Type Here to Get Search Results !

अंगुलीमाल भयानक राक्षस कसा झाला बुद्ध यांचा शिष्य वाचा मराठी मध्ये.

 अंगुलीमाल भयानक राक्षस कसा झाला बुद्ध यांचा शिष्य? 

अंगुलीमाल गौतमबुद्ध 


एक व्यक्ति होता असा की ज्याच्या सोबत खूप काही वाईट घडले होते. म्हणून त्यांनी ठरवल होत की 101 एकशे एक लोकांना मारून त्यांच्या बोटांची माळ तयार करून गळ्यात घालणार. म्हणून त्याला लोकं अंगुलीमाल असे म्हणत असत आणि खूप घाबरत असत. आसपासच्या सर्व गावातील लोकांमधे अंगुलीमाल ची खूप दहशत होती. कारण खूप क्रूर होता तो आणि त्याची वेषभूषा सुद्धा खूप खतरनाक होती.

अंगुलीमाल भयानक राक्षस कसा झाला बुद्ध यांचा शिष्य

जंगल 


अंगुली माल जंगल मध्ये राहत होता आणि रस्त्यावरून येणार्‍या जाणार्‍या लोकांवर तो हल्ला करत असत आणि त्यांची बोटे किंवा अंगठा कापून त्याची माळ बनवत असत. त्या लोकांकडे असणारे धन ही तो लुटत असत. अशाप्रकारे तो एक भयानक राक्षस म्हणजे दानव झाला होता. त्या जंगलातून जाणारे लोक परत वापस येत नसे म्हणून त्या जंगलात जायला यायला लोक प्रचंड घाबरत असत. हे सर्व गौतम बुद्ध यांच्या कानावर पडले.


गौतम बुद्ध यांनी ठरवले याला आता जागेवर आणले पाहिजे. म्हणून एक दिवस गौतम बुद्ध गावातून त्या जंगलाच्या मार्गाने निघाले. तर अचानक काही लोक तिथे आले आणि बुद्धी यांना अडवू लागली. एका जेष्ठ नागरिकांनी बुद्धांना सांगितल " तो राक्षस खूप भयानक आहे या जंगलात जाणारा माणूस परत येत नाही" तर लगेच दुसरा माणूस बोलतो बुद्धांना

गौतम बुद्ध 


 " तुम्ही त्याला कशाला ज्ञान द्यायला चालला आहात तो तर दानव आहे त्याला काय समजणार आहे तुमचे उपदेश उलट तुम्हाला त्याच्यापासून हानी आहे" हे सर्व गौतम बुद्ध शांत ऐकत होते. परंतु गौतम बुद्ध स्मित हास्य करत कोणाचीही न ऐकता त्या जंगला कडे निघाले. लोकांना काळजी वाटू लागली की आता काय होईल या साधू चे...

गौतमबुद्ध अंगुली माल स्केच 


गौतम बुद्ध जंगलात गेले. तेव्हा एका दगडावर तो बसला होता. आणि आपल्या हत्यारा ला धार लावत होता. त्याच्या समोरून गौतम बुद्ध न घाबरता गेले हे त्यानी बघितल आणि त्याला आश्चर्य वाटलं की हा साधू आपल्याला घाबरला का नाही. त्याने गौतम बुद्ध ला आवाज दिला "ओ साधु ईकडे ये, कुठे चालला आहे" गौतम बुद्ध म्हणाले "मी तर केव्हाचा पोहोचलो आहे मला जिथे जायच होत तिथे, तू चालतोय तू नाही पोहोचला अजून" 

हे ऐकल्यावर अंगुली माल ला काही समजल नाही तो बोलतो "हे काय बोलतोय.. मी तर बसलोय आणि चालतोय तू, आणि मला बोलतो मी चाललोय?" गौतम बुद्ध म्हणाले तू 100 लोकांना मारून त्यांचे बोटे गळ्यात टाकली आहे तर आता माझा मुंडकं पण कापून अटकाव गळ्यात किंवा माझी पण बोटे काप त्यानंतर तो पोहोचणार आहे का तुला जिथे जायच आहे तिथे?"


Angulimal buddhas 


 अंगुली माल आश्चर्य चकित झाला, आपल्याला सर्व घाबरतात आणि हा स्वतःहून सांगतोय मला मारून टाक म्हणून. त्याचा अहंकार दुखावल्या गेला आणि त्याला वाटत होते की 101 लोक मारल्यावर सुद्धा समाधान भेटणार नव्हते म्हणून तो गौतम बुद्ध याना शरण आला आणि बोलला."मला आपला शिष्य बनवून घ्या आणि मला मार्गदर्शन करा मी कुठे जाऊ काय करू" गौतम बुद्ध म्हणाले."तू त्या गावत जा ज्या गावातले तू 100 लोक मारले आणि तिथे भिक्षा मागून आण" अशाप्रकारे अंगुली माल सर्वात लोकप्रिय शिष्य झाला गौतम बुद्ध यांचा.


 तो जेव्हा त्या गावत साधू चे कपड़े घालून भिक्षा मागायला गेला तेव्हा त्याला बघून सगळे घाबरून पळू लागले तर काही लोक दगड मारू लागले. दगडाचा मार ने तो खाली पडला तेव्हा बुध आले आणि त्यांनी लोकांना समजावल की हा तो नहीं हा माझा शिष्य आहे. याला माराल म्हणजे मला मारल्यासारखं आहे तेव्हा लोक थांबले. अशा प्रकारे गौतम बुद्ध यांचा लोकप्रिय शिष्य अंगुली माल बनला....

Angulimal 


कशी वाटली तुम्हाला कथा नक्की कळवा... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad