Type Here to Get Search Results !

देवांची आरती का केली जाते जाणून घ्या शास्त्र |आरती कशी आणि किती वेळा ओवाळावी?

हिंदूंच्या धार्मिक कार्यामध्ये, संध्योपासना तसेच कोणत्याही मांगलिक पूजेत आरतीचे एक विशेष स्थान आहे. देवांची आरती का केली जाते तसेचआरती कशी आणि किती वेळा ओवाळावी? हे आपण जाणून घेणार आहोत. 

देवांची आरती का केली जाते जाणून घ्या शास्त्र |आरती कशी आणि किती वेळा ओवाळावी?
आरती का केली जाते 

देवांची आरती का केली जाते 

शास्त्रांमध्ये आरतीला 'आरात्रिक' अथवा 'नीराजन' सुद्धा म्हटले गेले आहे. संस्कृत मापूजी विज्ञान कित्येक वर्षांपासून आरतीचा महिमा, विधी, तिचे वैज्ञानिक महत्त्व वगैरेंविषयी सांगत आले आहेत, एवढेच नव्हे तर आपल्या सत्संग- समारंभांमध्ये सामूहिक आरतीद्वारे तिच्या लाभांचा प्रत्यक्ष अनुभवही करवित राहिले आहेत. आता इथे देवांची आरती का केली जाते या प्रश्नाच उत्तर आपल्याला मिळेल.

"आरती एक प्रकारे वातावरणात शुद्धिकरण करण्याची तसेच आपल्या आणि दुसऱ्यांच्या आभामंडळांमध्ये सामंजस्य आणण्याची एक व्यवस्था आहे. आपण आरती करतो तेव्हा तिच्यापासून आभा (aura), ऊर्जा मिळते. 

हिंदू धर्माच्या ऋषींनी शुभ प्रसंगी तसेच भगवंताची, संतांची आरती करण्याचा जो शोध घेतला आहे तो हानिकारक जीवाणूंना दूर ठेवतो, एकमेकांच्या मनोभावांचा समन्वय करतो आणि आध्यात्मिक उन्नतीत मोठे योगदानं देतो.'

शुभ कर्म करण्यापूर्वी आरती केल्याने शुभ कर्म शीघ्रतेने फळ देते. शुभ कर्म केल्यानंतर आरती केल्याने शुभ कर्मात एखादी त्रुटी राहून गेली असेल तर ती पूर्ण होते. ( देवांची आरती का केली) जाते  स्कंद पुराणात आरतीचा महिमा वर्णिलेला आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात

मन्त्रहीनं क्रियाहीनं यत्कृतं पूजनं मम । सर्वं सम्पूर्णतामेति कृते नीराजने सुत ॥
'जे मंत्रहीन व क्रियाहीन (आवश्यक विधी- विधानरहित) माझे पूजन केले गेले आहे, ते माझी आरती केल्याने सर्वथा परिपूर्ण होते.'
(स्कंद पुराण, वैष्णव खंड, मार्गशीर्ष माहात्म्य : ९.३७) 

आरतीच्या ज्योतीच्या संख्येचे रहस्य

बहुधा ५ ज्योतींच्या दिव्याने आरती केली जाते, जिला 'पंचप्रदीप' म्हटले जाते. आरतीत एकतर १ ज्योत असावी अथवा ३ ज्योती असाव्यात अथवा ५ असाव्यात. 

ज्योती विषम संख्येत (१, ३, ५, ...) लावल्याने वातावरणात सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होते. जर ज्योतींची संख्या सम (२) ४, ६, ...) असेल तर ऊर्जा संवहनाची क्रिया निष्क्रिय होते.

अतिथीची आरती का करावी?

प्रत्येक व्यक्तीच्या शरीरातून ऊर्जा, आभा निघत राहते. एखादा अतिथी (पाहुणा) येतो तेव्हा आपण त्याची आरती करतो, कारण सनातन संस्कृतीत अतिथीला 'देव' मानले गेले आहे. प्रत्येक मनुष्याची स्वतःची आभा आहे, म्हणून घरात राहणाऱ्यांच्या आभेला त्या अतिथीच्या नव्या आभेने विक्षिप्त करू नये आणि त्याने स्वतःला परके मानू नये, यासाठी आरती केली जाते.

आरती केल्याने त्याला स्नेहसुद्धा मिळाला  आणि घरच्या आत मिसळून जाण्यासाठी आरतीचे २-४ चक्करही मिळाले !
कशी सुंदर व्यवस्था आहे सनातन धर्माची !"

आरती कशी आणि किती वेळा ओवाळावी?

पूज्य बापूजींच्या सत्संग-वचनामृतात येते : "जे काही देव आहेत त्यांचा एक बीजमंत्र असतो. आरती करतात तेव्हा त्यांच्या बीजमंत्राच्या अनुसार आकृती संस्कृत बनविली जाते, जेणेकरून त्या देवाची ऊर्जा, स्वभाव आपल्यात येईल व त्यांच्या आभेत (aura) विज्ञा आपल्या आभेचा ताळमेळ होईल आणि आपली आभा देवत्वाला उपलब्ध होईल. म्हणून देवता, सद्गुरू आणि भगवंताची आरती केली जाते.


ज्या देवाचा जो बीजमंत्र असतो, आरतीच्या ताटाने त्या प्रकारची आकृती बनवून आरती केली तर जास्त लाभ होतो. जसे तुम्ही श्रीरामांची आरती करीत असाल तर त्यांचा 'रां' बीजमंत्र आहे, म्हणून 'रां' शब्द आरतीत बनविणे जास्त लाभ करेल. देवीची आरती करीत असाल तर सरस्वती देवीचा 'ऐं' अथवा लक्ष्मीचा 'श्रीं' बनवा. गणपतीचा बीजमंत्र 'गं' आहे म्हणून ताटाने त्याच प्रकारची आकृती बनवा. ( आरती कशी आणि किती वेळा ओवाळावी? )

आता कोणत्या देवाचा कोणता बीजमंत्र आहे हे ठाऊक नसेल तर सर्व बीजमंत्रांचा एक मुख्य बीजमंत्र आहे - 'ॐ' कार ! आरती ओवाळता- ओवाळता तुम्ही ॐकार बनवा. सर्व देवी-देवतांच्या आत जो परब्रह्म परमात्मा आहे, त्याचा स्वाभाविक ध्वनी 'ॐ' आहे.

तर 'ॐ' बनवा अथवा देवाच्या चरणांपासून गुडघ्यांपर्यंत (४ वेळा), मग नाभीसमोर (२ वेळा), मग मुखारविंदासमोर (एकदा), मग एकसाथ सर्व अंगांवर (७ वेळा) आरती ओवाळा. याच्याने देवाचे गुण व स्वभाव आरती ओवाळणाऱ्या व्यक्तीच्या स्वभावात थोडे-थोडे येऊ लागतात.

आरतीचा वैज्ञानिक आधार

आता तर वैज्ञानिकही चकित झाले आहेत
की भारताच्या या पूजा पद्धतीने किती मोठा लाभ होतो ! त्यांनाही आश्चर्यकारक परिणाम मिळाले. आता वैज्ञानिक बोलतात की आरती केल्याने जर विशेष व्यक्ती असेल तर तिची विशेष ओरा आणि सामान्य व्यक्तीची ओरा एकाकार होऊ लागते. वैज्ञानिकांच्या दृष्टीत केवळ  (aura) आहे तरीही धन्यवाद ! परंतु आभेसोबतच विचारही समान होतात, त्याचबरोबर आपल्या आणि समोरच्याच्या शरीरातून ती निघणाऱ्या तरंगांचा विपरीत स्वभाव नष्ट होऊन आपल्या जीवनात प्रकाशाचा भाव उत्पन्न होतो. 

जसे तूप, पेट्रोल, फुले इत्यादींचा आपला वेगवेगळा गंध असतो, असेच प्रत्येक मनुष्याची आपली आभा असते. आता तर 'किर्लियन' फोटोग्राफीद्वारे त्या आभेचा फोटोसुद्धा घेता येऊ  शकतो. जेव्हा देवता किंवा सद्गुरूंपुढे आरती केली जाते तेव्हा त्यांच्या आभेला आपल्या आभेसोबत एकाकार करण्याच्या प्रक्रियेत दिवा उत्प्रेरकाचे (catalytic agent) काम करतो. - (आरती कशी आणि किती वेळा ओवाळावी?)

आयुष्य व आरोग्य प्राप्ती

आणि शत्रूवृद्धीच्या शमनासाठी... आरती केल्याने इतके लाभ होतात आणि आरतीचे दर्शन केल्यानेही लाभ होतो. तुम्ही गुरुद्वारी केलेल्या आरतीच्या दर्शनाने तुमच्या शत्रूंची डाळ शिजणार नाही. दीपज्योती आयुष्य- आरोग्य प्रदायक व शत्रूंच्या वृद्धीचे शमन करणारी आहे. शेजारी किंवा प्रतिस्पर्धी एकमेकांचे इतके शत्रू नसतात, जितके मनुष्य-जीवनात काम, क्रोध, लोभ वगैरे शत्रू आहेत. तर आरतीचे दर्शन केल्याने शत्रूंच्या वृद्धीचे शमन होते."

शास्त्रांच्या अनुसार जो धूप व आरतीचे दर्शन करतो आणि दोन्ही हातांनी आरती घेतो, तो आपल्या अनेक पिढ्यांचा उद्धार करतो आणि भगवान विष्णूंच्या परम पदास प्राप्त होतो..

आरती मध्ये कापूर का वापरतात
सनातन संस्कृतीत पुरातन काळापासून आरतीत कापूर जाळण्याची परंपरा आहे. आरती केल्यानंतर आरतीवर हात फिरवून आपल्या डोळ्यांना लावतात, ज्यामुळे दृष्टी-इंद्रिय सक्रिय होते. पूज्य बापूजींच्या सत्संग-वचनामृतात येते : "आरती करतात तेव्हा कापूर जाळतात.

कापूर वातावरणाला शुद्ध करतो, पवित्र वातावरणाची आभा (aura) तयार करतो. घरात देवदोष आहे, पितृदोष आहे, वास्तुदोष आहे, भूत-पिशाचाचा संस्कृती दोष आहे किंवा कोणाला वाईट स्वप्न पडतात तर कापराची ऊर्जा त्या दोषांना नष्ट करून टाकते. - ( देवांची आरती का केली जाते )

असे म्हणतात की संध्या होते तेव्हा दैत्य- राक्षस हल्ला करतात म्हणून शंख, घंटा वाजविली पाहिजे, कापूर जाळला पाहिजे, आरती पूजा केली पाहिजे अर्थात् संध्येच्या वेळी आणि सकाळच्या वातावरणात विशिष्ट व विविध प्रकारचे जीवाणू असतात, जे श्वासोच्छ्वासाद्वारे आपल्या शरीरात प्रवेश करून आपल्या जीवनरक्षक कोशिकांसोबत लढतात. 

तर 'देव-असुर' संग्राम होतो, देव म्हणजे सात्त्विक कण आणि असुर म्हणजे तामसी कंण !... कापराच्या सुगंधाने हानिकारक जीवाणू (bacteria) आणि विषाणू (virus) रूपी राक्षस पळून जातात.

वातावरणात जी अशुद्ध आभा (ओरा) आहे, तिच्यामुळे तामसी अथवा निगुरे लोक जरा-जरा गोष्टीत खिन्न होतात, पीडित होतात. परंतु कापूर आणि आरतीचा उपयोग करणाऱ्यांच्या घरांमध्ये अशा कीटाणूंचा, अशा हलक्या आभेचा प्रभाव टिकू शकत नाही. म्हणून घरात कधीकधी कापूरजाळला पाहिजे, गुग्गळाचा धूप केला पाहिजे, कधीकधी कापराच्या १-२ छोट्या-छोट्या वड्या कुस्करून ती भुकटी घरात विखुरली पाहिजे. तिच्या हवेने ऋणायन बनतात, जे हितकारी आहेत. सध्याच्या परिस्थितीत घरात दिवा लावणे अथवा कापराची कधीकधी आरती करणे चांगले आहे.

अकाल मृत्यूपासून रक्षणासाठी...

विज्ञान भगवान नारायण देवउठी (प्रबोधिनी) एकादशीला योगनिद्रेतून उठतात. त्या दिवशी कापराची आरती करणाऱ्याला अकाल मृत्यूपासून सुरक्षित होण्याची संधी मिळते." कापराचे वैज्ञानिक महत्त्व

कित्येक संशोधनांनंतर विज्ञानाने कापराची महत्ता स्वीकारली आहे. कापूर आपल्या आसपासची हवा हरि कपूर शुद्ध करतो, सोबतच शरीराला हानी पोहोचविणाऱ्या संक्रामक जीवाणूंना दूर ठेवण्यात मदत करतो. याची वाफ किंवा सुगंध सर्दी-खोकल्यात आराम देतो तसेच मिर्गी (फीट येणे), वेडाचे झटके, कायमस्वरूपी चिंता, जीव घाबरा होणे वगैरे लक्षणे कमी करतो. 

कापराची वाफ किंवा याच्या तेलाच्या उग्र सुगंधाने नाकाचे द्वार उघडतात. हा सुगंध श्वासनलिका, स्वरयंत्र, ग्रसनी (घसा), नासिकामार्ग व फुफ्फुस- 7 मार्गासाठी लगेच अवरोध-निवारकाचे काम करतो. म्हणून कापराचा उपयोग सर्दी-खोकल्याच्या ये कित्येक औषधांमध्ये (बाम वगैरे) केला जातो. कापराच्या वाफेचा सुगंध कफाने कोंडलेल्या र घशाची सफाई करून श्वसनसंस्थेचा मार्ग मोकळा करण्यात मदत करतो. कापूर कुस्करून चोळल्याने रक्तप्रवाह वाढतो.

निस्कर्ष:-
या लेखामध्ये आपण बघितल देवांची आरती का केली जाते जाणून घ्या शास्त्र |आरती कशी आणि किती वेळा ओवाळावी?. ही सर्व माहिती अनेक स्त्रोत वरून उपलब्ध केली आहे तर आपल्याला माहीत कशी वाटली ते कॉमेंट मध्ये नक्की कळवा आणि ही माहिती सर्वांना शेअर करायला मात्र विसरू नका. खाली व्हॉट्सॲप, फेसबुक चे बटण आहेत त्यावर क्लिक करून ही पोस्ट सर्वांना शेअर करा. धन्यवाद 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad