Type Here to Get Search Results !

श्रावण अजा एकादशी : व्रत कथा, एकादशी महात्म्य, फल | Aja Ekadashi vrat katha, Ekadashi September 2023

श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षात येणारी एकादशी म्हणजे अजा एकादशी. या वर्षी अजा एकादशी 10 सप्टेंबर 2023 रोजी आहे. अजा एकादशीची व्रत कथा व महात्म्य या लेखात आपणास वाचायला मिळेल. 

श्रावण अजा एकादशी : व्रत कथा, एकादशी महात्म्य, फल | Aja Ekadashi vrat katha Ekadashi September 2023
श्रावण अजा एकादशी : व्रत कथा, एकादशी महात्म्य, फल | Aja Ekadashi vrat katha, Ekadashi September 2023


श्रावण अजा एकादशी : व्रत कथा, एकादशी महात्म्य, फल | Aja Ekadashi vrat katha, Ekadashi September 2023

धर्मराज युधिष्ठिरांनी विचारले : हे जनार्दन ! श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षात कोणती एकादशी येते, तिचा विधी कसा आहे हे सविस्तर सांगण्याची कृपा करावी.


भगवान श्रीकृष्ण म्हणाले : राजन् ! लक्षपूर्वक ऐका. श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षात ‘अजा' एकादशी येते. ती सर्व पापांचा नाश करणारी आहे. वैकुंठपती श्रीहरींची पूजा करून जो हे एकादशी व्रत करतो तो सर्व प्रकारे निष्पाप होतो.

श्रावण अजा एकादशी : व्रत कथा, एकादशी महात्म्य, फल | Aja Ekadashi vrat katha, Ekadashi September 2023

प्राचीन काळी हरिश्चंद्र नामक एक प्रसिद्ध चक्रवर्ती राजा होऊन गेले. ते संपूर्ण भूमंडळाचे स्वामी आणि सत्यनिष्ठ होते. एकदा एका कर्माच्या फळभोगामुळे त्यांना राज्यापासून वंचित व्हावे लागले आणि आपल्या पत्नीला व मुलालाही विकावे लागले. नंतर त्यांनी स्वतःलाही एका चांडाळाला विकले. पुण्यात्मा असूनही त्यांना चांडाळाचे दास्यत्व पत्करावे लागले. ते स्मशानातील मृतदेहांवरची प्रेतवस्त्रे घेत असत. अशा स्थितीतही नृपश्रेष्ठ हरिश्चंद्र सत्यापासून ढळले नाही. अशा प्रकारे चांडाळाचे दास्यत्व करीत करीत अनेक वर्षे निघून गेली. यामुळे राजाला खूप चिंता वाटू लागली. ते अतिशय दुःखी होऊन विचार करू लागले की 'मी काय करू ? कोठे जाऊ ? माझा उद्धार कसा होईल ?' अशा प्रकारे चिंता करीत ते शोकसागरात बुडून गेले.

श्रावण अजा एकादशी : व्रत कथा, एकादशी महात्म्य, फल | Aja Ekadashi vrat katha, Little Baby Krishna Images
अजा एकादशी : व्रत कथा, एकादशी महात्म्य, फल | Aja Ekadashi vrat katha, Little Baby Krishna Images, Ekadashi September 2023


त्यांची अशी शोकातुर अवस्था जाणून महर्षी गौतम त्यांच्याकडे गेले. महर्षीना आपल्याकडे आल्याचे पाहून त्यांनी महर्षीच्या श्रीचरणी नमस्कार केला आणि हात जोडून नम्रपणे आपला संपूर्ण दुःखद वृत्तांत सांगितला. त्यांची हकिगत ऐकून महर्षी गौतम म्हणाले : "राजन् ! श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षात अत्यंत कल्याणकारक 'अजा एकादशी येत आहे, ती पुण्य प्रदान करणारी आहे. या एकादशीचे व्रत करा. यामुळे पापांचा अंत होईल. तुमच्या सुदैवाने आजपासून सातव्या दिवशी ही एकादशी आहे. त्या दिवशी उपवास करून रात्री जागरण करा.' "

श्रावण अजा एकादशी : व्रत कथा, एकादशी महात्म्य, फल | Aja Ekadashi vrat katha, Ekadashi September 2023

असे सांगून महर्षी गौतम अंतर्धान पावले. महर्षीच्या उपदेशानुसार हरिश्चंद्र राजांनी विधिवत् एकादशी व्रत केले. व्रताच्या प्रभावाने राजा सर्व दुःखांतून मुक्त झाले. त्यांना त्यांची पत्नी पुन्हा भेटली आणि त्यांच्या मृत पुत्रास जीवनदान मिळाले. तेव्हा आकाशात दुंदुभी वाजली आणि स्वर्गातून पुष्पवृष्टी होऊ लागली.

श्रावण अजा एकादशी : व्रत कथा, एकादशी महात्म्य, फल | Aja Ekadashi vrat katha, Krishna Beautiful Images
अजा एकादशी : व्रत कथा, एकादशी महात्म्य, फल | Aja Ekadashi vrat katha, Krishna Beautiful images 

श्रावण अजा एकादशी : व्रत कथा, एकादशी महात्म्य, फल | Aja Ekadashi vrat katha 

एकादशी व्रताच्या प्रभावाने राजाला निष्कंटक राज्य प्राप्त झाले आणि शेवटी ते नगरवासी व आप्तजनांसह स्वर्गात गेले.

युधिष्ठिर ! जे या एकादशीचे व्रत करतात, ते सर्व पापांतून मुक्त होऊन स्वर्गात जातात. या माहात्म्याच्या पठण व श्रवणाने अश्वमेध यज्ञाचे  पुण्यफळ मिळते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad