श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षात येणारी एकादशी म्हणजे पुत्रदा एकादशी. या वर्षी पुत्रदा एकादशी 27 ऑगस्ट 2023 रोजी आहे. पुत्रदा एकादशीची व्रत कथा व महात्म्य या लेखात आपणास वाचायला मिळेल.
श्रावण पुत्रदा एकादशी : व्रत कथा, महात्म्य मराठीमध्ये | Putrada Ekadashi in information in marathi | |
मानव-जीवनाचा मुख्य उद्देश परमात्मप्राप्ती हाच आहे. शारीरिक, मानसिक व बौद्धिकदृष्ट्या संपन्न मनुष्यच भोग आणि मोक्ष प्राप्त करतो. यात विधिवत् केलेल्या एकादशी आणि व्रतोपवासांची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. मनुष्याच्या सर्वांगीण उन्नतीचे सोपान यात समाविष्ट आहेत. एकादशीच्या उत्पत्तीचा प्रसंग जितका रोचक आहे, एकादशी माहात्म्याचे वर्णन करणाऱ्या कथासुद्धा तितक्याच आनंददायक आहेत. शुक्ल व कृष्ण पक्षांतील सर्व एकादशी व्रतांचे शास्त्रीय विवेचन आपणास या वेबसाईटवर वाचायला मिळेल.
श्रावण पुत्रदा एकादशी : व्रत कथा, महात्म्य मराठीमध्ये | Putrada Ekadashi in information in marathi |
धर्मराज युधिष्ठिरांनी विचारले : मधुसूदन ! श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षात कोणती एकादशी येते, तिचा विधी कसा आहे हे सविस्तर सांगण्याची कृपा करावी.
भगवान श्रीकृष्ण म्हणाले : राजन् ! प्राचीन काळातील गोष्ट आहे. द्वापर युगाच्या प्रारंभीचा काळ होता. माहिष्मतीपूरच्या महीजित राजाला संतती नसल्याने त्यांचे राज्य त्यांना सुखद वाटत नव्हते. स्वतःची बिकट अवस्था पाहून त्यांना खूप चिंता वाटू लागली. एकदा ते प्रजेला म्हणाले : “प्रजाजनहो! या जन्मात माझ्याकडून कोणतेही पापकर्म झालेले नाही. मी राजकोषात केवळ न्यायोपार्जित धनच संग्रहित केलेले आहे. ब्राह्मण आणि देवतांचे धनदेखील मी कधी घेतले नाही. प्रजेचे पुत्रवत् पालन केले आहे. धर्माचरणाने पृथ्वीवर राज्य केले आहे. दुष्टांना, मग ते बंधू वा मुलांसारखे असले तरी त्यांना शिक्षा केली आहे. विद्वान पुरुषांचा सदैव सन्मान केला आहे आणि कोणाचाही द्वेष केला नाही. मग कोणत्या कारणास्तव आजपर्यंत मला संतती झाली नाही ? यावर तुम्ही विचार करावा.
श्रावण पुत्रदा एकादशी : व्रत कथा, महात्म्य मराठीमध्ये | Putrada Ekadashi in information in marathi | |
राजाचे हे उद्गार ऐकून प्रजाजन, ब्राह्मण व पुरोहित राजाच्या हिताचा विचार करून घनदाट जंगलात गेले. राजाचे कल्याण इच्छिणारे ते सर्वजण जंगलात फिरून ऋषी-मुनींच्या आश्रमांचा शोध घेऊ लागले. एवढ्यात त्यांना मुनिश्रेष्ठ लोमश मुनींचे दर्शन झाले.
श्रावण पुत्रदा एकादशी : व्रत कथा, महात्म्य मराठीमध्ये | Putrada Ekadashi in information in marathi |
लोमश मुनी धर्माचे तत्त्वज्ञ, सर्व शास्त्रांमध्ये पारंगत, दीर्घायुषी आणि महात्मा आहेत. ते ब्रह्मदेवांसमान तेजस्वी आहेत. त्यांच्या शरीरावर लव आहेत. एकेक कल्प पूर्ण झाल्यावर त्यांच्या शरीरावरील एकेक लव भंगतो, गळून पडतो. म्हणून त्यांचे नाव 'लोमश' पडले. ते महामुनी त्रिकाळज्ञानी आहेत. त्यांच्या दर्शनाने सर्वांना अत्यानंद झाला. त्या लोकांना पाहून लोमश मुनींनी विचारले : "तुम्ही सर्वजण येथे कशासाठी आला आहात ? येथे येण्याचे कारण सांगावे. तुम्हा लोकांसाठी जे हितकर कार्य असेल, ते मी अवश्य करेन."
श्रावण पुत्रदा एकादशी : व्रत कथा, महात्म्य मराठीमध्ये | Putrada Ekadashi in information in marathi | |
प्रजाजन म्हणाले : ब्रह्मन् ! महीजित राजांना संतती नाही. आम्ही त्यांचीच प्रजा आहोत. त्यांनी आमचे पुत्रवत् पालन केले आहे. ते निपुत्रिक असल्याने त्यांच्या दुःखामुळे व्यथित होऊन आम्ही तपश्चर्या करण्याचा दृढ निश्चय करून येथे आलो आहोत. द्विजोत्तम ! राजाच्या सद्भाग्याने यावेळी आम्हाला आपले दर्शन झाले. महापुरुषांच्या दर्शनानेच मनुष्यांची सर्व कार्ये सफल होतात. मुनी ! आता आम्हाला असा उपदेश द्यावा, जेणेकरून राजाला पुत्रप्राप्ती होईल.
श्रावण पुत्रदा एकादशी : व्रत कथा, महात्म्य मराठीमध्ये | Putrada Ekadashi in information in marathi |
हे ऐकून लोमश महर्षी दोन घटिका ध्यानमग्न झाले. त्यानंतर राजाच्या पूर्वजन्मीचा वृत्तांत जाणून ते म्हणाले : "प्रजाजनहो! ऐका. महीजित राजा पूर्वजन्मी लोकांचे शोषण करणारा एक निर्धन वैश्य होता. तो वैश्य गावोगावी फिरून व्यापार करीत असे.
श्रावण पुत्रदा एकादशी : व्रत कथा, महात्म्य मराठीमध्ये | Putrada Ekadashi in information in marathi | |
एके दिवशी ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील दशमीला मध्यान्हीचा सूर्य तळपत असताना तो एका गावाच्या सीमेजवळील विहिरीवर पोहोचला. पाण्याने भरलेली पायऱ्यांची विहीर पाहून त्याने पाणी पिण्याचा विचार केला. इतक्यात तेथे वासरासह एक गायसुद्धा आली. ती तहानेने व्याकूळ व उन्हामुळे त्रस्त झाली होती, म्हणून विहिरीत उतरून पाणी पिऊ लागली. वैश्याने पाणी पित असलेल्या गाईला हाकलले आणि स्वतः पाणी पिऊ लागला. त्याच पापकर्मामुळे राजा या जन्मी निपुत्रिक आहे आणि त्याही पूर्वीच्या एका जन्मातील पुण्याईमुळे राजाला या जन्मी निष्कंटक राज्य मिळाले आहे."
श्रावण पुत्रदा एकादशी : व्रत कथा, महात्म्य मराठीमध्ये | Putrada Ekadashi in information in marathi | |
प्रजाजन म्हणाले : मुनीश्वर ! पुराणांमध्ये उल्लेख येतो की प्रायश्चित्तरूपी पुण्यामुळे पापे नष्ट होतात. म्हणून अशा एखाद्या पुण्यकर्माचा उपदेश द्यावा, जेणेकरून त्या पापाचा नाश होईल.
श्रावण पुत्रदा एकादशी : व्रत कथा, महात्म्य मराठीमध्ये | Putrada Ekadashi in information in marathi |
लोमश मुनी म्हणाले : प्रजाजनहो ! श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षात जी एकादशी येते, ती 'पुत्रदा' नावाने प्रसिद्ध असून इच्छित फळ देणारी आहे. तुम्ही तिचेच विधिवत् व्रत करा.
हे ऐकून प्रजाजनांनी मुनींना नमस्कार केला आणि नगरात येऊन पुत्रदा एकादशीचे विधिवत् व्रत केले. त्या दिवशी त्यांनी जागरणसुद्धा केले आणि त्याचे पुण्य राजाला अर्पण केले. त्यानंतर राणी गर्भवती झाली. कालांतराने तिने एका सुदृढ पुत्राला जन्म दिला.
श्रावण पुत्रदा एकादशी : व्रत कथा, महात्म्य मराठीमध्ये | Putrada Ekadashi in information in marathi | |
श्रावण पुत्रदा एकादशीचे माहात्म्य ऐकून मनुष्य सर्व पापांतून मुक्त होतो आणि इहलोकी सुखी होऊन परलोकी स्वर्गीय गती प्राप्त करतो.