Type Here to Get Search Results !

मनाला वश करण्याचे उपाय, - सुंदर खरी कथा मराठी मध्ये | How to control mind?

मनाला वश करण्याची युक्ती काय आहे ते आपण एका कथा मधून समजून घेऊया खूप महत्वाचा प्रश्न आहे how to control mind? तर या कथा मधून मिळेल उत्तर. 

www.marathivachak.com
How to control mind 



मनाला वश करण्याचे उपाय, - सुंदर खरी कथा मराठी मध्ये | How to control mind? 


श्री तोतापुरी महाराज समुद्राच्या वाळूत दुपारपर्यंत लेटून रहायचे व धुनीसुद्धा जाळायचे. त्यांच्या शरीरात पित्तदोष वाढला, याच्याने त्यांचा स्वभाव रागीट बनला होता. एकदा रामकृष्णदेवांना समजले की पौष मासाच्या अशा कडक थंडीत गुरुजी अमुक जागी आले आहेत. रामकृष्णदेव आपल्या गुरुदेवांचा महिमा, प्रभाव जाणत होते; कारण ते कालीमातेच्या उपासनेने, प्रीतीने सुसंपन्न हृदयाचे धनी होते. ते गुरुजींच्या सेवेत पोहोचले.

रात्रीची वेळ होती. गुरू-शिष्यात सात्त्विक वार्तालाप आणि सत्संग सुरू झाला. सुख दुःखात समतेचे महत्त्व, सर्व कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते... सर्व शुभ कर्मांचे फळ हे आहे की आपल्या आत्मा-परमात्म्याच्या ज्ञानात जीवन धन्य व्हावे... वगैरे विषयांवर गुरू-शिष्याची चर्चा चालता-चालता पहाट झाली.

इतक्यात एक हुक्केबाज व्यसनी आला. तो म्हणाला : ‘“बाबा ! थोडीशी आग पाहिजे, धुनीतून एक निखारा घेऊ ?” तुमच्या बाबांनी पाहिले की हा तर हुक्केबाज आहे,

ते म्हणाले : "आग नाही आहे. ' "बाबा ! तुम्ही परवानगी दयाल तर मी एक निखारा शोधून काढतो."

बाबांनी विचार केला असेल 'खेटराच्या : भूतांना बोलून समजविण्यात वेळ घालविणे ठीक नाही.' त्यांनी लाल डोळे दाखविले आणि ओरडले.
त्याने तर पळ काढला, बाबा सुद्धा चिमटा हातात घेऊन त्याच्या मागे धावले. "थांब, तुला पाहतोच, थांब तू... !”

तो पुढे आणि बाबा मागे... दे धमाधम ... ! धमाधम... !! त्याला दूर पळवून परत आले तेव्हा रामकृष्ण हसू लागले.
कोणी रागात असेल आणतुम्ही त्याच्यावर त्याच
वेळी हसाल तर त्याचा कोध कोठेही बरसू शकतो. तोतापुरी महाराजांनी रागारागात रामकृष्णांना ३ चिमटे मारले. ३ चिमटे परीक्षेसाठी नाही, रागात येऊन मारले. रामकृष्णांची उपासना होती भावप्रधान, प्रसन्नताप्रधान ! ते हसले : "गुरुदेव ! आज जो प्रसाद मला मिळाला आहे,
असा कोणालाच मिळाला नसेल. तुमची मोठी कृपा आहे, तुम्ही मला आपले मानले." असे करून गुरुदेवांच्या चरणी लोटांगन घातले व त्यांचा महिमा गायिला.

तेव्हा तोतापुरी महाराजांच्या मनात आले की 'अरे, मी क्रोधाच्या आवेगात येऊन याला मारले आणि हा माझ्यात सद्गुण पाहतो !...' ते लगेच आपल्या साक्षी स्वभावात, अष्टधा प्रकृतीच्या पार स्वभावात सजग झाले.

प्रेमळ व्यक्ती रागाच्या प्रसंगालाही प्रेमात बदलून टाकते. परंतु दुर्वासा ऋषी वगैरे क्रोध करायचे तेव्हा ते छोटे झाले आणि बाकीचे मोठे झाले असे नाही आहे. पित्तवाल्या व्यक्तीला राग (क्रोध) येतोच. वात-पित्त-कफ, गुण-दोष सर्व अष्टधा प्रकृतीत आहेत, तुमच्या शुद्ध स्वरूपात
काहीच नाही आहे. ना पित्त आहे, ना काम आहे, ना क्रोध आहे, ना भय आहे, ना जन्म आहे, ना मृत्यू आहे. वास्तवात तुम्ही अखंड आनंदस्वरूप, सच्चिदानंद आहात ! तुम्ही असे संकल्प करा की आपल्या खऱ्या रूपाला जाणण्यात सहयोगी होतील. आपल्या आत्म्याला जाणून घ्या, मग तर तुमचे मृत्यूशी काही घेणे-देणेच नाही- शरीर भले हजार वर्षे जगो, भले हजार सेकंद जगो, भले २ सेकंदात निघून जावो.

जन्म मृत्यु मेरा धर्म नहीं है.... हे अष्टधा प्रकृतीचे आहे. पाप पुण्य कछु कर्म नहीं है... हे कर्त्याचे आहे, अहंकाराचे आहे
क्रोधाची सवय आहे.' अहंकाराचे आहे.
मैं अज निर्लेपी रूप, कोई कोई जाने रे |
कोणी म्हणतात: "माझ्यात क्रोधाची सवय आहे." "
तुमच्यात नाही आहे क्रोधाची सवय, अष्टधा प्रकृतीत आहे. तुम्ही जेव्हा आपला महिमा विसरता, अष्टधा प्रकृतीशी जुळता तेव्हा तिचा दोष आपल्यात मानून व्यवहारकाळात बोलून टाकता. नाहीतर तुम्ही चैतन्य आहात, अमर आहात, शाश्वत आहात. तुमच्यात एखादा दोष किंवा एखादे दुःख असूच शकत नाही, व्यवहारात तर ज्ञानवानांनाही बोलावे लागते की 'माझ्यात आहे.'

तोतापुरी महाराजांनी दीर्घ श्वास घेतला आणि दृढ संकल्प केला की 'आजच्या नंतर या क्रोधाला जवळ फटकू देणार नाही.' त्यांच्या या दृढ संकल्पाने आजीवन क्रोधाला जवळ फटकू दिले नाही.

दोष अष्टधा प्रकृतीत आहेत आणि निर्दोष होण्याचे सामर्थ्य तुमच्या आत्मदेवात आहे. जर मनुष्याने संकल्प करून दृढ निश्चय केला की 'काहीही झाले तरी मला क्रोध नाही करायचा आहे... अथवा अमुक दुर्गुणाच्या वशीभूत नाही व्हायचे आहे...' तर क्रोध किंवा त्या दुर्गुणापासून वाचू शकतो. संकल्पात मोठी शक्ती असते. बस, संकल्प शिथिल होता कामा नये. तुम्ही पक्का निश्चय केला तर असंभवही संभव होईल.

वो कौन-सा उकदा है जो हो नहीं सकता ? तेरा जी न चाहे तो हो नहीं सकता ॥ छोटा-सा कीड़ा पत्थर में घर करे । इंसान क्या दिले-दिलबर में घर न करे ?

तुम्ही चांगल्या हृदयाचे आहात.
हृदयाचा देवता तुमचा सजग आहे. ...तर बहादुरांचे बहादूर आहेत तोतापुरी महाराज ! निश्चय केला की 'क्रोध भडकला तर सावध राहीन, आता हा क्रोध होणार नाही.'

मनाला वश करण्याची युक्ती


असेच मी आपली गोष्ट सांगतो. शेंगदाण्यात व्हिटॅमिन 'ई' असते आणि खारे शेंगदाणे चवदारही असतात, तेव्हा मी सेवकाला सांगितले की जर खारे शेंगदाणे आले असतील तर घेऊन ये. मी स्वतःसाठी एखादी वस्तू विकत घेऊन खाल्ली असेल असे मला आठवत नाही. सहजच येते तेव्हा बोलतो की "घेऊन या." थोडे खारे शेंगदाणे घेऊन आला. ते पडून राहिले, पडून राहिले... मन म्हणाले : "खाऊन घे."

मी म्हणालो : 'तू खाऊन तर पहा ! उचलून तर पहा !' दम मारला ! मन असे चुप झाले की कितीतरी दिवस, कितीतरी आठवडे शेंगदाणे तेथेच पडून राहिले. मला वाटले, 'बस! आता आली युक्ती हातात ! कोणताही गडबड संकल्प होईल तर मनाला बोलेन : 'करून तर पहा !...' दम मारेन मी...' दम मारला तर मग दम सफलही झाला पाहिजे आणि होतोच !... दृढ निश्चयाने कराल तर नक्कीच होईल. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad