गोवरीवर किंवा निखाऱ्यांवर एक चमचा अर्थात् ८-१० मि.ली. तुपाचे थेंब टाकून धूप केला तर एक टन शक्तिशाली वायू बनतो. अशा वातावरणात प्राणायाम केले तर वर्णनातीत लाभ होऊ शकतो. वायू जितका बलवान असेल; बुद्धी, मन, आरोग्य तितकेच बलवान होईल.

(२) सूर्यकिरण - रोगप्रतिकारक शक्ती 

सूर्यकिरणांमध्ये अद्भुत रोगप्रतिकारक शक्ती (Immunity power) आहे. जगाचा कोणताही वैद्य अथवा कोणताही मानवी उपचार तितके दिव्य आरोग्य आणि बुद्धीची दृढता नाही देऊ शकत, जितके सकाळच्या कोवळ्या सूर्यकिरणांमध्ये दडलेल्या ओज-तेजाने मिळते. त्यामूळे सूर्यकिरण हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी महत्वाचे उपाय आहे. 
प्रातःकाळी सूर्याला अर्घ्य- दान, सूर्यस्नान (कपड्याने डोके झाकून ८ मिनिटेसूर्याकडे तोंड करून आणि १० मिनिटे पाठ करून बसणे) आणि सूर्यनमस्कार केल्याने शरीर धष्टपुष्ट व बलवान बनते.

डॉ. सोले म्हणतात : “सूर्यात जितकी रोगनाशक शक्ती आहे तितकी जगाच्या अन्य कोणत्याही वस्तूत नाही."

(३) तुळशी 

( immunity power increase  food in marathi )
तुळशीची १-२ रोपे घरात अवश्य असली पाहिजेत. इतर औषधे कीटाणू नष्ट करतात परंतु तुळशीची हवा तर कीटाणूंची उत्पत्तीच होऊ देत नाही. तुळशीच्या रोपाचा त्याच्या चोहीकडे २०० मीटर पर्यंत प्रभाव राहतो.

जो सकाळी तुळशीची ५-७ पाने चावून पाणी पितो त्याची स्मरणशक्ती वाढते, ब्रह्मचर्य मजबूत होते. शेकडो रोगांना दूर करण्याची शक्ती तुळशीच्या पानांमध्ये आहे.

चिमूटभर तुळशीबीज रात्री पाण्यात भिजत टाकून सकाळी प्यायल्याने तुम्ही दीर्घजीवी रहाल आणि बऱ्याचशा रोगांना पळवून लावण्यात तुमची जीवनशक्ती सक्षम व सबळ राहील.

(४) श्वासोच्छ्वासाची भगवन्नाम-जपासह मानसिक गणती

श्वासोच्छ्वासाची भगवन्नाम-जपासह मानसिक गणती करावी (मध्येच न चुकता ५४ किंवा १०८ पर्यंत) किंवा 'अजपाजप' करावा.

(५) ॐकारच्या उच्चारणाने 

खुशी जैसी खुराक नहीं, चिंता जैसा मर्ज नहीं । सर्व रोगांवर हास्याचा औषधासारखा उत्तम प्रभाव पडतो. हास्यासोबत भगवन्नामाचे उच्चारण आणि भगवद्भाव झाल्याने विकार क्षीण होतात, चित्ताचा प्रसाद वाढतो आणि आवश्यक योग्यतांचा विकास होतो. हरिनाम, रामनाम व ॐकारच्या उच्चारणाने बऱ्याचशा व्याधी मिटतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

दिवसाच्या सुरुवातीला भगवन्नाम-उच्चारणकरून सात्त्विक हास्याने (देव-मानव हास्य प्रयोग केल्याने) तुम्ही दिवसभर ताजेतवाणे आणि ऊर्जेने भरपूर राहता, प्रसन्नचित्त राहता. हास्य तुमचा आत्मविश्वासही वाढविते.



(रोगप्रतिकारक प्रणालीवर प्रसन्न व खिन्न चित्तवृत्तीचा प्रभाव पाहण्यासाठी 'स्टेट यूनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क ॲट स्टोनी ब्रूक' मध्ये प्रतिष्ठित प्रोफेसर राहिलेले ए. ए. स्टोन यांनी परीक्षण केले. त्यांना आढळले की प्रसन्न चित्तवृत्तीच्या वेळी मनुष्याची प्रतिपिंड प्रतिसाद (antibody response) क्षमता अधिक असते. मनोवृत्ती खिन्न झाल्यावर ही क्षमता कमी आढळून आली.)

() immunity power increase food in marathi

 कडुलिंबाची पाने, फळे (निंबोण्या), फुले, फांद्या/डहाळ्या, मूळ वगैरे देशी तुपासोबत मिश्रित करून घरात धूप केला तर रुग्णाला तत्काळ आराम मिळतो, रोगप्रतिकारक शक्तीवाढविणारे वातावरण सर्जित होते.
 

(७) कडुलिंब आणि कोरफडीचा कडुपणा

बऱ्याचशा रोगांना पळवून लावतो. कोरफड जीवाणुरोधी (antibiotic) व विषनाशक सुद्धा आहे. ही रोगप्रतिकारक प्रणालीला मजबूत करण्यात अति उपयोगी आहे. [नीम (कडुलिंब) अर्क व घृतकुमारी रस (Aloe vera Juice) * चा उपयोगही करू शकता. ]

(८) शुद्ध च्यवनप्राश

 शुद्ध च्यवनप्राश मिळाल्यास त्याचा एक चमचा (१० ग्रॅम) अथवा आवळा पावडर* एक चमचा सेवन केल्याने पचनशक्ती सुरळीत होईल आणि वाढेल. रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढेल. (मधुमेहाच्या रुग्णांनी 'शुगर फ्री' च्यवनप्राशचे सेवन करावे.)

रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्याची कारणे

१) आहार विहार योग्य प्रमाणात नसेल तर हे रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्याची कारण असू शकते.
२) व्यायामाचा अभाव असणे हे देखिल रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्याची कारण आहे. कारण शरीराला व्यायामाची गरज असते ते नाही केले तर मग रोगप्रतिकारक शक्ती कमी होते.
३) fast food जास्तीत जास्त खाणे ज्यात काहीही जीवनसत्वे नसतात, पालेभाज्या, फळे हे कमी प्रमाणात खाणे रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्याची कारणे आहे.



रोग प्रतिकार शक्ती म्हणजे काय

कोणत्याही रोगाला प्रतिकार करण्याचा शरिराची क्षमता म्हणजेच रोगप्रतिकार शक्ती किंवा immunity power होय. प्रत्येकाची immunity power ही सारखी नसते भिन्न असते. रोगप्रिकारशक्ती मजबुत असल्यावर आजारी पडण्याचे प्रमाण कमी असते.

रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्याचे काही अन्य उपाय

हे काहीं अध्यात्मिक उपाय करा रोग प्रतिकार शक्ती कशी वाढवावी हा तुमचा प्रश्न नक्की सुटेल.

(१) ध्यान व जप अनेक रोगांमध्ये लाभदायी आहे. यामुळे औषधीय उपचारांची आवश्यकता कमी पडते. ध्यानाच्या वेळी अनेक प्रकारची सुखानुभूतिकारक मस्तिष्क-रसायने आपल्या मज्जातंतूंना (neurons) परितृप्त करतात. सेरोटोनिन, गाबा, मेलाटोनिन इ. महत्त्वपूर्ण रसायनांची वृद्धी होते. यामुळे ताण-तणाव, विषाद, अनिद्रा दूर होते आणि मनात आल्हाद, प्रसन्नता वगैरे सहजच येऊ लागते. न्यूजर्सीच्या 'रटगर्स' विश्वविद्यालयाच्या संशोधकांना आढळून आले की ध्यानाच्या अभ्यासकांमध्ये मेलाटोनिनची पातळी | सरासरी ९८ टक्क्यांनी वाढते. कोणाकोणात तर याची ३०० टक्क्यांहूनही अधिक वृद्धी झालेली आढळून आली. मेलाटोनिनचे कार्य आहे - तणाव कमी करणे, स्वस्थ निद्रा, रोगप्रतिकारक प्रणालीला सक्रिय करणे, कॅन्सर तसेच अन्य शारीरिक- मानसिक रोगांपासून रक्षण करणे.

(२) टमाटे, फूलकोबी, ओवा व संत्री रोगप्रतिकारक शक्ती वाढवितात. म्हणून आहारात यांचा समावेश करावा. हळद, जिरे, दालचीनी व धण्याचा उपयोग करावा. परिस्थिती लक्षात घेता अल्प प्रमाणात लसणाचा समावेशही करू शकता.

(३) १५० मि.ली. दुधात छोटा अर्धा चमचा हळद टाकून उकळून दिवसातून १-२ वेळा घ्यावे. 
(४) रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी प्राणदा टॅबलेट*, ब्राह्म रसायन*, होमिओ तुळशी गोळ्या*, तुळशी अर्क* (१०० मि.ली. पाण्यात १ ते ५ थेंब वय व प्रकृती अनुसार), होमिओ पॉवर केअर* इ.चे सेवन लाभदायी आहे. (संकलक : श्री धर्मेंद्र गुप्ता)

निस्कर्ष:-
या लेखामध्ये आपण रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी काय खावे | हे १२ उपाय करा | immunity power increase marathi. ही सर्व माहिती अनेक स्त्रोत वरून उपलब्ध केली आहे तर आपल्याला माहीत कशी वाटली ते कॉमेंट मध्ये नक्की कळवा आणि ही माहिती सर्वांना शेअर करायला मात्र विसरू नका. खाली व्हॉट्सॲप, फेसबुक चे बटण आहेत त्यावर क्लिक करून ही पोस्ट सर्वांना शेअर करा. धन्यवाद 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad