खरोखर जगात माझे हित अगर अनहित करणारा जर कोणी असेल तर तो माझा मीच. माणसाने प्रपंचात कसे वागावे हे गोंदवलेकर महाराज प्रवचनातून समजावून सांगतात. 'मी कर्ता' ही भावना ठेवली की फळ भोगण्याची इच्छा राहते. मनुष्याला वाटत असते की, आपल्याला दुःख होऊ नये, आजारपण येऊ नये. पण तरीसुद्धा आजारपण आणि दुःख तो टाळू शकत नाही. म्हणजे मी कर्ता ही जी आपली भावना असते ती निखालस खोटी ठरते.
गोंदवलेकर महाराज प्रवचन |
मनुष्याने प्रपंचात कसे वागावे - गोंदवलेकर महाराज प्रवचन
मालकी नसताना घराची मालकी गाजविण्याचा आपण प्रयत्न करतो याला काय करावे तेव्हा प्रापंचिकांत आणि संतांत फरक हाच की, ते कर्तेपण रामाकडे देतात, आणि प्रापंचिक ते आपल्याकडे घेतात. 'राम कर्ता' म्हणावे की सुख, कल्याण, सर्व काही आलेच. त्याच्याकडे सर्व सोपवा आणि आनंदात राहा. - गोंदवलेकर महाराज प्रवचने - मनुष्याने प्रपंचात कसे वागावे
त्यातच खरे हित आहे. गोड खायला देऊ नका असे डॉक्टरने बजावून सांगितले असताही रोग्याच्या इच्छेप्रमाणे गोड पदार्थ त्याला खायला घातला तर आपण त्याचे अनहितच करतो; तसे विषयाच्या लालचीने विषयाला बळी पडून आपले अनहित आपणच करून घेत असतो. आजारी माणसाला तीन मोष्टी कराव्या लागतात; एक, कुपथ्य टाळणे; दुसरी, पथ्य सांभाळणे आणि तिसरी, औषध घेणे.
तसेच भवरोग्यालाही तीन गोष्टी कराव्या लागतात. एक, दुःसंगती, अनाचार, मिथ्याभाषण, द्वेष, मत्सर, वगैरे अवगुणांचा त्याग करणे; दुसरी, सत्संगती, सद्ग्रंथसेवन, सद्विचार आणि सदाचार असणे; आणि तिसरी आणि सर्वांत महत्त्वाची गोष्ट, म्हणजे नामस्मरण करणे; हेच औषधसेवन होय.
हे पण वाचा - श्री ब्रह्मैतन्य गोंदवलेकर महाराज जीवन परिचय | चरित्र | संपूर्ण माहिती | Gondavlekar Maharaj
साधन हे वयावर अवलंबून नाही. मी केव्हा जाणार हे माहीत नाही, तेव्हा वयाने मी मला मोठाच म्हटले पाहिजे, आपण आपल्या जिभेला नामाचा चाळाच लावून घ्यावा. पहिल्यापहिल्याने विसरेल, पण चुकवता सवयीने आपोआप आठवेल, आणि मग भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव होईल. साधनात थोडी बळजबरी पाहिजेच. नियम थोडा असावा, पण तो प्राणापलीकडे सांभाळावा. नियम जास्त केला तर तो कसा येईल याचा मार्ग मन शोधायला लागते. - गोंदवलेकर महाराज प्रवचन मराठी
नाम घेणे हेच भगवंताकडे चालणे होय. साधनेत पुढे आलेले आपण मागे जात नाही ना, याकडे लक्ष पाहिजे. नामाबद्दलची तळमळ कमी व्हायला बाहेरच्या कितीतरी गोष्टी कारण आहेत; रोजचा प्रपंच आहे, व्यवहार आहे, मागच्या आठवणी आहेत, पुढची काळजी आहे.
अशात आपले नामस्मरण हट्टाने चालू ठेवले पाहिजे. नामात गोडी उत्पन्न व्हायला नामच घेतले पाहिजे. देवाला अत्यंत प्रिय जर काही असेल तर ते म्हणजे त्याचे नाम. ते घेतल्याने तो आपलासा होईल देव तुम्हाला खात्रीने भेटेल. जसे पाणी गोठल्यावर बर्फ होते, तसे नाम घेतल्याने श्रद्धा घट्ट होते. श्रद्धेमुळे देवाला तुम्हाला भेटावेच लागेल, त्रिवेणीचा संगम जर कोणता असेल तर तो म्हणजे देव, भक्त, आणि नाम. जिथे देव असेल तिथे भक्त आणि नाम असते, आणि जिथे भक्त असतो तिथे नाम आणि देव असतो. (gondavalekar maharaj daily pravachan marathi)
प्रपंच जरूरीपुरताच करावा - Gondavlekar maharaj pravachan
पुष्कळ लोक जोडधंदा करतात; म्हणजे, त्यांचा एक मुख्य धंदा असतो, आणि त्याला मदत म्हणून दुसरा धंदा करतात. त्यांचे सर्व लक्ष मुख्य धंद्याकडे केंद्रित झालेले असते. म्हणजे, जोडधंद्यामुळे जर मुख्य धंद्यात व्यत्यय येऊ लागला तर तो जोडधंदा जरूरीप्रमाणे बंदही करतात, किंवा नफा-नुकसानीचा प्रसंग आला, तर जोडधंद्यातल्या नफा-नुकसानीकडे विशेष आस्थेने पाहात नाहीत.
प्रत्येक माणसाने परमार्थ हा मुख्य धंदा ठेवून, प्रपंच हा जोडधंदा म्हणून करावा; म्हणजेच प्रपंचात होणाऱ्या लाभहानीचा परिणाम भगवंताच्या अनुसंधानावर होऊ देऊ नये. परमार्थाच्या आड प्रपंच न येईल अशा युक्तीने वागावे. भाजीला जसे मीठ लागते तसा परमार्थाला प्रपंच लागतो. मीठ नसेल तर भाजी आळणी लागते, पण मीठ जास्त झाले तर भाजी खाववत नाही. त्याचप्रमाणे प्रपंच आणि परमार्थ यांचा संबंध आहे.
काही लोकांना सवयीने मीठ जास्त लागते, तसे ज्यांना प्रपंचाची सवय झाली आहे, त्यांना तो जास्त लागतो. त्यांची गोष्ट निराळी, पण ज्यांना प्रपंच नवीन सुरू करायचा आहे, त्यांनी तरी तो बेतानेच करावा. भगवंत डोळ्यांपुढे ठेवून वागावे. प्रपंचात व्यवहार जतन करावा खरा, पण प्रपंच हाच काही सर्वस्व नव्हे. - (गोंदवलेकर महाराज प्रवचन टुडे)
भगवंताचा विसर हा कोणत्याही कारणाने झाला तरी तो बरा नाही; मग प्रपंचात मुखसोबी असल्यामुळे तो होवो किंवा प्रपंचात दुःख झाल्यामुळे होवो. प्रत्येकाला प्रपंचाची अत्यंत जरूरी आहे; पण आपण त्याला वाजवीपेक्षा जास्त महत्त्व देतो, आणि त्यामुळे सर्व विघडते. प्रपंच पाहिजे आणि दुःख नको असे म्हणणे वेडेपणाचे आहे. मूल असेल तर ते कधी तरी आजारी पडायचेच. प्रपंच हा कुणाला सुटता आहे? हा प्रपंच, हा संसार, भगवंतानेच उत्पन्न केला आहे तर तो कुणाला तरी सुटेल का ? तसा नुसता प्रपंच तापदायक नाही, तर आकुंचित प्रपंच हा तापदायक आहे.
ज्याप्रमाणे आपण आपल्या या खिशातले पैसे त्या खिशामध्ये ठेवतो, त्याचप्रमाणे प्रपंचातले आपले मन काढून भगवंताकडे लावावे तसे करण्यात समाधान आहे. नवरा बायकोचे ध्येय एकच असेल तर त्यांचा प्रपंच सुखाचा होतो. जो मनुष्य हौसेने प्रपंच करीत करायला चोवीस तासही पुरणार नाहीत पण जो जरुरीपुरता प्रपंच करील त्या तीन - चार तास पुरतील. प्रपंचामध्ये कर्तव्याला चुकू नये, पण त्यामध्ये आसक्तीने गुंतून राहू नये. आपले व्यवहाराचे कर्तव्य मनापासून केल्यानंतर त्याचे फळ रामाकडे सोपवावे. रामाचे नाव शक्य तितके घेऊन आपले मन त्याच्या ठिकाणी चिकटावे यासाठी त्याची मनापासून प्रार्थना करावी.
प्रपंचाचे स्वरूप समजून घेऊन नामात राहावे.
- आपले जीवन किती अस्थिर आहे हे लढाईच्या काळात चांगले येते. अशा अस्वस्थतेच्या काळात मनाने घाबरू नये. काळजी न करता समझ शांत चित्ताने भगवन्नामांत कर्तव्य करीत राहावे. काळजीला म्हणा कार असे काहीच लागत नाही, कारण ती आपल्या काळजापर्यंत, नव्हे काळजापाशीच असते. काळजी करायच म्हटले म्हणजे कोणत्याच गोष्टी तिच्यातून सुटत नाहीत. काळजीमुळे मानसिक आणि शारीरिक स ज्याला काळजी नाही त्याने भगवंत आपलासा करून घेतला हे समजावे. भगवंतावर पूर्ण विश्वास टाकून तुम्ही काळजी करण्याचे एकदम बंद करा...
- ज्याप्रमाणे कुणाचीही कुंडली मांडली, मग तो श्रीमंत असो की गरीब असो, तरी तिच्यामध्ये स ग्रह यायचेच, त्याचप्रमाणे जन्मलेल्या प्रत्येक प्राण्याला सर्व विकार असायचेच. भगवंताचे अवतार की झाले किंवा साधु-पुरुष जरी झाले तरी त्यांनाही विकार असतातच. अर्थात् त्या विकारांच्या बरोबर प्रेम दया, शांती, क्षमा, हे गुणही त्यांच्या अंगी असतात. ग्रह हे या जन्माचे आहेत, पण विकार हे मामच्या जन्मापासून असलेले असतात. या विकारांना यश न होता, म्हणजेच त्यांचे नियमन करून, गुणांचे संव करणे हे प्रपंचात मनुष्याला शिकायचे असते.
कुटुंबातल्या व्यवहारामध्ये प्रत्येक घटकाने आपापले स्थान ओळखून असावे. ज्याला स्वतच्या मुलाबद्दल प्रेमामुळे इतकी खात्री असते की, आपण सांगितलेले आपला मुलगा केल्याशिवाय राहणार तो बाप खरा. ज्याला अशी उत्सुकता असते की, वडिलांनी आपल्याला सांगावे आणि आपण ते को तो मुलगा खरा बापाचा पैसा हा मुलाने अनीतीने वागण्यासाठी नाही. जो मुलगा अनीतीने वागतो, त्या बापाने पैसा देऊ नये. ज्याप्रमाणे वर बसणाऱ्याची मांड पाहून घोडा दांडगाई करतो, त्याचप्रमाणे बापाचे पाणी ओळखूनच मुलगा वागतो. - ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे प्रवचन ) गृहिणीने स्वतः स्ववंशक करून घरातल्या माणसांना जेवायला करमध्ये प्रेम असते. प्रत्येक गृहिणीला घरामध्ये थोडे तरी काम पाहिजेच. खरोखर, विवाहाचे बंधने फार आहेत; कारण ती अत्यंत पवित्र गोष्ट आहे. जो मनुष्य तरुणपणी स्वाभाविक रीतीने आणि नीतिनियमानुसार बागेल त्याला म्हातारपण मुळीच दुःखदायक होणार नाही. आज ज्याने चांगले वागण्याचा निश्चय केला त्याचे मागले पुसलेच भगवंत रोज संधी देतो आहे; आज सुधारले आणि कालचे पुन केले. नाही म्हणजे पूर्वीचे नाहीसे होते, हीच संधी.
प्रपंचातील थोडी तरी चिकाटी भगवंतासाठी धरावी.
लग्न करणे याला आपण सामान्यतः प्रपंच समजतो. लग्न ही फार पवित्र संस्था आहे. तिच्यामध्ये दोन जीवांचा उद्धार आहे. ज्याप्रमाणे गुरू आणि शिष्य यांचा संबंध असतो, म्हणजे दोघांचे मत एकच असते, त्याप्रमाणे पती आणि पत्नी यांचा संबंध असावा. ( ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचने) पत्नी आपले सर्वस्व पतीला देते, यामध्येच खरे पवित्रपण आहे. लग्नाचा पवित्रपणा ज्या वेळी नाहीसा होईल, त्या वेळी आपल्या धर्माचा पायाच उखडला असे समजावे. आपली अशी समजूत असते की, लग्न केले तेव्हा सुख हे लागणारच. जे जे परमेश्वराने निर्माण केले ते माझ्या सुखासाठीच केले असे आपण म्हणतो.
वास्तविक, एकच वस्तू ठेवली आणि ती सर्वांनी घ्यावी म्हटले, तर सर्वच एकट्याच्या हाती कशी येईल ? बायको म्हणते, " मी माहेरी सोळा वर्षे तपश्चर्या केली आणि आता यांच्या पदरात पडले, तेव्हा यांनी मला आता सुख द्यावे." पोरांना वाटते, "आमची पुण्याई म्हणून यांना इतका पगार झाला, तेव्हा यांनी नाही का आमचे लाड पुरवू? "खरोखर, सुखाकरिताच प्रत्येकाची धडपड चाललेली असते; परंतु खरे सुख कशात आहे हे कळूनसुद्धा, आपण डोळ्यांवर कातडे ओढून घ्यावे, त्याप्रमाणे तिकडे दुर्लक्ष करीत असतो. प्रपंचात सुख मिळावे म्हणून आपण जी चिकाटी धरतो, तिच्या एकचतुर्थांश चिकाटी जरी भगवंतासाठी आपण धरली तरी आपले काम भागेल. आनंदाच्या प्राप्तीसाठी आपण जे साधन आज करतो आहोत ते चुकीचे आहे. तात्पुरत्या सुखासाठी आपण आज धडपडत आहोत, त्यापासून दुःखच पदरात पडते. म्हणून तसे न करता, चिरकाल टिकणाऱ्या सुखासाठी आपण काही तरी साधन करावे.
जगामध्ये प्रत्येक गोष्टीला बंधन आहे. प्रत्येकाचे नियम ठरलेले आहेत. त्या नियमांचे उल्लंघन करणे म्हणजे अनवस्था आणणे होय. त्याप्रमाणे कुटुंबामध्ये प्रत्येक माणसाचे कर्तव्य ठरलेले आहे. असे कर्तव्याचे वळण जिथे असते त्या घराला 'वळण आहे' असे म्हणतात. ज्या घरामध्ये वळण असते ते घर सुखी होईल.
समजा, आपण एक घर बांधले, त्यामध्ये दरवाजे केले, भिंतीला खिडक्या केल्या, वर आल्याला झरोके केले. आता त्यांपैकी झरोक्यांनी विचार केला की, 'आम्ही का म्हणून लहान असावे ? आम्ही इतकेच मोठे होणार!' असे म्हणून ते दरवाज्यांइतके मोठे झाले; खिडक्यांनीही तोच विचार केला, आणि त्या सगळ्या दरवाज्यांइतक्या मोठ्या बनल्या असे झाल्यावर त्या घराचे काय होईल? हे जसे बोध नव्हे, तसे, ज्या घरामध्ये प्रत्येकजण आपलेच मत खरे म्हणतो, आणि जेथे वडील माणसांविषयी आदर नसतो, त्या घराचा विचका व्हायला वेळ लागत नाही.
प्रपंचाच्या अपूर्ण गोष्टींत केव्हाही समाधान मिळणार नाही.
सर्व अनुभवत आत्मप्रचीती ही खरी. दुसऱ्याने पुष्कळ अनुभव सांगितले स्वतला येईल तो अनुभव हाच खरा महत्त्वाचा आत्मप्रच जागरूकता येईल, भाव वाढेल, साधनाला जोर येईल, आणि भगवत्प्रामी लवकर होईल. संतांनी पुष्कळ गोष्टी आजवर आपल्याला सांगितल्या, परंतु त्यांना देव जसा हवासा वाटला तसा आपल्याला वाटतो का? प्रपंच करीत असताना भगवंताची आपल्याला आवश्यकता वाटते का? आपण असा विचार करावा की, आपण लहानाचे मोठे झालो, विद्या संपादन केली, नोकरी लग्न झाले, मुलेबाळे झाली, घरदार केले, परंतु आपल्याला अजून काहीतरी हवेसे वाटतेच आहे ! हे आपने "हवेपण केव्हा संपणार ?
आपण नोकरी करतो, कोणी वकिली, कोणी डॉक्टरकी; नोकरी करणारा, मालकाला आपल्याशिवाय दुसरा कोणी नोकर मिळणार नाही म्हणून काही नोकरी करीत नाही, किंवा अशीलाला कोणी दुसरा बीन मिळणार नाही म्हणून वकील वकिली करीत नाही. म्हणजेच नोकरीवाला काय, डॉक्टर काय, वकील काय, कोणीही आपापले कर्म केवळ त्या कर्मासाठीच करीत नाही, तर त्यातून आपल्याला सुख मिळेल ह्याईने तो ते करीत असतो. परंतु आपण पाहतोच की सर्व काही केले, आयुष्यही संपले, तरी काहीली करण्याचे राहून जाते; त्याला पूर्णता येत नाही. एखादी गोष्ट आपल्याला मिळाली की, आता ह्या काही करायचे उरले नाही, असे काही वाटत नाही.
आता काहीएक नको आहे, जेवढे आहे त्यात समाधान आहे, असे कधी वाटते का? पुढे कसे होईल, हे सर्व टिकेल का, ह्यात आणखी भर कशी पडेल, याची विना काम! एखाद्याचे ठरले ते झाले की आता प्रपंचाची काळजी मिटली असे वाटते का? लग्न झाल्यावर, समजा पाच वर्षे मूल झाले नाही, तरी हा काळजी करतोच; आणि समजा, मुलेच मुले झाली तरीही याची काळजी आहेच! तेव्हा वा प्रपंचाच्या गोष्टी अपूर्ण आहेत. त्यांतून समाधान लाभेन हे कसे शक्य आहे? ह्या गोष्टी एकांतून एक निर्माण होणाऱ्या आहेत. ज्या ज्या म्हणून सुखाच्या मना त्या सर्व जरी एकच केल्या त्यांतून समाधान निर्माण होणार नाही. - ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचने
ज्या गोष्टी अपूर्णच आहेत त्यातून पूर्णस्वरूप असलेले समाधान कसे लाभेल ? समजा, एका वेड्याच्या इस्पितळात दोनशे वेडे आहेत; गोष्टी जर कुणी म्हणाले की आता आधी शंभर बेड़े आले की एक शहाणा त्यांतून निर्माण होईल है। कधी शक्य आहे का ?
निस्कर्ष:-
या लेखामध्ये आपण बघितल माणसाने प्रपंचात कसे वागावे? ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन. ही सर्व माहिती अनेक स्त्रोत वरून उपलब्ध केली आहे तर आपल्याला माहीत कशी वाटली ते कॉमेंट मध्ये नक्की कळवा आणि ही माहिती सर्वांना शेअर करायला मात्र विसरू नका. खाली व्हॉट्सॲप, फेसबुक चे बटण आहेत त्यावर क्लिक करून ही पोस्ट सर्वांना शेअर करा. धन्यवाद
छान 👍
उत्तर द्याहटवा