Type Here to Get Search Results !

गणेश चतुर्थी 2023 : जाणून घ्या गणेशाला दुर्वा का अर्पण करतात? त्याचे कारण काय? संपूर्ण कथा

आदौ पूज्यो विनायकः । या उक्तीनुसार समस्त मंगल कार्याच्या, शुभ कार्याच्या आरंभी भगवान गणेशांची अग्रपूजा भारतीय संस्कृतीमध्ये सुप्रसिद्ध आणि प्रचलित आहे. श्री गणपती सर्वस्वरूप, परब्रह्मस्वरूप आहेत, सुपरिचित 'गणपती अथर्वशीर्ष' स्तोत्रात गणेशाची स्तुती करताना म्हटले आहे : त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वमिंद्रस्त्वं अग्निः । यातून गणपतीला 'सर्वरूप' म्हटले आहे. श्रीगणेशपुराण, मुद्गलपुराण आदि गणेशसंबंधी अनेक पुराणे व तत्संबंधी साहित्यातही श्रीगणेशाचे परब्रह्मस्वरूपच मुख्यत्वाने वर्णिले आहे. मुद्गलपुराणात श्री गणेशाला 'ओंकारस्वरूप' म्हटले आहे. गणेश चतुर्थी 2023 : गणेशाला दुर्वा का अर्पण करतात? त्याचे कारण काय ?
गणेश चतुर्थी 2023 : जाणून घ्या गणेशाला दुर्वा का अर्पण करतात? त्याचे कारण काय? संपूर्ण कथा
गणेश चतुर्थी 2023 : जाणून घ्या गणेशाला दुर्वा का अर्पण करतात? त्याचे कारण काय? संपूर्ण कथा 

गणेश चतुर्थी 2023 : गणेशाला दुर्वा का अर्पण करतात? त्याचे कारण काय ?

ॐ इति शब्दोऽभूत् स वै गजाकारः ।
भगवान गणेश सर्व विघ्नहर्ता जसे आहेत त्याबरोबरच सिद्धी बुद्धी प्रदाताही आहेत. 

श्री ज्ञानेश्वर महाराजांनी 'भावार्थदीपिका ज्ञानेश्वरी'च्या मङ्गलाचरणात हेच म्हटले आहे.
देवा तूचि गणेशु । सकलार्थमति प्रकाशु । 
म्हणे निवृत्तिदासु । अवधारिजो जी ।। 
एकूण २० ओव्यांमध्ये श्री ज्ञानदेवांनी अतिदिव्य असे शब्दब्रह्म गणेशाचे चित्र रेखाटले आहे. भारतीय संस्कृतीत घराघरातून संस्कार कार्याला प्रारंभ होतो तो गणेशाच्या प्रार्थनेने
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ । निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥
या श्लोकांत गणेशाला 'वक्रतुण्ड' या नामाने संबोधले आहे. 

'वक्रतुण्ड' का म्हणतात गणेशाला ?वक्रतुण्ड शब्दाची व्युत्पत्ती 

वक्रान् (दुष्टान्) तुण्डयति छेदयति ।
वक्र प्रवृत्तीच्या माणसांना तुण्डयति म्हणजे ताडण करतो, शिक्षा करून त्यांचे पारिपत्य करतो. म्हणजे वाईट शक्ती, वाईट प्रवृत्तीची माणसे व अंत:करणातील वक्रता म्हणजे वेडेवाकडे विचार, अनुचित वासना किंवा वाईट भाव ही वक्रता दूर करतात. अगदी भक्तांच्या अंत:करणात काही प्रमाण असलेली वक्रताही हा वक्रतुण्ड दूर करतो. बहतांशी ही वक्रता गैरसमज व अज्ञान यातून आलेली असते. अज्ञान म्हणजे सत्यासंबंधीची मूढता. 
गणेश चतुर्थी 2023 : गणेशाला दुर्वा का अर्पण करतात? त्याचे कारण काय ?
श्री ज्ञानेश्वरमहाराज यासंबंधी वर्णन करतात -
जे तुझ्याविश्वी मूढ । तयालागी तू वक्रतुण्ड ।ज्ञानियांसी तरी अखंड । उजूचि आहासी ।। १७/४
हे देवा, जे तुझ्या स्वरूपास जाणत नाहीत अशा अज्ञानांना तू वक्र व ज्ञान्यांना मात्र तू उजू म्हणजे सरळ आहेत. याचा दुसरा अर्थ जे चक्र असतात त्यांच्यासाठी देव बक्र आहे. भगवान् श्रीकृष्ण त्रिभंगी म्हणजे तीन ठिकाणी वक्र आहेत. याची दोन कारणे एक म्हणजे ते भक्तांच्या भक्तीने वाकलेले आहेत आणि दुसरे म्हणजे दुष्ट लोक जर एक पट वक्र असतील, तर प्रभु त्यांच्यासाठी तीन पट वक्र होतो हे ध्वनित करायचे आहे.
गणेश चतुर्थी 2023 : जाणून घ्या गणेशाला दुर्वा का अर्पण करतात? त्याचे कारण काय? संपूर्ण कथा, गणेश फोटो
गणेश चतुर्थी 2023 : जाणून घ्या गणेशाला दुर्वा का अर्पण करतात? त्याचे कारण काय? संपूर्ण कथा, गणेश फोटो 
गणपतीचे 'वक्रतुण्ड' हे नांव म्हणजे बक्रांचे ताडण करणे हा ज्याचा स्वभाव आणि सामर्थ्य आहे तो देव होय. पूजा, उपासना, ध्यान करताना कामानिक वक्रता असू नये. ईश्वराचे ध्यान केवळ ईश्वरासाठीच असावे, ऐश्वर्य मागणीकरिता नव्हे. नाममंत्र त्यांना व अनुसंधान मात्र कामनेचे ही वक्रता झाली. सरळ त्याचे अस्तित्व धरावे. अनुचित भाव वा कामना मनात धरून साधना करू नये.
गणेश चतुर्थी 2023 : गणेशाला दुर्वा का अर्पण करतात? त्याचे कारण काय ?
आपल्याला काय हवे असेल ते त्याला जरूर सांगावे, प्रार्थनायुक्त मागणी करावी; पण ध्यानात मात्र अनुसंधान देवाचेच असावे. आपली साधना, उपासना निर्विघ्नतेने पार पाडावी ही त्या कोटिसूर्याप्रमाणे तेजस्वी गणेशाकडे प्रार्थना करावी.

भगवान गणेशाच्या नामाचे महत्त्व

भगवान गणेशाच्या नामाचे महत्त्व एवढे अगाध आहे की, ज्याप्रमाणे अगस्ती मुनींनी गणेश नामाच्या प्रभावाने अथांग असा सागर क्षणात प्राशन केला, त्याप्रमाणे भाविकांच्या पापांचा सागरही गणेशाच्या उपासनेने नष्ट होतो. गणेश हा पूर्णब्रह्म असून ॐकार आहे. अर्थात् गणेश हा सर्व देवांचाच नव्हे तर ब्रह्माचाही पती आहे. म्हणून एका गणेशाची सर्वस्वभावाने सेवा केली तर, इतर सर्व देवांची सेवा आपोआप साधते.
अशा भगवान गणेशांच्या दिव्य लीलांचे विस्ताराने वर्णन ज्यात आले आहे अशा ग्रंथांपैकी एक श्रेष्ठ ग्रंथ म्हणजे 'श्री गणेशपुराण' होय. अठरा उपपुराणांपैकी आरंभी 'गणेश पुराण' व अंती 'मुद्गल पुराण' येते. श्री गणेश पुराणांस 'उपपुराण' म्हणतात. याचा अर्थ उपपुराण हे महापुराणाहून कमी प्रतीचे असे समजता कामा नये.
गणेश चतुर्थी 2023 : जाणून घ्या गणेशाला दुर्वा का अर्पण करतात? त्याचे कारण काय? संपूर्ण कथा
गणेश चतुर्थी 2023 : जाणून घ्या गणेशाला दुर्वा का अर्पण करतात? त्याचे कारण काय? संपूर्ण कथा, गणेश फोटो 

'उप' शब्दाचा अर्थ न्यूनतासूचक असला तरी पण कोठे 'समीपता' (जवळ) बोधक अशा अर्थी उप संज्ञा योजून श्रेष्ठत्वसूचक अर्थ सांगितला आहे. जसे इंद्र व उपेन्द्र या संज्ञा पुराणप्रसिद्ध आहेत. तेथे 'उप' शब्दाचा अर्थ श्रेष्ठत्वसूचक दाखविला आहे. कारण उपेन्द्र म्हणजे वामनावतारधारी महाविष्णू अथवा बिनायकावतारधारी गणेश; दोघेही कश्यप ऋषींचे पुत्र होत. पण इंद्राच्या मागाहून जन्मास आल्यामुळे इंद्रा धाकटे भाऊ, इतक्याच लक्षणार्थाने उपेन्द्र संज्ञेने वर्णिले गेले आहेत. परंतु सत्ता, सामर्थ्य, अधिकार, निग्रहानुग्रहन शक्ती इत्यादींचा विचार करिता ते इंद्राहून अत्यंत श्रेष्ठच ठरलेले आहेत. याच रीतीला अनुसरून गणेशपुराणाचे महत्त्व महापुराणाहून श्रेष्ठत्व सूचकच दिसते.
गणेश चतुर्थी 2023 : गणेशाला दुर्वा का अर्पण करतात? त्याचे कारण काय ?
'श्री गणेशपुराण' हे 'उपासनाखण्ड' आणि 'क्रीडाखण्ड' या दोन खंडात विभागले गेले आहे. उपासनाखण्डात गणेशद्वारा सृष्टीनिर्माण, विविध देवतांच्या द्वारा केलेले गणेशाराधन व उपासना, गणेशद्वारा शंकरास केलेला गणेशसहस्रनामोपदेश, पार्थिवपूजा, संकष्टचतुर्थी, अंगारक व्रत, दूर्वामाहात्म्य गणेशद्वाराकृत विविध लीला, असुरमर्दन इत्यादी अनेक विषयांचे वर्णन येते. उत्तरखण्डात म्हणजे क्रीडा खण्डात गणेशाने केलेले अनेक असुरांचे पारिपत्य, गणेशभक्तांच्या कथा, गणेशाच्या विविध अवतार कथा, अष्टविनायक मयुरेश अवतार कथा, एकादश अध्यायात्मक गणेश गीता आदि अनेक गोष्टींचा ऊहापोह केलेला आहे. उपासनाखण्डात ब्रह्मदेव व कृतवीर्य पिता यांच्या संवादात ६ अध्यायात दूर्वा माहात्म्य वर्णि आहे. 
कृतवीर्याच्या पित्याने ब्रह्मदेवास प्रश्न केला
दुर्वाङ्कुरार्पणस्थापि श्रोतु मिच्छामि कारणम् ।
किम गणनायस्य प्रिया दुर्वाकुरा वद ।।

गणेशाला दुर्वा का अर्पण करतात? त्याचे कारण काय ? 

यावर ब्रह्मदेव एक इतिहास सांगू लागले-
दक्षिण देशात जांब नगरात सुलभ नावाचा क्षत्रिय होता. तो आपली भार्या सुमुद्रा हिच्यासह एकदा शुचिर्भूत होऊन पुराणश्रवण करीत असता मधुसूदन नावाचा एक भिक्षेकरी ब्राह्मण तेथे आला. फाटके वस परिधान केलेल्या त्या ब्राह्मणास पाहून सुलभ क्षत्रिय हसला. तेव्हा त्या तपस्वी ब्राह्मणाने त्याला शाप दिला की, 'तू बैल होशील.' पतीला असा शाप मिळालेला पाहून सुमुद्रेने रागावून ब्राह्मणास शाप दिला की, त गाढव होशील.' हा शाप ऐकून ब्राह्मणानेही समुद्रेला उलट शाप दिला की, 'तू चांडाली हो.' परस्पर शापाशापी झाली. तिघेही अनुक्रमे बैल, गाढव, चांडाली बनली. एकदा ती चांडाली फिरत असता एका गणेशमंदिरात महोत्सव सुरू असलेला तिने पाहिला. त्याच वेळी अतिवृष्टीही सुरू झाली. तिला कुठेही आश्रय मिळेना. म्हणून ती हातात अग्नी घेऊन त्या देवळात शिरली. तिथूनही लोकांनी हाकलल्यावर बाहेर गवत पेटवून ती अंग शेकू लागली. या वेळी तिने आणलेल्या गवतातील एक दुर्वांकूर वाऱ्याने उडून गणेशाच्या मस्तकावर जाऊन पडला. गणेश चतुर्थी 2023 : जाणून घ्या गणेशाला दुर्वा का अर्पण करतात? त्याचे कारण काय? संपूर्ण कथा  योगायोगाने तो शापित बैल व गाढव तिथे येऊन तेथील गवत खाऊ लागले. त्या दोघात खाण्यासाठी भांडण सुरू झाले व यामुळे उडालेले दोन दुर्वांकूर गणेशाच्या पायावर आणि सोंडेवर जाऊन पडले. चांडालीने त्या दोघांना हाकलून काढून स्वतः गणेशाचा नैवेद्य खाल्ला. या गोंधळामुळे जाग्या झालेल्या देवळातील लोकांनी त्यांना भयंकर मारहाण केली. त्यामुळे वेदनांनी ती तिघेही किंचाळू लागली. दारे बंद असल्यामुळे त्यांना बाहेरही पडता येईना. अखेर एकेका दुर्वांकुराने संतुष्ट झालेल्या गणेशाने त्या तिघांनाही दिव्य देह देऊन विमान पाठवून स्वतःच्या स्थानाला पोचविले. या तिघांना प्राप्त झालेली सद्गती पाहून काही योग्यांनी गणेशगणांना विचारले, “आम्हाला ती गती कधी व कशी प्राप्त होईल ?" (६२)
गणेश चतुर्थी 2023 : गणेशाला दुर्वा का अर्पण करतात? त्याचे कारण काय ?
या वेळी गणांनी दूर्वांकुराचा महिमा सांगण्यास प्रारंभ केला : एकदा नारद देवराज इंद्राला भेटण्यासाठी गेले असता इंद्राने विचारल्यावरून नारदांनी दूर्वा माहात्म्य कथा सांगितली. पूर्वी स्थावर नगरात कौंडिण्य नामक एक गणेशोपासक होता. प्रतिदिवशी गणेशाला दूर्वा वाहात असता त्याच्या आश्रया नावाच्या भार्येने विचारले, "रोज ह्या गवताचा भार गणेशावर का घातला?" तेव्हा कौंडिण्य म्हणाला, 'ऐक, पूर्वी यमधर्माच्या राजसभेत नृत्य करीत असता अप्सरा तिलोत्तमेचा पदर खाली पडला. तेव्हा कामातुर होऊन लज्जित झालेला यमधर्म निघून जात असता त्याचे स्खलन झाले ते जमिनीवर पडले. त्यापासून एक आगीच्या लोळासारखा राक्षस निर्माण झाला. या अनलासुरापासून रक्षण करण्यासाठी सर्व देव गणेशाकडे गेले आणि त्यांनी त्याची स्तुती केली. तेव्हा बालरूप धारण करून गणेश त्यांच्यासमोर प्रगट झाला आणि म्हणाला, "मला, तुम्ही बळेच त्याच्यापुढे नेऊन सोडा." हे ऐकताच देवांनी त्या बालकाला अनलासुरापुढे नेऊन उभे केले. तेथे जाताच तो बालक पर्वताएवढा होऊन अनलासुरापुढे उभा ठाकला. (६३)
गणेश चतुर्थी 2023 : गणेशाला दुर्वा का अर्पण करतात? त्याचे कारण काय ?
त्या पर्वतप्राय गणेशाने अनलासुरास अगदी सहज गिळून टाकले. यानंतर गणेशाने विचार केला की, हा आपल्या उदरात असलेल्या त्रिभुवनाला जाळून टाकील. तेव्हा गणेशाच्या शांतीसाठी प्रत्येकाने काही ना काही दिले. इंद्राने चंद्र, ब्रह्मदेवाने दोन मानसकन्या, विष्णूने कमळ, वरुणाने शीतल जल, शंकराने सहस्र फणांचा नाग. इतके मिळूनसुद्धा गणेशाच्या उदरातील अनल शांत झाला नाही. मग तेथे आलेल्या ऐंशी हजार ऋषीमुनींनी प्रत्येकी एकवीस दूर्वा त्याच्या मस्तकावर ठेवल्या, तेव्हा मात्र तो गणेश शांत झाला. श्रीगणेश प्रसन्न झाला आणि तेव्हापासून गणेशाची पूजा दूर्वांकुराने सुरू झाली. गणेशाची पूजा दूर्वाशिवाय व्यर्थ आहे. या ठिकाणी देवांनी कालाजलाचे प्राशण करणारा विघ्नहर म्हणून गजाननाच्या मूर्तीची तेथे स्थापना करून त्या स्थानाला 'विजय' हे नाव दिले. (६४)
गणेशाला दुर्वा का अर्पण करतात?
यानंतर कौंडिण्याने आणखी एक दूर्वामाहात्म्य सांगितले. एकदा गजाननाचे दर्शन घेण्याकरिता नारद आले आणि त्यांनी स्वतः पाहिलेले एक आश्चर्य सांगितले. नारद म्हणाले "मिथिल देशात जनक राजा असून तो स्वतःलाच ईश्वर मानतो. त्या राजाला एका ईश्वरावाचून दुसरा कुणीही नाही, हे सिद्ध करून देईन आणि तुझा धर्म दंभमूलक आहे हे पटवून देईन असे मी बोलून आलो आहे."
गणेशाला दुर्वा का अर्पण करतात?
नारद निघून गेल्यावर गणेशाने एका रोगी माणसाचे रूप घेऊन मिथिलानगरी गाठली. जनकाच्या दारात जाऊन, 'मी बृद्ध भुकेला ब्राह्मण आहे.' असे राजास सांगितले. राजाने त्याला भोजनास वाढले. पाकशाळेतील सर्व अन्न संपले, भांडारातीलही संपले. शेवटी धान्य दिले तेही संपले. काहीही शिल्लक राहिले नाही. तेव्हा तो ब्राह्मण घरोघरी अन्नासाठी हिंडला. पण कोठेच धान्य शिल्लक नव्हते. जनकासारख्या श्रेष्ठ दात्याच्या नगरीतून अतृप्त कसा जाऊ, अशा विचारात तो विप्रवेषधारी गजानन नगरात हिंडत असता त्याला विरोचना आणि त्रिशिरस या भक्ताचे घर दिसले. (६५)
गणेश चतुर्थी 2023 : गणेशाला दुर्वा का अर्पण करतात? त्याचे कारण काय ?
त्या घरात वस्त्र, अन्न, पात्र काहीही नव्हते. केवळ पूजेसाठी आणलेल्या दुर्वांकुरांपैकी एक दूर्वांकुर
शिल्लक होता, तो त्या ब्राह्मणपत्नीने गजाननाला भक्षण करावयास दिला. त्याने त्या ब्राह्मणाचा जठराग्नी एकदम शांत झाला. खरे स्वरूप प्रगट करून गणेशाने त्या पतिपत्नीस दर्शन दिले. जो नित्य दुर्वांनी माझे अर्चन करितो त्यावर मी सदैव संतुष्ट राहीन, असा वर दिला व गजानन अदृश्य झाला. कौंडिण्य पुढे म्हणाला, 'आश्रये, असा दूर्वांकुर महिमा आहे. दूर्वांकुराचा एवढा महिमा ऐकूनही आश्रयेचे समाधान झालेले दिसेना. तेव्हा कौंडिण्याने आश्रयेला सांगितले की, "हा दुवांकुर घेऊन इंद्राकडे जा आणि तो तोलून तेवढे, सुवर्ण आण.” गण म्हणाले, “त्याप्रमाणे आश्रया दूर्वांकुर घेऊन इंद्राकडे गेली." व इंद्रास म्हणाली, “या दुर्वांकुराएवढे सोने मला तोडून द्या. जास्त कमी नको." तिला इंद्राने कुबेराकडे पाठविले, कुबेराने विस्मित होऊन तो दूर्वांकुर तोलण्यास प्रारंभ केला. पण काय ? त्याचा सारा द्रव्यकोश एका परड्यात घातला, शेवटी स्वतःला व आपल्या नगरीला पारड्यात घालून ब्रह्मादिकांचे स्मरण केले. तरीही दूर्वांकुराचे पारडे जडच राहिले. गणेश चतुर्थी 2023 : जाणून घ्या गणेशाला दुर्वा का अर्पण करतात? त्याचे कारण काय? संपूर्ण कथा  दूर्वांकुराचा हा महिमा आश्रयेने जाणला, तेव्हा श्रीगणेशाची पूजा करून तिने त्याला संतुष्ट केले. आश्रयेचे समाधान झाले. दोघांनी भक्तिभावाने गणेशाचे पूजन केले. शेवटी त्यांना सद्गती लाभली. हे आख्यान ब्रह्मदेवाच्या मुखातून कृतवर्म्याच्या पित्याने ऐकले, नंतर प्रणाम करून तो स्वस्थानी निघून गेला. श्रीगणेशपुराणाच्या उपासनाखंडात याप्रमाणे दूर्वामाहात्म्य वर्णन करत असताना शेवटी म्हटले आहे की
दुर्वेति स्मरणात् पापं त्रिविधं विलयं व्रजेत् । 
तत् स्मृतो स्मर्यते देवो यतः सोडपि गजाननः ॥
'दूर्वा' असे स्मरण करताच त्रिविध पाप लयास जाते; कारण तिच्याबरोबर गजानन देवाचेही स्मरण होते. पुष्कळ दूर्वा न मिळाल्यास एकाच दूर्वेने पूजन करावे. त्यानेही कोटीपट पूजा केली असे फळ मिळते. यानंतर श्री गणेशपुराणाच्या उत्तरार्ध क्रीडा खंडात स्वयं भगवान शंकरांनी देवी पार्वतीस गणेशास अत्यंत प्रिय अशा शमी मंदाराची श्रेष्ठता सांगितली. यासंबंधी एक छोटा इतिहासही सांगितला; तो असा -
गणेश चतुर्थी 2023 : जाणून घ्या गणेशाला दुर्वा का अर्पण करतात? त्याचे कारण काय? संपूर्ण कथा
गणेश चतुर्थी 2023 : जाणून घ्या गणेशाला दुर्वा का अर्पण करतात? त्याचे कारण काय? संपूर्ण कथा, गणपती फोटो 
पूर्वी प्रियव्रत नावाचा एक राजा होता. त्याला कीर्ति आणि प्रभा अशा दोन स्त्रिया होत्या. पण राजा प्रभेच्या पूर्ण आहारी गेला, प्रभेने सवतीमत्सराने कीर्तिला अपमानित करून लाथ मारून बाहेर काढले, तेव्हा ती माहेरी गेली. तेथे आलेल्या देवल नावाच्या ऋषींनी तिला गजाननाची उपासना सांगितली. त्याप्रमाणे तिने गणेशमूर्तीची स्थापना करून स्तुतीसह पूजा केली.

एकदा कीर्तिच्या सख्यांना पूजेसाठी दूर्वा मिळाल्या नाहीत, तेव्हा त्यांनी शमीची पाने आणली. कीर्तिने शमीच्या पत्रांनी निष्ठेने पूजा केली. शमीपत्राच्या पूजनाने गणेश परम संतुष्ट झाला. रात्री स्वप्नात दर्शन दिले व दृष्टान्त देऊन सांगितले की, तुझ्या पूजनाने मी प्रसन्न झालो आहे. मी तुला वर देतो, 'तू पतिप्रिया होशील. तुला एक सुंदर पुत्र होईल. पण चौथ्या वर्षी तो विषप्रयोगाने मरेल; पण गृत्समद येऊन त्याला पुनरुज्जीवित करेल.'
गणेश चतुर्थी 2023 : गणेशाला दुर्वा का अर्पण करतात? त्याचे कारण काय ?
कीर्तिला परमानंद झाला, कालांतराने प्रियव्रत राजाची आवडती राणी प्रभा निस्तेज झाली आणि तिला रक्तपिती झाली. पुढे गणेशाच्या प्रेरणेने तो राजा कीर्तीच्या घरी गेला आणि तिच्या अधीन झाला. यथाकाल तिला पुत्र झाला. गणेशाच्या आज्ञेनुसार कीर्तिने त्याचे नांव 'क्षिप्रप्रसादन' असे ठेवले. असूयेने प्रभेने तिच्या पुत्रावर विषप्रयोग केला. कीर्ति आपल्या मृत पुत्राला घेऊन वनात जाऊन शोक करीत असता तेथे गृत्समद मुनी आले. त्याने तिचे सांत्वन केले आणि सांगितले की,
अज्ञानतः शमीपत्रे सत्वयाऽपूजि विनायकः । तत्पुण्यमस्य हस्तेत्वमर्पयस्व ममाज्ञया ।। तत्पुण्यप्रसादादायु सुत उत्थास्यति तवाधुना ।
“हे देवी पुत्र जिवंत होण्याचा उपाय सांगतो. अज्ञानाने शमीपत्राच्या योगे तू गजाननाची पूज केलीस. ते पुण्य माझ्या आज्ञेने याच्या हातावर सोड. म्हणजे त्या प्रसादामुळे हा तुझा पुत्र ऐकून हर्षयुक्त झालेल्या कीर्तिने शमीपत्राने केलेल्या पूजेचे फळ त्यास दिले. तेव्हा अमृतवृष्टी केल्याप्रमाणे उठेल. तिचा पुत्र उठला. तेव्हा अत्यानंदाने तिने मुनीच्या चरणी मस्तक ठेवले, शमीचा प्रभाव जाणून तिने मुनींना शमीचे माहात्म्य सांगण्याविषयी प्रार्थना केली.
गणेश चतुर्थी 2023 : जाणून घ्या गणेशाला दुर्वा का अर्पण करतात? त्याचे कारण काय? संपूर्ण कथा
गणेश चतुर्थी 2023 : जाणून घ्या गणेशाला दुर्वा का अर्पण करतात? त्याचे कारण काय? संपूर्ण कथा, गणेश फोटो 

गृत्समद कीर्तिला सांगू लागले एकदा नारद इंद्राकडे आले असता इंद्राने औस्वासंबंधी हकिकत त्यांना विचारली. तेव्हा नारद म्हणाले, "मालव देशात औरव नावाचा एक तपस्वी ब्राह्मण राहात होता. त्याची सुमेधा नावाची पत्नी होती. त्यांना शमिका नावाची एक कन्या झाली. उपवर झाल्यावर औरवाने वेदशास्त्र पारंगत अशा धौम्यपुत्र मंदारास आपली कन्या विधिवत् विवाह करून समर्पित केली. एकदा हे नवदांपत्य आपल्या आश्रमात आनंदाने क्रीडा करीत असताना तिथे गणेशभक्त भ्रुशुंडी ऋषींचे आगमन झाले. भुशुंडींना गणेशाच्या अखंड तपस्येने भ्रमध्यात सोंड फुटली होती. ते विलक्षण रूप पाहून हसू लागले. तेव्हा भ्रुशुंडीने त्या दोघांना शाप दिला की, तुम्ही दोघेही निर्जन अरण्यात वृक्षयोनीत जन्म घ्याल." दोघांनी खूप क्षमायाचना केली. तेव्हा ऋषींनी उ:शाप दिला. तुम्ही दोघांनी माझी शुंडा पाहून मूर्खपणामुळे हास्य केले; पण हा शुंडायुक्त देवाधिदेव जेव्हा प्रसन्न होईल तेव्हा तुम्हांस पूर्वीचे रूप प्राप्त होईल." यानंतर मुनी निघून गेले. शापानुसार मंदार बाह्मण मन्दार वृक्ष झाला व शमिका सर्व बाजूंनी काटे असलेली शमी बनली. ते दोन्ही वृक्ष मुनींच्या वाक्यामुळे प्राण्यांनी वर्ज्य केले. अनेक महिने गेले, मुलांचा शोध लागेना. औरव व शौनक यांनी आपल्या पुत्रांचा खूप शोध घेतला. शेवटी ध्यान करून सर्व वृत्त जाणले. त्यांना अत्यंत वाईट वाटले. पुढे औरवाने आपल्या कन्येसाठी आणि शौनकाने आपल्या शिष्यांसाठी बारा वर्षे गणेशोपासना केली. त्या दोघांची तपस्या पाहून सूर्यकोटिसमान भगवान् गणेश प्रसन्न झाले. दोघांनी स्तवन केले. तेव्हा संतुष्ट होऊन गणेश म्हणाले, 'हे ब्राह्मणहो, जे संभवनीय नाही असा वर मी कसा देऊ. भ्रुशुंडी माझा भक्त आहे. भक्ताचे वचन मी पूर्ण करणारच. तरी पण संतुष्ट होऊन मी तुम्हास बर देतो-
अद्यप्रभृति मन्दार मूलं स्थास्यामि निश्चलः । मृत्युलोके स्वर्गलोके मान्योऽयं च भविष्यति ॥ मन्दारमूलैर्मे मूर्ति कृत्वा यः पूजयेन्नरः । शमीपत्रैश्च दूर्वा मिस्त्रितयं दुर्लभं भुवि ।। क्रीडाखंड ३५-१८/२
आजपासून मी मन्दार वृक्षाच्या मुळाशी राहीन. स्वर्ग व पृथ्वीवर हा वृक्ष मान्य होईल. माझी मूर्ती मंदाराच्या मुळाशी करून जो शमी व दूर्वेने तिची पूजा करतो तो पुण्यवान होय. कारण या तिघांचा संयोग भूलोकी दुर्लभ होय. हे मुनींनो, शमीच्या ठिकाणी माझे अधिष्ठान नेहमी राहील. तुमचेकरिता हाच दुर्लक्ष बर मी या दोन वृक्षांना दिला आहे. दूर्वा नसेल तर मंदार व दोन्ही नसतील तेव्हा मला शमी प्रिय आहे. शमीपत्राने पूजा केल्याने जे पुण्य लागते, ते हे द्विजांनो यज्ञ, तीर्थ, व्रतादींनीही मिळत नाही. गणेश चतुर्थी 2023 : जाणून घ्या गणेशाला दुर्वा का अर्पण करतात? त्याचे कारण काय? संपूर्ण कथा 
नाहं प्रीये धनकनकचयै नन्निदानैर्नवस्त्रे- नीनापुष्पैर्नच मणिगणेनैव मुक्ताफलैश्च । यद्वच्छम्यादलनिचयकृतैः पूजनैर्ब्राह्मणानां मन्दाराणां कुसुमनिचयैः सर्वकालं मुनीन्द्रौ ।। ३५/२४
'हे मुर्नीद्रांनो, ब्राह्मणांनी शमीपत्र व मंदार पुष्पे यांनी केलेल्या पूजेने मी जसा संतुष्ट होतो तसा धन, सुवर्णाचे ढीग, अन्नदान, वस्त्रे, पुष्पे, मणी, मोती यांचे योगाने मी संतुष्ट होत नाही.' सकाळी शमीचे दर्शन, वंदन, पूजन करणाऱ्यास संकट रोग, विघ्न व बंधन प्राप्त होत नाही.
गणेश चतुर्थी 2023 : गणेशाला दुर्वा का अर्पण करतात? त्याचे कारण काय ?
भगवान शंकरांनी माता पार्वतीस हे शमी मंदार माहात्म्य सांगितले. तेच ब्रह्मदेवाने गृत्समदास सांगितले. भगवान गणेशाचा महिमा अगाध आहे. त्रिपुरासुर वधप्रसंगी शंकरांकडून गणेशाचे पूजन न करता युद्धाला जाणे झाले. त्यामुळे त्यांना विजय प्राप्त करता येईना. जेव्हा गणेशाराधन केले त्या वेळी विजयप्राप्ती झाली. अशा विघ्नहर्ता सकळ सिद्धिप्रदाता गजाननाचे नित्य स्मरण पूजन करणाऱ्यास सर्व कार्यात सफलता प्राप्त होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad