Type Here to Get Search Results !

श्री स्वामी समर्थ मंत्र जप लाभ जाणुन घ्या | श्री स्वामी समर्थ संदेश भक्तांसाठी | shri swami samarth

!!! श्रीस्वामी समर्थ !!!
 समर्थांच्या दर्शनार्थीमधे एक अंध सूरदास व ब्रम्हनिष्ठ वामनबुवाचे पिता रावजीही आले होते. ( (श्री स्वामी समर्थ संदेश श्री स्वामी समर्थ मंत्र जप लाभ) सूरदासने दर्शन घेतल्यावर स्वामींना प्रत्यक्ष पाहायची इच्छा प्रदर्शित केली आणि रावजींना कृपाप्रसाद हवा होता. 

श्री स्वामी समर्थ मंत्र जप लाभ जाणुन घ्या | श्री स्वामी समर्थ संदेश भक्तांसाठी | shri swami samarth
shree swami samarth 

श्री स्वामी समर्थ मंत्र जप लाभ जाणुन घ्या

या दोघाच्या वतीने भुर्‍याबुवाने समर्थांना विनंती केली. समर्थांनी सूरदासाला डोळे उघडायला सांगून म्हणाले, बघ माझेकडे. त्याबरोबर त्याला सर्व स्पष्ट दिसू लागले. अनामिष नेत्रांनी समर्थांना बघतच राहिला. सूरदासाला केवळ दर्शनच झाले नाही तर, समर्थांचे दुर्लभ दर्शनही घडले.

               भुर्‍याकडे बघून समर्थ म्हणाले, अरेऽ या रावजीला आम्ही दोनवेळा भेटलो आहोत, काशीक्षेत्री याची रुखमाई नावांची आई अतिशय आजारी होती. तिच्या दुखण्याने पत्नि अहिल्या व रावजी दोघेही चिंतेत होते. त्यावेळी आम्ही तिथे पोहचलो व यांच्या मातोश्रींना दुरुस्त केले. 

दुसरी खूण..आम्ही याला भेटण्या पूर्वी याची काशी नावाची लहान कन्या दिवंगत झाली होती. नंतर ब्रम्हवर्तास विश्वनाथ ब्राम्हणाच्या घरी भेटून, याचेवरचे संकट दूर केले होते. 

रावजींना सारे आठवले व अश्रूंचा पूर लोटला. त्यांनी एकदम समर्थचरणी लोटांगण घातले, आणि समर्थ श्रृतींच्या आधारे स्वामी समर्थ हे प्रत्यक्ष परमात्मा असून परम पुरुष परमहंस, निर्वाण जगत् प्राण आणि विश्व व्यापक कसे आहेत अशी स्तुती केली. 

त्याने केलेली ही ज्ञानगर्भ स्तुती ऐकून प्रसन्न झालेले स्वामी म्हणाले, तुझा जेष्ठ पुत्र सदाचारी व वैदिक होईल, दक्षिणदेशी यवनप्रांती आमचे दर्शन योग्यवेळी होईल, दुसरा पुत्र मोठा शिव भक्त, मनाने मवाळ व सर्वभूतरहित होईल. 

आमच्या लीला तोच लोकांपर्यंत पोहचवेल असा आशिर्वाद दिला. गोमतीर्थावर येऊन या तीर्थाची महिमा सांगीतली आणि स्वामी भुर्‍या बुवाच्या निवासस्थानी आले. अनेक लोकांना तापसंतप्त, विव्हल, आर्तलोकांना कृतार्थ करत एक दिवस स्वामी अचानक अंतर्धान पावले. श्री स्वामी समर्थ मंत्र जप लाभ जाणुन घ्या | श्री स्वामी समर्थ संदेश भक्तांसाठी | shri swami samarth
              

यानंतर स्वामी सौराष्र्ट देशातील काठेवाड प्रांती असलेल्या जुनागड संस्थानात गिरनार पर्वतावर प्रगट झाले. श्रीशैल पर्वतावर कर्दळी वनात नृसिंह सरस्वती गुप्त झाले होते. त्यानंतर जवळजवळ तीन शतकांनंतर उत्तर प्रांती भागीरथी तीरावर असणार्‍या जंगलातील प्रचंड वारुळातून एका लाकुड तोड्याचा घाव बसल्याने समाधीतून श्रीसमर्थांच्या रुपाने बाहेर आलेत. 



 | श्री स्वामी समर्थ संदेश भक्तांसाठी | shri swami samarth


ते गिरनार पर्वतावर म्हणजेच स्वतःच्या पूर्वनिवासस्थानी प्रगट झाले. इथेही समर्थांनी अनेक चमत्कार केले. तिथे असलेल्या एका पांगळ्याला चालण्याचे सामर्थ्य दिलेले बघून तेथील लोकांना समर्थ असेच कुणीतरी पोटार्थी, बहुरुपी असेल असे वाटले होते पण त्या पांगळ्याला चलण्याचे बळ दिलेले बघून भ्रम निरस झाला. श्री स्वामी समर्थ मंत्र जप लाभ
              तिथे असलेल्या अंबीकादेवीच्या दर्शनाला स्वामी गेले असतां, देवी म्हणाली, आपले मुख्य स्थान सोडून कुठे गेला होता? लोककल्याणार्थ या भूतलावर संचार करीत फिरत आहे.मुद्दाम आपल्या दर्शनाला आलोय. माते! तुझा वरहस्त सदैव आमच्या शिरी असावा. ज्या कमंडलु तीर्थात आदीगुरु दत्तात्रय स्नान करीत त्या तीर्थात स्वामींनी स्नान केले.
            समर्थांना भेटायला रामदास, सेवादास व कृष्णदास असे तीन साधु आले. सेवादासाने कांही शंकानिवारनार्थ समर्थांना विचारले या कलियुगात हठयोगी व राजयोगी दिसत नाही. 

त्यांचे दर्शन या पर्वतीवर होईल या अपेक्षेने इथे वास्तव्यास आहोत. समर्थ किंचित हसले. त्या वेळी समर्थ चंचलभारती म्हणून ओळखल्या जात होते. समर्थ म्हणाले, या कलियुगातसुध्दा देवदेवता, सत्पुरुष आहेत, त्यांचे दर्शन होण्या साठी प्रथम आपण पात्र असायला हवे.पात्रता निर्माण होण्यासाठी निष्काम कर्मोपसना, वेद विहित सत्पथावरुन जात महापुरुषांच्या भेटी आवश्यक आहे. श्री स्वामी समर्थ मंत्र जप लाभ
असा उपदेश सेवादासला करुन समर्थ म्हणाले, याच पर्वतावर साक्षात नृसिंहाचे वास्तव्य आहे. अनन्यभावे त्यांंना शरण जाऊन, मनातील संकल्प, विकल्प,संशय विकार, अहंकार सोडून त्यांचे चरणी लीन झाल्यास त्यांच्या कृपेने पावन व्हाल. त्याच्या डोळ्यातून अश्रूरुपाने सारा अहंकार वाहून गेला समर्थांनी त्याला दत्तस्वरुपात दर्शन देऊन त्याचे जीवन कृतार्थ, धन्य केले.श्री स्वामी समर्थ मंत्र जप लाभ जाणुन घ्या | श्री स्वामी समर्थ संदेश भक्तांसाठी | shri swami samarth
                    नारदजी वर्णन करतात की , *lजी भक्ति स्वयंफलरुप आहे. म्हणून मुमुक्षूंनी ती ( भक्ती ) च ग्रहण करावी. अध्यात्ममार्गात प्रविष्ट होण्याची इच्छा करणाऱ्यास मुमुक्षू म्हणतात. अनासक्त बुद्धीने कर्मे करणाऱ्या पुरुषासही गीतेमध्ये मुमुक्षू म्हटले आहे. काही मुमुक्षू फक्त स्वप्रयत्नाने या संसारबंधनातून मुक्त होतात. ते ज्ञानयोगाचा अवलंब करतात, असे श्री ज्ञानेश्वर महाराजांनी मुमुक्षूचे जे लक्षण पंधराव्या अध्यायात केले आहे ; पण कित्येकांना तेवढे सामर्थ्य नसते, त्यांच्याकरिता श्रीकृष्णानेही उध्दवास उपदेश करतेसमयी भक्ती हेच साधन सांगितले आहे. श्री स्वामी समर्थ मंत्र जप लाभ
सर्व लौकिक भोगांपासून पुर्णपणे विरक्त असून विधिपुर्वक संन्यास घेऊन ज्यांनी कर्माचा त्याग केलेला आहे अशा विरक्तांकरता ज्ञानयोग सांगितला आहे; आणि कर्मामध्ये आसक्त असणाऱ्या कामिक विषयेच्छु लोकांना सिद्धी देणारा कर्मयोग सांगितला आहे.
श्री स्वामी समर्थ मंत्र जप लाभ
ज्याला पूर्वसुकृताने भगवंताच्या पवित्र कथालीलादि श्रवण करण्याची गोडी लागुन श्रद्धा उत्पन्न झाली, तो विषयादिकांपासून फार विरक्त नाही व विषयी लोकांप्रमाणे अत्यासक्त नाही अशा पुरुषांकरिता भक्तियोगच इष्ट फल देणारा आहे. भक्ती हेच साधन मुमुक्षूंकरिता आहे; याच मार्गाने अनेक संत गेले आहेत.
मार्गी बहुत! याचि गेले साधुसंत!! ( तुकाराम म. )
हा राजमार्ग आहे, म्हणूनच निश्चियपूर्वक सांगतात की अन्य साधनांचा अवलंब न करता या साधनाचा स्वीकार मुमुक्षूंनी करावा.

समर्थ हे नाम आपल्या जीवनाला तारून नेणारी आहे त्या नामामध्ये फार मोठी शक्ती आहेत म्हणून या नामाच्या स्मरणाने आपल्या मनाला शांती मिळते. आणि आपले मन शांत झाल्यामुळे आपल्या मनात चांगले व सकारात्मक विचार यायला लागतात... दररोज श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण केल्यामुळे आपले व आपल्या घराचे संकटांपासून वाढतं इन पासून रक्षण होते भविष्यात येणाऱ्या अडचणी आधीच दूर होऊन जातात आणि आपले आयुष्य हे सुलभ होऊन जाते. 
श्री स्वामी समर्थ मंत्र जप लाभ
तसेच या नामस्मरणाच्या शक्तीमुळे आपल्या प्रारब्धाची तीव्रता कमी होते आपली पूर्वीच्या जन्मातली आणि या जन्मातली पापकर्मे नष्ट होतात जेव्हा आपण घरामध्ये श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करीत असतो तेव्हा या नामाच्या स्पर्धामुळे आपल्या वास्तूची शुद्धी होते त्या वास्तुमधील सर्व नकारात्मक ऊर्जा ही नाहीशी होते नकारात्मक ऊर्जा नष्ट झाल्यामुळे आणि सकारात्मक ऊर्जा वाढल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणता बाळाचे आपल्या घरातील वातावरण हे आनंदी होते आणि जर आपल्या घरातील वातावरण प्रसन्न असले तर आपल्या घरात आपोआपच सर्व गोष्टी घडायला लागतात नियमितपणे श्री स्वामी समर्थाचे नामस्मरण केल्यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो व आपली एकाग्रताही वाढते आणि मुळे आपल्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडायला लागतात. आणि आपली प्रगती होत जाते या नामस्मरणामुळे सर्व वाईट स्पंदने नष्ट होतात आणि आपल्या आयुष्यातील दुःख नाहीसे होऊन आपल्याला सुखाची प्राप्ती होते असे आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होतात आणि आपल्याला प्रत्येक चांगल्या कामांमध्ये मनासारखे यश मिळते जर आपल्याला कुठे प्रकारची भीती वाटत असेल तर आपण श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण दररोज केले पाहिजे.

या नामस्मरणामुळे आपल्या मनातली प्रकारची भीती नाहीशी होते आणि आपल्याला संकटांना सामोरे जाण्यासाठी शक्ती मिळते दररोज सकाळी श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण केले पाहिजे त्यामुळे आपला संपूर्ण दिवस हा चांगला जातो दिवसाची सुरुवात चांगली होते आणि आपली

दिवसभरातील सर्व कामे यशस्वीपणे पार पडतात जीवनामध्ये असे व या प्रकारचे अनेक चमत्कारिक बदल घडवून आणणारे श्री स्वामी समर्थांचे नाम आहे म्हणून दररोज सकाळ संध्याकाळी स्वामी समर्थांचे जास्तीत जास्त नामस्मरण केले पाहिजे दररोज निदान एक माळ तरी श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करावे त्यामुळे नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये चांगले बदल घडून येतील म्हणून आज पासुनच श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करण्यास सुरुवात करा 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad