Type Here to Get Search Results !

आषाढी एकादशी: पंढरपूर व पांडुरंगा बद्दल ही माहिती ज्ञात आहे का तुम्हाला? Ashadi ekadashi 2023

*नवीन पिढीतील किती मंम्मी/डॅडी अन् त्यांच्या किड्स ना निदान जनरल नाॅलेज म्हणून हे माहित असेल ?* 😞

*जय हरि..!!* 
  • १] पंढरपूर कोणत्या जिल्ह्यात आहे = सोलापूर
  • २] पंढरपूरस्थित मंदिराचे नाव = श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर
  • ३] विठ्ठल कुणाचे देवरूप आहे = श्री विष्णू (कृष्ण)
  • ४] विठोबा द्वापारयुगामध्ये कितवा अवतार मनाला जातो = दुसरा
  • ५] त्याला दशावतारातील कितवा अवतार मानले जाते = नववा
  • ६] शास्त्र पुराणातील विठ्ठलाचे नाव = बौद्ध/बोधराज
  • ७] महाराष्ट्रातील विठ्ठलभक्त संप्रदाय = वारकरी
  • ८] कर्नाटलातील विठ्ठलभक्त संप्रदाय = हरिदास
  • ९] विठ्ठलमंदिर कोणत्या नदीकाठी वसले आहे = भीमा
  • १०] या नदीला या ठिकाणी कोणत्या नावाने ओळखतात = चंद्रभागा
  • ११] विठ्ठलाला कशाचा हार घातला जातो = तुळशी व मंजिरी
  • १२] तुळस हे कोणाचे प्रतिक मानले जाते = श्री लक्ष्मी
  • १३] मुख्य मंदिराची निर्मिती कोणत्या शतकात झाली असावी = १२ वे शतक
  • १४] कोणी केली/कोणाच्या कालखंडात झाली असावी = देवगिरीचे यादव प्रशासक
  • १५] विठ्ठलाचे पंचाक्षरी नाव = पंढरीनाथ
  • १६] पंढरपूर चे मूळ कानडी नाव = पंडरगे
  • १७] त्यावरून विठ्ठलाला हे नाव पडले = पांडुरंग
  • १८] त्या शब्दाचा अर्थ काय/म्हणजे कोणता रंग = शुभ्र रंग
  • १९] विठ्ठलाच्या गळ्यातील हार कसला बनविलेला आहे = कौस्तुभमणी
  • २०] विठ्ठलाला विटेवर उभे करणारा भक्त कोण = भक्त पुंडलिक
  • २१] विठ्ठल किती काळ विटेवर उभा आहे = २८ युगे
  • २२] संत ज्ञानेश्वरांनी विठ्ठलाची कोणती 2 विशेषणे वापरली आहेत = कानडा व कर्नाटकु
  • २३] श्री विष्णूच्या 24 अवतारात किंवा सहस्त्रनामात उल्लेख नसल्यामुळे संत मंडळी त्याला कोणत्या 2 शब्दांनी संबोधतात = चोविसावेगळा व सहस्त्रांआगळा
  • २४] वारकरी संप्रदायाचे दुसरे नाव = विठ्ठलसंप्रदाय
  • २५] वर्षभरातील 2 प्रमुख वाऱ्या कोणत्या = आषाढी व कार्तिकी एकादशी

आषाढी एकादशी: पंढरपूर व पांडुरंगा बद्दल ही माहिती ज्ञात आहे का तुम्हाला? Ashadi ekadashi 2023
आषाढी एकादशी: पंढरपूर व पांडुरंगा बद्दल ही माहिती ज्ञात आहे का तुम्हाला? Ashadi ekadashi 2023


*विठ्लाचे नामस्मरण करा।आनंदी व सुखात रहावे आपल्या घरा।।*

. -:🛑:- आषाढ महिना माहिती -:🛑:-


  1. || भारतीय पंचागांनुसार आणि मराठी कॅलेंडरनुसार 
  2. || आषाढ हा चौथा महिना आहे. सूर्य ज्यावेळी कर्क राशीत 
  3. || प्रवेश करतो त्यावेळी हिंदू पंचांगातील आषाढ हा महिना 
  4. || सुरु होतो. आषाढ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेच्या दरम्यान 
  5. || पूर्वाषाढ आणि उत्तराषाढ येते म्हणून याला ‘आषाढ’ असे 
  6. || नाव पडल्याचे सांगितले जाते. 

-:🛑 आषाढ महिन्यात काय करावे ? :------------ 


  • || आषाढ महिन्यात सर्वात विशेष दिवस म्हणजे आषाढी 
  • || एकादशी येते. या निमित्ताने उपवास केला जातो आणि 
  • || देवाची आराधना केली जाते. धार्मिक ग्रंथानुसार आषाढ 
  • || महिन्यात संत आणि ब्राह्मणांना खटाळ, छत्री, मीठ आणि 
  • || आवळ्याचे दान करावे. हे दान केल्याने भगवान वामन 
  • || प्रसन्न होतात. ते भगवान विष्णूचे अवतार मानले जातात. 
  • || या महिन्यात त्यांची विशेष पूजा करावी.
  •  
  • || आषाढ महिन्यात सूर्यदेवाची पूजा करण्याचाही नियम 
  • || आहे. ज्या लोकांच्या कुंडलीत सूर्य अशुभ आहे त्यांनी 
  • || या महिन्यात गहू, लाल चंदन, गूळ आणि तांब्याचे भांडे 
  • || लाल कपड्यात ब्राह्मणांना दान करावे. यामुळे सूर्यदेव 
  • || प्रसन्न होतात. या महिन्याच्या प्रत्येक रविवारी जेवणात 
  • || मीठ वापरू नये.

  • || आषाढ महिना यज्ञ आणि धार्मिक विधी करण्यासाठी 
  • || शुभ आहे. वर्षातील १२ महिन्यांमध्ये आषाढ महिना हा 
  • || एकमेव महिना आहे, ज्यामध्ये यज्ञ केल्याने त्याचे फळ 
  • || लवकर प्राप्त होते. एवढेच नाही तर यासोबतच जीवनात 
  • || सुख-समृद्धीचे आगमन होते.
 

-:🛑 आषाढात येणारे सण :------------ 


  • || आषाढ महिन्यात अनेक मराठी सण साजरे केले जातात. 
  • || या काळात देवशयनी आषाढी एकादशी येते. 
  • || वारकऱ्यांसाठी हे दिवस अत्यंत पवित्र असल्याचे मानले 
  • || जाते. या काळात अनेक ठिकाणांहून पंढरपूर कडे वारी 
  • || निघते. 
  •  
  • || आषाढ महिन्यात दुसरा महत्वाचा सण म्हणजे गुरु 
  • || पौर्णिमा. या दिवशी गुरुंची पूजा केली जाते. हा दिवस 
  • || महर्षी व्यास यांचा जन्मदिवस म्हणून देखील ओळखला 
  • || जातो.
  •  
  • || आषाढ महिन्यात इतर अनेक उपवास आणि सण 
  • || साजरे केले जातात, त्यामुळे हा महिना पूजेसाठी 
  • || आणखीनच खास आहे. कांदे नवमी, आषाढी एकादशी, 
  • || वासुदेव द्वादशी, गुरु पौर्णिमा, मौना पंचमी, कामिका 
  • || एकादशी, दिव्याची आवस सण येत असून या दरम्यान 
  • || विधीपूर्वक पूजा-व्रत- पाठ केल्यास देव प्रसन्न होऊन 
  • || आशीर्वाद देतात.
  •  
  • || आषाढ महिन्यात स्नानासोबतच दानधर्मालाही विशेष 
  • || महत्त्व आहे. आपल्या क्षमतेनुसार आषाढ महिन्यात 
  • || गरजूंना दान आणि दक्षिणा द्या. आषाढ महिन्यात छत्री, 
  • || आवळा, चप्पल आणि मीठ इत्यादी दान करणे श्रेष्ठ 
  • || मानले जाते. असे केल्याने भगवान विष्णूची कृपा राहते 
  • || आणि साधकही भाग्यवान होतो असे म्हणतात.

  • || शुक्रवार :--- { २३ / ०६ / २०२३ } !............
*श्री स्वामी समर्थ*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad