Type Here to Get Search Results !

कोरोना सारख्या महामारी कसे पसरतात? महामारी मध्ये कशी घ्यायची काळजी

आयुर्वेदाचा ग्रंथ 'चरक संहिता' (विमान स्थान : ३.६) च्या अनुसार एकाच काळात, एकसारख्या लक्षणांच्या तसेच अनेक लोकांचा विनाश करणाऱ्या रोगांचा उदय वायू, जल, देश (स्थान) आणि काळ विकृत झाल्याने होतो.

कोरोना सारख्या महामारी कसे पसरतात? 


(१) विकृत वायू

ऋतूच्या विपरीत वाहणाऱ्या, अति निश्चल किंवा वेगवान, अति थंड किंवा उष्ण, अत्यंत रुक्ष व मलिन गंध, वाफ, वाळू, धूळ आणि धुराने दूषित झालेल्या वायूला रोगकारी मानावे. सद्यस्थितीत वाढती वायुविकृती अनेक प्रकारच्या आजारांना जन्म देत आहे. मार्च २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय जर्नल ‘कार्डिओव्हॅस्क्युलर रिसर्च' मध्ये प्रकाशित झालेल् अहवालानुसार दरवर्षी ८८ लाख लोक वायुप्रदूषणाने मृत्युमुखी पडत आहेत. 'डॉक्टर्स फॉर क्लीन एअर' समुहाने म्हटले आहे की 'दीर्घ काळापासून प्रदूषित असलेल्या वातावरणात राहिल्याने शरीराच्या अवयवांची पूर्णरूपेन कार्य करण्याची क्षमता घटते आणि संक्रमित होण्याची व रोगांना बळी पडण्याची शक्यता वाढते. महामारी, साथीचे रोग पसरले असता अशा लोकांना गंभीर अडचणींचा सामना करावा लागू शकतो.'

(२) विकृत जल : 

जे अत्यंत विकृत गंधाचे आणि विकृत वर्णाचे असेल, चवीला चांगले नसेल - अप्रिय असेल, त्याला दूषित जल समजावे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अनुसार दूषित पाण्याने अतिसार, पटकी (कॉलरा), पेचिश (आव पडणे/पोटात मुरडा येणे), टायफॉईड,पोलियो यांसारखे आजार पसरू शकतात.

(३) विकृत देश : 

ज्या देशाचे (स्थान, क्षेत्र किंवा राष्ट्राचे) स्वाभाविक वर्ण, गंध, रस, स्पर्श विकृत झाले असतील; जेथे लोकांनी धर्म, सत्य, लज्जा, सदाचार, सुस्वभाव व सद्गुण सोडून दिले असतील आणि ते नष्ट झाले असतील, तो देश दूषित आहे असे समजावे.

भारत देश 'कृषि-देश' आहे आणि 'ऋषि- देश' सुद्धा आहे. 'भा... रत' अर्थात् तो देश, ज्याच्या रहिवाशांचा मूळ स्वभाव आहे 'भा' अर्थात् ज्ञानात 'रत' राहणे. ब्रह्मतत्त्वाच्या अनुभवी संत-महापुरुषांचा आदर- सन्मान करून त्यांच्याकडून ब्रह्मविद्या प्राप्त करणे, आचार- विचाराची योग्य पद्धत जाणून त्यानुसार जगून जीवन दिव्य बनविणे येथील लोकांचा स्वाभाविक धर्म आहे, सद्गुण आहे, येथील संस्कृती आहे. परंतु हे पुण्यात्मा आपला हा महान स्वभाव विसरत चालले होते, ज्यामुळे आपल्या संस्कृतीपासून विन्मुख होऊन विदेशी 'कल्चर'चे अनुकरण करीत विकृतींना बळी पडू लागले होते. त्यांची कशा प्रकारे जागृती होत होती हे सांगताना माजी पंतप्रधान भारतरत्न श्री अटल बिहारी - वाजपेयी यांनी म्हटले होते :

(४) विकृत काळ : 

ऋतूच्या स्वाभाविक लक्षणांहून विपरीत किंवा कमी-अधिक लक्षणांचा काळ अस्वास्थ्यकर (अहितकर) जाणावा.

ऋतूच्या विपरीत होणारा पाऊस, थंडी आणि गरमीमुळे आजार विशेष होतात. ऋतूंचा कालखंड आपल्या सामान्य काळाहून कमी- अधिक झाल्यानेही रोग व्यापक होतात. अत्यधिक वृक्षतोडीमुळे पाऊस कमी होणे किंवा अवेळी (अकाली/ऋतू नसताना) पाऊस पडणे, काही देशांद्वारे केमिकल्सच्या मदतीने पाऊस पाडला जाणे वगैरेंमुळे प्राकृतिक असंतुलन झाले आहे.

महामारीच्या बिकट काळात जेव्हा विविध चिकित्सा-पद्धतीसुद्धा स्थिती नियंत्रित करण्यात अक्षमतेचा अनुभव करू लागतात, तेव्हा मोठमोठे शक्तिशाली राष्ट्रसुद्धा दिशाहीन अवस्थेत येतात आणि आपल्या जनतेला पीडेपासून वाचविण्यात स्वतःला असमर्थ व विवश अनुभवू लागतात. अशा स्थितीत जेव्हा वर्तमान स्थूल, भौतिक औषधेसुद्धा कोणता विशेष आराम (गुण) देऊ शकत नाहीत, तेव्हा त्या सर्वच राष्ट्रांच्या कल्याणाच्या भावनेने भरून आयुर्वेदाचे विश्वहितैषी महर्षी चरक असा उपाय सांगतात जो भारताचे. 
एक समाधिनिष्ठ महर्षीच सांगू शकतात. त्यांनी चरक संहितेत (विमान स्थान :३. १५-१८) महामारीचे सर्वसुलभ व प्राणरक्षक औषध सांगितले आहे : 'सत्य बोलणे, प्राणिमात्रावर दया, दान, सद्वृत्ताचे (शास्त्रोक्त व शास्त्रांचे रहस्य जाणणाऱ्या अनुभवी संतांच्या मार्गदर्शनानुरूप सदाचाराचे) पालन, . शांती ठेवणे आणि आपल्या शरीराचे रक्षण, कल्याणकारी गाव व नगरांचे सेवन (निवास / आश्रय), ब्रह्मचर्याचे पालन, ब्रह्मचारी व जितात्मा महर्षीची (आत्मवेत्ता महापुरुषांची) सेवा करणे, धर्मशास्त्राची सत्कथा व सत्संग ऐकणे, सात्त्विक, धार्मिक व ज्ञानवृद्धांद्वारे प्रशंसित महापुरुषांचा सदा सान्निध्य-लाभ घेणे - अशा प्रकारे ही सर्व महामारीच्या भयंकर काळात, ज्या मनुष्यांचा मृत्युकाळ अनिश्चित आहे त्यांच्या आयुष्याचे रक्षण करणारी औषधे सांगितली गेली आहेत.'

मरणाऱ्यांना मृत्यूच्या मुखातून वाचवून आयुष्य प्रदान करणारा वेद आहे 'आयुर्वेद' ! हा वेद आपल्याला मार्गदर्शन देत आहे की ब्रह्मनिष्ठ महापुरुषांचा सत्संग, सान्निध्य लाभ व त्यांची सेवाच परम हितकारी उपाय आहे, ज्यामुळे सत्य, जीवदया, परोपकार, सदाचार, आंतरिक शांती, शरीर-रक्षणाची कला, कल्याणकारी स्थळाचे सेवन, ब्रह्मचर्य - या सर्व सद्गुणांची प्राप्ती सहजच होते, जी महामारीच्या भयंकर काळात जीवरक्षा करणारी औषधे सांगण्यात आली आहेत.

आणि असे महापुरुष आपल्याकडून सेवेच्या रूपात अपेक्षा तरी कोणती करतात ? त्यांची हीच इच्छा असते की जो दिव्य आत्मसुखाचा, आत्मशांतीचा, अमिट व अखूट आत्मानंदाचा लाभ त्यांना झाला आहे, तो आपण स्वतःही मिळवावा आणि इतरांपर्यंत पोहोचवावा. अशा सत्प्रवृत्तींचा लाभ आपण स्वतःही घ्यावा आणि इतरांनाही मिळवून द्यावा.
महामुनी वशिष्ठजी महाराज श्री योगवाशिष्ठ महारामायणात (निर्वाण प्रकरण उत्तरार्ध :९८.९,१४) तत्त्वज्ञानी पुरुषांचा आश्रय घेण्याचा उपदेश देताना प्रभू श्रीरामांना म्हणतात: "भद्र ! राजांच्या नाशक, देशाला छिन्नभिन्न करणाऱ्या तसेच दुर्भिक्ष (दुष्काळ) वगैरेंनी उत्पन्न झालेल्या जनतेच्या क्षोभाला तत्त्वज्ञानी पुरुष तपश्चर्येचा प्रताप, सत्कर्मांचे अनुष्ठान, साम (मैत्रीभावाची नीती) वगैरे उपायांनी असे पकडून रोखून ठेवतात, जसे भूकंपाला पर्वत !...

आपदांमध्ये, बुद्धिनाशात, तहान-भूक, शोक-मोह, जरा-मरणादी क्लेशांमध्ये, व्याकुळ देशांमध्ये तसेच खूप मोठ्या संकटांमध्ये सज्जनांची गती संतच आहेत. ' "

सृष्टीचे संचालन करणारी तसेच सु-संतुलन करणारी जी सर्वोच्च सत्ता आहे, तिच्या नियम- कायद्याला भगवंताचे 'मंगलमय विधान' म्हटले जाते आणि तिचे सूक्ष्म रहस्य ब्रह्मवेत्ता महापुरुषच जाणतात. यामुळे अशा महापुरुषांच्या सत्संग- सान्निध्यापासून वंचित समाजात संयम- सदाचाराचा -हास होऊन अधर्म वाढतो. जसे की मांसाहार व विकृत आहार-विहार, भोग-विलासाची प्रवृत्ती, नैसर्गिक नियमांची अवहेलना, भेसळ, यांत्रिक कत्तलखान्यांद्वारे खूप मोठ्या संख्येत गाय व अन्य पशूंची हत्या वगैरे-वगैरे... यामुळे मग अनेक प्रकारचे दोष व रोग उत्पन्न होतात.

महामारी मध्ये कशी घ्यायची काळजी  

संक्रामक रोगांपासून कसे वाचावे?

आयुर्वेदात संक्रामक (संसर्गजन्य आजारांचे वर्णन आगंतुक ज्वर (अर्थात् शरीरबाह्य कारणांनी उत्पन्न ताप किंवा रोग) च्या अंतर्गत आले आहे. हा कोणाला होतो आणि कोणाला नाही, असे का? :

चरक संहितेत आचार्य पुनर्वसू म्हणतात "एकाच ज्वररूपी अर्थाला ज्वर, विकार, रोग, व्याधी आणि दहशत (भय) - या नामबोधक पर्यायी शब्दांनी ओळखले जाते. शारीरिक व मानसिक दोषांच्या प्रकोपाविना शरीरधाऱ्यांना ज्वर (रोग) होत नाही. म्हणून शारीरिक वात, पित्त, कफ तसेच मानसिक रजो-तमोगुणरूप दोष ज्वराची मूळ कारणे सांगितली गेली आहेत. ' (चरक संहिता, चिकित्सा स्थान : ३.११-१२)

तात्पर्य, जर शारीरिक व मानसिक दोष विकृत झाले नसतील तर कोणताही रोगाणू शरीरात प्रवेश केल्यावर रोग उत्पन्न करू शकणार नाही; काही क्षुल्लक लक्षणे जरूर दाखवू शकतो.

याचा अर्थ हा नाही की सावधगिरी बाळगू नये. रोगाणूने शरीरात प्रवेशच करू नये याची सावधगिरी व नियम पालन तर परम आवश्यक आहे, परंतु नकळत जर एखाद्या रोगाणूने शरीरात प्रवेश केला तर त्याला आपला प्रभाव पाडण्याची संधी मिळू नये अशी संरक्षणात्मक सावधगिरी ठेवण्याप्रती सतर्क करण्याचा येथे उद्देश आहे.

दोष - विकृतीची कारणे

(१) जठराग्नीची विकृती
 : चरक संहिता (चि. स्था. : १५.४२-४४) च्या अनुसार 'भूक  लागल्यावर भोजन न केल्याने, अगोदर खाल्लेल्या अन्नाचे पचन झालेले नसताना आणि भूकेविनाच भोजन केल्याने, कधी जास्त - कधी कमी, कधी वेळेवर तर कधी अवेळी भोजन केल्याने, पचायला जड, थंड, अति रुक्ष, दूषित व प्रकृतीच्या विपरीत पदार्थांच्या सेवनाने, मल-मूत्रादीच्या आवेगांना रोखल्याने; देश (स्थान), काळ व ऋतूच्या विपरीत आहार घेतल्याने दूषित झालेला जठराग्नी पचायला हलक्या (सुपाच्च) अन्नालाही योग्यरित्या पचवू शकत नाही. असे न पचलेले (अपक्व) अन्न विषासमान हानिकारक होते.'

चरक संहितेत (विमान स्थान : २.९) येते की 'चिंता, शोक, भय, क्रोध, दुःख, शय्या (दिवसा झोपणे) व रात्री उशिरापर्यंत (११-१२ वाजेनंतरही) जागरण - यांच्यामुळे प्रमाणात खाल्लेल्या पथ्य अन्नाचेही योग्यरित्या पचन होत नाही.'

म्हणून स्वस्थ राहण्याच्या इच्छुकांनी वरील प्रकारची बेसावधगिरी टाळली पाहिजे.

(२) योग्य आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्याचा

अभाव : उचित आहार, उचित निद्रा व ब्रह्मचर्य- पालन हे वात, पित्त आणि कफ यांना संतुलित करून शरीराला स्वस्थ व निरोग बनवून ठेवतात. म्हणून या तिन्हींना आयुर्वेदाने शरीराचे 'उपस्तंभ' मानले आहे. म्हणून उत्तम आरोग्यासाठी या तिन्हींची काळजी घेणे अनिवार्य आहे.

(३) हितकारक सेवन, आचार व कर्मांचा अभाव:-
मनुस्मृतीत (१.१०८) येते की 'सर्व धर्मांमध्ये (कर्तव्य-कर्मामध्ये) 'सदाचार' सर्वोत्तम आहे.' याचे आचरण केल्याने जीवन सफल होते आणि न केल्याने मनुष्याचा विनाश होतो.

चरक संहितेत (सूत्र स्थान : ७.६०) म्हटले गेले आहे : 'इहलोकी व मृत्यूनंतर सुखाच्या इच्छुक बुद्धिमान पुरुषाने आहार, आचार व सर्व प्रकारच्या क्रिया-कलापांमध्ये हितकारक वस्तूच्या सेवनाचा परम प्रयत्न करावा.'

येथे आहाराचे तात्पर्य केवळ 'स्थूल भोजन' असे घेऊ नये. पाच इंद्रियांद्वारे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध वगैरे जे काही सेवन केले जाते त्याला महापुरुष व शास्त्रांद्वारे 'आहार'च म्हटले गेले आहे. या सर्वांच्या सेवनात बेसावधगिरी रोग व आजारांना जन्म देते. रोगाणुजन्य आगंतुक रोगांपासून रक्षण तसेच उत्तम आरोग्यासाठी दोष-विकृती करणाऱ्या कारणांपासून वाचणे अत्यंत आवश्यक आहे.

आगंतुक रोगांची उत्पत्ती रोखण्याचा उपाय

रोगांच्या उत्पत्तीनंतर त्यांचा उपचार करणे - याहूनही उत्तम हे मानले गेले आहे की रोग उत्पन्नच होऊ नये याची पूर्वीपासूनच दक्षता घेतली जावी, स्वस्थ व्यक्तीच्या आरोग्याचे रक्षण केले जावे स्वास्थ्यरक्षणं.... स्वस्थस्य
(च.सं., सू.स्था. : ३०.२६)

चरक संहितेत (सू.स्था. : ७.५३-५४) येते : 'प्रज्ञापराधांचा (बुद्धीच्या मूर्खपणामुळे उत्पन्न अपराध) त्याग करणे, इंद्रियांचे उपशम अर्थात् इंद्रियांना आपल्या वश ठेवणे, स्मरणशक्ती उत्तम ठेवणे, देशज्ञान, काळज्ञान (देश व काळाच्या अनुरूप आहार-विहाराचे ज्ञान) आणि आत्मज्ञानाचे चिंतन करून ते स्वभावात आत्मसात् करणे तसेचसद्वृत्त (शास्त्र व संत संगत सदाचार) चे पालन करणे - हा आगंतुक रोगांना उत्पन्न होऊ न देण्याचा मार्ग आहे. बुद्धिमान मनुष्याने रोगोत्पत्ती होण्यापूर्वीच अशी कार्ये केली पाहिजेत की ज्यांच्यामुळे आपले हित होऊ शकेल.'

आप्तोपदेश-पालनाने लाभ 

'आप्तपुरुषांचे (ब्रह्मवेत्ता महापुरुष) उपदेश
विशेषरूपाने प्राप्त करणे आणि योग्यप्रकारे त्यांचे पालन करणे या दोन बाबी मनुष्यांचे रोगांच्या उत्पत्तीपासून रक्षण करतात आणि उत्पन्न रोगांना शीघ्रच शांत करतात.' (च.सं., सू. स्था. ७.५५) आपल्या शास्त्र व महापुरुषांनी सांगितलेल्या अशा निर्देशांची ज्या व्यक्ती, समाज व देशाद्वारे जितकी उपेक्षा केली जाते, त्याला तितकाच अधिक दुष्परिणाम भोगावा लागतो आणि या निर्देशांचे जितके आदराने पालन केले जाते, त्याला तितकाच श्रेष्ठ लाभ होतो..

रोगप्रतिकारक क्षमता वाढवा 

चिकित्सा विज्ञान सांगते की जीवाणू किंवा विषाणू (bacteria or virus) रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यावर संक्रमित करतात. देशवासींनी सजग व विशेष तत्पर होऊन ब्रह्मनिष्ठ संत व सत्शास्त्रांनी सांगितलेल्या जीवन निरोगी, स्वस्थ व रोगप्रतिकारक शक्तीने संपन्न बनविणाऱ्या निर्देशांचे पालन केले तर रोग व महामाऱ्यांपासून वाचण्यात मदत मिळेल. (रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी पूज्य बापूजींनी सांगितलेले सशक्त उपाय वाचा पृष्ठ ३० वर)

कसा असावा आहार-विहार?

महामाऱ्या (साथीचे रोग) मानव-समाजाला खूपकाही शिकवत आहेत, जसे की (१) व्यक्तिगत व सामाजिक स्वच्छता (२) कार्य करताना आपसात अंतर ठेवून आपल्या आरोग्याचे व आभेचे रक्षण करणे.

(३) हस्तांदोलन न करणे आणि प्राण्यांचा स्पर्श व त्यांच्या श्वासोच्छ्वासापासून वाचणे. (४) अंडी, मांसाहार व व्यसनांपासून दूर राहून शुद्ध, सात्त्विक, शाकाहारी आहार घेणे.

(५) बिघडलेली दिनचर्या सुधारणे. आरोग्यरक्षणासाठी या बाबींचीही काळजी घ्याः

(१) पिण्यासाठी उकळून थंड केलेल्या पाण्याचा उपयोग करावा.

(२) उपलब्ध व अनुकूल झाल्यास तुलसी सकाळी तुळशी व कडुलिंबाच्या पानांचे * सेवन करावे. (अथवा तुळशी अर्क* किंवा नीम अर्क* पाण्यात मिसळून घेऊ शकता.)

(३) फ्रिजमध्ये ठेवलेल्या पदार्थांच्या सेवनाने

जठराग्नी मंद होतो आणि इतर हानीसुद्धा होतात. (४) बाजारू खाद्यपदार्थांचे सेवन टाळावे. (५) प्राणायाम, योगासने, सूर्यनमस्कार वगैरे

आपल्या शक्तीनुसार करावे.

(६) कोमट पाण्यात थोडीशी हळद व सैंधव मीठ मिसळून रोज १-२ वेळा गुळण्या (गार्गल्स्) करू शकता.

करा रोगाणुरहित वातावरणाची निर्मिती

 घरात नियमितपणे कापूर जाळल्याने वातावरणातील रोगाणू नष्ट होतात आणि शरीरावर रोगांचे आक्रमण सहजतेने होत नाही.

अथर्ववेदात (कांड १९, सूक्त ३८, मंत्र १) येते की 'ज्या मनुष्याच्या आसपास औषधिरूप गुग्गुळाचा श्रेष्ठ सुगंध व्याप्त राहतो, त्याला कोणताही रोग पीडित करीत नाही.'

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad